Sunday, 5 July 2026

आरंभ-स्वर १४ : दम भर जो उधर मुँह फेरे (Raj Kapoor-Nargis starrer)


साल होतं १९८८. नुकताच पदवीधर होऊन पुढील परीक्षेचा अभ्यास सुरु होता त्यामुळे आयुष्यात भरपूर वेळ असण्याचा तो काळ होता. २ जून १९८८ रोजी हिंदी चित्रसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता/दिग्दर्शक राजकपूर याचे निधन झाले. आमच्या आई-बाबांच्या पिढीतील "राज-दिलीप-देव" या त्रिकुटाची पडद्यावरची जादू संपून दशकाहून अधिक काळ लोटला होता तरीही त्यांची लोकप्रियता कायम होती. राजकपूर गेल्यानंतर पुण्यातील विजय टॉकीज (लिमये नाट्य चित्र मंदिर) मध्ये त्याच्या चित्रपटांचा महोत्सव लागला होता. त्यात प्रथम "आवारा" पाहिला आणि इतरांप्रमाणेच भारावून गेलो. त्याची कथा, त्यातील दृश्ये, सर्वांचा अभिनय आणि त्यातील गाणी यांनी नंतर कित्येक दिवस झपाटून टाकले. त्यावेळी गीत/संगीत यातील फार काही कळत नव्हते पण गाणी कानाला गोड लागत होती.

नंतर जशीजशी समज वाढत गेली तेंव्हा लक्षात आले की कसे राजकपूरने आणि त्याच्या लेखकांनी "आवारा" आणि "श्री ४२०" सारख्या चित्रपटातून तद्दन साम्यवादी विचार मांडले आहेत ते! Indian Express मध्ये मागे राजकपूरने एक लेख लिहिला होता त्यात लिहिले होते की "आवारा चित्रपटात मला हे सिद्ध करायचे होते की आवारा, गुंड मुले जन्मतःच नसतात तर गरिबी आणि आजूबाजूच्या दुष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात". 

चोरी, लूटमारी, गुन्हे करणे यांसारख्या वाईट कामांचे उदात्तीकरण गरिबी आणि समाजाने ठोकरलेला या गोंडस आवरणाखाली या चित्रपटांनी केले. त्यातील गुंड, स्वार्थी, लबाड, भ्रष्टाचारी, गुन्हेगार नायकाला हिरो बनवून एक प्रकारे समाजात चुकीचा संदेश पसरवला. आज हे दुर्गुण सर्व समाजात मोठ्या प्रमाणात पसरले आहेत आणि समाज रसातळाला जातो आहे हे आपण अनुभवतो आहोत. याला प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या अशा चित्रपटांतून झालेले दुर्गुणांचे उदात्तीकरण कारणीभूत आहे असे वाटते. असो.

आज सादर करत असलेले गाणे हे १९५१ सालच्या "आवारा" चित्रपटातील आहे. "आवारा" मधे तब्बल १० गाणी आहेत त्यापैकी लताची ६ (४ सोलो, २ द्वंद्व), मुकेशची ३ (२ सोलो, १ द्वंद्व), आणि रफी, मन्ना डे आणि शमशाद बेगम यांचे प्रत्येकी १ गाणे आहे. सहा गाणी शैलेंद्र यांनी तर उर्वरित चार गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली आहेत. आणि अजरामर असं संगीत दिलंय शंकर-जयकिशन (SJ) यांनी. राजकपूर बरोबरच्या पहिल्या "बरसात" या चित्रपटानंतर SJ जोडीचा हा दुसरा चित्रपट. "आवारा" मध्ये शंकर-जयकिशन यांनी तब्बल १०० वादकांचा वाद्यवृंद वापरला. "तेरे बिना आग ये चांदनी" आणि "घर आया मेरा परदेसी" सारखी गाणी ऐकली तर या वाद्यवृंदाची जादू लक्षात येईल. क्या कहने? वाहव्वा!!

गाण्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी: श्रीमंत न्यायाधीश असलेले रघुनाथ (पृथ्वीराज कपूर) यांचा "चांगल्या माणसांची मुले चांगलीच निघतात आणि वाईट माणसांची वाईट" या उक्तीवर ठाम विश्वास असतो. गुंड जग्गा (K. N. सिंग) याला रघुनाथ यांनी शिक्षा सुनावलेली असते. त्याचा बदला म्हणून जग्गा रघुनाथ यांची बायको लीला (लीला चिटणीस) हिला पळवून आणतो, आणि ती गरोदर आहे हे समजताच ४ दिवसांनी घरी पाठवून देतो. तिच्या चारित्र्याबद्दल शंका येऊन रघुनाथ तिला घराबाहेर काढतात, कालांतराने लीलाला राज (छोटा राज - शशी कपूर, मोठा राज - राज कपूर) हा मुलगा होतो. त्यांच्या दुर्दैवाने तो जग्गाच्या कचाट्यात सापडून पुढे चोरी, लूटमारी असे धंदे करायला लागतो. राजची बालपणीची मैत्रीण रिटा (नर्गिस). दोघांची गाठ तरुणपणी १२ वर्षानंतर पडते. त्यांच्या पहिल्या भेटीच्या प्रसंगादरम्यान येते हे अप्रतिम गाणे "दम भर जो उधर मुँह फेरे".

चित्रपट: आवारा,  गीतकार:  शैलेंद्र, संगीतकार: शंकर-जयकिशन, गायक/गायिका: लता मंगेशकर आणि मुकेश

सुरुवातीलाच ऐकू येतो फक्त लताचा अमर आवाज...

दम भर जो उधर मुँह फेरे, ओ चन्दा

नंतर बासरीचा एक मधुर तुकडा, आणि मग...

मै उनसे प्यार कर लूंगी, बातें हज़ार कर लूँगी । ।

दुसऱ्यांदा हीच ओळ म्हणताना खास शंकर-जयकिशन ठेका सुरु होतो आणि गाणे वेग पकडते.... 

दिल करता है प्यार के सजदे, और मैं भी उनके साथ
चाँद को चन्दा रोज़ ही देखे मेरी पहली रात 
(रिटा राजला प्रेमाने चाँद म्हणत असते) 
बादल में अब छुप जा रे ओ चन्दा
मै उनसे प्यार कर लूँगी ...

आता ऐकू येतो तो मुकेशचा निर्मळ आवाज:

दम भर जो इधर मुँह फेरे, ओ चन्दा
मै उनसे प्यार कर लूँगा,  नज़रें तो चार कर लूँगा । । 

मै चोर हूँ काम है चोरी, दुनिया में हूँ बदनाम     (सत्य)
दिल को चुराता आया हूँ मैं यही मेरा काम    (मुलामा)
आना तू गवाही देने ओ चन्दा                   
मै उनसे प्यार कर लूँगा,  नज़रें तो चार कर लूँगा । ।                

ती तिच्या मनातील भीती व्यक्त करते:

दिल को चुराके खो मत जाना, राह न जाना भूल
इन कदमों से कुचल ना देना मेरे दिल का फूल
ये बात उन्हें समझा दे ओ चन्दा
मै उनसे प्यार कर लूँगी ... । । 

शेवट पुन्हा संथ, तलावातील पाण्यात चंद्राचे दर्शन आणि लताने गायलेली शेवटची ओळ आपल्याला हुरहूर लावून जाते. 

राज कपूर आणि विशेषतः नर्गिस यांचा अप्रतिम अभिनय; प्रियकर-प्रेयसीच्या भेटीची आतुरता, त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद आणि बालपणीच्या प्रेमाला आलेला बहर या सर्व भावनांचे अत्यंत प्रभावी चित्रण करणारे शैलेंद्र यांचे हृदयस्पर्शी शब्द; शंकर-जयकिशन यांचे अफलातून संगीत; आणि त्यावर लता मंगेशकर व मुकेश यांच्या भावपूर्ण गायकीने चढवलेला कळस—या सर्व घटकांनी मिळून हे गीत अजरामर बनवले आहे. ते चिरंतन लोकप्रिय ठरले नसते, तरच नवल वाटले असते.

चला तर ऐकू या हे सुप्रसिद्ध गीत.

ब्लॉग आवडला असेल अशी आशा करतो. आपली प्रतिक्रिया कळवा आणि ब्लॉग तुमच्या संपर्कातील लोकांनाही पाठवा. धन्यवाद.


The year was 1988. I had just graduated and was preparing for my next competitive examination, so it was a period in life when I had plenty of free time. On 2nd June 1988, the legendary Hindi film actor and director Raj Kapoor passed away. Although more than a decade had passed since the golden era of the iconic trio of my parents' generation—Raj Kapoor, Dilip Kumar, and Dev Anand—their popularity remained undiminished.

Following Raj Kapoor's death, Vijay Talkies (Limaye Natya Chitra Mandir) in Pune organized a festival showcasing his films. The first film I watched there was “Awaara”, and like countless others, I was completely captivated. Its story, memorable scenes, brilliant performances, and unforgettable songs stayed with me for days. At that time, I knew very little about the finer aspects of lyrics or music, but the songs were irresistibly melodious.

As my understanding matured over the years, I realized how Raj Kapoor and his writers had infused films like “Awaara” and Shree 420 with distinctly socialist, even communist, themes. I remember reading an article by Raj Kapoor in The Indian Express, where he wrote that his objective in “Awaara” was to demonstrate that criminals and vagabonds are not born that way; rather, poverty and adverse social circumstances turn them into such people.

These films, in my view, romanticized theft, robbery, and crime under the sympathetic guise of poverty and social oppression. By portraying gangsters, selfish, deceitful, corrupt, and criminal protagonists as heroes, they arguably conveyed a problematic message to society. Today, when dishonesty and criminal tendencies seem widespread and society appears to be deteriorating morally, one cannot help wondering whether the glorification of such flawed characters in cinema has, directly or indirectly, contributed to this decline. Be that as it may.

The Story

The story revolves around Raghunath (Prithviraj Kapoor), a wealthy judge who firmly believes that good men produce good children, while bad men produce bad children. He sentences the notorious criminal Jagga (K. N. Singh), who later kidnaps Raghunath's wife Leela (Leela Chitnis) in revenge. Upon discovering that she is pregnant, Jagga releases her after four days. However, Raghunath suspects her chastity and throws her out of the house.

In time, Leela gives birth to a son, Raj (played by Shashi Kapoor as a child and Raj Kapoor as an adult). Fate leads the boy into Jagga's influence, and he eventually turns to theft and crime. Raj's childhood friend is Rita (Nargis). The two meet again twelve years later as adults, and during this memorable reunion comes the enchanting song "Dam Bhar Jo Udhar Munh Phere."

The Music

““Awaara”” features an impressive ten songs:

  • Lata Mangeshkar sings six (four solos and two duets).
  • Mukesh sings three (two solos and one duet).
  • Mohammed Rafi, Manna Dey, and Shamshad Begum contribute one song each.

Six songs were written by Shailendra, while the remaining four were penned by Hasrat Jaipuri. The immortal music was composed by the legendary duo Shankar–Jaikishan. After their successful collaboration with Raj Kapoor in “Barsaat”, ““Awaara”” became their second film together.

Remarkably, Shankar–Jaikishan employed an orchestra of nearly 100 musicians for the soundtrack. Listening to songs like "Tere Bina Aag Yeh Chandni" and "Ghar Aaya Mera Pardesi" reveals the grandeur of this orchestral arrangement. Simply magnificent!

"Dam Bhar Jo Udhar Munh Phere", Lyrics – Shailendra, Composer - Shankar–Jaikishan, Singers - Lata Mangeshkar and Mukesh

The song opens with Lata Mangeshkar's immortal voice:

Dam bhar jo udhar munh phere, o chanda...

A gentle flute passage follows, after which she sings:

Main unse pyar kar loongi, baatein hazaar kar loongi...

When she repeats the line, the percussion joins in and the song gathers momentum.

The lyrics continue:

Dil karta hai pyar ke sajde, aur main bhi unke saath,
Chaand ko chanda roz hi dekhe, meri pehli raat.

(Rita affectionately calls Raj "Chanda"—the Moon.)

The duet continues with Raj's playful confession:

Main chor hoon, kaam hai chori, duniya mein hoon badnaam...
Dil ko churata aaya hoon main, yahi mera kaam...

He admits to being a thief but cleverly softens the truth by claiming that what he truly steals are hearts.

Rita responds with a gentle warning:

Dil ko churake kho mat jaana, raah na jaana bhool,
In kadmon se kuchal na dena mere dil ka phool...

The song concludes at a slower pace, with the reflection of the moon shimmering in the lake. Lata Mangeshkar's final line leaves the listener with a lingering sense of longing.

Raj Kapoor's, and especially Nargis's, superb performances; Shailendra's evocative lyrics that beautifully capture the lovers' longing to meet, the joy of their reunion, and the blossoming of their childhood love; Shankar–Jaikishan's extraordinary music; and the crowning touch added by Lata Mangeshkar and Mukesh through their soulful singing—all these elements come together to make this song immortal. It would have been surprising if it had not achieved everlasting fame.

Let us once again enjoy this timeless classic.

Hope you liked the blog. Please leave a comment and share further. Thanks.


No comments:

Post a Comment

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.