Thursday 1 February 2024

अनमोल रतन - 17: First ever Duet of Kishore Kumar and Asha Bhosale

Namaskar Friends,

I am pleased to present a new song in this edition of अनमोल रतन. As it is the first song of 2024, I have selected a light-hearted, funny song for you. Hope you will enjoy the song.

English version of the blog is right after the Marathi version.

गीत # १७ - आती है याद हमको जनवरी फरवरी (Aati Hai Yaad Humko January February)


Film: Muqaddar (1950)
Director: Arvind Sen

Cast: Nalini Jaywant, Sajjan, Kishore Kumar, Iftekhar
Lyrics: Raj Shekhar

Composer: Khemchand Prakash, Bhola Shreshtha
Singers: Kishore Kumar and Asha Bhosale


गुलाबी थंडीने सुरुवात झालेल्या या वर्षातील हे पहिले गाणे तुमचा मूड आनंदी करण्यासाठी निवडलेले असे वैशिष्ट्यपूर्ण गाणे आहे. या गाण्याचे एक संगीतकार खेमचंद प्रकाश हे आपल्याला सुप्रसिद्ध "महल" (१९४९) या चित्रपटाचे तसेच त्यातील अजरामर "आयेगा आनेवाला" या गीताचे संगीतकार म्हणून परिचित आहेत. तर दुसरे संगीतकार भोला श्रेष्ठ हे फारसे कोणाला माहिती नसतील, पण एकेकाळची पार्श्वगायिका सुषमा श्रेष्ठ ही भोला श्रेष्ठ यांची मुलगी. भोला श्रेष्ठ यांच्याविषयी थोडी माहिती मिळवली तर त्यांनी ५० हून अधिक गाणी संगीतबद्ध केल्याचे समजते. 

१९५० साली आलेला "मुकद्दर" हा चित्रपट किशोरकुमार यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील चौथा चित्रपट. १९४६ ते १९८९ या काळात किशोरकुमार यांनी एकूण ८८ चित्रपटात काम केले. जशी किशोरकुमार यांची अभिनय कारकीर्द १९४६ मध्ये चालू झाली, तशी आशाबाईंची गायिका म्हणून कारकीर्द १९४८ मधे संगीतकार हंसराज बहल यांच्या "चुनरिया" चित्रपटातून झाली, त्यावेळी त्या अवघ्या १५-१६ वर्षांच्या होत्या!

आज सादर करत असलेले गाणे हे किशोरकुमार आणि आशा भोसले यांचे पहिले-वहिले द्वंद्वगीत आहे. तसेच या गाण्यात प्रथमच किशोरकुमार यांनी Yodeling वापरले आहे, जी पुढे त्यांची शैली बनली. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोरकुमारला त्यांच्या "ज़िद्दी" (१९४८) या चित्रपटातील अजरामर गीतातून नावारूपाला आणले, त्या खेमचंद प्रकाश यांच्याबरोबरचा किशोरकुमार यांचा "मुकद्दर" या शेवटचा चित्रपट ठरला कारण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसातच खेमचंद प्रकाश यांचे निधन झाले.

आता थोडे आजच्या गाण्याविषयी - हे गाणे मोठे मजेदार आहे, कारण त्यात बाराही इंग्रजी महिन्यांची नावे आली आहेत. किशोरने हे गाणे मोठे खुलून म्हटले आहे. आशाबाई मात्र नवीन असल्याने त्यांच्यावर त्याकाळच्या सुप्रसिद्ध गायिका शमशाद बेगम यांचा प्रभाव दिसतो. गाण्यात "जुलै ऑगस्ट सप्टेंबर" या कडव्यात आशाबाईंनी थोडेसे पाश्चिमात्य ढंगाने गायचा प्रयत्न केल्याचे दिसते. एकूण गाणे छान झाले आहे. काहीतरी वेगळे ऐकल्याचे समाधान मिळते. ब्लॉगच्या शेवटी गाण्याचा व्हिडीओ पहा.


At the time when you are enjoying the cold mornings of the 2024 winter, here is a song that will enhance your happy mood. The song is from the film "Muqaddar" (1950) composed by Khemchand Prakash and Bhola Shreshtha. While, you would have known Khemchand Prakash as the Music composer of the superhit film "Mahal" (1949) and its equally blockbuster song "Aayega Aanewala", the composer Bhola Shreshtha is little known. If you scratch your memory a little bit, you will remember a singer viz. Sushma Shreshtha from the 70's and 80's who was popular for a while, she is the daughter of Bhola Shreshtha. Bhola ji composed more than 50 songs for various Hindi films in his film music career.

"Muqaddar" happened to be the 4th movie as an actor for Kishore Kumar. He acted in around 88 films from 1946 to 1989. Asha Bhosale started her film playback career in 1948 through the film "Chunariya" composed by Hansraj Bahal. Asha ji was barely 15-16 years old then

Today's song happens to be the first ever duet sung by Kishore and Asha together. Kishore, who was later known to be Yogeling expert, used this art for the first time in this film. "Muqaddar" happened to be the last movie of Kishore Kumar with his Guru Khemchand Prakash who had introduced him as a singer in his film "Ziddi' (1948). Khemchand ji died within few months after "Muqaddar" was released.

This particular song is very peculiar in the sense that it carries names of all the 12 months in a year. While Kishore sounds to be at his usual best, Asha ji seems to be under the influence of the then popular singer Shamshad Begum. Asha ji has tried to sing in Western style as well. The song will certainly make you happier. Enjoy the song.