Friends,
I am really happy to present the fifth song of the series Anmol Ratan and this time it is a Bengali jewel from Lata Mangeshkar!
English version of the blog is at the end of the Marathi version below.
Song #5: Aar jeno nei kono bhabna (আর যেন নেই কোন ভাবনা)

Cast : Suchitra Sen, Basanta Chowdhury, Pahari Sanyal, Anil Chatterjee, Tulsi Chakraborty, Kajari Guha, Namita Sinha
Lyrics : Gauriprasanna Mujumder
Hemant Kumar |
असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीला काळ आणि वेळेचा योग यायला लागतो. माझ्या आयुष्यात जुनी बंगाली गाणी ही अशीच काही वर्षांपूर्वी अचानक आली. साधारण २०१६-१७ मध्ये माझा मित्र अद्वैत धर्माधिकारी याने स्वामी विवेकानंद आणि संगीत या विषयावर एक व्याख्यान पुण्यात सुदर्शन रंगमंच येथे दिले होते. वेगळा विषय असल्याने मी उत्सुकतेने त्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे अद्वैतने विवेकानंद जे भजन त्यांच्या गुरूंसाठी म्हणजे रामकृष्णांसाठी म्हणायचे ते "Shyma maa ki amaar" हे भजन पन्नालाल भट्टाचार्य यांच्या आवाजात ऐकवले. रंगमंचातील डॉल्बी सिस्टिम मुळे ते भजन खूपच प्रभाव टाकून गेले, इतका की नंतर बरेच दिवस मी ते भजन रोज ऐकत होतो. नंतर काही महिन्यांनी Whatsapp वर काही मित्रांनी प्रसिद्ध हिंदी गाण्यांची मूळ बंगाली गाणी पाठवली. ती पण आवडली होते. मात्र काही महिन्यांपूर्वी एक दिवस अचानक जुनी बंगाली गाणी Internet वर सापडली. लता, गीता दत्त, आशा, हेमंत कुमार, किशोर कुमार यांची बंगाली गाणी ऐकून मी अक्षरशः झपाटला गेलो. गेले काही महिने मी ही झपाटलेली अवस्था अनुभवतोय. रोजचा दिवस लताची बंगाली गाणी ऐकल्याशिवाय सुरु होत नाही आणि मावळतही नाही. अपार आनंद दिलाय या गाण्यांनी. लताजींचा इतका गोड आवाज मी मराठी आणि हिंदीत क्वचितच ऐकला असेल असे थोडे धाडस करून मी म्हणू इच्छितो.
हे गाणे आहे १९५९ साली प्रदर्शित झालेल्या "दीप जेले जाय" या चित्रपटातले. दिग्दर्शक असित सेन यांनी पुढे १९६९ साली हाच चित्रपट हिंदीत "खामोशी" या नावाने आणला होता. दोन्ही चित्रपटांना अप्रतिम संगीत स्व. हेमंत कुमार यांनी दिले आहे. हेमंत कुमारांनी एकूण १३८ बंगाली चित्रपटांना संगीत दिले आहे, त्याशिवाय रवींद्र संगीतातील त्यांची गाणी संपूर्ण बंगाल मध्ये गाजली आहेत आणि आजही गायली जातात. त्यांच्या बंगाली चित्रपटातील कामाची आणि योगदानाची तुलना आपले बाबुजी म्हणजेच सुधीर फडक्यांच्या मराठीतील योगदानाशीच होऊ शकते. लताजींनी बंगालीत एकूण १८५ गाणी गायली आहेत. हेमंत कुमार, सलील चौधरी, भूपेन हजारिका, व्दिजेन मुखर्जी, शैलेंद्र चौधरी इ. संगीतकारांच्या रचनांना चार चाँद लावण्याचे काम लताजींनी केले आहे.
ज्यांनी "खामोशी" हा चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यासाठी "दीप जेले जाय" चित्रपटाची कथा थोडक्यात:
हा चित्रपट आशुतोष मुखर्जी यांच्या "नर्स मित्रा" या लघुकथेवर बेतलेला आहे. लंडनहून शिकून आलेली राधा मित्रा (सुचित्रा सेन) कोलकत्यातील एका वेड्यांच्या इस्पितळात नर्स म्हणून काम करत असते. मानसिक रुग्णांची मैत्रीण आणि प्रेमिका असल्याचा अभिनय करून रुग्णांना त्यांच्या मानसिक अवस्थेतून बरे करण्याची जबाबदारी राधावर सोपवलेली असते. तिचा पहिला पेशंट देबाशिष याला बरे करता करता राधा त्याच्या प्रेमात पडते, पण तो बरा झाल्यावर आपल्या मैत्रिणीशी लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात करतो. या धक्यातून राधा सावरते ना सावरते तोच इस्पितळातील प्रमुख डॉक्टर (पहाडी संन्याल) तिला आणखीन एका पेशंटची - तपसची (बसंत चौधरी) - केस देतात. नाईलाजाने राधा तपसवर उपचार करण्याचे कबूल करते. तपसच्या सुलेखा (काजोरी गुहा) नावाच्या मैत्रिणीमुळे तो मनोरुग्ण झालेला असतो, हे राधाला कळल्यावर ती सुलेखाला भेटायला जाते. राधा जेंव्हा सुलेखाच्या घरी पोचते त्यावेळी ती पियानोवर खालील गाणे म्हणत असते.
पुढे तपसवर उपचार करता करता राधा पुन्हा एकदा प्रेमात पडते. तपस पण बरा होतो; पण आता वेडे होण्याची पाळी राधाची असते. चित्रपटाच्या शेवटी राधा स्वतःच एक मनोरुग्ण म्हणून इस्पितळात दाखल होते. चित्रपटाचे अतिशय सविस्तर आणि सुंदर विश्लेषण खालील लिंकवर वाचायला मिळेल
https://learningandcreativity.com/silhouette/revisiting-deep-jele-jai/
सुचित्रा सेनने आपल्या अप्रतिम सौंदर्य व अभिनयाने हा चित्रपट खाऊन टाकला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या चित्रपटात एकूण ३ गाणी आहेत - मन्ना डे यांनी गायलेले "Aeimon bondhu aar ki", हेमंत कुमारांचे प्रचंड गाजलेले "Ei raat amaar tomaar" हे गाणे (जे हिंदी मध्ये "ये नयन डरे डरे" म्हणून आले) आणि लताजींनी गायलेले "Aar jeno nei kono bhabna".
गाण्याची सुरुवात पियानोने होते आणि मग येतात लताचे स्वर्गीय स्वर, पार्श्वभूमीवर वाजते ती अप्रतिम बासरी. संपूर्ण गाण्यात पियानो आणि बासरी यांची जणू जुगलबंदीच आहे. विशेषतः पहिल्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या "भाबोना", तसेच पहिल्या कडव्याच्या पहिल्या ओळीच्या शेवटी येणाऱ्या "तुलबे" या शब्दांच्या मागून ऐकू येणारी सुमधुर बासरी. दोन कडव्यांच्या मध्ये वाजणारा पियानो तुम्हाला इतका गोड क्वचितच ऐकू आला असेल. हे कमी की काय म्हणून अंतरा आणि दोन्ही कडवी संपतानाच्या "पाबोना" या शब्दावर लताजींनी घेतलेली जीवघेणी हरकत, अहाहा!
या गाण्याच्या सौंदर्याचा सर्वोच्च बिंदू कुठला असेल तर तो म्हणजे पहिले कडवे संपल्यावर लगेचच म्हटलेल्या २ ओळी "जानी ना.." पासून ते "दिये जाय जे उडे" इथपर्यंत. इथे गाण्याची चाल आणि ताल दोन्ही बदलतात पण तरीही कानाला कुठेही खटकत नाही. या दोन ओळी आपल्याला काही सेकंदांपुरत्या वेगळ्या विश्वात घेऊन जातात आणि परत मूळ चालीवर दुसऱ्या कडव्यापाशी आणून सोडतात. सारेच कानात साठवून घेण्यासारखे.
लताजींचे निर्दोष बंगाली उच्चार हे एखाद्या अ-बंगाली माणसाकरता किती अवघड आहे हे आपण स्वतः जेंव्हा हे गाणे म्हणायचा प्रयत्न करू तेंव्हा लक्षात येते. त्याबद्दल त्यांना सलाम!
गाण्याचे शब्द आणि इंग्रजीतील अर्थ खाली दिला आहे. तसेच लताजींच्या आणखी काही गोड बंगाली गाण्यांच्या लिंक्स लेखाच्या शेवटी दिल्या आहेत. ती गाणीही जरूर ऐकावीत.
या गाण्याने मला जितका आनंद दिला तितकाच तो आपल्यालाही होईल अशी आशा आहे. भाषेचा अडसर बाजूला सारून फक्त संगीत आणि स्वर यासाठी हे गाणे जरूर ऐका, कदाचित २-४ वेळा ऐकल्यावर आवडायला लागेल. आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.
Video link
https://www.youtube.com/watch?v=WNtZQmIM2lY
Lyrics: (English translation courtesy - Gargi Bhattacharya)
Aar jeno nei kono bhabona
Jodi aj okaron kothao haray mon
Jani ami khuje tare ar pabona
(There are no worries. If my mind gets lost today for no reason, I know I would not get it back)
Bhromorer benu sur tulbe sei sure mon amar bhulbe
Kohibe fagun jeno amare
Ami tomar bhubon chere kobhu jabona
(Bee's flute will play a tune and my mind will dive in that tune. The sprint will probably tell me I will never leave your world)
Janina se to ami janina
Ogo kon sudure amake bolakara daak diye jay je dure
(I don't actually know, but geese call me from very far away to unknown destination)
Koto kotha prane jeno jaglo apnare koto bhalo laglo
Akhite swapan ache jorano
Ami ei abesh kobhu fele jete chabo na
(Many thoughts arose in my heart - I felt beautiful from inside. My eyes are wrapped in a dream. I never want to come out of this euphoria)
যদি আজ অকারন কোথাও হারায় মন
জানি আমি খুঁজে তারে আর পাবনা
ভ্রমরের বেনু সুর তুলবে সেই সুরে মন আমার ভুলবে
কহিবে ফাগুন যেন আমারে
আমি তোমার ভুবন ছেড়ে কভু যাবনা
জানিনা সে তো আমি জানিনা
ওগো কোন সুদূরে আমাকে বলাকারা ডাক দিয়ে যায় যে দূরে
কত কথা প্রানে যেন জাগলো আপনারে কত ভালো লাগলো
আঁখিতে স্বপন আছে জড়ানো
আমি এ আবেশ কভু ফেলে যেতে চাবো না
Friends,
I am extremely happy to present to you this Bengali jewel from Lata Mangeshkar. It's from the 1959 film 'Deep Jele Jai' directed by Asit Sen who remade the film in Hindi by the name 'Khamoshi' in 1969.
Suchitra Sen plays the main lead of a nurse Radha Mitra working in a Mental Hospital at Kolkata. Her job is to play the role of a friend and lover for the mentally ill patients, without getting emotionally involved in them. However, she falls in love with her first patient - Debashish - while curing him by enacting as his friend and lover. After he is cured, he goes home and starts a new life with his girlfriend. Learning this, Radha is shocked; however recovers and starts working again. The circumstances force her to take up the second case that of Tapas (Basanta Chowdhury) who is in deep depression due to his girlfriend - Sulekha (Kajari Guha). Radha tries to meet Sulekha and asks for her help to get Tapas out of the trauma. We see Sulekha singing this song on the Piano when Radha visits her home.
In the end, Radha could not help herself from falling in love with Tapas; and when he too leaves the hospital, Radha is shattered. As a result, she gets admitted into the same hospital as a patient herself.
The film was a hit in Bengal and the song 'Ei raat tumaar amaar' by Hemantda is termed as the Signature song of the film, and is a huge hit even today. This song was remade in Hindi as 'Yeh nayan dare dare'.
Excellent and very detailed analysis of the film can be found at
https://learningandcreativity.com/silhouette/revisiting-deep-jele-jai/
The song that is presented here 'Aar jeno nei kono bhabna' is one of the best melodies I have ever heard from Lata. I cannot recall any sweeter voice of hers even in Marathi and Hindi. Being a Maharashtrian myself, I can imagine how difficult it would have been for Lataji to get the Bengali pronunciation perfect and still deliver the song with all its melody, hats off to her.
The composition is simply amazing specially the use of Piano and Flute. Lata's tonal quality and voice control are of high calibre as always. Please listen carefully the flute in the background of the words "Bhabna" or "Tulbe". The high point of the song are the 2 lines rendered just after the first Astaai (1st stanza).
Hope you will like the song. Please do share your feedback. Thanks.
MUST LISTEN Bengali Songs:
1) Akash Prodip Jole - Salil Chaudhary - Lata
2) Asharh Sraban Maney na to Mon - Monihar (1966) - Hemant Kumar - Lata
3) Nijhumo Shondhay Pantho Pakhira - Monihar (1966) - Hemant Kumar - Lata
4) Chanchal Mayuri e raat bodhu jete - Adwitiya (1968) - Hemant Kumar - Lata
5) Rangila Bashite ke daake - Bhupen Hazarika - Lata
6) Tumi Je Amaar - Harano Sur (1957) - Hemant Kumar - Geeta Dutt (what a song - gem!!)
7) Nishiraat Baka Chaand Akashe - Prithibi Amare Chai (1957) - Nachiketa Ghosh - Geeta Dutt
Enjoy the music, have a great life. Thanks.