Sunday, 6 September 2026

आरंभ-स्वर १६ : नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए (S. D. Burman, Shailendra and Lata)

“नैन खोये खोये तेरे…” — प्रेमाची लाजरी, खट्याळ आणि मधुर कबुली!

चित्रपट: मुनिमजी (१९५५) | गीतकार: शैलेंद्र | संगीतकार: सचिनदेव बर्मन | गायिका: लता मंगेशकर

हिंदी चित्रसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयप्रतिभेची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मराठी नावांची एक प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा आहे. दुर्गा खोटे, ललिता पवार, शांता आपटे, शोभना समर्थ, लीला चिटणीस, सुलोचना, शशिकला, उषा किरण, नूतन, संध्या, बेबी नंदा, तनुजा, स्मिता पाटील आणि माधुरी दीक्षित ही त्यातील काही ठळक नावे. आपल्या सौंदर्याने, व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाच्या सामर्थ्याने या सर्वांनी हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध करत तिच्या वैभवात मोलाची भर घातली. (संदर्भ: विकिपीडिया)

याच परंपरेतील एक लक्षणीय नाव म्हणजे नलिनी जयवंत. १९४१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या नलिनी जयवंत यांनी साठहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. त्यापैकी सुमारे बारा चित्रपटांत त्यांनी तब्बल ३५-४० गाणी पडद्यावर साकारली आहेत. (संदर्भ: विकिपीडिया) शिरीष कणेकर यांनी त्यांचे केलेले वर्णन अगदी समर्पक आहे—“लाखों में एक अशी लोभसवाणी सूरत आणि विलक्षण बोलका चेहरा लाभलेली” अभिनेत्री! काला पानी (१९५८) मधील किशोरीची भूमिका आणि त्यांच्यावर चित्रित झालेले “नज़र लागी राजा तोरे बंगले पर” हे गाजलेले गीत यामुळे त्या रसिकांच्या विशेष स्मरणात राहिल्या.

आता वळूया आजच्या गीताकडे.

मुनिमजी (१९५५) मध्ये एकूण दहा गाणी असून सचिनदेव बर्मन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने ती सजली आहेत. पाच गाणी साहिर लुधियानवी यांनी, तर पाच शैलेंद्र यांनी लिहिली. लताची पाचही गाणी सोलो आहेत. “जीवन के सफर में राही” हे किशोरकुमारचे गीत प्रचंड लोकप्रिय झाले, तर “घायल हिरनीया मैं बन बन डोलूं” हे लताच्या शास्त्रीय संगीतावरील प्रभुत्वाचे सुंदर उदाहरण आहे. एक गंमतीदार बाब म्हणजे संगीतकार मदनमोहन यांनीही या चित्रपटात अभिनेता म्हणून भूमिका केली आहे!

आजचे गीत नलिनी जयवंत आणि देव आनंद अभिनित मुनिमजी मधील असले तरी ते नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित झालेले नाही. ते अमिता हिच्यावर चित्रित झाले आहे. १९५२ ते १९७३ या २१ वर्षात अमिताने एकूण ४९ चित्रपटात काम केले. पण ती नावारूपाला आली ती तुमसा नहीं देखा मध्ये शम्मी कपूरची नायिका म्हणून. 


या गीताची खरी गंमत मात्र बर्मनदांच्या संगीतकलेत आहे. त्यांनी चालीत लोकसंगीताचा बाज इतक्या सहजतेने आत्मसात केला आहे की ते एखादे अस्सल लोकगीतच असावे असे वाटते. चालीतील सहजता, लयीतील ठेका आणि तिच्यातील खट्याळ लावणीचा स्पर्श गाण्याला विलक्षण चैतन्य देतो. त्याला अनुरूप अशी नृत्यरचनाही मोहक आहे. संगीत आणि नृत्य यांचा मेळ इतका नैसर्गिक आहे की आधी चाल तयार झाली की नृत्य, की आधी नृत्य आणि मग चाल—हा प्रश्न पडतो!

ढोलकी, तबला, घुंगरू, बासरी आणि बहुधा मेंडोलिन यांची साथ, तसेच बर्मनदांनी केलेला मोजका पण परिणामकारक कोरस, गाण्याला प्रसन्न आणि उत्साही रंग देतो.

आणि या सगळ्यावर कळस चढवतात शैलेंद्रांचे शब्द!

प्रेमाची कबुली देताना ते मोठमोठे शब्द वापरत नाहीत; उलट डोळे, ओठ, लाजरे कटाक्ष आणि मनातील गुपित हालचाली यांतून प्रेमाचे विविध रंग उलगडतात—

“नैन खोये खोये तेरे,
दिल में भी कुछ होये…”

डोळे हरवले आहेत आणि त्यांच्या मागे मनातही काहीतरी दडलेले आहे—प्रेमाची ही किती हळुवार चाहूल!

मग येते ती सुंदर ओळ—

“होठों पे इनकार, तेरी आँखों में इकरार है…”

ओठ नकार देतात, पण डोळे मात्र प्रेमाची कबुली देतात. आणि पुढे—

“मन में हाँ हाँ मगर मुँह पे ना ना…”

मनात होकार, ओठांवर नकार—या दोन्हींच्या मध्ये दडलेले ते लाजरे, खट्याळ प्रेम!

शैलेंद्रांनी प्रेयसीच्या डोळ्यांना बाणांचे रूप देत म्हटले आहे—

“बड़ी बड़ी आँखों से लेके निशाना,
घड़ी घड़ी तीर चला के तेरा शर्माना…”

तर “नींबू की फाकी सी अंखिया” आणि “तीखी तीखी ये जुल्मी कनखिया” या प्रतिमांतून सौंदर्याबरोबरच डोळ्यांतील खट्याळपणाही खुलतो.

आणि “उनके मुँह पे लाज का गुलाल रंग लाये रे…”‘लाज का गुलाल’ ही तर प्रेमाने लाल झालेल्या गालांची अप्रतिम शब्दचित्रच!

“बदली के दिन जैसे धूप आये जाये रे…” या उपमेतून प्रेमातील संकोच आणि उमलत्या भावनांचे किती सुंदर चित्र उभे राहते! तर “मीठी मीठी पीड़ों से दिल को मजा आये रे…” मध्ये प्रेमाच्या गोड वेदनेचा विरोधाभास किती सहजपणे व्यक्त होतो!

गाण्याचे दृश्यरूपही तितकेच देखणे आहे—चेहऱ्यावरील हावभाव, नजरेतील सूचक संवाद आणि मोहक close-ups गाण्याला जिवंत करतात.

लोकगीताची सहजता, बर्मनदांचे चैतन्यमय संगीत, शैलेंद्रांचा खट्याळ प्रणय, लताचा मधुर स्वर आणि नृत्य-हावभावांचा सुंदर मिलाफ म्हणजे “नैन खोये खोये तेरे…”

चला तर मग, प्रेमाच्या या लाजऱ्या, खट्याळ आणि मधुर कबुलीचा आस्वाद घेऊया!

गीत आवडले तर नक्की शेअर करा. धन्यवाद! 


“Nain Khoye Khoye Tere…” — A Shy, Playful and Melodious Confession of Love!

Film: Munimji (1955) | Lyricist: Shailendra | Music: Sachin Dev Burman | Singer: Lata Mangeshkar

Hindi cinema has had a long and illustrious tradition of actresses from Maharashtra who enriched the industry with their beauty, personality and acting prowess. Among them were Durga Khote, Lalita Pawar, Shanta Apte, Shobhana Samarth, Leela Chitnis, Sulochana, Shashikala, Usha Kiran, Nutan, Sandhya, Baby Nanda, Tanuja, Smita Patil and Madhuri Dixit. Another distinguished name in this glorious tradition was Nalini Jaywant.

Making her Hindi-film debut in 1941, Nalini Jaywant appeared in more than sixty films. Shirish Kanekar aptly described her as an actress blessed with “a face that was one in a million, and an extraordinarily expressive face.” She is particularly remembered for her role as Kishori, the courtesan, in Kala Pani (1958), and for the unforgettable “Nazar Lagi Raja Tore Bangle Par.”

But let us turn to today’s song.

Munimji (1955), with music by Sachin Dev Burman, has ten songs—five written by Sahir Ludhianvi and five by Shailendra. Lata Mangeshkar sings all five of her songs as solos. Kishore Kumar’s “Jeevan Ke Safar Mein Rahi” became hugely popular, while Lata’s “Ghayal Hirniya Main Ban Ban Dolun” showcases her extraordinary command of classical music. An amusing fact about the film is that composer Madan Mohan also appeared in it as an actor!

Our song features Nalini Jaywant and Dev Anand, but, interestingly, it is not picturised on Nalini Jaywant. Instead, it features Ameeta—the same actress who later became famous as Shammi Kapoor’s heroine in Tumsa Nahin Dekha. In her Hindi film career spanning 21 years from 1952 to 1973, Ameeta worked in 49 films (Ref. Wikipedia).

In the film, Roopa (Nalini Jaywant) initially dislikes Raj (Dev Anand). But after he saves her life following an accident in the jungle, their relationship acquires a new emotional dimension. The song emerges against this backdrop, although on screen it is picturised on Bela (Amita) and her friends.

One immediately notices the distinctive magic of Burmanda’s music. He has infused the melody with the flavour of folk music—its effortless simplicity, rhythmic bounce and playful lilt making it sound almost like an authentic folk song. The choreography is equally charming, so closely does it blend with the music that one wonders which came first—the dance or the melody. They seem to have sprung from the same creative impulse.

The restrained use of chorus, along with dholki, tabla, ghungroo, flute and perhaps mandolin, gives the song a wonderfully bright and vibrant character.

But the real magic lies in Shailendra’s lyrics.

He portrays love not through grand declarations but through eyes, lips, shy glances and hidden emotions:

“Hothon pe inkaar, teri aankhon mein ikraar hai…”

The lips say no, while the eyes confess everything. And then:

“Dil hi dil mein tera balkhana,
Man mein haan haan magar munh pe na na…”

A yes in the heart, a no on the lips—and between them lies the deliciously shy, playful romance of love.

Shailendra turns the heroine’s eyes into arrows:

“Badi badi aankhon se leke nishana,
Ghadi ghadi teer chala ke tera sharmana…”

The eyes take aim, shoot their arrows, and then the beloved herself blushes!

His imagery is wonderfully vivid—“neembu ki faaki si ankhiyaan,” “teekhi teekhi ye julmi kanakhiyan”—capturing not merely beauty but the mischief and flirtatiousness hidden in those eyes.

And then comes the unforgettable image:

“Unke munh pe laaj ka gulaal rang laaye re…”

What could describe cheeks flushed with the colour of love more beautifully than “laaj ka gulaal”?

“Badli ke din jaise dhoop aaye jaaye re…”

Sunlight appearing and disappearing behind clouds becomes a lovely metaphor for the hesitation and blossoming emotions of love.

Finally:

“Meethi meethi peedon se dil ko maza aaye re…”

Even the pain of love is sweet—and Shailendra captures that delightful paradox with disarming simplicity.

The song is equally rewarding visually: the expressive faces, fleeting glances and beautifully framed close-ups make the romance come alive on screen.

The effortless charm of folk music, Burman’s sparkling orchestration, Shailendra’s playful poetry, Lata’s enchanting voice and the expressive choreography—all combine to make “Nain Khoye Khoye Tere…” a wonderfully shy, mischievous and melodious confession of love.

So, let us savour this delightful little celebration of love!


1 comment:

  1. Great Sachin da, Pahadi folk lis essence and soul of mountains and forests, rivers near to nature . HE Really made hindi and Bengal filmy music lovers mad for pahadi folk. This song represents the same .

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.