Namaskar Friends,
Anil Biswas (Part 1) - English
In this part, I am going to present 10 of Anilda's greatest gems composed for the legendary Lata Mangeshkar, first in Marathi and then in English.
If you like it, please leave a comment on the blog itself with your name and share further. Thanks.
मित्रांनो, अनिल विश्वास आणि लता मंगेशकर यांच्यावर स्वतंत्र भाग लिहिण्याचे प्रमुख कारण आहे की १९४८ साली अनिलदांकडे लता जेंव्हा पहिल्यांदा "अनोखा प्यार" चित्रपटात गायली, तेंव्हापासून अनिलदांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ३३९ गाणी स्वरबद्ध केली, त्यातील तब्बल १२७ गाण्यांमध्ये लता होती (८९ सोलो आणि ३८ इतरांबरोबर) म्हणजे जवळपास ३२% गाणी लताची होती. आणखीन थोडे खोलात जाऊन बघितले तर लता आल्यानंतर अनिलदांनी महिला गायकांना घेऊन २५५ गाणी बनवली त्यातील १२७ गाणी लताची होती, हे प्रमाण जवळपास ५०% आहे. यावरून आपल्याला अनिलदांच्या संगीतात लताचे काय स्थान होते याचा अंदाज येतो.
पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे, अनिलदांनी स्वतः एके ठिकाणी असं म्हटलंय की ज्या वेळी लता फिल्म संगीताच्या क्षितिजावर उगवली, त्या वेळेपासून संगीतकारांसाठी एक अतिभव्य दालन खुले झाले की जेथे ते त्यांच्या प्रतिभेप्रमाणे काहीही स्वरबद्ध करू शकत होते कारण त्यांना विश्वास होता की त्यांची स्वररचना लताच्या गळ्यातून सहज उतरेल.
चला तर ऐकू या अनिलदांनी लतासाठी स्वरबद्ध केलेली १० अप्रतिम सुमधुर गाणी.
Friends, if you are wondering why there is a special article on just Lata Mangeshkar in a tribute series on Anil Biswas, well, here is the reason. Lata sang for Anil da for the first time in 1948 for the movie "Anokha Pyar". Since then, Anil da composed total 339 songs out of which Lata contributed to 127 songs (89 solo and 38 with others). If we analyze a bit further, we find that After Lata's entry into Anilda's camp, Anil da composed 255 songs that had at least one female singer in it. And Lata's contribution in these 255 songs was 127 - which is close to 50%. This tell us how important Lata was for Anil da.
Secondly, as mentioned in Part-1, Anil da himself had said once that after Lata came on the horizon, a world of limitless possibilities opened to the music composers then since she could sing anything that a composer would compose.
Let's now listen to the 10 of Lata's gems composed by Anil da.
Interesting Statistics about Lata's songs for Anil da (Year-Movie wise break-up)
१९४८ सालचा "अनोखा प्यार" म्हणजे जबरदस्त गाण्यांची जणू लयलूट होती. चित्रपटात एकूण ११ गाणी होती. त्याशिवाय ३-४ गाण्यांच्या वेगळ्या गायक/गायिकेच्या आवाजात रेकॉर्ड्स निघाल्या होत्या. असंच हे गाणं. "इक दिल का लगाना बाकी था". चित्रपटात हे गाणे नर्गिसवर चित्रित झाले आहे आणि मीना कपूर यांनी म्हटले आहे. पण HMV ने जेंव्हा "अनोखा प्यार" च्या रेकॉर्ड्स काढायच्या ठरवल्या तेंव्हा मीना कपूर आजारी असल्याने अनिलदांनी लताला सांगितले. लताही त्यावेळी नवीन होती व अनिलदांसारखे गुरु सांगताहेत म्हणून तीही तयार झाली. आणि काय गाऊन ठेवलंय लताने! पियानो, हवाईयन गिटार आणि तालवाद्य एवढ्या मोजक्या वाद्यांवर ही अप्रतिम चाल बांधली आहे अनिलदांनी. मीना कपूरनेही छान म्हटलंय, त्यांचं गाणं थोडं संथ लयीत आहे पण त्यांच्या आवाजातील दर्द जाणवतो, मीना कपूर यांचे गाणे इथे ऐका. लताचे गाणे ऐकू या.
"Anokha Pyar" released in 1948 was a treat for the music lovers. It had almost 10-11 songs in it. Moreover, there were versions of at least 3-4 songs separately. The first song of Lata-Anilda duo being presented below is one such version song. It was sung originally by Meena Kapoor in the movie and the song was picturized on Nargis. However, when HMV decided to bring out the records of "Anokha Pyar" songs, unfortunately, Meena Kapoor was unwell, hence Anilda requested Lata to record some of her songs, which she agreed. And thus we got a real gem from Lata-Anilda. The composition is managed only with few instruments. One can identify the Piano, Hawaiin Guitar and Rhythm instrument. You can listen to the original Meena Kapoor Song here. Her song is bit slow in its rhythm, but full of sorrow as per the situation demand. Let's listen to the Lata version below.
2) Mast Pawan Hai Chanchal Dhara - Jeet (1949) - Lyricist Prem Dhawan
हे लताचं अनिलदांकडचं वेगळ्या अंदाजातलं अतिशय गोड असं गाणं. गेल्या भागात आपण "जीत" मधलं देव आनंद आणि सुरैय्या यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे पाहिले होते. हे गाणे दुसऱ्या एका जोडीवर आहे - मदन पुरी (जो पुढे खलनायक म्हणून प्रसिद्ध झाला) आणि सुरैया चौधरी. दोघेजण नदीमध्ये नौका वल्हवत आहेत आणि सुरैया हे गाणे म्हणते आहे. गाण्याची सुरुवातच मुळी एका बहारदार तानेने होते. होडीतले गाणे, पाठीमागे दिसणारी शिडाची नौका त्यामुळे अनिलदांनी ही तान नाविक / कोळी लोकं गातात तशी स्वरबद्ध केली आहे. लताच्या गाण्यातील छोट्या छोट्या मुरक्या, हरकती यामुळे गाण्याची नजाकत वाढते. गाण्याला स्वतःची अशी एक सुंदर लय आणि डौल आहे. या गाण्याचा USP म्हणाल तर "डोल" शब्दावर प्रत्येक वेळी लताने घेतलेला स्वरांचा हिंदोळा, अहाहा! ऐकाच हे अप्रतिम सुमधुर गीत.
This particular song shows a different Lata when she sings for Anil da. In the last part, we saw a duet picturized on the main leads of the film i.e. Dev Anand and Suraiyya. This song is picturized on the second pair of Madan Puri (famous Villain in his later days) and Suraiya Chowdhary. The two are rowing a small boat in the river, and on the backdrop we see a Sailboat, so Anil da has composed a suitable Taan at the beginning. Lata has shown her great versatility in singing the word "Dol" differently every time. Let's listen to this beautiful song.
3) Tumhare Bulane Ko Jee Chahata Hai - Laadli (1949) - Lyricist Prem Dhawan
लताने अनिलदांकडे गायलेले हे आणखी एक सदाबहार गाणे १९४९ साली आलेल्या "लाडली" या चित्रपटातील. यात एकूण ११ गाणी होती, त्यातील लताने ८ गाण्यांना आपला आवाज दिला आहे (५ सोलो व ३ इतरांबरोबर). गाण्याच्या स्वररचनेत गायकाचा आवाज सुप्रीम असेल हे अनिलदांचे वैशिष्ट्य आपल्याला या गाण्यातही जाणवेल. परत एकदा फक्त पियानो, व्हायोलिन आणि अतिशय हळुवार वाजणारे तालवाद्य यावर अनिलदांनी ही अप्रतिम स्वररचना केली आहे. लताच्या मधुर आवाजाने त्यावर कळस चढवला आहे. "चाहता" शब्द उच्चारण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, "मुस्कुराने" शब्दावरची मुरकी किंवा शेवटच्या कडव्यात "ये जी चाहता है" मधील "ये" वर घेतलेली छोटीशी हरकत ऐका, किती सुंदर लागते कानाला. चला तर हे गाणे ऐकू या.
One of the many Evergreen songs that Lata has sung for Anil da from the movie "Laadli" (1949). It had 11 songs out of which Lata has sung 8 (5 solo and 3 with others). Even in this song, the voice of the singer is supreme, the accompanying music does not overpower it, this is pure Anil da style! Once again, you will realize that Anil da has composed the music for this song with Piano and Violin as the prime instruments, and still he is able to create an atmosphere of love and affection! Listen carefully to Lata's delivery of words like "Chahata", "Muskurane", "Ye", its a treat for the ears. Let's listen to the song.
4) Man Mein Kisi Ki Preet Basa Le - Aaram (1951) - Lyricist Rajendra Krishna
१९५१ सालचा देवआनंद-मधुबाला-प्रेमनाथ-दुर्गा खोटे अभिनित "आराम" हा चित्रपटही गाण्यांमुळे गाजला. "आराम" मध्ये ८ गाणी होती, आठही सोलो, त्यातील ५ लताची! पाचही गाणी अद्भुत आहेत. "मिल मिल के बिछड गये नैन", "बालमवा नादान", "उजडी रे मेरे प्यार की दुनिया", "रुठा हुआ चंदा है रुठी हुई चांदनी" आणि आज सादर करत असलेले "मन में किसी की प्रीत बसा ले". कुठलं गाणं वगळावं हा प्रश्नच पडतो.
गाण्याच्या सुरुवातीला आपल्याला दिसतात राणी माँ (दुर्गा खोटे) या लीलाला (मधुबाला) घेऊन हॉल मध्ये येतात जिथे कुमार (प्रेमनाथ) पियानोवर सुरावटी छेडत असतो. आणि अचानक लीला गायला सुरुवात करते, त्या क्षणापासून ते पुढील १५-२० सेकंद तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव बघा - अभिनय काय असतो हे आपल्याला कळते. कुमार आश्चर्यचकित झालेला असतो, त्याची आई म्हणजे राणी माँ यांना कुमारचे प्रेम लीलावर आहे हे कळलेले असते, पण अजून लीलाने होकार दिलेला नसतो, त्यामुळे लीला हे गाणे नक्की कोणाला उद्देशून म्हणते आहे हे त्यांना कळत नाही, तर लीलाचे प्रेम श्यामवर (देव आनंद) असते, त्यामुळे ती कसनुसं हसत बघत जरी कुमारकडे असली तरी मनातून श्यामची आठवण काढत असते. तिघांच्या भावमुद्रा केवळ लाजवाब आहेत.
बाकी गाण्याबद्दल काय बोलू? केवळ स्वर्गीय! माझ्या अत्यंत आवडत्या गाण्यांपैकी एक. चला ऐकू या.
"Aaram" (1951) had a great star cast in Dev Anand-Madhubala-Premnath-Durga Khote. The movie had 8 amazing Solo songs, out of which Lata contributed to 5! All of Lata songs are simply superb. E.g. "Mil Mil Ke Bichhad Gaye Nain", "Balamwa Nadan", "Ujadi Re Mere Pyar Ki Duniya", "Rutha Hua Chanda Hai" and the one being presented below "Man Mein Kisi Ki". I am always puzzled which one to present and which ones to omit.
As the song starts, we see Rani Maa (Durga Khote) and Leela (Madhubala) coming into the room where Kumar (Premnath) is playing Piano. Suddenly, Leela starts singing, from that moment watch the reactions on the faces of all three - simply amazing. Kumar is surprised to see Leela sing, his mother Rani Maa knowing that Kumar loves Leela, but she hasn't confirmed yet, so Rani Maa is unsure for whom Leela is singing, while Leela is in love with Shyam (Dev Anand), she has to keep a smiling face in front of Rani Maa and Kumar. Hats off to the Director and the actors.
I have nothing much to talk about the song. It's simply out of this world. One of my favorites. Let's listen and enjoy.
5) Beiman Tore Nainwa Nindiya Na Aaye - Tarana (1951) - Lyricist D. N. Madhok
१९५१ सालचा "तराना" हा दिलीपकुमार आणि मधुबाला यांचा एकत्रित पहिलाच चित्रपट. डॉ. मोतीलाल (दिलीपकुमार) आणि तराना यांच्यातील ही प्रेमकहाणी. गाण्याच्या सुरुवातीच्या संवादातून आपल्याला कळतं की मोतीला बरं नाहीये आणि त्यामुळे तराना त्याला झोपून विश्रांती घ्यायला सांगत आहे. (पण मधुबालासारखी तराना शेजारी असताना कोणाला झोप लागणे शक्य आहे का? 😆) मोती झोपण्याचे नाटक करतो हे कळल्यावर तराना त्याला बेईमान म्हणते, आणि अप्रतिम गाणे सुरु होते. या गाण्यात अनिलदांनी बासरीचा भरपूर वापर केला आहे. ही मधुर अशी बासरी वाजवली आहे अनिलदांचे मेव्हणे आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पं. पन्नालाल घोष यांनी. सुरुवातीची बासरी आणि त्यानंतरचा सतारीचा तुकडा ऐकावा असाच. "बेईमान तोरे नैनवा" मधील "बेईमान" हा शब्द "बेईमाँ" असा सुद्धा म्हणता आला असता, पण इथे संगीत दिग्दर्शक आणि गायिका दोघांचेही कसब दिसते की "बेईमान" असा पूर्ण शब्द म्हटल्याने गाण्यातील गोडवा अधिक वाढतो. "ये रात कहीं भागी न जाये" यातील "रात" शब्दावर लताने काय सुंदर तान घेतली आहे! गीतकार दीनानाथ मधोक यांनी हे गाणे कमालच लिहिलंय. "आँखे बंद कर लो" असं सरधोपट सांगण्याऐवजी डॉ. मोतीच्या प्रेमात आकंठ बुडालेली तराना त्याला सांगते "ले मूँद ले अँखिया तनिक ज़रा", काय शब्द आहेत हो! गाणं कमालीचं श्रवणीय तर आहेच, पण मधुबालामुळे, तिचं हसणं, तिचं लाजणं यामुळे ते अधिक प्रेक्षणीय सुद्धा झालं आहे. खाली दिलेल्या video मध्ये गाणं संपता संपता दोघेही झोपी जातात, त्यानंतर जेंव्हा सकाळ होते तेंव्हा साधारण ३० सेकंद बासरीची सुरावट ऐकू येते ती केवळ लाजवाब. वाह, क्या बात है अशी दाद द्यावीशी वाटते दिग्दर्शक, कॅमेरामन, अभिनेते, संगीतकार, गीतकार आणि गायिका यांच्या संचाला. चला तर ऐकू या हे अतिशय गोड असे गाणे.
Dilip Kumar and Madhubala starred for the first time together in this 1951 film "Tarana". The plot of the film revolves around the love story of Dr. Motilal (Dilip Kumar) and Tarana (Madhubala). The dialogues at the start of the video tell us that Tarana is trying to let Dr. Moti to sleep and rest. (It's another matter if anyone would want to sleep when Madhubala is next to you 😆) When she realizes that Dr. Moti is only pretending, she calls him "Beimaan" (Dishonest) and the song starts. You will hear a piece of Flute and Sitar at the beginning. Anil da has composed the entire song with Flute and Rhythm instrument as major instruments. His brother-in-law and famous Flute player Pt. Pannalal Ghosh has played the flute, and how sweet it can be heard! The delivery of some of the words like "Beimaan" is something to be noted. Also hear the beautiful Taan Lata takes on the word "Raat" in the line "Yeh Raat Kahin Bhaagi Na Jaaye". Lyricist Dinanath Madhok has penned this song beautifully. Any average person would have said "Aankhe Band Kar Lo" (Close your eyes", but a Kavi in D. N. Madhok writes "Le Moond Le Ankhiyan Tanik Jara", the use of Shuddh Hindi words is exemplary here. The song is an absolute treat to the ears, however, more so to the eyes because of sheer presence of the beautiful Madhubala and her smile. Please also listen to the wonderful Flute piece for about 30 seconds at the end of the video. Let's listen to this yet another real gem from Anil da and Lata.
6) Aankhon Mein Chitchor Samaye - Mehman (1953) - Lyricist P. N. Rangeen
अनिलदांनी एके ठिकाणी म्हटलं होतं की लताच्या आवाजाला आत्मा आहे. अनिलदांकडे लताने गायलेले प्रत्येक गाणे ऐकले की हे पुन्हापुन्हा जाणवतं. हे गाणंही असंच एक जीव ओतून गायलेलं गाणं. "मेहमान" (१९५३) मध्ये एकूण ८ गाणी होती, त्यातील ४ लताच्या वाट्याला आली होती. सर्व गाणी लोकप्रिय झाली. ह्या गाण्यातली काही वैशिष्ट्ये गाणे ऐकताना जाणवली ती देत आहे, तुम्हीही मन लावून गाणं ऐकलंत तर ही वैशिष्ट्ये तुम्हालाही जाणवतील व गाण्याचा आनंद द्विगुणित होईल. १) गाण्याची सुरुवात आणि मुखडा दोन्ही अतिशय संथ लयीत आहे. "दरस दिखाये" या शब्दांची फेक बघा. २) मुखडा साधारण ०१:२२ ला संपतो आणि गाण्याची लयच बदलते, गाणे जलद होते, इथे आपल्याला बंगाली संगीताची झलक दिसेल. ३) अंतरा (कडवे) सुरु होतो, त्यात "मन में बैठा ऐसे वो" मध्ये "वो" नंतरची छोटीशी मुरकी घेऊन खालच्या स्वरावर येणे, केवळ जादू ४) कडव्यामध्ये काही ठिकाणी दोन ओळींच्या मध्ये सतारीचे तुकडे आलेत, ते ऐका. एक ओळ दोनदा वेगळ्या पद्धतीने म्हटली आहे ५) "सखी मन को तडपाये तरसाये" ही ओळ लताने अद्भुत म्हटली आहे, इथे पण "सखी" शब्दामध्ये आपल्याला बंगाली कीर्तनातील तारस्वराची आठवण होईल ६) साधारण ०२:४५ ला कडवे संपताना गाणे पुन्हा संथ लयीत जाते त्यावेळी "फिर भी मन का मीत कहाये " या ओळीची सुरावट अशी अप्रतिम बांधली आहे की ती पुन्हा मुखड्याच्या लयीत येते.
अनिलदांची संगीत रचना अद्भुत आहे, आणि लताशिवाय हे गाणे अजून कोणी इतक्या ताकदीने, कौशल्याने गाऊ शकेल असं वाटत नाही. चला तर ऐकू या.
Anil da had once said that Lata's voice has soul in it. If you hear all the Lata songs for Anil da, you will agree with his views. The song being presented below is one such soulful song from the movie "Mehman" (1953). All the 8 songs from the movie were popular, Lata had sung 4 of them! While listening to this song, I could pick up some of what I call it the beauty spots from the song, I have listed few below. If you can follow these while listening to the song, you will enjoy its beauty more. 1) The opening of the song has slow rhythm, please note the delivery of the words "Daras Dikhaye" 2) From 01:22, the rhythm changes completely and the song picks up a faster rhythm, you will hear pure Rabindra Sangeet here 3) In the stanza, listen to the line "Man Mein Baitha Aise Wo" and a small Muraki on the word "Wo" to bring the Swar to a lower octave 4) In the stanza, Anil da has used Sitar pieces quite beautifully between the two lines 5) The last line of the stanza "Sakhi Man Ko Tadpaye Tarsaye" will remind you of a Bengali Kirtan style 6) At 02:45 the song changes the rhythm again through the line "Phir Bhi Man Ka Meet Kahaye", what a beautiful transformation!
Anilda's composition, his music arrangement is extraordinary in this song. And what a rendering by the one and only Lata! Let's listen to the song.
7) O Jaanewale Raahi Ek Pal Ruk Jana - Raahi (1953) - Lyricist Prem Dhawan
१९५३ सालचा "राही" हा चित्रपट ख्वाजा अहमद अब्बास यांनी दिग्दर्शित केला होता. यात देव आनंद, बलराज साहनी आणि नलिनी जयवंत हे प्रमुख कलाकार होते. दिग्दर्शक स्वतः साम्यवादी विचारांचे असल्याने त्यांनी या चित्रपटातून आसाम मधील चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या बिहारी मजुरांच्या शोषणाची व्यथा मांडली होती. अनिलदांनी सुद्धा आपल्या गीतातून आणि पार्श्वसंगीतातून त्या व्यथांना अनुरूप अशा चाली दिल्या. हे गाणे चित्रपटात दोन वेगवेगळ्या मनःस्थितींमध्ये आहे - एक आनंदी तर दुसरी दुःखी. या गाण्याची चाल अनिलदांनी पंजाबच्या "इक पल वई जानां" या लोकगीतावर बांधली आहे. आनंदी गाण्याची लय आणि ताल तुम्हाला डोलायला लावतात तर दुःखी गाणं तुम्हाला भावविवश करतं. दोन्ही गाण्यात पहिलं कडवं समान आहे, पण मूडनुसार चाल वेगवेगळी आहे. ऐकू या दोन्ही गाणी.
"Raahi" released in 1953 was directed by the well-known director Khwaja Ahmed Abbas. It had Dev Anand, Balraj Sahni and Nalini Jaywant in the lead roles. Since Abbas himself was influenced by Communism, he portrayed the pains of Bihari laborers working in Tea fields of Assam. Anil da composed the music which was apt for the situation. This particular song is in two moods - Happy and Sad. Anil da had taken the tune of this song from a famous Punjabi folk song "Ik Pal Wai Janaa". The rhythm and beat of the happy song is very cheerful, while the sad song is extremely touching. In both versions, the words of the first stanza are same, but tune is different suiting the mood of the song.
8) Na Dir Deem Tan De Re Na - Pardesi (1957) - Lyricist Asad Bhopali, Prem Dhawan
इथून पुढची म्हणजे शेवटची तीनही गाणी ही शुद्ध भारतीय शास्त्रीय संगीतावर आधारलेली आहेत. "परदेसी" (१९५७) या चित्रपटातील या गाण्याला भरतनाट्यम नृत्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अनिलदांनी या गाण्याची चाल दक्षिण भारतीय संगीतावर आधारलेली आहे. गाण्यात सतार, बासरी यांबरोबरच मृदंग आणि घटम ही अस्सल दक्षिण भारतीय वाद्ये ऐकू येतात. लताने हे गाणे खूपच गोड गायले आहे.
The last 3 songs of this part are based on pure Indian Classical Music. This particular song from the 1957 film "Pardesi" is picturized on a professional Bharat Natyam dancer, hence Anil da has used South India (Carnatic style) music for this song. Thus, you will hear Mrudungam and Ghatam also being played along with Sitar and Flute. Lata sounds so sweet in this song.
9) Intezaar Aur Abhi - Char Dil Char Rahen (1959) - Lyricist Sahir Ludhiyanwi
"चार दिल चार राहे" हा त्या काळातील Multi-Starrer चित्रपट म्हणावा लागेल. कारण त्यात मीनाकुमारी, राजकपूर, शम्मीकपूर, निम्मी, अजित, अन्वर हुसेन, डेव्हिड असे प्रसिद्ध कलाकार होते. तरीही हा चित्रपट चालला नाही. पण आश्चर्य म्हणजे १९६२ मध्ये हाच चित्रपट जेंव्हा रशियात प्रदर्शित झाला तेंव्हा तिथे तो जवळपास ४ कोटी लोकांनी पाहिला आणि आजच्या गणिताप्रमाणे या चित्रपटाने जवळजवळ ६०० कोटी रुपयांचा गल्ला जमावाला होता. यातील "कच्ची है उमरिया" हे मीना कपूरने गायलेले गाणे प्रचंड गाजले. लताचे "इंतजार और अभी" हे पूर्णतः शास्त्रीय संगीतावर आधारलेले गाणेही लोकांना आवडले. अनिलदांनी १९५३ मधील "हमदर्द" चित्रपटातील "ऋतू आये ऋतू जाये" या जबरदस्त रागमालेनंतर प्रथमच हा प्रयोग या गाण्यात केला, आणि पुन्हा एकदा आपली स्वररचनेवरची हुकूमत सिद्ध केली. हे गाणी यमन, बिहाग आणि भैरव या तीन रागात बांधलेले आहे. गाणे निम्मीवर चित्रित झाले आहे. आणखीन एक चमत्कार या गाण्यात बघायला मिळतो (हो, मी त्याला चमत्कारच म्हणेन) तो म्हणजे दोन कडव्यांच्या मध्ये अनिलदांनी फक्त घड्याळाच्या एका ठोक्याचा आवाज वापरला आहे, दुसरे कुठलेही संगीत नाही. या एका ठोक्याने दिग्दर्शक बदललेली वेळ दाखवतो तर अनिलदा राग-बदल दाखवतात! कमाल! ऐकाच हे सुंदर गाणे.
"Char Dil Char Raahe" was a multi-starrer movie from 1959. It had some big names like Meena Kumari, Raj Kapoor, Shammi Kapoor, Nimmi, Ajit, Anwar Hussain and David. However, the big star cast did not help the movie in India. But, in 1962, when it was released in Russia (then Soviet Union), the film got immense response. As many as 4 crore people watched it and the film earned approx. 600 crores (in today's terms)! The song "Kachchi Hai Umariya" sung by Meena Kapoor became extremely popular. Anil da composed a Raagmala for the first time after using it very successfully in 1953 movie "Hamdard" and once again proved his mastery. Song is picturized on Nimmi. This song has been composed in 3 Raag viz. Yaman, Bihag and Bhairav. Not sure whether it is Director's creativity or Anilda's to show the clock and its ticking sound to depict the change in the time from Evening to Night to Early Morning. There is just one clock tick between 2 stanzas to implement the transfer from one Raag to another, no music piece at all! You are simply amazed to see such creativity.
10) Ja Main Tose Naahi Bolu - Sautela Bhai (1962) - Lyricist Shailendra
१९६० नंतर अनिलदांची कारकीर्द उतरणीला लागली होती. १९६१ ते १९६५ या पाच वर्षात अनिलदांचे फक्त ५ चित्रपट आले. त्यातील "सौतेला भाई" (१९६२) आणि "छोटी छोटी बातें" (१९६५) यातील काही अप्रतिम गाणी वगळली तर अनिलदांच्या संगीतात पूर्वीची चमक दिसली नव्हती. उदा. "लागी नाही छुटे रामा" (सौतेला भाई - मीना कपूर, लता), "ज़िन्दगी का अजब फसाना है" (छोटी छोटी बातें - मुकेश, लता), "ज़िन्दगी ख्वाब है था हमें भी पता" (छोटी छोटी बातें - मुकेश), "कुछ और जमाना कहता है" (छोटी छोटी बातें - मीना कपूर) आणि खाली सादर करत असलेले गाणे या गाण्यातून अनिलदांनी पुन्हा एकदा त्यांच्यातली संगीतकाराची प्रतिभा दाखवून दिली. पण हे म्हणजे विझत चाललेल्या प्रतिभेच्या दिव्याची ज्योत मोठी व्हावी त्याप्रमाणे होते.
"सौतेला भाई" (१९६२) या चित्रपटातील "जा मैं तोसे नाही बोलू" हे गाणे मिश्र अडाणा या रागावर आधारित आहे. हे गाणे कोठ्यावरचे आहे. त्यामुळे अनिलदांनी सारंगी आणि तबल्याचा यथेच्छ वापर केला आहे. लताचे स्वर, तिची शब्दफेक, तिने घेतलेल्या अवघड ताना, तिने गाण्यातून प्रकट केलेले भाव सगळे कधीही न विसरता येण्यासारखे, उच्च दर्जाचे. चला तर ऐकू या भागातील हे शेवटचे अप्रतिम गाणे.
Anilda's long career was fading out slowly after 1960. Between 1961 and 1965, he did only 5 movies. Out of 23 songs he produced for these 5 movies, only a handful were really good and showed us his genius. E.g. "Laagi Nahi Chhute Rama" (Sautela Bhai - Meena Kapoor, Lata), "Zindagi Ka Ajab Fasana Hai" (Chhoti Chhoti Baatein - Mukesh, Lata), "Zindagi Khwab Hai Tha Hamein Bhi Pata" (Chhoti Chhoti Baatein - Mukesh), "Kuchh Aur Zamana Kehta Hai" (Chhoti Chhoti Baatein - Meena Kapoor) and the song being presented below were the examples of Anilda's genius.
"Ja Main Tose Naahi Bolu" (Sautela Bhai-1962) song was based on the Raag Mishra Adana. It's a courtesan song, hence Anilda has promptly used Sarangi and Tabla as his main instruments. Lata, as usual, has been outstanding in her delivery of lines, her Taan, the emotions she has portrayed through her voice all are exemplary, of high class and one remembers it forever. Let's now listen to this wonderful song, which is the last song of this Part-4.
With this, I conclude the 4-part series on the genius, Bhishma Pitamah of Hindi film music - Anil Biswas. Hope you liked it. Please do leave a comment on the blog with your name. Thank you.