Sunday 14 June 2020

Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 2

Namaskaar Friends!

Welcome to the second part of my blog on the legendary Sajjad Hussain.

If you haven't read Part-1 of this blog, please visit this link Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 1

English version of the blog is at the end of the Marathi version below.


My Rendezvous with Sajjad Hussain


१९८६-८७ साल असावे, कॉलेजचे दिवस होते, भरपूर वेळ असायचा. गाणी ऐकायला खूप आवडायची, त्यावेळी FM Radio नसल्यामुळे मनोरंजनासाठी फक्त विविध भारतीवर अवलंबून राहायला लागायचे. त्यावर बऱ्याचदा त्याकाळातील लोकप्रिय गाणी ऐकायला मिळायची. पुस्तके वाचायचा नाद होता. अशातच शिरीष कणेकर यांचे "गाये चला जा" हे पुस्तक हातात पडलं आणि वेड्यासारखा वाचत गेलो. त्यात वर्णन केलेले संगीतकार, गायक यांच्याविषयी नवनवीन माहिती मिळत गेली. लता, आशा, तलत, किशोर, रफी इ. ची अनेक जुनी गाण्यांचे उल्लेख त्या पुस्तकात होते. त्यामुळे उत्सुकता वाढली व आपल्याकडे ही गाणी हवीत असे वाटू लागले. त्याच पुस्तकात संगीतकार सज्जाद हुसैन यांच्यावरचा "कथा एका वेड्या कलावंताची" लेख वाचला, मनाला भिडला तो लेख. व्यावहारिक जगातील माणसांना वेडे, उर्मट वाटणारे सज्जाद प्रत्यक्षात कसे असतील याची उत्सुकता लागून राहिली. तोपर्यंत सज्जादची गाणी कधीही ऐकली नव्हती, पण लेखात उल्लेख केलेली गाणी ऐकावीत असे वाटू लागले.

आणि एक दिवस HMV ने प्रकाशित केलेला "यादों की बारात" नावाचा १२ कॅसेट्सचा संग्रह अलूरकरांकडून घरी घेऊन आलो. त्यात सज्जादची २ गाणी होती - "आज मेरे नसीब ने" (लता - हलचल) आणि "फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम" (रफी-मन्ना डे - रुस्तम सोहराब). ही गाणी ऐकली आणि सज्जादच्या संगीताच्या प्रेमातच पडलो. काहीतरी जगावेगळं ऐकलं असं वाटून गेलं. तेंव्हापासून सज्जादना भेटता येईल का? जगाच्या दृष्टीने उर्मट असणारा माणूस प्रत्यक्षात कसा असेल? असे अनेक प्रश्न मनात येत राहिले. पण तो जमाना काही Internet/Google चा नव्हता की शोधलं आणि सापडलं. सज्जाद जिवंत आहेत का नाहीत हेही माहित नव्हते, तर ते कुठे राहतात, त्यांना भेटू शकू का हे समजणे तर खूप दूरचे होते.

अनेक वर्ष गेली. १९९४-९५ मुंबईत नोकरी करत होतो. अंधेरीला कंपनीच्या Guest House मध्ये राहायची सोय होती; कामाकरता नरिमन पॉइंटला जावे लागायचे. फक्त दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असल्याने त्याच वेळी पुण्याला घरी यायचो, इतर वेळी चेंबूरच्या एका मित्राकडे जायचो अधून-मधून. तो स्वतः उत्तम हार्मोनियम वादक असल्याने आणि मी बऱ्यापैकी गात असल्याने कधी कधी मैफल जमायची. त्याला माझी जुन्या गाण्यांची आवड आणि त्यातून सज्जादचे प्रेम माहीत होते. त्यामुळे बऱ्याचदा सज्जादची गाणी म्हणायचो. असंच एकदा त्याच्याकडे मित्राचा मित्र - अमित दाते - आला होता, त्यावेळी परत सज्जादची गाणी म्हटली. त्यानंतर अमितने विचारले की सज्जादना भेटायचे आहे का? मी सुन्न झालो, २ मिनिटे आ वासला गेला, मला काही समजेचना. भानावर आल्यावर मी एवढेच विचारले "ते अजून जिवंत आहेत?" अमित म्हणाला हो, इथे माहीमलाच राहतात, माझे येणे-जाणे असते अधून-मधून, तुला भेटायचे असेल तर वेळ ठरवतो. मला गगन ठेंगणे झाले. अमितने रविवार १९ मार्च १९९५ सकाळी १० वाजताची वेळ ठरवली!!

नंतरचे काही आठवडे मी पूर्णपणे हवेत होतो. एकदाचा तो दिवस उजाडला. मी बरोबर पावणे दहा वाजता माहीम स्टेशनवर अमितला भेटलो, तिथून आम्ही सज्जाद जिथे राहत होते, त्या नाताळवाला बिल्डिंग मधील त्यांच्या घरी गेलो. "पुण्याहून तुमचा एक चाहता येणार आहे तुम्हाला भेटायला" असे अमितने सज्जाद साहेबांना सांगून ठेवले होते, बऱ्याच वर्षानंतर त्यांना कुणीतरी भेटायला येणार होतं, त्यामुळे ते बिचारे सर्व आवरून वाट बघत बसले होते.

सज्जाद साहेबांचे प्रथम दर्शन झाले ते साध्या पण पांढऱ्या शुभ्र झब्बा-लेंग्यात! त्यावेळी त्यांचे वय होते ७८, पण तब्येत खुटखुटीत दिसत होती! "आईए सप्रे साहब", सज्जादनी हसून स्वागत केले. त्यावेळी माझ्याकडे ना टेपरेकॉर्डर होता ना कॅमेरा. तसंही सज्जाद यांचा स्वभाव लक्षात घेता त्यांनी या दोन्हीला परवानगी दिली नसती. १०*१२ च्या त्यांच्या हॉल मध्ये गालिचे अंथरले होते, त्यावर आम्ही बसलो. इकडे तिकडे नजर फिरवताच दृष्टीस पडली ती फक्त वाद्य आणि वाद्यच! कोपऱ्यात सतार, बाजूला तंबोरा, तबला, हार्मोनियम, मेंडोलिन सगळे आपापली जागा घेऊन होते. 

"काय घेणार" असं न विचारता सज्जाद साहेबांनी "काय ऐकणार, सप्रे साब" असं विचारलं. शांत, नम्र स्वर, समोरच्याच्या मनाचा वेध घेणारे डोळे, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दल समाधान पण त्याच वेळेला बरंच काही गमावल्याची खंत मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसली आणि मी भानावर आलो. मी जाताना २ याद्या घेऊन गेलो होतो, एक सज्जाद साहेबांच्या ऐकलेल्या गाण्यांची, आणि दुसरी न ऐकलेल्या. दोन्ही याद्या त्यांना दाखवल्या आणि म्हटलं "सज्जाद साब, तुमची न ऐकलेली गाणी आज ऐकण्याची इच्छा आहे". मंद स्मित करत त्यांनी कॉटखालची ट्रंक पुढे ओढली, आणि एक एक कॅसेट बाहेर काढायला सुरुवात केली. आणि नंतर सुरु झाली ती अविस्मरणीय मैफल!!

"भूल जा ऐ दिल मोहब्बत का फसाना" (लता - हलचल), "ये कैसी अजब दास्तां हो गयी है" (सुरैय्या - रुस्तम सोहराब), "जाते हो तो जाओ" (लता - खेल), "ये हवा ये रात ये चांदनी" (तलत - संगदिल) अशी एक से एक गाणी त्या गाण्यांचा महान संगीतकार स्वतः शेजारी बसून ऐकवत होता, एवढंच नाही तर प्रत्येक चालीमागची स्टोरी सांगत होता. सर्वच अविश्वसनीय होतं माझ्यासाठी! "लताजी की कई गानों की रिहर्सल यहीं हम जहाँ बैठे है न, इसी जगह हुई थी" असं त्यांनी सांगितल्यावर अंगावर शहारे आले! "यहीं पर एक गाने के रिहर्सल में मैंने लताजी को ठीक तरह से गाईये, ये नौशाद की धुन नहीं है असं म्हटलं होतं, सप्रे साब"  असं कान पकडून सज्जाद साहेब एखाद्या अल्लड मुलासारखं हसत म्हणाले आणि मी थरारलो. 

पुढे बोलता बोलता विषय सैगल साहेबांवर आला तेंव्हा सज्जाद म्हणाले "सैगल साहेब अतिशय प्रतिभावान गायक होते, पण दारूमुळे शेवटी शेवटी त्यांचे इतके वाईट दिवस आले की त्यांच्यावर नौशादकडे गायची वेळ आली (चित्रपट - शाहजहान). आणि त्याचे सैगल साहेबांना इतकं वाईट वाटलं म्हणे की (नौशादची गाणी गाऊन) "जब दिल ही टूट गया हम जी के क्या करेंगे" असं म्हणत अल्लाला प्यारे झाले" :-) सज्जाद साहेब मूड मध्ये आले होते!

सर्व गाणी ऐकून कान तृप्त झाले होते. नंतर सज्जाद साहेबांनी त्यांच्या मेंडोलिन वादनाच्या कॅसेट काढल्या, आणि एक एक राग विस्ताराने ऐकवायला सुरुवात केली. "मैंने इतनी मेहनत की है इस Instrument पे, आप अंदाजा नहीं लगा पाओगे। पुरे ३३ साल मैंने रियाज़ किया है तब जाकर कहीं अपना पहला Live Public Performance मैंने दिया" असं म्हणून त्यांनी १९५६ सालच्या एका मैफलीत अनेक दिग्गज समोर बसलेले असताना "हमें दिखाओ तो सही की इतना छोटासा वाद्य लेकर तुम Classical कैसा बजा सकते हो, देखेंगे" हे आव्हान स्वीकारून त्यांनी असा काही Performance दिला की सर्व दिग्गज लोक प्रचंड खुश झाले, खूप तारीफ केली. मल्लिकार्जुन मन्सूर, पं. रविशंकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात सज्जादना लिहिलेली पत्रं त्यांनी दाखवली. माझा अंदाज चुकत नसेल तर पंडित रविशंकरांनी लिहिलं होतं "आपने हमारे सामने आज अलग ही दुनिया खडी कर दी!" हे सर्व दाखवताना सज्जाद साहेबांच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होते. त्यांचा अमूल्य ठेवाच होता तो. मी व अमित आम्ही दोघेही अवाक होऊन पाहत होतो.

नंतर सज्जाद साहेब लताबद्दल भरभरून बोलले, त्यांचा आवाज ही त्यांना अल्लाने दिलेली देन आहे असं म्हणाले. लता अजूनही विचारपूस करते, खूप मदत करते असं सांगितलं. सज्जादची पाचही मुलं मेंडोलिन शिकली आहेत व मोठमोठ्या कलाकारांना साथ करतात, "अभी अभी एक लडका मद्रास में कॉन्सर्ट करके वापस लौटा है" हे सांगताना त्यांचा चेहरा अभिमानाने फुलून आला.  

एक तास ठरवलेली वेळ, आता दुपारचे २ वाजले होते. मन आणि कान दोन्ही तृप्त झालं होतं. एका महान कलाकाराच्या शेजारी बसून त्यांच्याच चीजा ऐकण्याचे भाग्य मला लाभले होते, मी प्रचंड खुश होतो.

त्यानंतर ३-४ महिन्यांनीच २१ जुलै १९९५ रोजी सज्जाद साहेबांचे निधन झाले. मला तर असं वाटतं की ते मलाच भेटण्यासाठी थांबले होते, कारण बघा ना, कोण कुठला मी, त्यांच्या अनेक चाहत्यांपैकी एक, कधी काळी त्यांना भेटण्याचं स्वप्न बघितलेला, मला त्यांचा आगा-पिछा काही माहिती नव्हते. पण परमेश्वरानी माझे स्वप्न पूर्ण केले आणि जीवनाचे सार्थक झाले.

तेंव्हापासून मी लता मंगेशकरांना भेटण्याचे स्वप्न बाळगून आहे, आणि हे स्वप्नही पूर्ण होईल अशी खात्री आहे,
बघू या.

सज्जाद यांच्याच एका गाण्याचे शब्द वापरून मी त्यांना माझी आदरांजली वाहतो - फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम, हम ना भुलेंगे तुम्हे अल्ला कसम!

तुम्हाला हा लेख आवडला असेल अशी आशा आहे. 

सज्जाद यांची ४ अप्रतिम गाणी मी या भागात सादर करणार आहे. तीही तुम्हाला अतिशय आवडतील अशी खात्री आहे.

१) दर्शन प्यासी आयी दासी - गीता दत्त - संगदिल (१९५१) - गीतकार राजेंद्रकृष्ण 
Darshan Pyaasi Aayi Daasi - Geeta Dutt - Sangdil (1951) - Lyricist Rajendra Krishna
हिंदी सिनेसंगीतातील सर्वोत्कृष्ट ३ भजनांमध्ये मी याचा निःसंकोचपणे समावेश करेन. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की हे भजन गाण्यासाठी सज्जादनी त्यांच्या favourite लता ऐवजी गीता दत्तला निवडले, आणि गीता दत्तने काय कमाल केली आहे! संपूर्ण गाण्यात ऐकू येत राहतात ते जलतरंग, बासरी आणि तबला. देवळात गायल्या जाणाऱ्या भजनासाठी घंटा वाजवण्याऐवजी जलतरंग हे Major वाद्य घेऊन केलेली दुसरी संगीत रचना माझ्या तरी ऐकिवात नाही, यासाठी सज्जाद साहेबांना सलाम.



२) दिल में समा गये सजन - तलत महमूद-लता मंगेशकर (संगदिल - १९५१) - गीतकार राजेंद्रकृष्ण
Dil Mein Samaa Gaye Sajan - Talat Mahmood - Lata Mangeshkar - Sangdil (1951) - Lyricist Rajendra Krishna
दिलीपकुमार आणि मधुबाला या जोडीवर चित्रित झालेलं हे एक अप्रतिम प्रेमगीत. परत एकदा सज्जादच्या खास Style ला शोभेशी या गाण्याची नांदी म्हणजेच Prelude मध्ये लताचा आवाज ऐका. १९८१ साली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या Mortal Men Immortal Melodies या कार्यक्रमात हिंदी सिनेजगतातल्या जुन्या-नव्या सर्व कलाकारांना बोलावून त्यांचा सत्कार करण्यात आला होता, व या निमित्ताने त्यांची गाणी सादर करण्यात आली होती. जेंव्हा लता आणि तलत साहेबांना स्टेजवर बोलावले तेंव्हा पार्श्वसंगीत म्हणून हे गाणे वाजवले होते, ती याची पावती होती की हे दोघांचे सर्वोत्कृष्ट द्वंद्वगीत आहे. 



३)  ऐ दिलरुबा नज़रें मिला - लता मंगेशकर (रुस्तम सोहराब - १९६३) - गीतकार जाँ निसार अख्तर
Ai Dilruba Nazaren Mila - Lata Mangeshkar - Rustam Sohrab (1963) - Lyricist Jaan Nisar Akhtar
काय आणि किती बोलू या गाण्याविषयी? हे लताचे सर्वोत्कृष्ट गाणे आहे असं मी मानतो. एक तर अरेबिक संगीत, त्यातील मुरकती/हरकती सर्व काही अरेबिक ढंगाने. सर्वात महत्वाचे लताचा Amazing Voice Control! इतकी अफलातून चीज सज्जादना कशी सुचली असेल हे एक परमेश्वरच जाणे. गाणे जेमतेम एका कडव्याचे आहे, शेवटचे १ मिनिट आणि १८ सेकंद फक्त लताची "आ आ आ" अशी आलापी, "ऐ दिलरुबा" हे शब्द आणि पार्श्वसंगीत बस्स एवढेच ऐकू येते, पण त्याचा प्रभाव खूप वेळ राहतो आपल्यावर! पियानो, व्हायोलिन, तबला/बोन्गो आणि मेंडोलिन या चार वाद्यांवर अवघे गाणे पेलले आहे. Youtube वर जाऊन इतर गायकांनी हे गाणे गायचा जो प्रयत्न केला आहे तो बघितला की लताची ताकद कळते, आणि सज्जाद आणि लता दोघांच्या प्रतिभेपुढे मान आपोआप झुकते.



४) फिर तुम्हारी याद आयी ऐ सनम - रफ़ी, मन्ना डे आणि सादत खान - रुस्तम सोहराब (१९६३) - गीतकार क़मर जलालाबादी 
Phir Tumhari Yaad Aayi Ai Sanam - Mohd. Rafi, Manna Dey and Sadat Khan - Rustam Sohrab (1963) - Lyricist Qamar Jalalabadi
सज्जाद साहेबांचे आणखी एक कमाल गाणे! ही कव्वाली आहे, पण यात एकही टाळी वाजवलेली नाही! युद्धाला तयार असलेले सैनिक आपल्या बायकोची/कुटुंबियांची आठवण काढून हे गीत गातात, कोरसही अप्रतिम. प्रेमनाथ, मुमताज आणि पृथ्वीराज कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील सर्वच्या सर्व म्हणजे पाचही गाणी खूप गाजली.



तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा, लेख आवडला असेल तर कृपया शेअर करा. धन्यवाद.


Friends,

It was 1986-87, those were wonderful College days, used to have lots of free time, so my main hobbies were to read and listen to songs on Vividh Bharati since that was the only Entertainment in those days. One day, I happened to read a Marathi book titlted "Gaaye Chala Jaa" by Shirish Kanekar. It contained different chapters on famous Singers, Music Directors from the Hindi Film Industry. I was glued to the book so much so that I started wondering if I will every be able to have the songs mentioned in the book, if I will ever be able to meet the personalities about whom the author had written with so much passion and empathy. Particularly, I got intrigued by a Music Director of yesteryears viz. Sajjad Hussain about whom there was a full chapter "Katha Eka Vedya Kalavantachi" (Story of a Crazy Artist). Reading about him and his idiosyncrasies, it got me thinking what would have gone wrong with a person who looked to be a straight talker, why then he still considered as the Best Musician of those years. 

In few years time, I purchased a 12-cassette set viz. "Yaadon Ki Baaraat" published by HMV. It carried 2 songs of Sajjad - "Aaj Mere Naseeb Ne" from Hulchul (1951) and "Phir Tumhari Yaad Aayi Ai Sanam" from Rustam Sohrab (1963). When I listened to those songs, I felt that this is something totally different from what I used to hear on Vividh Bharati! My gosh!! How could Sajjad even think of such compositions!!? Slowly, I got drawn to the songs composed by the legend called Sajjad Hussain. I wanted to meet him in person, but had no idea whether he was alive and if so his whereabouts, so the dream remained at the back of my mind for number of years.

Cut to 1994-95, I used to work in Mumbai (erstwhile Bombay). On some week ends, used to visit my friend in Chembur who himself was a good harmonium player. He knew about my passion of Old Hindi Songs, and Sajjad in particular, so we used to have a small mehfil at his place with lots of Sajjad's songs. In one such Mehfil, I got introduced to his friend - Amit Date - who also was a fan of Sajjad. Out of nowhere, Amit asked me if I want to meet Sajjad, and I was spellbound!! I couldn't react for a minute or two, and when I got my senses back, the only question I asked him was "Is he still alive?". When Amit affirmed that not only Sajjad saab is alive, he lives in Mahim, I was pleasantly surprised and requested him to ask for him time. He finalized 10AM on 19th March 1995, it was a Sunday.

I couldn't be happier, was eager to meet him, my dream of years (out of nowhere) was going to come true, so was just waiting for the day. And the day arrived! It was a pleasant Sunday morning in Mumbai on 19th March 1995. I met Amit at 9:45am and both of us travelled to Natalwala Building where Sajjad used to live in a small flat on the first floor.

"Aaiye Sapre saab" were the words with which I was greeted by Sajjad saab. Wearing a white Salwar and Kurta, Sajjad bore a very simple look and was polite to the core. Amit had told him that one of his fans from Pune wants to meet him, it was after a long long time, that someone had desired to meet him! And Sajjad saab seemed to be as eager as me! He had the reason for not being suscpicious of my intentions, since I had carried only one notebook, no camera, no taperecorder. We sat down comfortably on a maroon-coloured carpet. It was a small 10*12 ft. hall, neatly maintained and clean. All the corners had one or other instrument like Tambora, Violin, Mandolin, Sitar, Tabla, etc. The environment was completely musical!

Normally, when guests arrive, the first question we would ask is "What will you have?". Instead, Sajjad asked me "What would like to listen today?" I presented him 2 lists - one was having his songs that I had already heard, and the other one was the songs that I had not heard and wanted to hear. There was a gentle smile when he saw both the lists. He opened a small trunk (briefcase) which contained loads of cassettes of his songs. And I felt, how valuable this Khajana would be! I did not know that it was just a beginning of a 4-hour long mehfil.

"Bhul Ja Ai Dil Mohabbat Ka Fasana" (Lata - Hulchul), "Yeh Kaisi Ajab Dastan Ho Gayi Hai" (Suraiyya-Rustam Sohrab), "Jaate Ho To Jaao" (Lata - Khel), "Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandani" (Talat-Sangdil) ... it was a grand start to our meeting. And I was awestruck to be sitting besides the legend and listening to the stories behind composition of every song, his thought process to have composed it the way he did and many other interesting anecdotes. It was simply unbelievable! "Lataji, sing carefully, this is not Naushad song" - Sajjad saab said, with an innocent smile on his face, how he had warned The Lata, and I got goosebumps.

Later, the discussion turned to the great Kundan Lal Saigal - the first Singing Super Star of the Hindi Film Industry. Sajjad saab said he had great respect for Saigal saab, he was an outstanding and gifted singer, however his addiction for liquor was his undoing particularly in his last days. The luck ran away from Saigal when he had to sing for Naushad - Sajjad continues his story on Saigal - and that made Saigal feel so bad that he sang "Jab Dil Hi Toot Gaya Hum Jee ke Kya Karenge" for Naushad in "Shahjehan" (meaning My heart is broken by singing Naushad's songs, I better die now) and expired soon after, Sajjad says with a wry smile on his face.

After listening to his film songs, Sajjad saab turned to what he liked most, his performances on Mandolin. He said "Sapre saab, I trained myself and practiced for 33 long years before giving my first public performance, you won't be able to judge my hardship". He remembered his performance from a 1956 concert in Kolkata (erstwhile Calcutta) which was attended by legends like Pt. Vinayakbua Patwardhan, Ali Akbar Khan, Pt. Ravishankar, Mallikarjun Mansur, etc. Sajjad took up the challenge of playing Hindustani Classical music on a small instrument like Mandolin, and what a performance he delivered, it was just awesome! Sajjad still seemed to remember every detail of that concert, showed us the hand written letters by Mallikarjun Mansoor and Pt. Ravishankar in which they had praised Sajjad's performance. If I am not mistaken, Pt. Ravishankar had written "Aapne to hamare saamane alag hi duniya khadi kar di" (You took us to a completely different world with your performance). We could observe the complete sense of achievement and satsfaction on Sajjad's face when he was showing all that to us. Both myself and Amit were still in a shock to hear/see all the Khajana that Sajjad had.

Sajjad also spoke very highly of Lata Mangeshkar. According to him her voice and talent is Allah's gift to her. He mentioned that Lata is still in touch with him, helps him a lot when needed. He also mentioned that all of his 5 sons - Mustafa, Noor, Nasir, Yusuf and Abdul play Mandolin. One of them had just returned from Chennai (erstwhile Madras) from a concert. A father was speaking very proudly of his sons!

We had fixed up an hour for the meeting; it was 4 hours - 2PM!! And Sajjad saab was still going great. However we had to leave him there. My dream had come true finally. I left the place with the hear filled with joy and gratitude to a man who gave so many wonderful compositions - a true Legend.

Sajjad saab expired on 21st July 1995 just 4 months after our meeting. Till date, I continue to feel that I was destined to meet him, and he was also waiting to see one of his truest fans. I was blessed to have met him. Since then, I started following my second dream of meeting Lata Mangeshkar in person - I am confident that it too will happen soon. Let's see.

I pay my respect to Sajjad saab with words from one of his famous songs - Phir Tumhari Yaad Aayi Ai Sanam, Hum Na Bhoolenge Tumhe Allah Kasam.

Hope you would have liked this story.

I will now present 4 of Sajjad's best songs. Hope you will like those too.

1) Darshan Pyaasi Aayi Daasi - Geeta Dutt - Sangdil (1951) - Lyricist Rajendra Krishna

This is a Bhajan (devotional song); I would not hesitate to rate this song in Top 3 Bhajans in Hindi films. Notable thing is that Sajjad chose Geeta Dutt over Lata to deliver this song, and she did not disappoint. The composition mainly comprises of Jaltarang, Flute and Tabla. Jaltarang being used to portray sound of the bells in the temple, what an idea, Sirji!!

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

2) Dil Mein Samaa Gaye Sajan - Talat Mahmood - Lata Mangeshkar - Sangdil (1951) - Lyricist Rajendra Krishna

This is a romantic duet filmed on Dilip Kumar and ever beautiful Madhubala. Please note the prelude of the song and Lata's young scintillating voice. In 1981, there was programme viz. "Mortal Men Immortal Melodies" held at Shanmukhanand Hall in Mumbai. The aim was to present all the artists of the Hindi Film industry from yesteryears till date and their work. Many legends including Noorjehan had attended that programme. When Talat and Lata were called on the stage, the song that was played in the background was "Dil Mein Samaa Gaye Sajan". It was a testimony that this is and will remain the best duet of Talat and Lata.

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

3) Ai Dilruba Nazaren Mila - Lata Mangeshkar - Rustam Sohrab (1963) - Lyricist Jaan Nisar Akhtar

What can I say about this song? Simply out of the world! I consider this to be Lata's Best Song ever. The composition is Persian/Arabic and uses Piano, Violin, Mandolin and Tabla/Bongo majorly. Amazing voice control by Lata. The song has only one stranza. The last 78 seconds is only Aalaap and words "Ai Dilruba" along with background music, but the song leaves a longlasting impact on us. Hats off to Sajjad saab for this Gem!

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

4) Phir Tumhari Yaad Aayi Ai Sanam - Mohammad Rafi, Manna Dey and Sadat Khan - Rustam Sohrab (1963) - Lyricist Qamar Jalalabadi

This is a unique Kawwali in the sense that it does not contain any hand clap - quite unusual to this type of song. And yet it gives a feel of a pure Kawwali, that's Sajjad for you! Listen to the chorus singing along with the background score. Simply amazing. The Movie had Premnath, Mumtaz and Prithviraj Kapoor in lead roles. All the 5 songs from this film became popular.

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 


Hope you liked this story. Please do let me know your feedback. Thank you!

1 comment:

  1. Excellent post Dhananjay ji. It must be one of the proud and happy moments of your life. Enjoyed the journey with you. How fortunate to you are!

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.