नमस्कार मित्रांनो. आज भाऊबीज. दिवाळी २०१३ रूढार्थाने आज संपते; हो, रुढार्थानेच, कारण परंपरेनुसार दिवाळी ही तुळशीच्या लग्नापर्यंत मानली जाते. पण आजकालच्या जमान्यात शहरातील घरांमध्ये ना अंगणे उरली आहेत ना तुळशी. तेंव्हा त्या तुळशीचे लग्न लावणे तर दूरच मग पूजा तरी कोण करणार? असो. आपणा सर्वांची ही दिवाळी आनंदाची गेली असेल अशी आशा करतो.
आजच्या मंगल दिवशी माझ्या पहिल्या-वहिल्या ब्लॉगची सुरुवात करण्याचे धाडस करतो आहे. पुढे किती नेमाने चालवू शकेन याची आत्ताच खात्री देता येत नाहीये कारण मी काही सिद्धहस्त लेखक नाही; शिवाय नियमित सकारात्मक लेखन करायला जी अभ्यासू/संशोधक वृत्ती व मानसिक बैठक लागते त्याचा माझ्यामध्ये अभाव आहे ह्याची मला जाणीव आहे. तरी पण एखादी गोष्ट नियमितपणे करायची ठरवली तर त्या गोष्टीसाठी आवश्यक ते गुण तुमच्यात हळूहळू तयार व्हायला लागतात असा माझा विश्वास आहे आणि या विश्वासावरच मी हे धाडस करत आहे. तेव्हा कृपया हे गोड मानून घ्यावे व निःसंकोचपणे तुमच्या चांगल्या/वाईट प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती.
गेले अनेक वर्षांपासून आसपास घडत असलेल्या घटना बघून/वाचून एक अस्वस्थता मनात घर करून राहिली होती; व्यक्त व्हावेसे वाटत होते. त्याची सुरुवात मित्र व नातेवाइक यांना पत्र लिहून केली. पुढे तंत्रज्ञान जसे सुधारत गेले तसे ई-मेल, मेसेज इ. मुळे पत्रलेखन हळूहळू बंद पडले. २००६ ते २००८ या कालावधीत वृत्तपत्रांना पत्रे लिहायला लागलो, त्यातील काही पत्रे छापूनही आली. पण तरीही त्या लेखनाचे स्वरूप त्या त्या घटनांपुरतेच मर्यादित राहिले.
गेली २० वर्षे ज्या संगणक क्षेत्रात मी काम करत आहे तिथे अचाट बुद्धिमत्तेची माणसे पाहिली. ज्ञान, धन व गुणसंपन्न अशा माणसांना जवळून बघता आले. आज त्यातील बरेचसे परदेशात आहेत; तर काही जणांनी मात्र स्वदेशाचा रस्ता पकडला आहे. जे इथे राहिले त्यातील बरीचशी मंडळी आपापल्या विश्वात मग्न आहेत. आसपासच्या चांगल्या / वाईट घटनांचे यांच्यावर काहीच परिणाम होताना निदान दृश्य स्वरूपात दिसत नाहीत. अशा वेळी आपल्या मनात काय आहे ते ब्लॉगच्या माध्यमातून इतरांबरोबर शेअर करावे असे वाटले. त्यातून जर कोणाला काही चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली तर माझ्या लेखनाचे सार्थक झाले असे मी समजेन.
मात्र काही सन्माननीय अपवाद आहेत जे स्वतःचे घर, नोकरी/व्यवसाय सांभाळून काही ना काही सामाजिक कार्य करीत आहेत. त्या सर्वांबद्दल मला अपार आदर वाटतो.
माझ्या या धडपडीमागची प्रेरणा मला माझे वडील - श्री. रघुनाथ बाळकृष्ण सप्रे - यांजकडून मिळाली. स्वतःचा संसार आणि नोकरी सांभाळून बाबांनी उभे आयुष्य विवेकानंद केंद्र व ज्ञानदा प्रतिष्ठान या संस्थांच्या कामासाठी वेचले. १९७८ साली पुण्यात जेंव्हा इंग्रजी माध्यमाची आणि उत्तम शिक्षण देणारी शाळा म्हणजे कॉन्व्हेंट असा प्रचलित समज होता, त्या काळात पुण्यातील कर्वेनगर परिसरातील नवसह्याद्री सोसायटीमध्ये संपूर्ण भारतीय पद्धतीवर आधारित शिक्षण देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांसाठी ज्ञानदातर्फे सुरु करण्यात बाबांचा सिंहाचा वाटा होता. आज त्या परिसरातील ज्ञानदा ही एक उत्तम शाळा गणली जाते. बाबांच्या तळमळीचा मी एक साक्षीदार होतो; कदाचित त्यातूनच माझ्यात सामाजिक कामाची प्रेरणा जागृत झाली असावी. त्यामुळे माझे हे पहिले-वहिले लेखन बाबांना अर्पण करतो आणि थांबतो.
पुढील ब्लॉग घेऊन लवकरच आपल्या भेटीला येईन. तोपर्यंत, तुमच्या शुभेच्छांची नितांत गरज आहे, धन्यवाद.
- धनंजय सप्रे

अप्रतिम शब्दांकन. Keep it up.
ReplyDeleteधनंजय, मी अगदी याच वळणावर येऊन ठेपलोय. तुझ्या ब्लॉग ला माझ्या हार्दिक शुभेच्छा! निनाद
ReplyDeleteधनंजय, मनातले विचार स्वच्छपणे बिनचूकरीत्या मांडता येणे ही एक कला आहे आणि तुझ्या ब्लॉगची ही उत्तम सुरुवात बघता तुझ्यातली ही कला ह्या नव्या माध्यमाच्या सहाय्याने आमच्यापर्यंत नित्य पोहोचत राहील याची खात्री आहे. तुझ्या ह्या नवीन उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteअतिशय स्तुत्य उपक्रम! हार्दिक शुभेच्छा!
ReplyDeleteधन्यवाद JJ. तुझे महाराष्ट्र टाइम्स मधील लिखाण मी miss करतो आहे
ReplyDeleteनमस्कार धनंजय,
ReplyDeleteअभिनंदन आणि All the best !!
- अमित शिरसीकर
Dear Dhanajay....Many Congratulations on your first blogpost !! Please keep it coming.
ReplyDeleteधन्यवाद अमित!
ReplyDeleteAnonymous - appreciate your comments, but pl identify yourself. Thanks.
Dear Dhanajay, very interesting . Will wait for the next post. -Sudhir
ReplyDeleteThanks Dhananjay, for starting your blog. You were always an expert in putting your thoughts in right words ... now your blog will help us in listening to you - even before meeting you personally :-)
ReplyDelete- Mangesh
Thanks Mangesh for encouraging words.
ReplyDeleteधनंजयराव, वेळोवेळी अशीच 'सप्रे'म भेट देत रहा!!
ReplyDeleteमिलिंद जलवादी