Anil Biswas (Part 2) - Anilda's greatest solo songs for Mukesh, Manna Dey, Kishore Kumar, Hemant Kumar and Talat Mahmood
Namaskar Friends,
Welcome to the Part 2 of my 4-part series on Anil Biswas alias Anil da. In Part 1, we learnt about his life and career as a music composer. If you haven't had a chance to read Part 1, here are the links to Marathi and English blogs respectively.
In this part, I am going to present 10 of Anilda's best compositions for Mukesh, Manna Dey, Kishore Kumar, Hemant Kumar and Talat Mahmood in that order, first in Marathi and then in English.
If you like it, please leave a comment on the blog itself with your name and share further. Thanks.
माझ्याकडे उपलब्ध असलेल्या अनिलदांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या यादीत एकूण ५७९ गाणी आहेत. त्यापैकी ३७३ म्हणजे साधारण ६४% गाणी हे एकल (सोलो) आहेत. या ३७३ सोलो गाण्यांपैकी फक्त १२२ म्हणजे ३३% गाणी ही पुरुष गायकांनी गायली आहेत, तर उरलेली २५१ म्हणजे ६७% गाणी ही महिला गायिकांनी म्हटलेली आहेत.
In the list compiled by me, total no. of songs composed by Anil da is 579. Out of 579 songs, 373 (64%) songs are Solo. Out of the 373 Solo songs, male singers have sung 122 songs (33%), while the female singers have sung rest 251 (67%) songs!
पुरुष गायकांमध्ये सर्वात जास्त गाणी (सोलो व इतर) गाण्याचा मान सुरेंद्र यांच्याकडे जातो. त्यांनी २७ सोलो व १९ इतर गायकांबरोबर अशी एकूण ४६ गाणी अनिलदांकडे म्हटली आहेत. स्वतः अनिल विश्वास एक उत्तम गायक होते. त्यांनी एकूण ४४ (१९ सोलो + २५ इतर) गाणी म्हटली आहेत. इतर पुरुष गायक - मन्ना डे (३९), मुकेश (२६), तलत महमूद (१९), शंकर दासगुप्ता (१४), मोहम्मद रफी (११), किशोर कुमार (१०) आणि हेमंत कुमार (८) अशी विभागणी आहेत. याशिवायही पुरुष गायक आहेत, पण त्यांच्या गाण्यांची वैयक्तिक संख्या कमी आहे.
Among the male singers, Surendra tops the list with 46 (27 Solo + 19 with others) songs. Anil da himself was an accomplished singer. He has sung 44 (19+25) of his own songs. The distribution of songs among the other leading male singers of that era is as follows: Manna Dey (39), Mukesh (26), Talat Mahmood (19), Shankar Dasgupta (14), Mohammad Rafi (11), Kishore Kumar (10) and Hemant Kumar (8). There are other male singers too; however, the no. of their songs is very less hence not mentioned here.
आजच्या भागात मी मला आवडणाऱ्या ५ पुरुष गायकांची त्यांनी अनिलदांकडे म्हटलेली गाणी सादर करणार आहे.
In today's part I will be presenting the songs sung by my favorite male singers.
1) Mukesh (मुकेश)
गोष्ट १९४० ची. अनिलदांचे मित्र मोतीलाल एक दिवस एका तरुण गायकाला घेऊन अनिलदांकडे आले आणि म्हणाले की याच्यासाठी काही करता आले तर बघा. अनिलदांनी त्याचे गाणे ऐकले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "त्याच्या स्वरात अद्भुत सामर्थ्य होतं पण मेहनत कमी होती, तो मींड आणि मुरक्या घेऊ शकला नसता". तो तरुण निराश होऊन परत गेला, पण त्याने अनिलदांशी संपर्क कायम ठेवला. शेवटी १९४५ मध्ये अनिलदांनी त्याला प्रथम चित्रपटात गायची संधी दिली. चित्रपट होता "पहली नज़र", नायक मोतीलाल. गाणे मिश्र दरबारी रागात स्वरबद्ध केले होते. HMV च्या स्टुडिओत रेकॉर्डिंग होणार होते, त्याची तारीख आणि वेळही ठरली होती. पूर्वीच्या अनुभवामुळे खचून गेलेल्या त्या गायकाची अनिलदांचे गाणे गायची हिम्मत होत नव्हती, त्यामुळे तो एका बार मध्ये जाऊन दारू पीत बसला. इकडे अनिलदांचा धीर सुटत चालला होता. शेवटी ते तो तरुण जिथे पीत बसला होता तिथे गेले आणि त्यांनी त्याला अक्षरशः ओढतच स्टुडिओत आणले, आणि दोन कानाखाली ठेऊन दिल्या. तो तरुण गायक धाय मोकलून रडायला लागला. अनिलदांनी त्याला शांत होऊन दिले, आणि नंतर तो गायला. गाणे एकाच टेक मध्ये अंतिम केले गेले. ते गाणे अजरामर झाले, आणि त्याबरोबर तो गायकही. गाण्याचे बोल होते "दिल जलता है तो जलने दे, आँसू न बहा फ़रियाद न कर", तर तो तरुण गायक होता मुकेशचंद्र माथूर उर्फ मुकेश!
मुकेशने ते गाणे इतके भावनाविवश होऊन गायले होते की त्याचा दर्दभरा आवाज ऐकून लोकांना जणू दुसरा सैगलच गातोय की काय असे वाटले. त्यावर अनिलदा त्याला म्हणाले "सैगलची नक्कल करून तू सैगल बनू शकत, पण तुझे मुकेशपण मात्र हरवून बसशील. तू तुझ्यासारखा गा आणि जगाला दाखवून दे की दुसरा मुकेश होणार नाही". हा गुरुमंत्र मुकेशने आयुष्यभर जपला.
चला तर ऐकू या मुकेशचे पहिले आणि अजरामर झालेले गाणे.
This is a small story behind an immortal song. The year was 1940. Anilda's friend, Motilal, who himself was a great actor, brought a young aspiring boy to Anil da and told him that the boy sings well, and it would be great if Anil da can help him with an opportunity to sing for a film. Anil da heard him. Anil da later described his feelings "The boy had an unbelievable voice; however, he was lacking proper education and Riyaz (practice). He could not have rendered the Meend and Muraki". The boy returned dejected and empty handed but kept in touch with Anil da. In 1945, he got an opportunity from Anil da for a film "Pehli Nazar" in which Motilal was the main lead. Anil da had composed the song in Raag Mishra Darbari. It was planned to be recorded at HMV Studios on a certain date and time. However, going by previous experience, the boy could not gather enough courage to sing Anilda's song, and went to a bar to drink in the expectation of gaining the necessary courage. Anil da was getting impatient due to the boy's absence. Finally, in extreme anger, he went to the bar and almost dragged the young boy to the studio. Anil da slapped him very strongly, upon which the boy started weeping. Anil da allowed the boy to overcome his emotions and then recorded the song by him. It was okayed in the first go. The song went on to achieve the immortality in the history of the Hindi film songs. The song was "Dil Jalta Hai To Jalne De" and the young singer was Mukesh Chandra Mathur - none other than our own Mukesh!
Mukesh had sung that song with so much emotion and in his soulful voice that the audience mistook him to be Kundan Lal Saigal (the first superstar singer of 1930-40's). However, Anil da cautioned Mukesh and urged him not to mimic Saigal but follow his own style and voice. Mukesh followed this Guru Mantra and went on to become a legend himself.
Let's listen to this famous song by Mukesh.
Dil Jalta Hai To Jalne De - Pehli Nazar (1945) - Lyricist Safdar Aah Sitapuri
मुकेशचे सादर करत असलेले दुसरे गाणे मला खूप आवडते. हे गाणे आहे १९५१ सालच्या "आराम" या चित्रपटातील. अत्यंत सुमधुर,गोड असे हे गाणे. आश्चर्य म्हणजे ते चित्रित झाले आहे प्रेमनाथवर जो आपल्या सर्वांना खलनायक म्हणून परिचित आहे! याच १९५१ या वर्षात अनिलदांनी ४ चित्रपटांना संगीत दिले होते. "बडी बहू", "आराम", "तराना" आणि "दो सितारे". या चारही चित्रपटातील गाणी केवळ लाजवाब आहेत, कितीही ऐकली तरी मन भरत नाही. खाली सादर करत असलेले गाणे असेच आहे. "आराम" चित्रपटात प्रेमाचा त्रिकोण आहे. गायनात रुची असलेला कुमार (प्रेमनाथ) - लीला (मधुबाला) आणि चित्रकार श्याम (देव आनंद) असे हे त्रिकुट आहे. कुमारचे लीलावर तर लीलाचे श्यामवर प्रेम आहे. हे कळल्यावर कुमार दुःखी होऊन हे गाणे गातो असा प्रसंग आहे. गाण्याच्या सुरुवातीला आपल्याला देव आनंद आणि मधुबालाचेही दर्शन होते. कुमारच्या मनातील दुःखाचे वादळ दाखवण्यासाठी अनिलदांनी पियानोचा किती अप्रतिम वापर केला आहे तो ऐका. गाण्याच्या सुरुवातीची पियानोची धून ऐकून तुम्हाला मराठीतल्या "एक धागा सुखाचा" या बाबूजींनी (सुधीर फडके) गायलेल्या अजरामर गीताची आठवण येईल कदाचित. पण अनिलदा हे बाबूजींचे सुद्धा गुरु होते, खरेखुरे. असो. तर हे सुमधुर गीत ऐकू या.
The second song of Mukesh to be presented below is very dear to me. It is from the 1951 film "Aaram". It's been picturized on Premnath - the famous villain of yesteryears who had played Hero's roles at the start of his film career. In 1951, Anil da had composed music for 4 films viz. "Badi Bahu", "Aaram", "Tarana" and "Do Sitare". All the songs in these films are simply superb. One strives to listen to them again and again. This particular song is also very sweet. "Aaram" had a love triangle between a talented singer Kumar (Premnath), Leela (Madhubala) and Artist Shyam (Dev Anand). Kumar loves Leela; however on finding that Leela loves Shyam, Kumar is devastated. The Piyano at the beginning of the song so impactfully depicts the clutter in Kumar's mind as his heart is broken. This is the genius of Anil da. The Piyano tune would also remind you of a similar tune in a popular Marathi song sung by the great Sudhir Phadke, who considered Anil da to be his Guru. Let's listen to this sweet melody from Anil da in the voice of Mukesh.
Ai Jaane Jigar Dil Mein Samaane Aa Jaa - Aaram (1951) - Lyricist Rajendra Krishna
2) Manna Dey (मन्ना डे)
मन्ना डे यांची पार्श्वगायनाची कारकीर्द १९४३ साली "रामराज्य" या चित्रपटापासून झाली होती. त्यांचा धीरगंभीर आवाज, आवाजाची पोत आणि त्यांची शास्त्रीय बैठक पाहून संगीतकार त्यांना धार्मिक-पौराणिक चित्रपटातील गाणी द्यायला लागले. किंवा मग चरित्र अभिनेत्यावरचे अथवा जीवनाचा विचार मांडणारी गाणी त्यांच्या वाट्याला आली. सुरुवातीची ५-७ वर्षे अशीच गेली. अनिलदांनी जेव्हा मन्नादांना ऐकले तेंव्हा त्यांना विश्वास आला की मन्नादा नायकाची गाणीही उत्तम गाऊ शकतात. मग अनिलदांनी १९५३ सालच्या त्यांच्या "हमदर्द" चित्रपटात एकूण ५ गाणी मन्नादांकडून गाऊन घेतली. त्यातीलच एक गाणे, जे आजही मन्नादांच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी ओळखले जाते. खरं तर ही एक गज़ल आहे. पुढे १९६० सालच्या "तू नहीं और सही" या चित्रपटात हीच गज़ल संगीतकार रवी यांनी वेगळी चाल लावून ती मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घेतली होती. रफी साहेबांचे गाणे इथे ऐकता येईल. खाली बघू या मूळ मन्नादांचे गाणे.
Manna Dey - nephew of the legendary singer from 1930's Krishna Chandra Dey (K. C. Dey) - started his playback singing career in 1943 with the film "RamRajya". However, owing to the quality of his voice, the composers usually gave him songs from the religious movies only. We have often heard Manna da sing songs for a character actor in the film or a background song depicting the philosophy of life. It was only after the initial struggle for 5-7 years, Manna da got a breakthrough by Anil da who had believed that Mannada's voice can be used for the Hero of the film. Thus, in the 1953 film "Hamdard" starring Shekhar and Nimmi in the lead roles, Anil da got Manna da sung 5 songs. The song being presented below is one of them, it's a Ghazal. Later, in 1960, music composer Ravi composed the same Ghazal differently and got Rafi saab to sing it. You can listen to Rafi's version of the same Ghazal here.
आज सादर करत असलेले मन्ना डे यांचे दुसरे गाणे आहे गैरफिल्मी! हे गाणे अनिलदांनी मल्हार रागात बांधले आहे. हे गाणे मुख्यतः आकाशवाणीसाठी बनवले गेले होते. आणि आकाशवाणीच्या विविध भारती केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ३ ऑक्टोबर १९५७ रोजी विविध भारती रेडिओ स्टेशनवरून हेच गीत सर्वप्रथम वाजवले गेले. दोन्ही गाण्यातून मन्नादांची शास्त्रीय संगीताची पक्की बैठक जाणवते. या गाण्यात सुरुवातीची जबरस्त तान, अनेक ठिकाणी घेतलेल्या सुंदर मुरकती याने गाण्याची लज्जत वाढवली आहे. या गाण्याच्या दोन आवृत्ती खाली सादर करत आहे. पहिली आहे मूळ गाणे जे रेडिओवरून प्रसारित झाले, आणि दुसरी आवृत्ती मन्नादांनी दूरदर्शनला दिलेल्या "आनंदन" या मुलाखतीतील कार्यक्रमातील आहे, जे Live थेट मन्नादांकडून ऐकण्यात वेगळी मजा आहे.
The second song I would like to present of Manna da is a non-filmi song! To our surprise, Manna da has number of non-Filmi hit Bengali and Hindi songs to his credit! This particular song is composed by Anil da in Raag Malhar. It was composed basically for Aakashvani, and was the first song to be played at the inaguration of Aakashvani's Vividh Bharati channel on 3rd Oct 1957. The song comprises of beautiful Aalaap and Murakat which makes it more beautiful. Both the songs of Manna da being presented here depicts his great mastery over Hindustani Classical music. Presenting below 2 versions of the same song - first one is the original and the second one is from an interview of Manna Da which he gave for Doordarshan's "Anandan" programme. It's a real pleasure to see the legend sing his song live. Hope you will like it too.
किशोरकुमारची हिंदी सिनेमातली कारकीर्द अभिनेता म्हणून १९४६ सालातील "शिकारी" या चित्रपटातून, तर गायक म्हणून १९४८ सालच्या "ज़िद्दी" या चित्रपटाद्वारे झाली. किशोर त्याकाळातील सुप्रसिद्ध गायक-अभिनेते कुंदनलाल सैगल यांना आदर्श मानायचा. त्यामुळे सुरुवातीच्या चित्रपटात तो हुबेहूब सैगल यांच्यासारखा गायला आहे. पुढे लवकरच त्याने या प्रभावातून बाहेर येऊन स्वतःची Yogeling ची शैली विकसित केली. त्यावेळचे अनेक संगीतकार असं मानायचे की किशोर गंभीर गाणी गाऊच शकणार नाही. पण अनिलदांनी ही समजूत खोटी ठरवायची ठरवले, आणि किशोरला त्यांच्या १९५३ सालच्या "फरेब" या चित्रपटात एकूण ३ गाणी दिली. त्यापैकी २ सोलो होती तर १ लता बरोबरचे द्वंद्वगीत होते. तीनही गाणी प्रचंड गाजली. पुढे १९५६ मध्ये "पैसा ही पैसा" अनिलदांनी किशोरकडून एकूण ७ गाणी गाऊन घेतली त्यातील ३ सोलो होती. पण चित्रपट साफ आपटला त्याबरोबरच त्याचे संगीतही. त्यात पूर्वीचे अनिल विश्वास लोकांना दिसलेच नाहीत. आज आपण "फरेब" चित्रपटातील एक सोलो गीत ऐकणार आहोत. किशोर कुमारच्या सर्वोत्कृष्ट Tragedy Songs मध्ये याचा समावेश जरूर करावा लागेल.
Kishore Kumar started his Hindi film career as an actor in the 1946 film "Shikari". As a singer, he was given a break by the legendary composer Khemchand Prakash in the 1948 film "Ziddi" starring Dev Anand and Kamini Kaushal. Since his childhood, Kishore Kumar had idolized the legendary singer from 1930's and 40's - Kundan Lal Saigal. Thus, he used to try and copy Saigal's style of singing. If we hear his songs from the first few films, it will be evident to us. However, credit to him, Kishore Kumar found his own style when he started experimenting with Yodeling. Because of this, many composers of those times did not believe that Kishore can sing serious songs. However, Anil da was sure that Kishore can do wonders even with sad songs. In 1953, in his film "Fareb", Anil da gave Kishore 3 songs - 2 solo and 1 duet with Lata. All the songs were extremely popular. Anil da tried using Kishore in 1956 film "Paisa Hi Paisa", however that did not work since both its music and film itself flopped heavily at the box office. Audience went searching for the old Anil da who were missing in this film. Anyways, I am presenting below one of the most beautiful sad songs of Kishore from the film "Fareb".
खरं तर हेमंत कुमार हे काही अनिलदांच्या पसंदीदा गायकांपैकी होते असे म्हणता येणार नाही. कारण अनिलदांनी हेमंतदांना फक्त ८ गाणी दिली त्यातील ४ सोलो आणि ४ इतरांबरोबर. पण तरीही हे गाणे सादर करण्याची काही कारणे आहेत. ती अशी - १) १९५५ आणि १९५६ ही दोन्ही वर्षे अनिलदांना व्यावसायिकदृष्ट्या अतिशय खराब गेली होती. त्यांचे एकूण ४ चित्रपट या दोन वर्षात आले होते - "फरार", "चाँद", "हीर" आणि "पैसा ही पैसा". सर्वच चित्रपट पडले होते. तरीही पुन्हा १९५७ साली अनिलदांनी "जलती निशानी" आणि "परदेसी" सारखे सांगीतिकदृष्ट्या हिट चित्रपट दिले. २) या गाण्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे पाचव्या सेकंदापासून मुख्य गायकाच्या बरोबरीने कोरस गाऊ लागते, तेही नुसते स्वर, शब्द नाहीत. मुख्य आवाज आणि कोरस हातात हात घालून शेवटपर्यंत गातात, आणि तरीही गाण्याचा गोडवा कमी होत नाही. चला तर ऐकू या हेमंतदांचे एक सुरेल गाणे.
Hemant Kumar was not in Anilda's favorite singers list; since he only has sung 8 songs under Anil da out of which 4 are solo. However, I still selected this particular song for reasons as follows - 1) After the worst two years of his life 1955 and 1956, Anil da managed to roar back with great music in 2 of his next films in 1957 viz. "Jalti Nishani" and "Pardesi". Both the films did not run well; however, its songs were a hit. 2) What struck me most was the use of chorus since the 5th second from the start of the song, it lasts till the end. The main voice and the chorus sing hand-in-hand (or shall I say note-by note), the difference being while the male singer sings the lyrics, the chorus only hums the tune. Let's now listen to this melodious song.
Keh Rahi Hai Zindagi Jee Sake To Jee - Jalti Nishani (1957) - Lyricist Qamar Jalalabadi
5) Talat Mahmood (तलत महमूद)
तलत महमूद मूळचा उत्तर प्रदेशातील लखनौचा. चित्रपटात काम करायच्या आणि गाणे गायच्या आवडीने त्याने ते क्षेत्र निवडले. १९३६ साली तलत All India Radio साठी सर्वप्रथम काही गज़ल गायला. त्याच्या आवाजातील वेगळेपण ओळखून HMV ने १९४१ साली त्याच्या काही गाण्यांच्या रेकॉर्ड्स काढल्या. त्यामुळे एक गज़ल गायक म्हणून त्याची ख्याती लखनौ पासून कलकत्त्यापर्यंत पसरली. १९४४ साली तो कलकत्ता येथे आला. तिथे त्याचे पहिलेच गाणे "तस्वीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी" (संगीतकार कमल दासगुप्ता) प्रचंड लोकप्रिय झाले. पुढे त्याने "तपन कुमार" नावाने बरीच बंगाली गीते गायली. पण ही सर्व गाणी गैरफिल्मी होती. कलकत्त्यामध्ये तलतला कोणीही चित्रपटात संधी देत नव्हते. त्यामुळे तलत अखेरीस १९४९ मध्ये मुंबईला आला.
एका मित्राच्या सल्ल्यावरून तलतने आपले गाणे अनिलदांना ऐकवले. अनिलदांना तलतच्या आवाजातील मार्दव आणि कंपन खूप आवडले. त्यांनी लगेच तलतकडून त्यांच्या १९५० सालच्या "आरजू" चित्रपटासाठी "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल जहाँ कोई न हो" हे गीत गाऊन घेतले. मुकेशच्या पहिल्या "दिल जलता है" प्रमाणेच तलतचे हे पहिले हिंदी चित्रगीतही प्रचंड लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपट पार्श्वगायनाच्या क्षितिजावर एक नवा तारा उगवला होता. अनिलदांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केले होते की त्यांना उत्तम कलाकाराची किती पारख आहे ते! चला ऐकू या तलतचे हे अजरामर गीत.
Talat Mahmood was born in Lucknow, Uttar Pradesh in a traditional, conservative Muslim family. He had a liking towards acting and singing in films, which was against the wishes of his family. However, he pursued his passion. In 1936, Talat sang few Ghazals for All India Radio. HMV soon realized the distinct quality of Talat's voice and came out with few records of his songs. Thus, Talat's fame as a Ghazal singer spread as far as Kolkata (then Calcutta). Owing to his wish of acting/singing in films, Talat came to Kolkata in 1944. He sang "Tasveer Teri Dil Mera Bahla Na Sakegi" under the music direction of Kamal Dasgupta. This non-Film song became an instant hit. Talat was later awarded many Bengali non-Film songs, he sang all of them under the name "Tapan Kumar". Many of his Bengali songs became extremely popular. However, Talat was not completely satisfied since his wish was still not fulfilled. So, he decided and migrated to Mumbai (then Bombay) in 1949.
Upon a friend's advice, Talat approached Anil da. Anil da listened to Talat's songs and was very impressed with the softness and a characteristic quiver in his voice. He immediatey signed him for his film "Aarzoo" (1950) and gave him the song "Ai Dil Mujhe Aisi Jagah Le Chal Jahan Koi Na Ho". The song became an instant hit just like Mukesh's first song for Anil da "Dil Jalta Hai". A new star had arrived on the horizon of Hindi film music, Anil da proved to world again that he has the knack of finding the real talent. Let's listen to this wonderful song.
Ai Dil Mujhe Aisi Jagah Le Chal - Aarzoo (1950) - Lyricist Majrooh Sultanpuri
आज सादर करत असलेले तलतचे दुसरे गाणे आहे १९५१ सालच्या "आराम" या चित्रपटातले. तलतचे पहिले हिंदी चित्रपटगीत "ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल" लोकप्रिय झाल्यावर त्याला अनेक संगीतकार आपल्याकडे गाण्यासाठी बोलवायला लागले. पण काही लोकांनी तलत गाताना नर्व्हस होतो त्यामुळे त्याचा आवाज कापतो अशी आवई उठवली. याचा परिणाम म्हणून संगीतकार तलतला गाणे देताना चार वेळा विचार करू लागले. अर्थातच तलतचा आत्मविश्वास कमी झाला. आणि तो आपल्या आवाजात कंप येणार नाही अशा तऱ्हेने गाऊ लागला. अनिलदांनी जेव्हा "आराम" साठी तलतला बोलावले तेंव्हा त्याचे हे नवे रूप पाहून अनिलदा चकित झाले. ते तलतला म्हणाले की तुझ्या आवाजाला काय झालं आहे? तुझ्या आवाजातले ते कंपन कुठे हरवले आहे? तेंव्हा तलतने अनिलदांना सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून अनिलदा तलतला म्हणाले की तुझ्या आवाजातील मार्दव आणि कंपन हीच तुझी वैशिष्ट्ये आहे, ती नसतील तर तू एक अति-सामान्य गायक म्हणून ओळखला जाशील, तेंव्हा तू तुझ्या मूळ आवाजातच गा आणि बघ काय होते ते! असे म्हटल्यावर तलत तयार झाला आणि त्याने "आराम" मधील "शुक्रिया ऐ प्यार तेरा शुक्रिया" हे जबरदस्त गाणे रेकॉर्ड केले. या गाण्याच्या लोकप्रियतेने अफवा पसरवणारे लोक तोंडघशी पडले.
या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे तलतने गायले असून त्याच्यावरच चित्रित झाले आहे! गाण्यातून ज्या भावना अभिनेता-गायक तलत व्यक्त करतो त्या खरं तर चित्रपटाचा नायक कुमार (प्रेमनाथ) याच्या असतात. तलतचा तरल आवाज, सफाईदार ताना आणि प्रामुख्याने पेटी, तबला आणि पार्श्वभूमीवर व्हायोलिन या तीनच वाद्यांवर अनिलदांनी संपूर्ण गाण्याची अप्रतिम स्वररचना केली आहे. पाहू या हे तलतचे मधुर गीत.
The second Talat song being presented below is from the 1951 film "Aaram". After Talat's first Hindi film song "Ai Dil Mujhe Aisi Jagah Le Chal" was hit, he started getting offers from various music composers. However, at the same time, few people in the Hindi film industry started the rumor that Talat gets nervous while singing hence causing the quiver in his voice. As a result, many composers moved away from Talat. This disturbed Talat mentally and he started doubting his abilities. He tried changing his style of singing and avoid the quiver in his voice. When Anil da called him to sing for "Aaram", Anil da was disappointed with Talat's voice and changed singing style. When Talat told him the reasons for the change, Anil da told Talat that the soft voice and quiver are the unique properties of his voice and hence he should not be guilty about it. These words coming from a very senior composer helped Talat regain his confidence, and he recorded what turned out to be another gem in his long career.
It is important to specially mention here that the song being presented below has been sung and picturized on Talat himself! In the movie, he is actually portraying the feelings of movie's hero Kumar(Premnath). Also note Talat's soft voice and excellent singing. Anil da has used only 3 instruments in particular - a Harmonium, Tabla and Violin in the background. But what a beautiful composition it's been! Let's enjoy this great song.
तलतचे पुढचे गाणे खरं तर एक अप्रतिम अशी गज़ल आहे. ही आहे १९५२ सालच्या "दो राहा" या चित्रपटातील. १९५२ साली अनिलदांचे केवळ २ चित्रपट प्रदर्शित झाले - "आकाश" (७ गाणी) आणि "दो राहा" (९ गाणी). "दो राहा" हा काही संगीत-प्रधान चित्रपट नव्हता, पण त्याची गाणी लोकप्रिय झाली. यातील ९ गाण्यांपैकी ४ गाणी एकट्या तलतने सोलो गायली आहेत. या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणे साहिर लुधियानवी यांनी लिहिले आहे. साहिरनी अनिलदांबरोबर फक्त २ चित्रपट केले - "दो राहा" (१९५२) आणि "चार दिल चार राहें" (१९५९). अनिलदांबद्दल मला पडलेल्या कोड्यांपैकी एक कोडे हे आहे की त्यांनी साहिरबरोबर तो भरात असताना जास्त काम का केले नाही? तसेच १९३५ ते १९४५ या काळात सैगल आणि नूरजहाँ दोघेही त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्यांचे अनिलदांबरोबर एकही गाणे का नसेल? असो. तर ऐकू या ही अप्रतिम गज़ल.
The next song being presented is in reality a Ghazal penned by the great Sahir Ludhiyanvi. It's from the film "Do Raha" (1952). Anil da could manage only 2 films in the year 1952 - "Aakash" and "Do Raha". Though "Do Raha" was not a music oriented its songs became popular. Talat sung 4 out of 9 songs! Looking at Anil da's composer career, I always wonder why he could not work more with Sahir when he (Sahir) was at his peak during the 1950's (only 2 films and 9 songs between Sahir and Anil da). I also wonder, sadly though, that why Anil da and the legendary singers from 1930's and 40's - Saigal and Noorjehan - could not work together even for one song! Anyways, enjoy this melodious Ghazal.
Mohabbat Tark Ki Maine - Do Raha (1952) - Lyricist Sahir Ludhiyanvi
आणि आता सादर करत आहे या भागातील शेवटचे दहावे आणि तलतचे चौथे गाणे. सदैव अस्सल भारतीय संगीतावर आधारित गाणी देणाऱ्या अनिलदांनाही कधीतरी पाश्चात्य संगीताची भुरळ पडली होती. झालं असं की आल्फ्रेड हिचकॉक या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा इंग्रजी चित्रपट "The Man Who Knew Too Much" हा १९५६ साली प्रदर्शित झाला होता. त्यात एक गाणे होते "Que Sera Sera" (के सरा सरा). हे गाणे लिहिले आणि संगीतबद्ध केले होते जे लिविंगस्टन आणि रे इव्हान्स या जोडीने. आणि गायलं होतं डोरिस डे या गायिकेने. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले संपूर्ण जगात. इतके की पुढे लोकं डोरिस डे ला या गाण्यामुळे ओळखायला लागले.
अनिलदांनाही या गाण्याच्या स्वरावलीने भुरळ घातली. त्यांनी या गाण्यापासून प्रेरणा घेऊन, त्याला भारतीय संगीताची जोड देऊन एक सुंदर चाल तयार केली. त्यावर गीतकार इंदीवर यांनी गाणे लिहिले "जीवन है मधुबन, तू इसमें फूल खिला". अनिलदांनी ते गाणे १९५७ साली प्रदर्शित झालेल्या "जासूस" या चित्रपटात त्यांच्या आवडत्या गायकांकडून म्हणजे तलतकडून गाऊन घेतले. हे गाणे भारतातही खूप गाजले.
आज मी इथे दोन्ही गाणी सादर करत आहे - अनिलदांचे हिंदी गाणे, आणि डोरिस डे हिने गायलेले मूळ इंग्रजी गाणे. उद्देश हा की तुम्हाला दोन्ही गाण्यांची तुलना करता येईल आणि दोन्हीतील फरकही समजेल. मूळ इंग्रजी गाणे त्या चित्रपटातील नायिका जरी पियानो वाजवताना म्हणत असली तरी त्यात पियानो हा पार्श्वभूमीवर वाजतो, त्यापेक्षा जास्त वापर गिटार व कदाचित मेंडोलिनचा आहे. अनिलदांच्या रचनेत मात्र पियानो हे प्रमुख वाद्य ऐकू येते, आणि जोडीला व्हायोलिन व तालवाद्य आहे. चला तर ऐकू या दोन्ही नितांतसुंदर अशी गाणी.
Finally, I present the last song of this part and the 4th of Talat's songs for Anil da. To our surprise, this song has been inspired by a very famous English song! Anil da, who was known for composing most of his songs based on Indian music (classical, folk, etc.), he was indeed inspired by a song "Que Sera, Sera" from the 1956 film "The Man Who Knew Too Much" directed by the legendary director Alfred Hichcock. The song was written and composed by Jay Livingston and Ray Evans and was sung by Doris Day. It was so popular that it became the signature song of Doris Day.
Anil da was inspired by its composition, and gave it his own touch while composing "Jeevan Hai Madhuban" written by Indeevar for the 1957 film "Jasoos". The song became popular in India too.
I will be presenting both English and Anilda's song below so that you will be able to not only enjoy but also spot the differences in two compositions. While the English song uses Guitar and possibly Mandolin as primary instruments and Piano plays in the background, Anil da has used Piano as his prime instrument accompanied by Violin and Tabla. Let's hear these two wonderful melodious songs.
Jeevan Hai Madhuban Tu Ismein Phool Khila - Jasoos (1957) - Lyricist Indeevar and
Que Sera, Sera - The Man Who Knew Too Much (1956) - Singer Doris Day
With this I come to the end of Part 2 of my 4-part series on Anil da. Hope you enjoyed all the songs presented herein. Please do leave your comment on the blog itself and spread the word. Thank you.
References:
1) Ritu Aaye Ritu Jaaye – Biography of Anil Biswas by Sharad Dutt – Marathi Translation by Sharayu Pednekar – First Edition Padmagandha Prakashan
Thank you. Who is this please? Next time, pl mention your name at the end of the comment. Thanks. "Sun Bairi Balam" song is from the film "Bawre Nain" directed by Kidar Sharma, Sung by Rajkumari and Music by Roshan.
धनंजयजी, आपला संपूर्ण लेख, प्रत्येक गाण्या भोवतीची कथा, त्या गाण्या इतकिच रोचक व माहितीपूर्ण आहे. "नाच रे मयुरा", खूप वर्षांनी ऐकले, हे गैर फिल्मी आहे,हे माहीत नव्हते.आपल्या या उस्फूर्त उपक्रमा बद्द्ल मन:पूर्वक आभार.
Great post. Superb. Also sun bairi balam sach bol re is another great Song. Enjoyed. Keep up great work.
ReplyDeleteThank you. Who is this please? Next time, pl mention your name at the end of the comment. Thanks. "Sun Bairi Balam" song is from the film "Bawre Nain" directed by Kidar Sharma, Sung by Rajkumari and Music by Roshan.
Deleteधनंजयजी, आपला संपूर्ण लेख, प्रत्येक गाण्या भोवतीची कथा, त्या गाण्या इतकिच रोचक व माहितीपूर्ण आहे. "नाच रे मयुरा", खूप वर्षांनी ऐकले, हे गैर फिल्मी आहे,हे माहीत नव्हते.आपल्या या उस्फूर्त उपक्रमा बद्द्ल मन:पूर्वक आभार.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद. कृपया पुढच्या वेळेला comment खाली आपले नावही लिहावे म्हणजे मला कळेल.
Delete