Sunday 14 June 2020

Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 1

Namaskaar Friends!

Once again, I am extremely happy to present some more musical pieces from the Golden Era of Hindi Film Music. This time I will be presenting few songs from one of my favorite music composers - Sajjad Hussain. Sajjad was the master of Mandolin, one of the most difficult instruments to play classical music. He was also known for his extremely complex and out of the world compositions for the Hindi films from 1950's and 1960's. 

He was a real genius who enthralled the contemporary musicians and audience with his immicable Mandolin performances and Song compositions.

This blog has 2 parts - this is the first part which contains general information about Sajjad and 4 of his selected songs, while the second part contains an interesting stroy about my face-to-face meeting with Sajjad and 4 of his best songs.

You can read the second part at this link Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 2.

English version of the blog is at the end of the Marathi version below.


The Legend
"सज्जादची गाणी म्हणायला सगळ्यात अवघड, पण त्यापासून मिळणारा आनंदही तेवढाच मोठा. सज्जाद तऱ्हेवाईक असेल; पण अस्सल कलावंत होता" - तलत महमूद (संदर्भ: "गाये चला जा" - शिरीष कणेकर)

"सज्जादच्या प्रत्येक गाण्यात तो अशा काही करामती करतो, की आम्ही संगीतकारही त्याला मानतो. अफलातून संगीतकार; पण माणूस डोक्याने पार गेला. निव्वळ माथेफिरू! - संगीतकार के. दत्ता (दत्ता कोरगावकर) (संदर्भ: "गाये चला जा" - शिरीष कणेकर)

"सज्जाद हुसैन यांना मी मानतो. बादशहा होते संगीतातले. एकेक अशा चीजा देऊन गेलेत की तौबा तौबा" - संगीतकार ओ. पी. नय्यर (संदर्भ: "गाये चला जा" - शिरीष कणेकर)

"सज्जादसारखा संगीतकार हा शतकातून एखादा होतो" - नूरजहाँ 

"Sajjad was the only original composer we ever had. All of us at some point have been inspired by something or other. But every note of Sajjad's is original" - संगीतकार अनिल विश्वास (Ref. "Yesterday's Melodies Today's Memories" by Manek Premchand)

"Sajjad Sahab was a misunderstood artist. He was simply a perfectionist. He loved Arabic music and would demonstrate how to sing. He disliked loud Alaap and taught me to sing in a feather-light, effortless manner. You know, there is little one can do with the Mandolin. But Sajjad Sahab performed Meend and Taan, which is surprising. He was so sharp that he could instantly tell when a musician hit a wrong note" - लता मंगेशकर (Ref. Times of India dated 15th June 2017)

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गजांची सज्जाद हुसैन यांच्याविषयीची वरील मते वाचली की त्यांचे मोठेपण लक्षात येते, अर्थात जे सज्जादना प्रत्यक्ष भेटलेत त्यांना हे कळेल की खुद्द सज्जादना अशा कुठल्याही प्रशस्तिपत्रकाची अपेक्षा नव्हती. विलक्षणच माणूस होता तो, अतिशय बुद्धिमान आणि कदाचित त्यामुळेच प्रचंड स्पष्टवक्ता! अर्थात त्यांच्या स्पष्ट बोलण्याला उर्मटपणाची थोडीशी किनार असेल, त्यामुळे खूप माणसे दुखावली गेली; ज्याचा परिणाम म्हणून सज्जादनी फक्त २४ चित्रपटांना संगीत दिले - त्यातील प्रदर्शित झालेले चित्रपट १९, या १९ पैकी एक सिंहली आणि एक तेलुगू भाषेतील; म्हणजे हिंदी चित्रपटांची संख्या १७, त्यातील ३ चित्रपटांना सहसंगीतकार म्हणून. म्हणजे स्वतंत्रपणे संगीत दिलेले हिंदी चित्रपट फक्त १४, तरी तब्बल १०५ गाणी त्यांच्या नावावर आहेत, आहे का नाही कमाल?! 

१५ जून १९१७ रोजी सीतामौ या मध्य प्रदेशातील एका खेड्यात जन्मलेल्या सज्जादना लहानपणीच वडील - मोहम्मद अमीर खान - यांनी सतार शिकवायला सुरुवात केली. थोड्याच वर्षात सज्जादनी वीणा, व्हायोलिन, बासरी, पियानो, जलतरंग, बँजो, क्लॅरोनेट, मेंडोलिन, Accordion, स्पॅनिश गिटार, Hawaiin Guitar अशी तब्बल १६ प्रकारची वाद्ये आत्मसात केली. त्यामुळे सज्जादना चित्रपट संगीत क्षेत्रात One Man Orchestra म्हणून ओळखायचे. यातील मेंडोलिन या वाद्यावर त्यांनी जबरदस्त हुकूमत मिळवली. वडिलांनी त्यांची आवड ओळखून त्यांना स्वतः एक मेंडोलिन बनवून दिले. पुढे कित्येक वर्षे ते हेच मेंडोलिन वाजवायचे. अनेक वर्षांनंतर मुंबईमध्ये सज्जादना रहीम सॉलोमन नावाच्या ज्यू मेंडोलिन वादकाने एक Professional Mandolin भेट म्हणून दिले.

Noorjehan - Photo Courtesy: Lyricsbogie
Noorjehan - Photo Courtesy: Lyricsbogie
Photo Courtesy: Cinestan.com
Photo Courtesy: Cinestan.com













१९३७ साली सज्जाद मुंबईला चित्रपटसृष्टीत नशीब आजमवायला आले. सुरुवातीची काही वर्षे सोहराब मोदींच्या मिनर्व्हा मूव्हीटोन आणि नंतर वाडिया मूव्हीटोन यामध्ये नोकरी केल्यानंतर सज्जादनी मीर साहेब आणि रफिक ग़ज़नवी यांचे संगीत सहाय्यक म्हणून काम केले. पुढे त्यांनी संगीतकार हनुमान प्रसाद यांचे सहाय्यक  म्हणून काम करायला सुरुवात केली. १९४४ साली आलेल्या "गाली" या चित्रपटामध्ये सज्जाद यांना २ गाणी स्वतंत्रपणे संगीतबद्ध करायची संधी मिळाली. त्याच वर्षी शौकत हुसेन (नूरजहाँ यांचे पती) दिग्दर्शित "दोस्त" चित्रपट हा सज्जाद यांचा स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट ठरला. त्यात नूरजहाँ यांनी ४ गाणी गायली, त्यातील "कोई प्रेम का देके संदेसा" आणि "बदनाम मोहब्बत कौन करें" ही २ गाणी प्रचंड गाजली. पण शौकत हुसेन यांनी या गाण्यांचे श्रेय सज्जाद यांच्या संगीताला न देता नूरजहाँच्या गायकीला दिले, दुखावल्या गेलेल्या सज्जादनी नंतर कधीही नूरजहाँ बरोबर काम केले नाही, आणि रसिक एका मेजवानीला मुकले!

१९४६ साली प्रदर्शित झालेल्या "१८५७" नावाच्या चित्रपटात तत्कालीन प्रख्यात गायिका सुरैय्या आणि शमशाद बेगम या सज्जाद यांची गाणी प्रथमच गायल्या, आणि सर्व गाणी तुफान गाजली. विशेषतः "ग़म-ए-आशियाना सताएगा कब तक", "फिर हो गयी उनसे बात" आणि "उम्मीदों का तारा किस्मत पे" ही सुरैय्याची गाणी. सुरेंद्र आणि सुरैय्यानी गायलेल्या "तेरी नज़र में मैं रहूं मेरी नज़र में तू" या गाण्याने तर धुमाकूळ घातला. 

१९५०, १९५१ आणि १९५२ ही तीन वर्षे सज्जाद यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट वर्षे म्हणता येतील. कारण या तीन वर्षात त्यांनी एक-से-एक चित्रपट दिले व आपल्या कौशल्याची, सामर्थ्याची जाणीव सिनेजगताला करून दिली. १९५० साली आलेले "खेल" आणि "मगरूर", १९५१ साली आलेले "हलचल" आणि "सैय्यां" आणि १९५२ साली आलेला "संगदिल" हे ते चित्रपट होत. 

Dilip Kumar and Shammi in Sangdil
"संगदिल" चित्रपटातील तलत महमूद यांनी गायलेले "ये हवा ये रात ये चांदनी" हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही आहे. या गाण्याचे तब्बल १७ टेक झाले होते. असं म्हणतात की मदन मोहन यांनी त्यांच्या "आखरी दाँव" चित्रपटात रफी साहेबांनी गायलेले अणि लोकप्रिय झालेले "तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा" हे गाणे "ये हवा ये रात" ची सहीसही नक्कल होती, त्याबद्दल सज्जाद यांची प्रतिक्रिया "अब मेरे गाने तो क्या उसकी परछाइयाँ भी चलने लगी है" अशी होती! तर मदनमोहन म्हणाले की "मला चोरी करायला सज्जादपेक्षा अधिक चांगला  संगीतकार कोण मिळाला असता?"

१९५५ सालच्या "रुखसाना" चित्रपटात आशा भोसले, मुबारक बेगम आणि किशोरकुमार यांची गाणी आहेत. त्यातील आशाचे "तुम्हे हम याद करते हैं" आणि "दर्द भरी किसी की याद" ही २ गाणी ऐकण्यासारखी आहेत. किशोर-आशा जोडीचे "तेरे जहाँ से चल दिए" हे गाणे खूप गाजले.

१९५५ नंतर सलग ८ वर्षे सज्जाद यांना कुठलेही काम मिळाले नाही, त्याला कारण त्यांचा तापट स्वभाव आणि त्यामुळे दुखावले गेलेले अनेक निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि अभिनेते. याबद्दलचे अनेक किस्से जगजाहीर आहेत त्यामुळे इथे त्यांची उजळणी करत नाही. 

१९६३ साल उजाडले. निर्माता रामसे आणि दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांनी "रुस्तम सोहराब" नावाचा चित्रपट बनवण्याचे ठरवले. चित्रपटाची कथा एका पर्शियन काव्यावर आधारित होती, त्यामुळे निर्मात्यांना असा संगीतकार हवा होता ज्याला पर्शियन/अरेबिक संगीताची जाण असेल. त्यांच्यासमोर फक्त एकच नाव आले - सज्जाद हुसैन. आणि सज्जादनी परत एकदा ८ वर्षानंतर आपला संगीताचा खजिना रिता केला. चित्रपटात एकूण ५ गाणी आहेत. त्यातील लताचे "ऐ दिलरुबा नजरे मिला" आणि सुरैय्याचे "ये कैसी अजब दास्ताँ हो गयी है" ही  गाणी त्यांची वैयक्तिक Signature Songs बनली आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.

१९५० च्या "खेल" मध्ये लता मंगेशकर प्रथमच सज्जाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायल्या. लता आणि सज्जाद या दोघांनी एकत्र फक्त १४ गाणी केली आहेत, पण प्रत्येक गाणं हे मोत्यांच्या माळेतील मोत्यासारखे शुद्ध आणि चमकदार आहे. लता आणि सज्जाद दोघांनाही एकमेकांविषयी अपार आदर होता. कधीही कुणाविषयी फारसं चांगलं न बोलणारे सज्जाद खालील व्हिडिओ मध्ये लताविषयी काय म्हणताहेत बघा:  (सज्जाद यांचे Live Video जवळपास नाहीतच, त्यामुळे हा Video अतिशय दुर्मिळ असाच आहे)

 


2 Legends - Sajjad and Lata
लता-सज्जाद यांनी अजरामर केलेली खालील गाणी ऐका/पहा म्हणजे मी जे म्हणतोय त्याचा प्रत्यय तुम्हाला येईल:
  1. जाते हो तो जाओ हम भी यहाँ - खेल (१९५०)
  2. भूल जा ऐ दिल मोहब्बत का फ़साना - खेल (१९५०) 
  3. आज मेरे नसीब ने मुझको रुला रुला दिया - हलचल (१९५१)
  4. हाए सदके तेरे ओ बाँके मेरे - हलचल (१९५१)
  5. लूटा दिल मेरा हाए आबाद होकर - हलचल (१९५१)
  6. हवा में दिल डोले - सैय्यां (१९५१)
  7. वो रात दिन वो शाम की - सैय्यां (१९५१)
  8. ख़यालों में तुम हो नज़ारों में तुम हो - सैय्यां (१९५१)
  9. किस्मत में ख़ुशी का ग़म नहीं - सैय्यां (१९५१)
  10. तुम्हे दिल दिया ये क्या किया मैंने - सैय्यां (१९५१)
  11. काली काली रात रे दिल बड़ा सताए - सैय्यां (१९५१)
    • या गाण्याबद्दल पं. हृदयनाथ मंगेशकरांनी एक आठवण सांगितली आहे ती येथे ऐका
  12. वो तो चले गए ऐ दिल - संगदिल (१९५२)
  13. दिल में समां गए सजन  - संगदिल (१९५२) - सहगायक तलत महमूद
  14. तेरा दर्द दिल में बसा लिया - रुखसाना (१९५५)
आश्चर्य म्हणजे "सिर्फ लता और नूरजहाँ गाती है, बाकी सब रोती है" असं म्हणणाऱ्या सज्जादने इतर गायक-गायिकांकडूनही काही अप्रतिम गाणी गाऊन घेतली आहेत, वानगीदाखल खालील गाणी बघा...

गाणे

गायक

चित्रपट

ये कैसी अज़ब दास्ताँ हो गयी है

सुरैय्या

रुस्तम सोहराब (१९६३)

टूट गया हाए टूट गया

राजकुमारी, शमशाद बेगम अणि मोहम्मद रफ़ी

मग़रूर (१९५०)

तेरी नज़र में मैं रहूँ

सुरेंद्र-सुरैय्या

१८५७ (१९४६)

मैं हूँ भोली सी नार

सुलोचना कदम

रुपलेखा (१९४९)

मेरी जान मोहब्बत करो चुपके

शमशाद बेग़म

सैय्यां (१९५१)

हुस्नवालों से कभी आँख मिलाया

मुबारक बेग़म

रुखसाना (१९५५)

तेरे जहाँ से चल दिए

किशोरकुमार-आशा भोसले

रुखसाना (१९५५)

अब देर हो गयी वल्लाह

आशा भोसले

रुस्तम सोहराब (१९६३)


"रुस्तम सोहराब" च्या यशानंतर परत एकदा सज्जाद गायब झाले. १९७३ साली आलेला "मेरा शिकार" आणि १९७७ सालचा "आख़री सजदा" हे चित्रपट त्यांचे शेवटचे चित्रपट ठरले, यातील संगीत अतिशय टुकार होते. १९७७ पासून ते २१ जुलै १९९५ त्यांच्या निधनापर्यंत पर्यंत सज्जाद जवळपास अज्ञातवासातच होते. असं म्हणतात की त्यांच्या अंत्ययात्रेत खय्याम आणि पंकज उदास वगळता चित्रसृष्टीतील कोणीही मान्यवर आले नव्हते!

सज्जाद यांची पाचही मुले आज मेंडोलिन वादनाचे कार्यक्रम करतात. मुस्तफा, नूर, युसूफ, नासिर आणि अब्दुल. यापैकी मुस्तफा, नूर आणि नासिर हे Top Grade Artists आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांबरोबर मेंडोलिनची साथ करतात.


आज मी सज्जाद यांची एकूण ८ गाणी सादर करणार आहे त्यांच्या वैशिष्ट्यांसकट. १०५ गाण्यातून ८ गाणी निवडणे महाकठीण काम होते! गाणी निवडताना गाण्याचा मूड, त्याचे संगीत, गाण्याचा प्रकार, गायक/गायिका, चित्रपट यात विविधता असेल याकडे लक्ष दिले आहे. अर्थात ८ पैकी ४ गाणी लताची आहेत! तुम्हाला ही गाणी आवडतील अशी आशा आहे. 

१) बदनाम मोहब्बत कौन करें - नूरजहाँ - दोस्त (१९४४) - गीतकार शम्स लखनवी
Badnaam Mohabbat Kau Karen - Noorjehan - Dost (1944) - Lyrics Shams Lakhnavi
स्वतंत्र संगीतकार म्हणून सज्जाद यांचा हा पहिला चित्रपट आणि त्यात समोर नूरजहाँ यांच्यासारखी प्रख्यात अभिनेत्री-गायिका. एखाद्याला दडपण आले असते, पण सज्जाद डगमगले नाहीत; त्यांनी असा काही समा बांधला की प्रत्यक्ष नूरजहाँ थक्क झाली! या  चित्रपटात नूरजहाँ यांनी एकूण ५ गाणी गायली आणि सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली। नूरजहाँ यांनी एका मुलाखतीत त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांमध्ये या गाण्याचा समावेश केला होता. "बदनाम" शब्दातील लडिवाळपणा आणि त्यानंतर लगेचच येणारा Pause हा या गाण्याची सुंदरता वाढवतो.



२) ग़म-ए-आशियाना सताएगा कब तक - सुरैय्या - १८५७ (१९४६) - गीतकार मोहन सिंग
Gham-e-Aashiyana Satayega Kab Tak - Suraiyya - 1857 (1946) - Lyrics Mohan Singh
१८५७ सालच्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धावर आधारित हा चित्रपट १९४६ सालातील सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट होता; याचे बरेच श्रेय सज्जाद यांच्या संगीताला जाते. सुरैय्या या तत्कालीन प्रसिद्ध गायिका अभिनेत्रीचा सज्जाद यांच्याबरोबरचा हा पहिला चित्रपट. या चित्रपटात तिने एकूण ४ गाणी गायली होती. "मेरी हो गयी उनसे बात", "उम्मीदों का तारा किस्मत पे" ही तिची गाणी खूप गाजली होती. सुरैय्या आणि सुरेंद्र यांचे "'तेरी नज़र में मैं रहूं" हे गाणेही तुफान गाजले होते. इथे सादर केलेल्या गाण्यात तरुण सुरैय्या गात आहे. शेवटच्या कडव्यातील उंच स्वरमालिका आपल्याला बाबूजींच्या (सुधीर फडके) संगीतशैलीची आठवण करून देते.



३) लूटा दिल मेरा हाए आबाद होकर - लता मंगेशकर - हलचल (१९५१) - गीतकार खुमार बाराबंक्वी
Loota Dil Mera Haaye Aabaad Hokar - Lata Mangeshkar - Hulchal (1951) - Lyricist Khumar Barabankwi 
३ गाण्यांचे संगीत करून सज्जाद यांनी हा चित्रपट सोडून दिला; उरलेली गाणी मोहम्मद शफी यांनी पूर्ण केली. या गाण्याचे मला जाणवलेले वैशिष्ट्य म्हणजे याची नांदी (Prelude) - पार्श्वसंगीत सुरु होण्याआधी गायकाने म्हटलेल्या ओळी - नर्गिसचा Close-up आणि लताजींचे करुण स्वर "बहार आयी मगर दिल के फूल खिल न सके, हम उनको पा के भी अफसोस उनसे मिल न सके". या दोन ओळीच सांगून जातात पुढे येणाऱ्या लाजवाब संगीताबद्दल. संपूर्ण गाण्यात व्हायोलिनचा अप्रतिम वापर, विशेषतः दोन कडव्यांच्या मध्ये उंचावरून अलगदपणे घरंगळत येणारे स्वर. लताजींच्या "आबाद", "बरबाद", "आझाद" या शब्दांवरच्या छोट्याशा मुरकी. आणि पहिल्या आणि शेवटच्या कडव्याची चाल एकसारखी असताना, सज्जाद दुसऱ्या कडव्याच्या पहिल्या ओळीची  चाल एवढी अफलातून वेगळी देतात (पण मीटर तोच) की आपण थक्क होतो! सज्जाद यांची ३ गाणी आणि मोहम्मद शफी यांची गाणी ऐकली की दर्जातील फरक स्पष्टपणे जाणवतो. गाणे ऐकाच. 



४) ख़यालों में तुम हो नज़ारों में तुम हो - लता मंगेशकर - सैय्यां (१९५१) - हसरत जयपुरी 
Khayalon Mein Tum Ho Nazaron Mein Tum Ho - Saiyan (1951) - Lyricist Hasrat Jaipuri
For a change, आनंदी मूड मधले सज्जाद यांचे हे गाणे खरं तर आहे एक स्वप्नगीत जे स्वप्न बघते आहे या चित्रपटाची नायिका सैंय्या (मधुबाला). तिच्या स्वप्नात येतात दोन राजकुमार - विजय (अजित - तोच Mona Darling वाला) जो आहे जरासा लाजाळू, पण सज्जन माणूस, आणि दुसरा त्याचा भाऊ रज्जो (सज्जन - हो, तोच "विक्रम और वेताळ" या TV मालिकेतील वेताळ) जो आहे उर्मट, धीट आणि अगाऊ प्रेमवीर. संपूर्ण गाण्यात केलेला कोरसचा अप्रतिम वापर आणि तोही सहगायन करताना, संपूर्ण गाण्याचे Orchestration केवळ लाजवाब आहे. गाणे सुरु होण्याच्या आधीचे पार्श्वसंगीत गाण्याबद्दलची उत्सुकता वाढवणारे. एकूण गाणे ऐकण्याचा आनंद अवर्णनीय आहे.  



मित्रांनो, तुम्हाला हा लेख आणि गाणी आवडली असतील अशी आशा करतो. धन्यवाद.

हा लेख लिहीत असताना जेंव्हा Internet वर सज्जाद विषयी कोणी कोणी काय लिहिलंय याचा शोध घेत होतो तेंव्हा २ अप्रतिम लेख मला मिळाले, तुम्ही ते जरूर वाचावे असं मला वाटतं.


अशा या सज्जादना प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला आला, त्याविषयी सविस्तर आणि उर्वरित ४ गाणी या लेखाच्या भाग-२ मध्ये, अवश्य वाचा Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 2


Friends,

"Sajjad's songs are most difficult to sing; however it is also a great pleasure. Sajjad's nature may be contentious but he was a genuine artist" - Talat Mahmood (Ref. "Gaaye Chala Jaa" - Shirish Kanekar)

"Sajjad in his every song shows his genius, so much so that we musicians really appreciate him" - Music Composer Datta Korgaokar (K. Datta) (Ref. "Gaaye Chala Jaa" - Shirish Kanekar)

"I really admire Sajjad for the outstanding compositions he did" - O. P. Nayyar (Ref. "Gaaye Chala Jaa" - Shirish Kanekar)

"You get a composer like Sajjad once in your lifetime" - Noorjehan 

"Sajjad was the only original composer we ever had. All of us at some point have been inspired by something or other. But every note of Sajjad's is original" - Music Composer Anil Biswas (Ref. "Yesterday's Melodies Today's Memories" by Manek Premchand)

"Sajjad Sahab was a misunderstood artist. He was simply a perfectionist. He loved Arabic music and would demonstrate how to sing. He disliked loud Alaap and taught me to sing in a feather-light, effortless manner. You know, there is little one can do with the Mandolin. But Sajjad Sahab performed Meend and Taan, which is surprising. He was so sharp that he could instantly tell when a musician hit a wrong note" - Lata Mangeshkar (Ref. Times of India dated 15th June 2017)

These are only some of the reactions that one gets from contemporary legends about Sajjad Hussain which tell you how much he was respected for his exemplary musical skills, though he himself would not have demanded it. Sajjad Saab was superly talented and perhaps hence was extremely straight talker. He would not hesitate to call spade a spade. He never compromised on his principles, never tolerated any interference in his compositions from anyone else. The film industry in general does not like people who are upright and thus tends to devalue, ignore them. With this kind of personality, Sajjad's fate was written already, hence he could do only 14 Hindi films in his entire career which lasted for 33 years to be precise from 1944 to 1977 with many years in between went into oblivion.

In spite of this, Sajjad composed music for 105 songs in Hindi. He also composed music for a Sinhalese film and a Telugu film. Both were a super hit thanks to Sajjad's music.

Born on 15th June 1917 in a small village viz. Sitamau in Madhya Pradesh, Sajjad's father - Mohammad Amir Khan - decided to teach him to play Sitar at a very young age. He not only picked up Sitar well enough in no time, but in a few years, had learnt to play almost 16 differnt instruments like Flute, Piano, Veena, Claronet, Violin, Jaltarang, Tabla, Mandolin, Harmonium, Spanish and Hawaiian Guitar. Hence, he was called 'One Man Orchestra' and never needed any Assistant while composing music. However he was fascinated by Mandolin, hence his father built a small one on his own. Sajjad used to play that Mandolin for many years before a Jewish Mandolin player - Rahim Soloman - gifted him a professional Mandolin in Mumbai.

In 1937, Sajjad Saab came to Mumbai (then Bombay) to try his luck as a Music Composer in the Hindi film industry. Initially, he worked at Sohrab Modi's Minerva Movietone and Wadia Movietone. He started as Assistant Music Director for Meer Saheb and Rafiq Gaznavi, later started assisting Hanuman Prasad. Seeing Sajjad's skills, Hanuman Prasad gave him an opportunity to compose 2 songs for the film 'Gaali' in 1944. Same year, Sajjad got his first major break for the film "Dost" which was directed by Shaukat Husain Rizvi (husband of Noorjehan - the Superstar Singer cum Actor of that time). "Dost" had 5 songs of Noorjehan of which "Koi Prem Ka Deke Sandesa" and "Badnam Mohabbat Kaun Karen" became popular. The movie became super hit due to its music; however Shaukat Rizvi gave all the credit to Noorjehan's gaayki. This angered Sajjad and he vowed not t work again with Noorjehan, and he literally did not. As a result, people were deprived of classics from Noorjehan and Sajjad.

Come 1946, Sajjad composed music for the film '1857' which was based on India's 1st War of Independence. In this film, Suraiyya and Shamshad Begum - who had already become singing starts - sung for Sajjad for the first time. All the songs proved to be a hit, in particular Suaiyya's "Ummedon ka Tara", "Phir Ho Gayee Unse Baat" and "Gham-e-Aashiyana Satayega Kab Tak". A duet by Surendra and Suraiyya "Teri Nazar Mein Main Rahoon" is remembered even today.

1950, 1951 and 1952 turned out to be Sajjad's most successful years as he not only composed some of his best songs for 5 films but stamped his authority and genius as a Composer who creates 'out-of-the-world' tunes. "Khel" and "Magroor" in 1950, "Hulchal" and "Saiyan" in 1951 and "Sangdil" in 1952 were the movies in which Sajjad enthralled the audience with his beautiful compositions. 

Dilip Kumar-Shammi : Sangdil
The song "Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandani" sung by Talat is an Evergreen song till date and is played on all channels quite regularly. The song required 17 retakes from Talat for Sajjad to finalize it. It created so much buzz in the whole Film industry that a great composer like Madan Mohan could not resist himself from copying this song for one of his songs "Tuze Kya Sunau Main Dilruba" from the fim "Aakhri Daao". Hearing this, Sajjad said "
अब मेरे गाने तो क्या उसकी परछाइयाँ भी चलने लगी है" meaning "Nowadays even a shadow of my song becomes popular" while Madan Mohan admitted that he did not think of any other composer than Sajjad to copy a tune.

In 1955, Sajjad worked with Asha Bhosale, Mubarak Begum and Kishore Kumar for the first time for the film "Rukhsana". Songs like "Tumhe Hum Yaad Karte Hain" (Asha), "Dard Bhari Kisi Ki Yaad" (Asha) and "Tere Jahan Se Chal Diye" (Kishore-Asha) are worth listening.

After "Rukhsana", Sajjad did not get any work for 8 years, primarily due to his attitude, arrogance and straight talk which was not liked by many in the Industry. Thus, many producers and directors turned their back on Sajjad. 

Cut to 1963, Producer F. C. Ramsay and Director Vishram Bedekar were working on a movie viz. "Rustam Sohrab" which was based on a Persian poem. Hence, they were looking for a Music Composer who had knowledge of Persian/Arabic music. They could not find anybody better and fitter than Sajjad. 
And Sajjad did not disappoint. Even after the gap of 8 years, Sajjad's genius was such that he could produce 5 wonderful compositions and all songs (as was rudimentary for a Sajjad film) were super duper hit.

Lata Mangeshkar sang for Sajjad for the first time in "Khel" in 1950. Together they have given ony 14 songs, but each one is a Gem. Both Lata and Sajjad had huge respect for each other. One would have hardly heard Sajjad praising any singer apart from Lata and Noorjehan. In the following video, please watch Sajjad talking about Lata - this is an extremely rare video and perhaps the only video of Sajjad where he is speaking live.


Here is a list of Lata's songs for Sajjad. Please spare some time and watch each one of them carefully to understand the sheer value of these gems. 
    1. जाते हो तो जाओ हम भी यहाँ - खेल (१९५०)
    2. भूल जा ऐ दिल मोहब्बत का फ़साना - खेल (१९५०) 
    3. आज मेरे नसीब ने मुझको रुला रुला दिया - हलचल (१९५१)
    4. हाए सदके तेरे ओ बाँके मेरे - हलचल (१९५१)
    5. लूटा दिल मेरा हाए आबाद होकर - हलचल (१९५१)
    6. हवा में दिल डोले - सैय्यां (१९५१)
    7. वो रात दिन वो शाम की - सैय्यां (१९५१)
    8. ख़यालों में तुम हो नज़ारों में तुम हो - सैय्यां (१९५१)
    9. काली काली रात रे दिल बड़ा सताए - सैय्यां (१९५१)
      • Pandit Hridaynath Mangeshkar has narrated a story about this song here
    10. किस्मत में ख़ुशी का ग़म नहीं - सैय्यां (१९५१)
    11. तुम्हे दिल दिया ये क्या किया मैंने - सैय्यां (१९५१)
    12. वो तो चले गए ऐ दिल - संगदिल (१९५२)
    13. दिल में समां गए सजन  - संगदिल (१९५२) - सहगायक तलत महमूद
    14. तेरा दर्द दिल में बसा लिया - रुखसाना (१९५५)
Sajjad used to say "सिर्फ लता और नूरजहाँ गाती है, बाकी सब रोती है" meaning only Lata and Noorjehan sing well, everyone else only cry. However, if you go through the following list of songs sung by singers other than Lata and Noorjehan, you will be surprised!

गाणे

गायक

चित्रपट

ये कैसी अज़ब दास्ताँ हो गयी है

सुरैय्या

रुस्तम सोहराब (१९६३)

टूट गया हाए टूट गया

राजकुमारीशमशाद बेगम अणि मोहम्मद रफ़ी

मग़रूर (१९५०)

तेरी नज़र में मैं रहूँ

सुरेंद्र-सुरैय्या

१८५७ (१९४६)

मैं हूँ भोली सी नार

सुलोचना कदम

रुपलेखा (१९४९)

मेरी जान मोहब्बत करो चुपके

शमशाद बेग़म

सैय्यां (१९५१)

हुस्नवालों से कभी आँख मिलाया

मुबारक बेग़म

रुखसाना (१९५५)

तेरे जहाँ से चल दिए

किशोरकुमार-आशा भोसले

रुखसाना (१९५५)

अब देर हो गयी वल्लाह

आशा भोसले

रुस्तम सोहराब (१९६३)


After the grand success of "Rustam Sohrab" in 1963, Sajjad once again went into oblivion for 10 years. In 1973 when he returned with "Mera Shikar" and "Aakhri Sajda" in 1977, he was merely a shadow of himself! 😢 These turned out to be his last films. From 1977 until his death on 21st July 1995, Sajjad lived a lonely life, far away from the glamour of the Film industry. No one remembered him. Well known composer Khayyam and singer Pankaj Udhas were the only ones to attend his funeral. 

Sajjad had five sons viz. Mustafa, Noor, Nasir, Yusuf and Abdul. All play Mandolin. Mustafa, Noor and Nasir are Top Grade artists and accompany many well known artists on Mandolin. 

Today, I am going to present 8 of Sajjad's songs - 4 in this part and 4 in the next one.

1) Badnaam Mohabbat Kau Karen - Noorjehan - Dost (1944) - Lyrics Shams Lakhnavi

"Dost" was Sajjad's first movie as an independent Music Director. And he had a Superstar in the form of Noorjehan in front of him; but Sajjad did not deter and composed such fine songs that Noorjehan terms this particular song as one of best songs. Listen to the coaxing nature of the word "Badnaam" and very effective pause after that. 

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

2) Gham-e-Aashiyana Satayega Kab Tak - Suraiyya - 1857 (1946) - Lyrics Mohan Singh

1857 was the biggest commercially successful movie in 1946 and major credit went to Sajjad's compositions. In this song, you will find the young Suraiyya expressing her worries. The last stranza is composed in higher pitch than the earlier ones, reminding us of the legendary composer Sudhir Phadke who had similar style of composing last stranzas in higher pitch.

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

Photo Courtesy
Lyricsbogie.com
3) Loota Dil Mera Haaye Aabaad Hokar - Lata Mangeshkar - Hulchal (1951) - Lyricist Khumar Barabankwi

Sajjad composed only 3 songs for the film and let it due to non payment by Producers. The unique point about this song is its prelude where Lata sings without any background music and excellent use of Violin. The high point of the song is the first line of the second stranza which is very different than the first lines of other stranzas.

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 



4) Khayalon Mein Tum Ho Nazaron Mein Tum Ho - Saiyan (1951) - Lyricist Hasrat Jaipuri

This is an unbelievable Dream song from orchestration point of view. Sajjad, for a change, has composed this song to portray the happy mood. The background music before the song begins is extremely pleasing. The film features Ajit (famous for his villian roles) in the lead male role, while the ever beautiful Madhubala plays the lead female role. Sajjan (Betal from famous TV Serial Vikram Aur Betal) plays the supporting actor role. The entire picturisation of this song enhances its beauty.

Please see the video in the article above. 
(I am really sorry but there is no provision in Blogger.com to have a Bookmark or link within the same article) 

Friends, I hope you liked the blog. While searching the Net for material on Sajjad, I found following 2 blogs to be extremely infomative and well written. Plese do read.



I had the fortune of meeting Sajjad face-to-face. Please read about it and rest of the 4 songs in Part-2 of this blog at Sajjad Hussain - The Inimitable Maestro - Part 2.

6 comments:

  1. अतिशय अभ्यासपूर्ण लेखन. आपल्या व्यासंगास अभिवादन. धन्यवाद आणि अशा अजून अनेक लेखांची अपेक्षेने वाट पहावी असा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद देवेंद्र!

      Delete
  2. Replies
    1. Thanks Tarun! So good to hear from you after a long time!

      Delete
  3. Very well written Dhananjay ji. I am lucky to have been taken to your link while searching Sajjad Hussain compositions. Looking for more....

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.