Namaskar Friends,
Anil Biswas (Part 1) - English
In this part, I am going to present 10 of Anilda's finest, melodious duets, first in Marathi and then in English.
If you like it, please leave a comment on the blog itself with your name and share further. Thanks.
1) Ritu Aaye Ritu Jaaye Sakhi Ri - Hamdard (1953) - Singers Manna Dey and Lata Mangeshkar - Lyricist Prem Dhawan
"हमदर्द" हा संगीतप्रधान चित्रपट होता. त्याच्या निर्मात्या होत्या अनिलदांच्या पहिल्या पत्नी - आशालता विश्वास. चित्रपटाचा नायक अशोक (शेखर) हा एक अंध गायक असतो. नायिका माधवीच्या भूमिकेत त्यावेळची सुप्रसिद्ध अभिनेत्री निम्मी आहे. अनिलदांना हा घरचाच चित्रपट असल्याने त्यात भारतीय शास्त्रीय संगीताचे विविध प्रयोग करायचे होते, आणि नायक हा गायक असल्याने त्यांना ती संधी मिळाली आणि त्याचे त्यांनी सोने केले. चित्रपटातील एकमेव द्वंद्वगीत लता आणि मन्ना डे यांनी म्हटले आहे. आज सादर करत असलेले गीत हे अनिलदांनी रागमाला वापरून बांधलेले आहे. असा प्रयोग करणारे ते पहिले संगीतकार होते. या गाण्याचा आधार शास्त्रीय आहे ज्यात चार ऋतूंचे वर्णन चार रागात केले आहे - गौड सारंग, गौड मल्हार, जोगिया आणि बहार! या गाण्यात अनिलदांनी प्रामुख्याने सारंगी आणि तबला ही दोनच वाद्ये वापरली आहेत. सारंगी आणि गायकांचे आवाज दोन्ही समांतर वाजत राहतात. ज्यांना शक्य आहे त्यांनी हे गाणे headset लावून ऐकावे आणि सारंगीचे अप्रतिम तुकडे जरूर ऐकावेत. अनिलदांच्या मते मन्ना डे आणि लता यांच्यातील अद्भुत अशा गायन प्रतिभेमुळेच हे गीत रेकॉर्ड होऊ शकले.
अशीच आणखी एक रागमाला अनिलदांनी बांधली ती १९५९ साली आलेल्या "चार दिल चार राहें" या चित्रपटासाठी, त्याविषयी पुढील भागात जाणून घेऊ या.
तर ऐकू या हे नितांतसुंदर गीत. तब्बल ७ मिनिटांचे आहे, केवळ अवर्णनीय!
"Hamdard" was a musical movie. It was produced under the banner of Variety Production owned by Anilda's first wife - Ashalata Biswas. Thus, being a home production, Anil da wanted to experiment various facets of Indian Classical Music in the film. And he got a golden opportunity since the hero of the movie happened to be a blind Singer played by Shekhar, while the female lead was played by the famous artist of those times - Nimmi. The lone duet in the film was sung by Manna Dey and Lata. Anil da composed this song, which depicts the 4 ऋतू, in 4 different Raagas viz. Gaud Sarang, Gaud Malhar, Jogiya and Bahar. Anil da has used only 2 instruments - Sarangi and Tabla. If you listen carefully, Sarangi is played almost parallel to the singers' voices.
Anil da happened to be the first composer presenting a full-fledged RaagMala in a movie. Anil da composed one more Raagmala in 1959 "Char Dil Char Rahen" movie, we will learn more about it in the next part. For now, let's listen to this beautiful out-of-the-world 7-min composition and singing.
2) Rahi Matwale Tu Chhed Ek Baar - Waris (1954) - Singers Talat Mahmood and Suraiyya - Lyricist Qamar Jalalabadi
१९५४ सालच्या "वारिस" चित्रपटातील हे एक सुंदर द्वंद्वगीत. या चित्रपटात तलत महमूद आणि सुरैय्या हे नायक आणि नायिकेच्या भूमिकेत होते, आणि त्या दोघांनीच हे गाणे गायले आहे हे या गाण्याचे वैशिष्ट्य. हे म्हणजे मराठी संगीत नाटकांसारखे झाले जिथे कलाकार स्वतःची गाणी स्वतःच गायचे! संपूर्ण गाणे हे रेल्वेच्या डब्यात चित्रित करण्यात आले आहे, त्यामुळे गाण्याचा वेगही गाडीच्या वेगाशी मिळताजुळता आहे. पहिल्या सेकंदापासूनच गाण्याची स्वररचना आपल्या मनाची पकड घेते. अनिलदांनी प्रसंगानुरूप संगीत इतके अनोखे दिले आहे, की रेल्वेचा वेग दाखवणारे संगीत हे कायम पार्श्वभूमीवर वाजत राहतात, अगदी दोन कडव्यांमध्येही. हे गाणे रवींद्र संगीतावर आधारित आहे. रवींद्रनाथ ठाकुरांचे एक बंगाली गाणे आहे "ओरे गृहोबाशी खोल द्वार खोल", या गाण्यावरून अनिलदांनी "राही मतवाले" ची चाल बांधली आहे. हे सुमधुर गाणे आजही लोकांच्या आठवणीत आहे.
One more sweet melody from Anil da from the 1954 movie "Waaris". Its star cast included Talat Mahmood and Suraiyya in lead roles. Both of them have sung this song themselves! This reminds us of Marathi Theatre Drama songs from old days wherein the artists themselves used to sing their own songs. The composition of the song is based on a Bengali song by Rabindranath Thakur viz. "Ore Gruhobashi Khol Dwar Khol". Anil da has certainly used the tune, but added his own value by composing the background and interlude music for the song, which matches the situation in the movie. Since the movie scene was shot inside a train bogie, Anil da has used fast paced rhythm in the background to imitate the train sound. This song is still played on few radio channels indicating that people still love and remember it. The movie also had the sad version of this song in slow pace sung by Suraiyya alone. Let's listen to the beautiful duet.
3) Aa Mohabbat Ki Basti Basayenge Hum - Fareb (1953) - Singers Kishore Kumar and Lata Mangeshkar - Lyricist Majrooh Sultanpuri
किशोरकुमार आणि लता मंगेशकर यांनी पहिले द्वंद्वगीत गायले होते १९४८ सालच्या "ज़िद्दी" या चित्रपटात संगीतकार खेमचंद प्रकाश यांच्या संगीत दिग्दर्शनामध्ये. त्याबद्दल मी माझ्या "अनमोल रतन" या मालिकेत सविस्तर लिहिले आहे, ते तुम्ही इथे पाहू शकता. अनिलदांकडे दोघांनी एकत्र गायलेले हे एकमेव गीत. "फरेब" मध्ये मुख्य भूमिकेत होते किशोरकुमार आणि शकुंतला परांजप्ये (प्रख्यात दिग्दर्शक सई परांजपे यांची आई आणि सुप्रसिद्ध गणितज्ञ रँग्लर परांजपे यांची मुलगी). गाण्याची सुरुवात होते किशोरच्या सदाबहार आवाजाने, त्यामुळे प्रसन्न वातावरण निर्मिती होते. किशोरच्या ओळी या खालच्या पट्टीत आहे तर लताच्या वरच्या पट्टीत. लताच्या दोन्ही कडव्यांच्या पहिल्या ओळी या लांबलचक आहेत तरीसुद्धा ती श्वास कुठे घेते हे कळत नाही. असं म्हणतात की अनिलदा त्यांच्या गायकांना चालीचे नोटेशन द्यायचे. पण किशोर कुमार गाणे शिकलेले नसल्यामुळे अनिलदांनी त्याला स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले गाणे दिले. आणि किशोरने ते जसेच्या तसे म्हटले आणि जन्म झाला किशोर-लताच्या असंख्य द्वंद्वगीतांपैकी एका अजरामर गीताचा. अनिलदांनी व्हायोलिन, सतार आणि तालवाद्य यांचा वापर करून ही सुंदर स्वररचना बनवली आहे. आपण ती ऐकू या.
Kishore Kumar and Lata Mangeshkar sang their first ever duet under Khemchand Prakash in "Ziddi" (1948). I had presented this song way back in my Anmol Ratan series first part. You can view it here. For Anilda, both had only one duet and how wonderful it is. "Fareb" had Kishore Kumar, Shakuntala Paranjpye (mother of well-known film director Sai Paranjpe), Maya Dass and Lalita Pawar. The song starts with Kishore's evergreen voice and sets a pleasant mood. While Kishore sings in lower octave, Lata was given to sing in a higher octave. It is said that Anil da used to give notations of the composition to the singers; however, since Kishore Kumar had not learnt music, Anil da recorded the song in his own voice and handed over the cassette to Kishore Kumar to listen and practice. Kishore Kumar then exactly mimicked Anil da to record one of the best duets of his life. Anil da has used Violin, Sitar and Rhythm instrument to create this beautiful melody. Let's enjoy the song.
4) Dhire Dhire Aa Re Badal Dhire Aa Re - Kismet (1943) - Singers Arun Kumar and Amirbai Karnataki - Lyricist Kavi Pradeep
आता तुम्हाला १९४० च्या दशकातील एक छान द्वंद्वगीत ऐकवणार आहे. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या दहा वर्षात अनिलदांना एक संगीतकार म्हणून मुंबईच्या फिल्म जगतात प्रस्थापित केले त्यात "जागिरदार" (१९३७), "औरत" (१९४०), "रोटी" (१९४०) आणि "किस्मत" (१९४३) या चित्रपटांचा सिंहाचा वाटा होता."किस्मत" चित्रपट आणि त्यातील गाणी प्रचंड गाजली. याबद्दल मी भाग-१ मध्ये विस्ताराने लिहिले आहे. यातीलच हे एक गाजलेले गाणे. अशोककुमार आणि मुमताज शांती यांच्यावर चित्रित झालेले. अनिलदांच्या संगीत रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातील संगीत कुठेही आवाजावर कुरघोडी करत नाही. याची स्वररचना अगदी साधी, सरळ आहे. कुठेही हरकती, ताना नाहीत. या गाण्यात अनिलदांनी प्रथमच शिट्टी (Whistle) चा वापर केलाय, त्याशिवाय स्वगत आणि काही गद्यात म्हटलेल्या ओळी, तरीही गाणे कानाला गोड लागते. चित्रपटसंगीतात असा धाडसी प्रयोग करणारे अनिलदा प्रथम संगीतकार होते. हे गाणे त्याकाळात प्रचंड लोकप्रिय झाले होते. ऐकू या तर.
Let me now take you back to 1940's and present a simple but sweet duet from the 1943 film "Kismet". As I had mentioned in Part-1, "Kismet" was one of the milestone films of Anil da in early years of his career, the others being "Jagirdar" (1937), "Aurat" (1940) and "Roti" (1940). This song has been picturized on Ashok Kumar and Mumtaz Shanti. The song was super hit in those days and is remembered till date. Even though the composition is very simple, it is pleasing to the ears. The accompanying music does not overpower the voices of the singers. While composing this song, Anil da has used Whistling and a bit of monologue. Anil da had the confidence to experiment with such out-of-way Let's listen to this song.
5) Nache Re Gori Dingu - Lajawab (1950) - Singers Lata Mangeshkar, Anil Biswas and Chorus - Lyricist Shekhar
अनिलदांनी आपल्या संगीतात भारतातील विविध प्रांतातील लोकसंगीताचा वापर केला. त्यांनी त्यांचे मित्र आणि प्रख्यात संगीतकार ग़ुलाम हैदर यांच्याबरोबर एक यात्राच काढली होती. दोघांनी भारतातील विविध प्रांतात जाऊन तेथील लोकसंगीत गोळा केले आणि नवीन गायक शोधले. अनिलदा म्हणायचे "प्रत्येक प्रांतातील लोकसंगीतामध्ये काही राग प्रामुख्याने बघायला मिळतात उदा. बंगाल मध्ये राग देश आणि बिलावल, पंजाब मध्ये भैरवी आणि पहाडी तर राजस्थान मध्ये मांड. अनिलदा स्वतः उत्तम गायक असल्याने ते ती लोकगीते म्हणूनही दाखवायचे. १९५० सालच्या "लाजवाब" चित्रपटात त्यांनी एक अतिसुंदर गाणे लोकगीतावर बांधले. लताजींनी त्या गाण्याला चार चाँद लावले, त्यांचा कोवळा मधुर आवाज, अप्रतिम शब्दफेक, आणि स्वरांवरची हुकूमत आपल्याला या गाण्यात जाणवेल. अनिलदांच्या शैलीप्रमाणे एक ताल (Rhythm) पार्श्वभूमीवर सतत ऐकू येतो, तसेच घुंगरांचा आवाजही. हे गाणे मुख्यतः लताजींचे आहे, उत्तम कोरसची साथ लाभली आहे. अनिलदांचा आवाज आपल्याला "नाचे रे गोरी" या ओळीत टिपेच्या स्वरात कोरस संपताना ऐकू येतो. ज्याने गाण्याची लज्जत वाढते. चला तर ऐकू या हे "लाजवाब" गाणे.
Anil da was known for his experiments in film music. He along with his friend and a great composer Master Ghulam Haider had taken a tour to collect folk songs from different parts of India and discover new singing talent. Anil da used to say that each part of the country had different forms of folk music based on different Ragas. E.g. Bengal's folk music was based on Raag Desh and Bilawal, Punjab's was based on Raag Bhairavi while Rajasthan had Raag Maand. Anil da, being an accomplished singer himself, used to demonstrate his observation by singing those folk songs. In his film "Lajawab" (1950), Anil da composed a beauty based on the folk music. And what a magic Lata has delivered. We are simply enthralled by Lata's young sweet voice, her amazing voice throw and her mastery over the Svar. In accordance with Anilda's style of music, one would continuously hear the Rhythm instrument in the background. In this particular song, the use of Ghungaroo (Musical Anklet) adds to the sweetness of the song. This song completely belongs to Lata and Chorus. You will hear Anilda's voice in "Nache Re Gori" line in very high octave at the end of the chorus. Enjoy the song and its beauty.
6) Ab Yaad Na Kar Bhool Ja Ai Dil Woh Fasana - Anokha Pyar (1948) - Singers Mukesh and Meena Kapoor - Lyricist Shums Azimabadi
पुढील ३ सुमधुर द्वंद्वगीते मी निवडली आहेत त्याचे एक कारण आहे की या तिन्ही गाण्यात लता नाहीये आणि तरीही ती गाणी अतिशय सुमधुर आहेत. हे गीत आहे १९४८ सालच्या "अनोखा प्यार" चित्रपटातील. दिलीपकुमार, नर्गिस आणि नलिनी जयवंत असा प्रेमाचा त्रिकोण चित्रपटात आहे. नर्गिस नायिकेच्या तर नलिनी जयवंत सहनायिकेच्या भूमिकेत आहे. अनिलदांच्या धाडसाचे कौतुक अशासाठी की नर्गिससाठी त्यांनी मीना कपूर यांचा तर सहनायिका नलिनी जयवंत हिच्यासाठी लताचा आवाज वापरला आहे! हा चित्रपटात केवळ संगीतामुळे प्रचंड गाजला. गाण्याच्या सुरुवातीला आपल्याला दिसतो तो उदासवाणा दिलीपकुमार जो त्याचे प्रेम विसरू पाहतोय. त्यामुळे मुकेशला दिलेली चालही तुलनेने संथ आहे. पार्श्वभूमीला एक वाद्य (बहुदा पियानो असावा) सतत वाजते जे नायकाच्या मनातील उदास भाव, हलकल्लोळ व्यक्त करत राहते. जसं पहिलं कडवं येतं आणि नर्गिसचा प्रवेश होतो तसा गाण्याचा टेम्पो बदलतो, जलद आणि आश्वासक होतो. दोघे भेटतात, त्यांच्यातली अधीरता संपते तसे गाण्याची पट्टीही वरती जाते आणि गाणे संपते. पडद्यावरील प्रसंगानुरूप चाल आणि संगीत कसे बांधावे याचे हे उत्कृष्ट उदाहरण.
The next 3 songs I have selected does not have Lata in it, and yet those songs are very sweet! This particular song is from the 1948 film "Anokha Pyar". It's a love triangle between Dilip Kumar, Nargis and Nalini Jaywant. While Nargis plays the female lead, Nalini Jaywant plays the co-actor role. However, salute to Ani da for his risk taking ability and self-confindence that Meena Kapoor has given playback to Nargis, while Lata sings for Nalini Jaywant! Any music director would have preferred Lata to sing heroine's songs, but Anil da was different in many ways. The song starts with Dilip Kumar singing in a somber mood. The background music using Piano depicts his mood perfectly. When Nargis enters the scene, the music tempo changes, it comes to life. When both meet at the end of the song, the joy is portrayed through very high pitch of the song. This is a perfect example of how to compose according to the situation of the movie scene.
7) Chahe Kitni Kathin Dagar Ho - Jeet (1949) - Singers Suraiyya and Shankar Dasgupta - Lyricist Prem Dhawan
हे गाणं म्हणजे रसिकांसाठी Surprise Package आहे! दोन कारणांनी - पहिले म्हणजे पडद्यावर हे गाणे सादर केलंय सुरैय्या आणि देव आनंद यांनी. दोघांनी एकत्र फार मोजक्या चित्रपटात काम केले आहे. आपण या जोडीच्या प्रेमाच्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. त्यांच्यातील एकमेकांविषयीचे प्रेम गाणे बघताना ओळीओळीत जाणवते. आणि दुसरे कारण म्हणजे देव आनंद साठी वापरलेला शंकर दासगुप्ता या अप्रसिद्ध गायकाचा आवाज. झब्बा, धोतर आणि जॅकेट घातलेल्या देव आनंदला पाहायला गंमत वाटते. 😂
This song is a surprise package for 2 reasons: Firstly, the song has been picturized on Dev Anand and Suraiyya whose off-screen relationship reflected in their on-screen presence. Both have done very few movies together. Secondly, Anil da have used a relatively unknown singer Shankar Dasgupta to playback for Dev Anand. It's also a bit of fun watching Dev Anand in Dhoti, Kurta and Jacket! 😂
8) O Sajanaa Chhutaa Hai Jo Daman Teraa - Heer (1956) - Singers Geeta Dutt and Hemant Kumar - Lyricist Majrooh Sultanpuri
अनिलदांना १९५५ हे वर्ष खूप खराब गेले होते, त्या वर्षी त्यांचा अवघा एक चित्रपट आला होता, आणि त्याची गाणीही फारशी गाजली नव्हती. १९५५ पर्यंत इतर उत्तमोत्तम संगीतकारही त्यांना स्पर्धक म्हणून उभे राहिले होते, त्यामध्ये सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर, रोशन यांच्यासारखे अनिलदांचे शिष्यही होते. चित्रपट संगीताची शैली बदलत होते, नवीन विषयांवर चित्रपट निघत होते, रसिकांची आवडही बदलत होती. १९५५ पर्यंत कारकिर्दीची २० वर्षे पूर्ण केलेले अनिलदा या सर्व आव्हानांना कसे सामोरे जाणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. पण अनिलदा हार मानणाऱ्यातले नव्हते. १९५६ चा "हीर" आणि १९५७ साली आलेले ३ चित्रपट - "जलती निशानी", "जासूस" आणि "परदेसी" यातील जबरदस्त गाण्यांनी अनिलदांनी त्यांचे सामर्थ्य पुन्हा एकदा दाखवून दिले. "हीर" हा संगीतप्रधान चित्रपट होता. त्यात एकूण १५ गाणी होती. यातीलच हे एक अतिशय गोड गाणे. तरुण नूतन आणि ठोकळा प्रदीपकुमार यांच्यावर चित्रित झाले आहे. या गाण्यात दोन कडव्यांच्या मध्ये संगीत नाहीच, त्याऐवजी कोरस वापरला आहे. आश्चर्य म्हणजे नूतनला गीता दत्तचा आवाज दिला असूनही खटकत नाही.
1955 and 1956 were the worst years of Anilda's film music career. He delivered only one movie "Farar" in 1955 and none of its songs worked with the audience. Also, the composers who had learnt from Anil da the art of music composing now were his competitors. It included C. Ramchandra, O. P. Nayyar and Roshan. By 1955, the Hindi cinema was changing, there were movies with different subjects, film music was changing and so was audience. Anil da who had completed 20 years of career as a Music Composer had many big challenges ahead of him and question was whether he will be able to sustain and if so for how long. But, Anil da proved everyone wrong by delivering great music in movies like "Heer" (1956), "Jalti Nishani", "Jasoos" and "Pardesi" (all 1957). "Heer" was a musical oriented movie containing total 15 songs. The song being presented below is one such sweet duet. Having worked extensively with Lata for last 7-8 years and using her voice for many female leads, Anil da had guts to use Geeta Dutt to playback for a young Nutan. And what a song he delivered! Let's enjoy this wonderful melody.
9) Zamane Ka Dastur Hai Yeh Purana - Lajawab (1950) - Singers Mukesh and Lata Mangeshkar - Lyricist Prem Dhawan
अनिलदांच्या अप्रतिम द्वंद्वगीतांमधली शेवटची दोन गाणी ही त्यांची सर्वात सुंदर गाणी म्हणता येतील. त्यातील हे पहिले गाणे "लाजवाब" (१९५०) चित्रपटातील. गीतकार प्रेम धवन यांनी या चित्रपटात भूमिकाही केली होती. या गीतातून त्यांनी जीवनाची वास्तवता सांगितली आहे - "ज़माने का दस्तूर है ये पुराना, मिटाकर बनाना बनाकर मिटाना". हे गाणे चित्रित झाले आहे रेहाना आणि सोहम यांच्यावर. संबंध गाणे एका संथ लयीत आहे कारण हे दुःखाचे गाणे आहे. अनिलदांनी त्यांची आवडती वाद्ये पियानो, व्हायोलिन आणि तालवाद्य वापरून गाण्याचे संगीत बनवले आहे. पण गाण्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या कडव्याआधी सतारीचा एक अप्रतिम तुकडा वाजतो तो जरूर ऐका आणि नंतर येणारा लताचा दर्दभरा आवाजही. ऐकू या हे लाजवाब गाणे.
Last two songs in this part are amongst the most memorable songs Anil da had composed. The first song is from the film "Lajawab" (1950) written by Prem Dhawan who also acted in this film. What a song it is! Prem Dhawan portrays the sad reality of our life through the lines "ज़माने का दस्तूर है ये पुराना, मिटाकर बनाना बनाकर मिटाना" (It's been an old custom of this world to create and destroy and vice versa). The song has been picturized on Rehana and Soham. The entire song is in the slower beat to depict the sadness of the situation. Anil da has as usual used his favorite instruments Piano, Violin and Rhythm to provide background and interlude music. However, to our surprise, there is a cute Sitar piece at the start of the song and also just before the last stanza, followed by soulful voice of Lata. Let's listen to this "lajawab" melody.
10) Seene Mein Sulagate Hai Armaan - Tarana (1951) - Singers Talat Mahmood and Lata Mangeshkar - Lyricist Prem Dhawan
हे आजच्या तिसऱ्या भागातले शेवटचे द्वंद्वगीत. हे असे एक गाणे आहे त्याशिवाय अनिलदांच्या कारकिर्दीवर बोलणे व्यर्थ आहे. हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोच्च गाणे आहे आणि "तराना" त्यांचा सर्वोत्कृष्ट चित्रपट. दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा हा पहिलाच एकत्रित चित्रपट. असं म्हणतात की या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये प्रेमाची ठिणगी पडली. प्रख्यात समीक्षक बाबुराव पटेल यांनी "तराना" हा मधुबालाचा सर्वोत्तम चित्रपट असल्याचे म्हटले होते. या चित्रपटातील गाणी तुफान गाजली. केवळ अप्रतिम संगीतामुळे "तराना" बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. यात एकूण ९ गाणी आहेत. त्यातील तलतचे "एक मैं हूँ एक मेरी बेकसी की शाम है" सोडले तर इतर आठही गाण्यात लता आहे. लताची ६ सोलो तर तलत बरोबरची २ अजरामर झालेली द्वंद्वगीते - पहिले "नैन मिले नैन हुए बावरे" आणि दुसरे "सीने में सुलगते है अरमान".
एकमेकांपासून अलग झालेल्या दोन प्रेमी जीवांची तडफड या गाण्यातून प्रतीत होते. असं म्हणतात की गीतकार प्रेम धवन आणि अनिलदा एकदा गाडीने स्टुडिओत चालले असताना प्रेम धवन यांनी अनिलदांना या गाण्याचा मुखडा ऐकवला, अनिलदांना तो आवडला. अनिलदांनी मुखड्याला अक्षरशः पाच मिनिटात चालसुद्धा लावली होती! यातील शेवटच्या कडव्यात अनिलदांची खासियत स्वर-उतरण त्यांनी वापरली आहे. लता गाते "इक ऐसी आग लगी मन में जीने भी न दे मरने भी न दे, चूप हूं तो कलेजा जलता है", या ओळीतील "मरने भी न दे" नंतरची स्वर-उतरण ऐकाच आणि त्यानंतर ज्या आर्ततेन "चूप हूँ" गायलंय, त्यानंतर एका क्षणाचा विराम ...अहाहा केवळ स्वर्गीय! चला तर ऐकू या हे नितांतसुंदर गीत.
खाली दिलेली गाण्याच्या YouTube Video ची लिंक ही YouTube वर असलेल्या पैकी सर्वात चांगली आहे. जरी त्यात गाणे ००:३७ सेकंदाला सुरु होत असले तरी त्याआधीचे सर्व फोटो पाहण्यायोग्य आहेत. यासाठी मी तो YouTube Video बनवणाऱ्याला धन्यवाद देतो.
This is the last song of the Part-3. Without this song, it is impossible to conclude any write-up on Anil da. "Tarana" (1951) was perhaps the best movie of Anil da and this song is his "The Best Duet" of all times. Dilip Kumar and Madhubala acted together for the first time in "Tarana" and the famous love story began here. Well-known critic Baburao Patel has termed "Tarana" as Madhubala's best performance. "Tarana" had 9 songs, all were immensly popular. Out of 9 songs, except for a Talat solo "Ek Main Hoon Ek Meri Bekasi Ki Shaam Hai", all other songs had Lata in it!
There is a story behind this song - the Lyricist Prem Dhawan and Anil da were travelling together to their workplace. Prem Dhawan recited the Mukhada of this song to Anil da and asked for his opinion. Anil da, of course liked it, and composed a tune for it in no time. When you would listen to the song, please listen carefully the interlude music and the last stanza. Anil da has used his signature style of falling of Swars at the end of the line "Ik Aisi Aag Lagi Man Mein Jeene Bhi Na De Marne Bhi Na De" and used a pause after "Chup Hoon" to create a massive impact. This is truly the work of a genius! Let's listen to this wonderful gem from Anil da.
The link given below is found to be the best among available videos. The actual song starts at 00:37; however, it is worth watching different photographs being shown in the first 36 seconds. I thank the YT video creator for the same.
Here I conclude the Part-3 of my tribute to the genius Anil Biswas. Hope you liked it. I would appreciate your feedback on the blog itself. Thank you. 🙏
References:
2) Wikipedia
4) List of songs courtesy https://m.hindilyrics4u.com/music_director/anil_biswas.php?page=59
Thank you for taking the efforts to compile these wonderful duets by Anil Da! The notes made it more interesting...
ReplyDeleteThank you. Appreciate your feedback. Request you to include your name in the comment next time please.
DeleteYour trademark as usual, some great information about Music director Anil Biswas and singers, actors, films etc. Superb article. Thanks A Lot from Sharad.
ReplyDeleteखूप धन्यवाद, शरद.
Delete