Sunday, 4 October 2026

आरंभ-स्वर १७ : मैं तुम्ही से पूछती हूँ मुझे तुमसे प्यार क्यों है? (Composer N. Datta)

#MarathiVersion

“मैं तुम्ही से पूछती हूँ मुझे तुमसे प्यार क्यों है?”

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील प्रेमाचा एक हळुवार प्रश्न

चित्रपट: ब्लॅक कॅट (१९५९) | गीतकार: जाँ निसार अख़्तर | संगीतकार: N. दत्ता | गायक-गायिका: लता मंगेशकर, मोहम्मद रफ़ी

काही गाणी आपण लक्षात ठेवतो ती त्यातील नायक-नायिकांमुळे, चित्रपटामुळे किंवा त्या गाण्यामागे असलेल्या प्रसिद्ध नावांमुळे. पण काही गाणी अशी असतात की त्यांच्याशी आपली ओळख कशी झाली, हेच कळत नाही.

नायक-नायिका कोण आहेत, गीतकार कोण आहेत, संगीतकार कोण आहेत—यापैकी काहीच आपल्याला कदाचित माहीत नसते. पण गाणे सुरू होते आणि काही क्षणांतच त्याची धून आपल्याला आपल्या मोहिनीने जखडून टाकते.

आजचे गाणे असेच एक सुंदर रत्न आहे.

१९५९ सालच्या Black Cat या चित्रपटातील हे गाणे केवळ प्रणयगीत नाही. प्रेमात पडल्यावर मनाची जी एक विलक्षण अवस्था होते—हृदयाने प्रेम स्वीकारलेले असते, पण बुद्धी अजूनही त्याचे कारण शोधत असते—त्या अवस्थेचे हे अतिशय हळुवार चित्रण आहे.

नायिका प्रेमात पडली आहे; पण तिलाच कळत नाही की का!

म्हणून ती आपल्या प्रियकरालाच अगदी साधा, निरागस आणि तरीही कदाचित प्रेमातील सर्वात अवघड प्रश्न विचारते:
“मैं तुम्ही से पूछती हूँ मुझे तुमसे प्यार क्यों है?”

हे गाणे इन्स्पेक्टर राजन आणि नीता गुप्ता यांच्या व्यक्तिरेखांवर चित्रित झाले आहे. इन्स्पेक्टर राजनची भूमिका बलराज साहनी यांनी, तर नीताची भूमिका मिनू मुमताज यांनी साकारली आहे.

राजनवर गुन्हेगारी जगतातील गूढ आणि प्रभावशाली राजा—ब्लॅक कॅट—याचा शोध घेऊन त्याला पकडण्याची जबाबदारी आहे. दुसरीकडे नीता राजनच्या प्रेमात पडली आहे. राजन तिच्या प्रेमाचा उपयोग करून ब्लॅक कॅटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो.

तो यशस्वी होतो का?

त्यासाठी चित्रपट पाहावाच लागेल. आणि जुन्या चित्रपटांचे हेही एक वैशिष्ट्य आहे—कथेची रहस्ये आपल्यासमोर हळूहळू उलगडत जातात.

गाण्यामागील कलाकार:

मिनू मुमताज ही प्रसिद्ध विनोदी अभिनेते मेहमूद यांची बहीण. १९५५ ते १९६८ या काळात तिने ७२ हिंदी चित्रपटांत काम केले. Black Cat मध्ये तिने नायिकेची भूमिका केली असली, तरी तिच्या इतर बहुतेक भूमिका सहाय्यक किंवा दुय्यम स्वरूपाच्या होत्या; अनेक चित्रपटांत ती नर्तिकेच्या भूमिकेतही दिसली.

१९५६ सालचा C.I.D. आठवतोय? त्यातील सुंदर गीत “बूझ मेरा क्या नाम रे, नदी किनारे गाँव रे” हे मिनू मुमताज यांच्यावर चित्रित झाले होते.

या गाण्याचे गीतकार होते प्रसिद्ध कवी, गीतकार आणि शायर जाँ निसार अख़्तर—गीतकार जावेद अख़्तर यांचे वडील, अभिनेता फरहान अख़्तर यांचे आजोबा आणि अभिनेत्री शबाना आझमी यांचे सासरे. मात्र या प्रसिद्ध नात्यांपलीकडेही जाँ निसार अख़्तर हे स्वतःच्या काव्यप्रतिभेने अजरामर झालेले कवी होते.

संगीत होते आपल्या महाराष्ट्रातील दत्ता नाईक, म्हणजेच N. दत्ता यांचे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ५६ चित्रपटांना संगीत दिले. साधना, धूल का फूल, धरमपुत्र आणि नया रास्ता हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट.

नाच घर (१९५९) मधील “ऐ दिल ज़ुबाँ ना खोल” हे त्यांचे आणखी एक अप्रतिम गीत.

आणि मग गाणे सुरू होते…

नायिका एका हळुवार आव्हानाने गाण्याची सुरुवात करते—

“कोई इक़रार करे, या कोई इनकार करे,
हमसे एक बार निगाहें तो ज़रा चार करे.”

म्हणजेच—कोणी प्रेमाची कबुली देवो किंवा नकार देवो; पण निदान एकदा तरी माझ्या नजरेला नजर मिळवू दे!

त्या काळच्या प्रेमवीराला साजेशा नम्र आणि लाजऱ्या अंदाजात नायकही तिच्या सौंदर्याची कबुली देतो—

“तुम हसीं हो, तुम्हें सब दिल में जगह देते हैं.”

पण त्यालाही एक प्रश्न पडतो—

“हममें क्या बात है ऐसी, जो कोई प्यार करे?”

म्हणजे—माझ्यात असे काय आहे, की कोणी माझ्यावर प्रेम करावे?

नायकाच्या या दोन ओळी वगळता संपूर्ण गाणे जणू नायिकेचेच आहे—आणि तिच्या भावनांना स्वर देतो लतादीदींचा अतुलनीय आवाज.

त्यानंतर ऐकू येतो अकॉर्डियनचा एक सुंदर तुकडा आणि गाणे अलगद ताल पकडते—

“मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है?
कभी तुम दगा न दोगे, मुझे ऐतबार क्यों है?
मैं तुम्ही से पूछती हूँ…”

या गाण्याचे खरे सौंदर्य त्याच्या संयमात आहे. पार्श्वभूमीतील व्हायोलिन्स अगदी अलगद साथ देतात; पियानोचा मंद, जणू शब्दांविना उमटणारा स्वर वातावरणात मिसळतो. आणि प्रत्येक कडव्याच्या दुसऱ्या ओळीनंतर येणारा तो छोटासा अकॉर्डियनचा तुकडा—जणू गाण्यावर उमटलेली एखादी नाजूक स्वाक्षरीच.

कुठेही संगीत आवाजावर मात करत नाही.

वाद्यवृंद गाण्याशी स्पर्धा करत नाही; उलट तो आवाजाला खुलण्यासाठी एक सुंदर अवकाश निर्माण करतो. हीच N. दत्ता यांच्या संगीतकौशल्याची खरी खूण.

आणि मग आहेत—लतादीदी.

त्या केवळ शब्द गात नाहीत; त्या त्या शब्दांमधली भावना जगतात. त्यांच्या आवाजात निरागसता आहे, प्रेमाची ओढ आहे, कुतूहल आहे आणि थोडीशी हतबलताही.

“मुझे तुमसे प्यार क्यों है?”

हा प्रश्न त्यांच्या आवाजात केवळ प्रश्न राहत नाही—तो एक हळुवार प्रेमस्वीकार बनतो.

कदाचित म्हणूनच हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील गाण्यांची जादू आजही टिकून आहे. काही सुंदर शब्द, एक मोहक चाल, मोजकीच पण नेमकी वाद्ये आणि त्या शब्दांना अमरत्व देणारा आवाज—एवढेच पुरेसे असते एखाद्या साध्या प्रेमप्रश्नाला कालातीत बनवण्यासाठी.

चला, काही क्षणांसाठी पुन्हा १९५९ मध्ये जाऊया.

काळ्या-पांढऱ्या पडद्यावरचे ते दिवस… लाजरे कटाक्ष… पार्श्वभूमीत वाजणारी व्हायोलिन्स… कडव्यांमधून अलगद डोकावणारा अकॉर्डियन… आणि मनाला सतत विचारणारी ती गोड धून—

“मैं तुम्ही से पूछती हूँ, मुझे तुमसे प्यार क्यों है?"

आणि मग…

फक्त गाणे ऐकू या.


#EnglishVersion

“Main Tumhi Se Poochhati Hoon, Mujhe Tumse Pyaar Kyon Hai?”

A Tender Question from the Golden Age of Hindi Cinema

Movie: Black Cat (1959) | Lyricist: Jaan Nisar Akhtar | Composer: N. Datta | Singers: Lata Mangeshkar, Mohammad Rafi

There are songs we remember because of the stars who appeared in them, the films they belonged to, or the famous names associated with their creation. And then there are songs that somehow find their way to us without any such introduction.

We may not know the actors. We may not immediately recognize the lyricist or composer. Yet, within a few moments, the melody takes hold of us and refuses to let go.

Today’s song is one such little gem.

It comes from the 1959 film Black Cat, and it is not merely a song about romance. It captures that wonderfully bewildering moment when the heart has fallen in love, while the mind is still searching for an explanation.

The heroine is in love—but she does not know why.

And so she turns to her beloved with the simplest and most innocent of questions:

“Main Tumhi Se Poochhati Hoon, Mujhe Tumse Pyaar Kyon Hai?”

The song is picturized on Inspector Rajan, played by Balraj Sahni, and Neeta Gupta, portrayed by Meenu Mumtaz. Rajan has been assigned the task of tracking down Black Cat, the mysterious kingpin of the criminal underworld. Neeta, meanwhile, has fallen in love with him. Rajan tries to use her affection to get closer to Black Cat and discover his whereabouts.

Does he succeed? For that, one must watch the film—and that is perhaps another pleasure of old cinema: allowing the story to reveal its secrets in its own time.

A few words about the people behind the song

Meenu Mumtaz was the sister of the celebrated comedian Mehmood. Between 1955 and 1968, she appeared in 72 Hindi films. Although she played the heroine in Black Cat, most of her other roles were supporting parts or appearances as a dancer.

Those who remember the 1956 classic C.I.D. may recall the delightful “Boojh Mera Kya Naam Re, Nadi Kinare Gaon Re” which was picturized on her.

The lyrics of today’s song were written by the distinguished poet and shayar Jan Nisar Akhtar—father of Javed Akhtar, grandfather of Farhan Akhtar, and father-in-law of Shabana Azmi.

The music was composed by our own Marathi-born Datta Naik, better known as N. Dutta. He composed music for 56 films during his career, including Sadhna, Dhul Ka Phool, Dharmputra and Naya Raasta. His “Ae Dil Zubaan Na Khol” from Naach Ghar is another memorable example of his musical craftsmanship.

And then the song begins…

The heroine opens with a playful invitation:

“Koi Ikraar Karein, Ya Koi Inkaar Karein | Hamse Ek Baar, Nigahein To Zara Chaar Karein”

The hero, with the courteous shyness so characteristic of the romantic hero of that era, readily agrees:

“Tum Hansi Ho, Tumhe Sab Dil Mein Jagah Dete Hai”

But he too has a question:

“Ham Mein Kya Baat Hai, Aisi Jo Koi Pyaar Karein?”

Except for these two lines sung by the hero, the song belongs almost entirely to the heroine, in the incomparable voice of Lata Mangeshkar.

Then comes a beautiful little passage on the Accordian, and the melody gently gathers momentum:

“Main Tumhi Se Poochhati Hoon, Mujhe Tumse Pyaar Kyon Hain |
Kabhi Tum Dagaa Naa Doge Mujhe Aitbaar Kyon Hain?"

What makes this song particularly enchanting is its restraint. The violins remain softly in the background, the piano adds its gentle murmur, and the Accordian returns after the second line of each verse like a delicate musical signature.

Nothing overwhelms the voice.

The orchestration does not compete with the melody; it simply creates a space in which the voice can breathe. That restraint is itself a mark of N. Dutta’s craftsmanship.

And then there is Lataji.

She does not merely sing the words—she inhabits them. There is innocence in her voice, but also longing, wonder and a touch of helplessness. The question “Why do I love you?” becomes almost a confession.

Perhaps that is the enduring magic of the golden age of Hindi cinema. A few beautiful words, a haunting melody, a handful of carefully chosen instruments, and a voice capable of transforming a simple romantic question into something timeless.

So let us return, just for a few minutes, to 1959—to black-and-white frames, shy glances, violins in the background, the gentle Accordian between the verses, and a melody that asks a question the heart has never quite learned to answer:

“Main Tumhi Se Poochhati Hoon, Mujhe Tumse Pyaar Kyon Hain?”

And then, simply—

let the song play.


Sunday, 6 September 2026

आरंभ-स्वर १६ : नैन खोए खोए तेरे दिल में भी कुछ होए (S. D. Burman, Shailendra and Lata)

“नैन खोये खोये तेरे…” — प्रेमाची लाजरी, खट्याळ आणि मधुर कबुली!

चित्रपट: मुनिमजी (१९५५) | गीतकार: शैलेंद्र | संगीतकार: सचिनदेव बर्मन | गायिका: लता मंगेशकर

हिंदी चित्रसृष्टीवर आपल्या सौंदर्याची आणि अभिनयप्रतिभेची मोहोर उमटवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मराठी नावांची एक प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरा आहे. दुर्गा खोटे, ललिता पवार, शांता आपटे, शोभना समर्थ, लीला चिटणीस, सुलोचना, शशिकला, उषा किरण, नूतन, संध्या, बेबी नंदा, तनुजा, स्मिता पाटील आणि माधुरी दीक्षित ही त्यातील काही ठळक नावे. आपल्या सौंदर्याने, व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनयाच्या सामर्थ्याने या सर्वांनी हिंदी चित्रपटसृष्टीला समृद्ध करत तिच्या वैभवात मोलाची भर घातली. (संदर्भ: विकिपीडिया)

याच परंपरेतील एक लक्षणीय नाव म्हणजे नलिनी जयवंत. १९४१ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या नलिनी जयवंत यांनी साठहून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. त्यापैकी सुमारे बारा चित्रपटांत त्यांनी तब्बल ३५-४० गाणी पडद्यावर साकारली आहेत. (संदर्भ: विकिपीडिया) शिरीष कणेकर यांनी त्यांचे केलेले वर्णन अगदी समर्पक आहे—“लाखों में एक अशी लोभसवाणी सूरत आणि विलक्षण बोलका चेहरा लाभलेली” अभिनेत्री! काला पानी (१९५८) मधील किशोरीची भूमिका आणि त्यांच्यावर चित्रित झालेले “नज़र लागी राजा तोरे बंगले पर” हे गाजलेले गीत यामुळे त्या रसिकांच्या विशेष स्मरणात राहिल्या.

आता वळूया आजच्या गीताकडे.

मुनिमजी (१९५५) मध्ये एकूण दहा गाणी असून सचिनदेव बर्मन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने ती सजली आहेत. पाच गाणी साहिर लुधियानवी यांनी, तर पाच शैलेंद्र यांनी लिहिली. लताची पाचही गाणी सोलो आहेत. “जीवन के सफर में राही” हे किशोरकुमारचे गीत प्रचंड लोकप्रिय झाले, तर “घायल हिरनीया मैं बन बन डोलूं” हे लताच्या शास्त्रीय संगीतावरील प्रभुत्वाचे सुंदर उदाहरण आहे. एक गंमतीदार बाब म्हणजे संगीतकार मदनमोहन यांनीही या चित्रपटात अभिनेता म्हणून भूमिका केली आहे!

आजचे गीत नलिनी जयवंत आणि देव आनंद अभिनित मुनिमजी मधील असले तरी ते नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित झालेले नाही. ते अमिता हिच्यावर चित्रित झाले आहे. १९५२ ते १९७३ या २१ वर्षात अमिताने एकूण ४९ चित्रपटात काम केले. पण ती नावारूपाला आली ती तुमसा नहीं देखा मध्ये शम्मी कपूरची नायिका म्हणून. 


या गीताची खरी गंमत मात्र बर्मनदांच्या संगीतकलेत आहे. त्यांनी चालीत लोकसंगीताचा बाज इतक्या सहजतेने आत्मसात केला आहे की ते एखादे अस्सल लोकगीतच असावे असे वाटते. चालीतील सहजता, लयीतील ठेका आणि तिच्यातील खट्याळ लावणीचा स्पर्श गाण्याला विलक्षण चैतन्य देतो. त्याला अनुरूप अशी नृत्यरचनाही मोहक आहे. संगीत आणि नृत्य यांचा मेळ इतका नैसर्गिक आहे की आधी चाल तयार झाली की नृत्य, की आधी नृत्य आणि मग चाल—हा प्रश्न पडतो!

ढोलकी, तबला, घुंगरू, बासरी आणि बहुधा मेंडोलिन यांची साथ, तसेच बर्मनदांनी केलेला मोजका पण परिणामकारक कोरस, गाण्याला प्रसन्न आणि उत्साही रंग देतो.

आणि या सगळ्यावर कळस चढवतात शैलेंद्रांचे शब्द!

प्रेमाची कबुली देताना ते मोठमोठे शब्द वापरत नाहीत; उलट डोळे, ओठ, लाजरे कटाक्ष आणि मनातील गुपित हालचाली यांतून प्रेमाचे विविध रंग उलगडतात—

“नैन खोये खोये तेरे,
दिल में भी कुछ होये…”

डोळे हरवले आहेत आणि त्यांच्या मागे मनातही काहीतरी दडलेले आहे—प्रेमाची ही किती हळुवार चाहूल!

मग येते ती सुंदर ओळ—

“होठों पे इनकार, तेरी आँखों में इकरार है…”

ओठ नकार देतात, पण डोळे मात्र प्रेमाची कबुली देतात. आणि पुढे—

“मन में हाँ हाँ मगर मुँह पे ना ना…”

मनात होकार, ओठांवर नकार—या दोन्हींच्या मध्ये दडलेले ते लाजरे, खट्याळ प्रेम!

शैलेंद्रांनी प्रेयसीच्या डोळ्यांना बाणांचे रूप देत म्हटले आहे—

“बड़ी बड़ी आँखों से लेके निशाना,
घड़ी घड़ी तीर चला के तेरा शर्माना…”

तर “नींबू की फाकी सी अंखिया” आणि “तीखी तीखी ये जुल्मी कनखिया” या प्रतिमांतून सौंदर्याबरोबरच डोळ्यांतील खट्याळपणाही खुलतो.

आणि “उनके मुँह पे लाज का गुलाल रंग लाये रे…”—‘लाज का गुलाल’ ही तर प्रेमाने लाल झालेल्या गालांची अप्रतिम शब्दचित्रच!

“बदली के दिन जैसे धूप आये जाये रे…” या उपमेतून प्रेमातील संकोच आणि उमलत्या भावनांचे किती सुंदर चित्र उभे राहते! तर “मीठी मीठी पीड़ों से दिल को मजा आये रे…” मध्ये प्रेमाच्या गोड वेदनेचा विरोधाभास किती सहजपणे व्यक्त होतो!

गाण्याचे दृश्यरूपही तितकेच देखणे आहे—चेहऱ्यावरील हावभाव, नजरेतील सूचक संवाद आणि मोहक close-ups गाण्याला जिवंत करतात.

लोकगीताची सहजता, बर्मनदांचे चैतन्यमय संगीत, शैलेंद्रांचा खट्याळ प्रणय, लताचा मधुर स्वर आणि नृत्य-हावभावांचा सुंदर मिलाफ म्हणजे “नैन खोये खोये तेरे…”

चला तर मग, प्रेमाच्या या लाजऱ्या, खट्याळ आणि मधुर कबुलीचा आस्वाद घेऊया!

गीत आवडले तर नक्की शेअर करा. धन्यवाद! 


“Nain Khoye Khoye Tere…” — A Shy, Playful and Melodious Confession of Love!

Film: Munimji (1955) | Lyricist: Shailendra | Music: Sachin Dev Burman | Singer: Lata Mangeshkar

Hindi cinema has had a long and illustrious tradition of actresses from Maharashtra who enriched the industry with their beauty, personality and acting prowess. Among them were Durga Khote, Lalita Pawar, Shanta Apte, Shobhana Samarth, Leela Chitnis, Sulochana, Shashikala, Usha Kiran, Nutan, Sandhya, Baby Nanda, Tanuja, Smita Patil and Madhuri Dixit. Another distinguished name in this glorious tradition was Nalini Jaywant.

Making her Hindi-film debut in 1941, Nalini Jaywant appeared in more than sixty films. Shirish Kanekar aptly described her as an actress blessed with “a face that was one in a million, and an extraordinarily expressive face.” She is particularly remembered for her role as Kishori, the courtesan, in Kala Pani (1958), and for the unforgettable “Nazar Lagi Raja Tore Bangle Par.”

But let us turn to today’s song.

Munimji (1955), with music by Sachin Dev Burman, has ten songs—five written by Sahir Ludhianvi and five by Shailendra. Lata Mangeshkar sings all five of her songs as solos. Kishore Kumar’s “Jeevan Ke Safar Mein Rahi” became hugely popular, while Lata’s “Ghayal Hirniya Main Ban Ban Dolun” showcases her extraordinary command of classical music. An amusing fact about the film is that composer Madan Mohan also appeared in it as an actor!

Our song features Nalini Jaywant and Dev Anand, but, interestingly, it is not picturised on Nalini Jaywant. Instead, it features Ameeta—the same actress who later became famous as Shammi Kapoor’s heroine in Tumsa Nahin Dekha. In her Hindi film career spanning 21 years from 1952 to 1973, Ameeta worked in 49 films (Ref. Wikipedia).

In the film, Roopa (Nalini Jaywant) initially dislikes Raj (Dev Anand). But after he saves her life following an accident in the jungle, their relationship acquires a new emotional dimension. The song emerges against this backdrop, although on screen it is picturised on Bela (Amita) and her friends.

One immediately notices the distinctive magic of Burmanda’s music. He has infused the melody with the flavour of folk music—its effortless simplicity, rhythmic bounce and playful lilt making it sound almost like an authentic folk song. The choreography is equally charming, so closely does it blend with the music that one wonders which came first—the dance or the melody. They seem to have sprung from the same creative impulse.

The restrained use of chorus, along with dholki, tabla, ghungroo, flute and perhaps mandolin, gives the song a wonderfully bright and vibrant character.

But the real magic lies in Shailendra’s lyrics.

He portrays love not through grand declarations but through eyes, lips, shy glances and hidden emotions:

“Hothon pe inkaar, teri aankhon mein ikraar hai…”

The lips say no, while the eyes confess everything. And then:

“Dil hi dil mein tera balkhana,
Man mein haan haan magar munh pe na na…”

A yes in the heart, a no on the lips—and between them lies the deliciously shy, playful romance of love.

Shailendra turns the heroine’s eyes into arrows:

“Badi badi aankhon se leke nishana,
Ghadi ghadi teer chala ke tera sharmana…”

The eyes take aim, shoot their arrows, and then the beloved herself blushes!

His imagery is wonderfully vivid—“neembu ki faaki si ankhiyaan,” “teekhi teekhi ye julmi kanakhiyan”—capturing not merely beauty but the mischief and flirtatiousness hidden in those eyes.

And then comes the unforgettable image:

“Unke munh pe laaj ka gulaal rang laaye re…”

What could describe cheeks flushed with the colour of love more beautifully than “laaj ka gulaal”?

“Badli ke din jaise dhoop aaye jaaye re…”

Sunlight appearing and disappearing behind clouds becomes a lovely metaphor for the hesitation and blossoming emotions of love.

Finally:

“Meethi meethi peedon se dil ko maza aaye re…”

Even the pain of love is sweet—and Shailendra captures that delightful paradox with disarming simplicity.

The song is equally rewarding visually: the expressive faces, fleeting glances and beautifully framed close-ups make the romance come alive on screen.

The effortless charm of folk music, Burman’s sparkling orchestration, Shailendra’s playful poetry, Lata’s enchanting voice and the expressive choreography—all combine to make “Nain Khoye Khoye Tere…” a wonderfully shy, mischievous and melodious confession of love.

So, let us savour this delightful little celebration of love!


Sunday, 2 August 2026

आरंभ-स्वर १५ : दिल में समा गये सजन (Sajjad-Talat-Lata treat to ears)



सामान्य चित्रपटातील एक असामान्य गीत : "दिल में समा गये सजन" (संगदिल, १९५२)

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेले आहेत की जे चित्रपट म्हणून कदाचित फारसे गाजले नाहीत; परंतु त्यांच्या अप्रतिम संगीतामुळे ते अजरामर झाले. अलबेला (१९५१), दिल अपना और प्रीत पराई (१९६०), आरजू (१९६५), आशिकी (१९९०) आणि ताल (१९९९) ही त्यांपैकी काही ठळक उदाहरणे. या चित्रपटांतील संगीताने चित्रपटांच्या लोकप्रियतेलाही मागे टाकले आहे.

आजचे गाणे अशाच एका चित्रपटातील आहे.

गीत : दिल में समा गये सजन, फूल खिले चमन चमन
चित्रपट : संगदिल (१९५२)
गीतकार : राजेंद्रकृष्ण
संगीतकार : सज्जाद हुसेन
गायक-गायिका : लता मंगेशकर आणि तलत महमूद

गाण्याविषयी बोलण्यापूर्वी एक रंजक आठवण सांगावीशी वाटते. माझे मित्र अद्वैत धर्माधिकारी यांनी एकदा या गीताच्या चालीचे प्रतिबिंब जवळपास वीस वर्षांनंतर ध्वनिमुद्रित झालेल्या लता मंगेशकर आणि अरुण दाते यांच्या "संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा" या मराठी गीतातही आढळते, असे सांगितले होते. नंतर या मनोरंजक साम्याचा उल्लेख मला पुढील संकेतस्थळावरही वाचायला मिळाला: https://www.aathavanitli-gani.com/Song/Sandhikali_Ya_Asha

चित्रपट

संगदिल हा चित्रपट शार्लट ब्राँटे यांच्या १८४७ सालच्या अमर Jane Eyre या कादंबरीवर आधारित आहे. दिलीपकुमार आणि मधुबाला यांनी एकत्र काम केलेला हा केवळ दुसरा चित्रपट. चित्रपटाची कथा तशी पारंपरिक असली, तरी राजेंद्रकृष्ण यांच्या उत्कृष्ट गीतांनी आणि सज्जाद हुसेन यांच्या कल्पक संगीताने त्याचे रूपांतर एका संगीतमय खजिन्यात केले. या चित्रपटाने त्या काळी जवळपास ९५ लाख रुपयांचा व्यवसाय केला होता—आजच्या मूल्यांनुसार साधारण शंभर कोटी रुपयांच्या आसपास.

या चित्रपटात एकूण आठ गीते आहेत. तलत महमूद यांची दोन एकलगीते आणि एक द्वंद्वगीत, लता मंगेशकर व आशा भोसले यांची प्रत्येकी एक एकलगीत आणि एक द्वंद्वगीत, तर गीता दत्त आणि शमशाद बेगम यांची प्रत्येकी एक एकलरचना.

चित्रपटाची कथा शंकर (दिलीपकुमार) आणि कमला (मधुबाला) या बालमित्रांभोवती फिरते. नियती त्यांना एकमेकांपासून दूर करते; परंतु त्यांच्या मनातील प्रेम मात्र अबाधित राहते. अनेक वर्षांनी नियती पुन्हा त्यांची भेट घडवून आणते. तोपर्यंत शंकर जहागीरदार बनलेला असतो, तर कमला देवळातील पुजारिण. जेव्हा दोघांना आपली खरी ओळख पटते आणि आयुष्यातील सर्व बंधने झुगारून एकत्र येण्याचा निर्णय घेतात, तेव्हा हे अविस्मरणीय द्वंद्वगीत सुरू होते—

आज प्रीत ने तोड़ दी बंधन की दीवार,
हार मान के प्रीत से चला गया संसार

सुरुवातीलाच मोहून टाकणारा संगीताविष्कार

गाण्याची सुरुवात लता मंगेशकर यांच्या निर्मळ, मधुर स्वरांनी होते. "तोड़" या शब्दावरील नाजूक हरकत, "दी" नंतर स्वरांची सहज उतरती चाल, "की" वरील सुबक हरकत आणि शेवटी "संसार" या शब्दावरील छोटीशी तान—या सर्वांमुळे गाणे पहिल्याच ओळीत एका विलक्षण उंचीवर जाऊन पोहोचते.

सज्जाद हुसेन यांनी पियानो, व्हायोलिन, बासरी आणि संयत तालवाद्य यांच्या सुरेख मिलाफातून एक विलक्षण नादमय वातावरण निर्माण केले आहे. या वाद्यांची साथ कधीही स्वरांवर मात करत नाही; उलट गाण्याच्या भावविश्वाला अधिक खुलवते.

मुखडा म्हणजे निव्वळ संगीताचा उत्सव—

दिल में समा गये सजन, फूल खिले चमन चमन,
प्यार भी मुस्कुरा दिया।
मस्ती भरी हवा चली, हँसने लगी कली कली,
तुम से मुझे मिला दिया॥

वर्षानुवर्षांच्या विरहानंतर एकमेकांना भेटलेल्या दोन प्रेमिकांच्या आनंदाचे चित्रण राजेंद्रकृष्ण यांनी अत्यंत सहज, परंतु प्रभावी शब्दांत केले आहे.

त्यांच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल पुढील कडव्यात व्यक्त होतो—

ऐसा बदल गया समा, बदले ज़मीन ओ आसमान,
छोड़ के जब बना लिया प्यार ने एक नया जहाँ।
आयी घटाएं झूम के, नील गगन को चूम के,
ग़म का निशाँ मिटा दिया॥

या कडव्यात जणू निसर्गही त्यांच्या मिलनाचा उत्सव साजरा करतो. ढग डोलू लागतात, आकाशाला चुंबन देतात आणि दुःखाची प्रत्येक खूण नाहीशी होते.

तिसऱ्या कडव्यात त्यांच्या पूर्वीच्या रिकाम्या आयुष्याची आणि प्रेमामुळे प्राप्त झालेल्या परिपूर्णतेची अत्यंत सुंदर तुलना आढळते—

पहले कोई खुशी ना थी, दिल की कली खिली ना थी,
तीर-ए-नज़र चला ना था, ज़िंदगी ज़िंदगी ना थी।
तेरे कदम की आहटें बन गयी मुस्कुराहटें,
मेरा जहाँ बसा दिया॥

एकेकाळचे ओसाड आणि अर्थहीन वाटणारे जीवन प्रिय व्यक्तीच्या आगमनाने फुलून आले आहे.

शेवटचे कडवे या आनंदोत्सवाला पुढे नेते—

आयी जो रुत बहार की, छिड़ गयी बात प्यार की,
दिल ने तड़प तड़प के फिर तेरे लिए पुकार की।
तुम भी कहीं से आ गये, धीरे से मुस्कुरा गये,
दिल को हँसा हँसा दिया॥

आणि मग पुन्हा मुखडा येतो—

मस्ती भरी हवा चली, हँसने लगी कली कली,
तुम से मुझे मिला दिया।
दिल में समा गये सजन, फूल खिले चमन चमन,
प्यार भी मुस्कुरा दिया।
ग़म का निशाँ मिटा दिया, दिल को हँसा हँसा दिया॥

सज्जाद हुसेन यांची संगीतप्रतिभा

संगीताच्या दृष्टीने पाहता हे गीत मिश्र यमन रागावर आधारित असल्याचे म्हणता येईल. पियानो, व्हायोलिन आणि बासरी यांच्या सुरेख तुकड्यांमुळे गाण्याची माधुरी अधिक खुलते आणि संपूर्ण रचनेत कोमल प्रणयभाव कायम राहतो.

गाण्याचा वेग चांगलाच असूनही "घटाएं", "कदम" आणि "कहीं" या शब्दांवरील सूक्ष्म हरकती लताबाईंनी ज्या सहजतेने घेतल्या आहेत, त्या त्यांच्या अद्वितीय स्वरनियंत्रणाची आणि अप्रतिम गायकीची साक्ष देतात. अशा प्रकारच्या अलंकारांसाठी विलक्षण अचूकता आणि कसब आवश्यक असते.

या गीताचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक कडव्याला सज्जाद यांनी स्वतंत्र चाल दिली आहे. चित्रपटसंगीतात क्वचितच आढळणाऱ्या या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण गीतात सतत नवेपणा जाणवतो आणि श्रोत्याची उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते.

माझ्या मते, "दिल में समा गये सजन" हे हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट पाच द्वंद्वगीतांपैकी एक मानले जावे. गीतकार राजेंद्रकृष्ण यांची भावस्पर्शी शब्दरचना, सज्जाद हुसेन यांचे कल्पक संगीत, लता मंगेशकर यांची सहजसुंदर आणि अप्रतिम गायकी, तलत महमूद यांच्या मखमली आवाजाची ऊब आणि अत्यंत संयत पण परिणामकारक वाद्यमेळ—या सर्वांचा संगम या गीताला कालातीत बनवतो.

हे सुंदर गीत तुम्हालाही तितकेच भावेल, अशी आशा आहे. ते ऐकल्यानंतर तुमचे मत आणि अनुभव अवश्य कळवा. धन्यवाद.


An Extraordinary Song from an Ordinary Film: "Dil Mein Sama Gaye Sajan" (Sangdil, 1952)

Hindi cinema has produced many films that may have been ordinary as cinematic experiences but became immortal because of their music. From Albela (1951) and Dil Apna Aur Preet Parai (1960) to Arzoo (1965), Aashiqui (1990), and Taal (1999), there are numerous examples where the soundtrack has long outlived the film itself.

Today's song belongs to that distinguished category.


Song:
Dil Mein Sama Gaye Sajan, Phool Khile Chaman Chaman
Film: Sangdil (1952)
Lyricist: Rajendra Krishna
Composer: Sajjad Hussain
Singers: Lata Mangeshkar and Talat Mahmood

Before discussing the song itself, let me share an interesting anecdote. My friend Advait Dharmadhikari once pointed out that the melodic inspiration for this composition resurfaced nearly two decades later in the Marathi song Sandhikāli Yā Ashā Dhundalyā Dishā Dishā, beautifully rendered by Lata Mangeshkar and Arun Date. I later found a reference to this fascinating connection on the following website: https://www.aathavanitli-gani.com/Song/Sandhikali_Ya_Asha

The Film

Sangdil was adapted from Charlotte Brontë's classic 1847 novel Jane Eyre. It was only the second film to feature Dilip Kumar and Madhubala together. Although the film itself was fairly conventional, Rajendra Krishna's outstanding lyrics and Sajjad Hussain's inspired compositions transformed it into a musical treasure. The film reportedly grossed nearly ₹9.5 million at the box office—a figure that would translate to roughly ₹100 crore today.

The soundtrack consists of eight songs: Talat Mahmood sings two solos and one duet; Lata Mangeshkar and Asha Bhosle each have one solo and one duet; while Geeta Dutt and Shamshad Begum contribute one solo each.

The story revolves around Shankar (Dilip Kumar) and Kamla (Madhubala), childhood companions separated by fate but united by enduring love. Years later, destiny brings them together once more. By then, Shankar has become a feudal lord, while Kamla has devoted herself to the temple as a priestess. The moment they recognise one another and decide to break free from the constraints that have kept them apart, this unforgettable duet begins:

Aaj preet ne tod di, bandhan ki deewar,
Haar maan ke preet se, chala gaya sansar.

A Sublime Musical Opening

The song opens with Lata Mangeshkar's exquisitely pure voice. The delicate harkat on the word "toṛ", the graceful descent immediately after "dī", another elegant ornament on "kī", and the brief taan on the concluding word "sansār" elevate the composition from its very first phrase.

Sajjad Hussain creates a magical atmosphere with a finely balanced orchestral palette: the piano leads the accompaniment, beautifully complemented by the violin, flute, and restrained percussion.

The opening refrain is sheer musical delight:

Dil mein sama gaye sajan, phool khile chaman chaman,
Pyar bhi muskura diya.
Masti bhari hawa chali, hansne lagi kali kali,
Tum se mujhe mila diya.

Rajendra Krishna captures with remarkable simplicity the overwhelming joy of two lovers reunited after years of separation.

The emotional transformation they experience is expressed in the next stanza:

Aisa badal gaya sama, badle zameen o aasman,
Chhod ke jab bana liya pyar ne ek naya jahan.
Aayi ghataayen jhoom ke, neel gagan ko choom ke,
Gham ka nishan mita diya.

Here, nature itself seems to celebrate their union. The entire world appears transformed; the clouds dance, the sky is kissed, and every trace of sorrow vanishes.

The third stanza beautifully contrasts their earlier emptiness with the fulfilment that love has brought:

Pehle koi khushi na thi, dil ki kali khili na thi,
Teer-e-nazar chala na tha, zindagi zindagi na thi.
Tere kadam ki aahatein ban gayin muskurahatein,
Mera jahan basa diya.

What was once a barren existence has blossomed into a complete and meaningful life through the beloved's arrival.

The final stanza continues this joyous celebration:

Aayi jo rut bahaar ki, chhid gayi baat pyar ki,
Dil ne tadap tadap ke phir tere liye pukar ki.
Tum bhi kahin se aa gaye, dheere se muskura gaye,
Dil ko hansa hansa diya.

The song concludes by returning to the refrain, reaffirming the lovers' happiness:

Masti bhari hawa chali, hansne lagi kali kali,
Tum se mujhe mila diya.
Dil mein sama gaye sajan, phool khile chaman chaman,
Pyar bhi muskura diya.
Gham ka nishan mita diya, dil ko hansa hansa diya.

Sajjad Hussain's Musical Brilliance

Musically, the composition may best be described as being based on Mishra Yaman. The piano, violin, and flute interludes enrich the melody without ever overwhelming it, creating an atmosphere of tenderness and romance.

The song moves at a brisk pace, yet Lata negotiates the intricate harkats on words such as "ghataayen," "kadam," and "kahin" with astonishing ease. These delicate embellishments demand exceptional control and precision—qualities that only a singer of Lata Mangeshkar's calibre could command.

Another striking feature of the composition is that Sajjad employs a different melodic treatment for each of the three stanzas. This uncommon approach lends the duet remarkable freshness and keeps the listener engaged throughout.

For me, Dil Mein Sama Gaye Sajan unquestionably deserves a place among the five greatest duets ever composed for Hindi cinema. It is one of those rare songs in which every creative contributor reaches the highest level of artistry: Rajendra Krishna's evocative poetry, Sajjad Hussain's inspired composition, Lata Mangeshkar's effortless virtuosity, Talat Mahmood's velvety warmth, and the understated orchestration all come together to create something truly timeless.

I hope you enjoy listening to this beautiful duet as much as I do. I would be delighted to hear your impressions after you have heard it.

Thank you.