Sunday, 7 June 2026

आरंभ-स्वर १३ : ख़ाली पिली काहे को अख्खा दिन बैठके बोंब मारता है? (Surprise Gem by Kishore Kumar and Manna Dey)

 

आज सादर करत असलेले गाणे म्हणजे एक धमाल, रंगतदार आणि मजेशीर गाणे आहे. ही कमाल केली आहे गीतकार पं. भरत व्यास, संगीतकार मन्ना डे आणि गायक किशोर कुमार यांनी! गाणे आहे १९५२ सालच्या "तमाशा" चित्रपटातले - दिग्दर्शक फणी मुजुमदार. प्रमुख भूमिका आहेत देव आनंद, मीनाकुमारी, बिपीन गुप्ता, किशोरकुमार आणि अशोककुमार यांच्या.

या चित्रपटाची काही वैशिष्ट्ये:

  • निर्माते अशोक कुमार आणि सावक वाच्छा यांच्या Bombay Talkies च्या १९५२ सालच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक. हॉलिवूडच्या १९४१ सालातील It Started with Eve चित्रपटाची हिंदी नक्कल
  • देव आनंदचा मीना कुमारी बरोबरचा पहिला तर किशोरकुमार बरोबरचा दुसरा एकत्र काम केलेला चित्रपट
  • किशोरकुमारने अभिनित केलेल्या आणि गायलेल्या विनोदी गीतांपैकी सुरुवातीच्या काळातील हे गीत
  • याच चित्रपटात ३ वेगवेगळ्या गाण्यांत मीनाकुमारीला तीन वेगवेगळ्या गायिकांचे (लता, आशा आणि गीता दत्त) आवाज वापरण्याचा अनोखा पण यशस्वी प्रयोग संगीतकार मन्ना डे यांनी केला आहे!

चित्रपटात एकूण ८ गाणी आहेत, त्यापैकी ५ गाण्यांना मन्ना डे यांचे संगीत आहे. मन्ना डे यांनी संगीतकार म्हणून १९४७ ते १९७३ दरम्यान १९ हिंदी चित्रपटातील ११५ गाण्यांना संगीत दिले आहे. आजचे गाणे हे मन्ना डे यांच्या गंभीर प्रकृतीच्या अगदी विरुद्ध आहे; पण चित्रपटात किशोरकुमार यांच्यावर चित्रित होणार असल्याने, प्रसंगाला अनुरूप असे संगीत मन्नादांनी दिले आहे.

पियानो, व्हायोलिन, ट्रम्पेट, ड्रम, इ. वाद्यांचा वापर आणि ज्याला freestyle म्हणता येईल अशी चाल आहे. असे हे गाणे किशोरकुमारने आपल्या भन्नाट शैलीत सादर केले आहे. 

श्रीमंत उद्योगपती राय साहेब (बिपीन गुप्ता) यांच्या संपत्तीचा एकुलता एक वारसदार त्यांचा नातू दिलीप (देव आनंद) एका अभिनेत्रीच्या प्रेमात असतो. आजोबांना हे मान्य नसते त्यामुळे तो किरण (मीनाकुमारी) नावाच्या एका गरीब घरातील सुसंस्कृत मुलीला घरी आणून तिच्याशी लग्न करणार आहे असे खोटेच आजोबांना सांगतो. मग राय साहेब त्यांचा दुसरा नातू रज्जू (किशोरकुमार) आणि किरण यांच्या मदतीने दिलीपला कसे वठणीवर आणतात ते YouTube वर चित्रपटातच बघा.

आळशी दिलीपला उठवायला रज्जू हे गाणे म्हणतो. सुरुवातीपासूनच गाणे धमाल आहे हे लक्षात येते. गाणे म्हणता म्हणता मध्येच गद्यात ओळी म्हणणे, चित्रविचित्र आवाज काढणे असे गंमतीशीर प्रकार केवळ किशोरकुमारच करू शकतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात. दुसऱ्या कडव्यात दिलीप जेंव्हा "अरे बापरे, अब क्या करें?" असे विचारतो त्यानंतर ऐकू येतो तो vintage किशोरकुमारचा आवाज, ज्याला तोड नाही. गाणे संपवताना किशोरकुमार "है" शब्द एकूण ६ वेळा वेगवेगळ्या पट्यांत आणि शेवटी खर्जात म्हणतो ते केवळ लाजवाब! यावरून त्याच्या range ची कल्पना येते.

तुम्हाला गाणे आवडेल अशी खात्री आहे. प्रतिक्रिया कळवा, फॉरवर्ड करा. धन्यवाद.


The song being presented today is a lively, colourful, and highly entertaining number. This magic has been created by lyricist Bharat Vyas, music director Manna Dey, and singer Kishore Kumar! The song is from the 1952 film Tamasha, directed by Phani Majumdar. The lead cast includes Dev Anand, Meena Kumari, Bipin Gupta, Kishore Kumar, and Ashok Kumar.

Some notable features of this film:

  • It was one of the popular 1952 films produced by Bombay Talkies, owned by Ashok Kumar and Savak Vacha.
  • It is a Hindi adaptation of the 1941 Hollywood film It Started with Eve.
  • This was Dev Anand’s first film with Meena Kumari and his second film with Kishore Kumar.
  • The song belongs to the early phase of Kishore Kumar’s comic songs that he both acted in and sang himself.
  • In this very film, music director Manna Dey carried out a unique and successful experiment by using the voices of three different singers — Lata Mangeshkar, Asha Bhosle, and Geeta Dutt — for Meena Kumari in three different songs!

The film has a total of eight songs, five of which were composed by Manna Dey. As a music director, Manna Dey composed music for 115 songs across 19 Hindi films between 1947 and 1973. Today’s song is completely opposite to Manna Dey’s usually serious style, but since it was picturized on Kishore Kumar, he composed music perfectly suited to the comic situation.

The song uses instruments like piano, violin, trumpet, drums, etc., and has a tune that can be called freestyle in nature. Kishore Kumar has performed it in his trademark crazy and energetic style.

The story goes like this: Wealthy industrialist Rai Saheb (Bipin Gupta) has only one heir to his fortune — his grandson Dilip (Dev Anand), who is in love with an actress. His grandfather disapproves of this relationship, so Dilip falsely tells him that he plans to marry Kiran (Meena Kumari), a cultured girl from a poor family. Then Rai Saheb, along with his other grandson Rajju (Kishore Kumar) and Kiran, tries to bring Dilip back on the right track. Watch the film on YouTube to see how this unfolds.

Rajju sings this song to wake up the lazy Dilip. Right from the beginning, you realize how hilarious and entertaining the song is. In the middle of singing, Kishore Kumar suddenly shifts to spoken lines, makes bizarre sound effects, and performs all sorts of comic antics — something only he could pull off. His facial expressions naturally bring a smile to your face. In the second verse, when Dilip says, “Oh my God, what do we do now?”, what follows is that vintage Kishore Kumar voice that is simply unmatched.

And while ending the song, Kishore Kumar sings the word “Hai” six different times in different pitches, ending finally in a deep bass note — absolutely marvellous! It gives a glimpse of his incredible vocal range.

I am sure you will enjoy the song. Do share your reactions and forward it to others. Thank you.