Saturday, 21 August 2021

Hemant Kumar - बंगाली माटी का मिश्टी सुरीला मानुष

Namaskaar Friends,

I am really very happy to present my new blog to you during the horrible times of the deadly pandemic. Hope this blog will keep you away, for some time though, from your pains and give you a chance to explore the pleasure through music.

Today, I am going to present the work of one of the most talented composers and singers of the Hindi and Bengali film industry - Hemanta Kumar Mukhopadhyay aka Hemant Kumar.

English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feelings. Thanks.


"हेमंतकुमार यांचा आवाज ऐकला की जणू एखादा साधू मंदिरात बसून गाणं गातोय असं वाटतं" - लता मंगेशकर 

"जर परमेश्वर कधी गायला असता तर तो नक्कीच हेमंतकुमार यांच्या आवाजात गायला असता" - सलील चौधरी

लताजी आणि संगीतकार सलील चौधरी यांच्या हेमंतकुमार यांच्याविषयीच्या वरील उद्गारांनी आपल्याला हेमंतकुमार यांच्या महान प्रतिभेची थोडीशी ओळख होते.

१६ जून १९२० रोजी हेमंतकुमार यांचा जन्म वाराणसी (बनारस) येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) गोविंद चंद्र बंदोपाध्याय हे व्यवसायाने डॉक्टर होते. कालिदास मुखर्जी आणि किरणबाला देवी यांचा हा सुपुत्र. जन्मानंतर काही वर्षातच हेमंतकुमार यांचे कुटुंबीय त्यांच्या वाडवडिलांच्या घरी म्हणजे दक्षिण २४ परगण्यातील बहरू या गावी गेले. तिथेच हेमंतकुमार यांचे बालपण गेले. त्यांच्या आई - किरणबाला देवी - यांना कविता लिहिण्याची आणि त्यांना चाली लावण्याची सवय होती. हाच गुण पुढे हेमंतकुमार यांच्यात आला असावा.  

हेमंतदांचे सुरुवातीचे शिक्षण बहरू माध्यमिक विद्यालयात झाले. १९२८ साली त्यांचे सर्व कुटुंब कोलकाता येथे आले. कोलकात्यामध्ये "जत्रा गान" आणि शाहिरांची गाणी हेमंतदांच्या कानावर पडायची, व ती त्यांना पाठही व्हायची. इथेच त्यांना काही मित्र मिळाले. या मित्रांना हेमंतदांचे गाणे खूप आवडायचे, त्यातीलच एक होते सुभाष मुखर्जी. सुभाष हे कवी होते. त्यांनीच हेमंतदांना Indian Broadcasting Corporation (IBC - याचे नाव नंतर All India Radio  असे झाले) मध्ये नेऊन तेथे गाण्याची संधी मिळवून दिली. हेमंतदांनी तिथे सुभाषने रचलेली दोन गाणी स्वतः चाल लावून म्हटली, ते त्यांचे पहिले जाहीर गाणे असावे. जेमतेम पंधरा वर्षाच्या दोन मुलांनी हा चमत्कार केला होता! पुढील वर्षी IBC ने हेमंतदांना अजून २ गाणी गाण्यासाठी बोलावले. आता लोक त्यांना हळूहळू ओळखू लागले होते आणि काही जण तर त्यांना "छोटा पंकज" (त्यावेळचे बंगालमधील सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक पंकज मलिक) म्हणूनही संबोधित करू लागले होते.

१९३७ साली वडिलांच्या इच्छेप्रमाणे हेमंतदां मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांनी जादवपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात Mechanical Engineering ला प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिकत असतानाच हेमंतदांच्या वडिलांचे सहकारी - शांती बोस - यांनी हेमंतदांची ओळख प्रसिद्ध संगीतकार आणि रेडिओ कलाकार शैलेश दत्तागुप्तां यांच्याशी करून दिली. शैलेश हे कोलंबिया कंपनी आणि HMV कंपनीमध्ये संगीत विषय शिकवायचे. शैलेश दत्तागुप्ता यांना कलाकारांची चांगली पारख होती. त्यांना हेमंतदांचा आवाज एवढा आवडला की त्यांनी २ गाणी हेमंतदांकडून १० दिवस सराव करून रेकॉर्ड करून घेतली. "जानिते जोदी गो तुमी" आणि "बॉलो गो बॉलो मोरे" ही ती दोन गाणी. तो महिना होता डिसेंबर १९३७, हेमंतदा होते अवघे १७ वर्षाचे. शैलेशबाबूंच्या मदतीने हेमंतदांची दुसरी रेकॉर्ड १९३८ मध्ये प्रसिद्ध झाली. या दोन्ही रेकॉर्ड्सचे मिळून त्यांना एकूण ४० रुपये (त्या काळचे) मानधन मिळाले, ज्यातून त्यांच्या वडिलांनी त्यांना बाजाची पेटी घेतली. शैलेशबाबूंनी हेमंतदांची ओळख All India Radio च्या बानी कुमार यांच्याशी करून दिली. बानी कुमारांनी हेमंतदांना पुन्हा एकदा रेडिओवर गायची संधी दिली. इथून पुढे हेमंतदांनी आपला संपूर्ण वेळ संगीताला द्यायचे ठरवले. शैलेशबाबूंनी हेमंतदांना रवींद्र संगीतही शिकवले. फणी भूषण बॅनर्जी यांच्याकडून हेमंतदांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. शैलेशबाबूंनी हेमंतदांना रविंद्र संगीत शिकवले. तर बानी कुमार यांनी त्यांना दरवर्षी होणाऱ्या "महिषासुरमर्दिनी" कार्यक्रमात सोलो गाणे गायची संधी दिली, या निमित्ताने हेमंतदांची प्रसिद्ध संगीतकार पंकज मलिक यांच्याबरोबरची ओळख वाढली. जवळपास १९५१ सालापर्यंत हेमंतदा "महिषासुरमर्दिनी" या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा भाग होते. १९४२ मध्ये त्यांनी गायलेली रविंद्र संगीतातील गाणी All India Radio (AIR) वरून प्रथमच प्रकाशित झाली आणि ते पुढे रविंद्र संगीताचे नियमित कार्यक्रम करू लागले.

हेमंतकुमारांची संपूर्ण कारकीर्द एक गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माता या तिन्ही दृष्टिकोनातून बघावी लागते.

१९४० मध्ये "निमाई शोनणाषी" (Nimai Sanyas) या बंगाली चित्रपटात हेमंतदांना प्रथम गाण्याची संधी मिळाली. १९४४ मध्ये आणखीन एका बंगाली चित्रपटासाठी ("प्रियो बानधोबि" (Priya Bandhabi)) हेमंतदांनी आपला आवाज दिला, या चित्रपटात त्यांनी रवींद्र संगीत गायले. याच वर्षी त्यांनी स्वतः संगीत दिलेली दोन गैर-फिल्मी गाणी गायली - "कोथा कोयो नाको, शुधू शोनो" आणि "आमार बिरोहे आकाषे प्रियो" ही ती दोन गीते होत. हिंदी चित्रपटात त्यांना गायक म्हणून पहिली संधी पं. अमरनाथ यांनी "इरादा" या चित्रपटात १९४४ साली दिली. "आराम से जो राते काटे" आणि "फिर मोहब्बत के पयाम" ही दोन गाणी हेमंतदांची हिंदी चित्रपटातील सुरुवातीची गाणी होती.

१९४१ ते १९५० या दशकात हेमंतदांनी जवळपास ७० बंगाली आणि ४० हिंदी गैरफिल्मी गाणी रेकॉर्ड केली, त्यातील २० बंगाली आणि ७ हिंदी गाण्यांना त्यांनी स्वतः संगीत दिले होते. त्यांच्या बऱ्याच हिंदी गाण्यांचे संगीत त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार कमल दासगुप्ता यांनी दिले होते. १९४७ साली आलेला "अभियात्रि" हा बंगाली चित्रपट हेमंतदांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट.

Photo Courtesy : YouTube

१९४५ च्या सुमारास हेमंतदा Indian People's Theatre Association (IPTA) या संस्थेचे सभासद झाले. इथेच त्यांची ओळख सलील चौधरी यांच्याशी झाली आणि सुरुवात झाली एका प्रदीर्घ संगीतकार जोडीची. १९४९ मध्ये सलीलदांनी लिहिलेले व संगीत दिलेले "गानेर बोधु" हे गैरफिल्मी गीत हेमंतदांनी गायले. या गाण्याने सलील चौधरी व हेमंतकुमार यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली. या गाण्याची हिंदी आवृत्ती "इक भोली भाली गाँव की रानी" १९५१ साली रेकॉर्ड झाली. त्यानंतर अनेक वर्षे या दोघांनी बंगालीमध्ये अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. एका प्रतिभावान संगीतकाराने आपली उत्तमोत्तम गाणी दुसऱ्या तितक्याच प्रतिभावान संगीतकार-गायकाकडून गाऊन घ्यायची यात दोघांची अतूट मैत्री, एकमेकांबद्दलचा आदर आणि मनाचा मोठेपणा दिसतो, हे चित्र आजकाल दुर्मिळ झाले आहे. या दोघांची काही अप्रतिम गाणी खालील लिंकवर ऐकता येतील, जरी भाषा समजली नाही तरी ही गाणी आवर्जून ऐका, या गाण्यांमध्ये तुम्हाला हेमंतदांची विविध रूपे ऐकायला मिळतील:

१) हेमंतकुमार-सलील चौधरी - १

२) हेमंतकुमार-सलील चौधरी - २


याच दरम्यान १९४३ च्या सुमारास All India Radio (AIR) मध्ये काम करत असताना हेमंतदांची ओळख बेला मुखर्जी यांच्याशी झाली. बेला स्वतः एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी बंगाली आणि हिंदीमध्ये अनेक गाणी गायली आहेत. दोघांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन ७ डिसेंबर १९४५ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. १९४७ साली दोघांच्या पहिल्या अपत्याचा (जयंत मुखर्जी) - जन्म झाला. हेमंतकुमार आणि बेला मुखर्जी या दोघांचे "सहारा" या १९५८ सालच्या चित्रपटातील एक हिंदी द्वंद्वगीत - हर दुखडा सहनेवाली

हेमंतकुमार यांचे हिंदी चित्रपटात संगीतकार म्हणून पदार्पण तसे उशीराच म्हणजे १९५२ साली आलेल्या "आनंदमठ" या चित्रपटाने झाले. त्यात हेमंतदांनी एकूण ९ गाणी संगीतबद्ध केली. त्यातील "वंदे मातरम" हे लताने गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. हेमंतदांनी या गाण्याच्या बंदिशीत जोश व उत्साह पुरेपूर घालून हे गाणे अद्भुत करून टाकले. या गाण्याचा एक भाग हेमंतदांनी स्वतः कोरसबरोबर गायला. बंदिशीतील अद्भुत आवेगामुळे हे समरगीत उल्लेखनीय बनले. असं म्हणतात की दिग्दर्शक हेमेन बोस यांनी या गाण्याचे २० टेक करायला लावले, कारण एकच - गाण्याचा ताल हा चित्रपटातील घोड्याच्या पावलांच्या तालाशी जुळायला हवा म्हणून! 

"आनंदमठ" च्या यशानंतर हेमंतदांसाठी हिंदी चित्रपटातील यशाचा मार्ग सुकर झाला. १९५२ ते १९८९ पर्यंत जवळपास ७५ हिंदी चित्रपटातील ४५०हून अधिक गाण्यांना हेमंतदांनी संगीत दिले. त्यातील ११ चित्रपटात ९ पेक्षा अधिक गाणी होती. या ११ चित्रपटातील गाण्यांची संख्या ११९ होते. म्हणजे जवळपास २५% गाणी ही या ११ चित्रपटात आहेत! 

Courtesy: Lyricsbogie
जागृती (१९५४), नागिन (१९५४), शर्त (१९५४), मिस मेरी (१९५७) या चित्रपटांनी त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला. "नागिन" चे संगीत प्रचंड लोकप्रिय ठरले. जवळपास २ वर्षे "नागिन" ची गाणी ही चित्रपट गीतांच्या विविध कार्यक्रमात पहिल्या नंबरवर होती. याच चित्रपटाने हेमंतकुमार यांना प्रतिष्ठित फिल्मफेअरचा १९५५ सालचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळवून दिला. १९६० च्या दशकातले "साहिब, बीबी और गुलाम" (१९६२) आणि "अनुपमा" (१९६६) या दोन चित्रपटातील गाणीही अतिशय लोकप्रिय झाली. 


१९६० च्या दशकात हेमंतकुमार यांनी त्यांच्या गीतांजली प्रॉडक्शन्स तर्फे काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. उ.दा. बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), फरार (१९६५), बीवी और मकान (१९६६), राहगीर (१९६९) आणि खामोशी (१९७०). यातील "बीस साल बाद" आणि "खामोशी" बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी ठरले. या सर्व चित्रपटांना स्वतः हेमंतकुमार यांचेच संगीत होते. "कोहरा", "बीस साल बाद" आणि "खामोशी" यातील गाणी खूप गाजली.


हेमंतदांचे संगीतकार म्हणून एक वैशिष्ट्य असे की त्यांनी जवळपास ५१ गायकांकडून आपली गाणी गाऊन घेतली. अगदी सिनेसंगीताच्या दुसऱ्या पिढीतील शमशाद बेगम, लता, आशा, गीता यांच्यापासून ते अमित कुमार, सुरेश वाडकर, येसूदास, उषा उत्थुप आणि शेरॉन प्रभाकर यांच्यापर्यंत. या यादीत सी. रामचंद्र, गुलाम मोहम्मद आणि रवी यांच्यासारखे संगीतकार-गायकही होते! गायिकांमध्ये लता १११, आशा ५३ व गीता दत्त यांनी १७ गाणी हेमंतदांकडे गायली आहेत. रफीसाहेब यांनी १७ तर किशोर कुमार यांनी १४ गाणी गायली आहेत. आश्चर्य म्हणजे तलत मेहमूद यांना अवघे १ सोलो गाणे व ३ गाणी इतर गायकांबरोबर हेमंतदांनी दिली आहेत, तर मुकेश यांना अवघी ४ गाणी ती पण इतर गायकांबरोबर गायची संधी मिळाली आहे. तलत व मुकेश या दोघांपेक्षा आपण स्वतःच आपली गाणी गावीत असे हेमंतदांमधल्या संगीतकाराला वाटले असल्यास नवल नाही!

हेमंतदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली इतर गायकांनी गायलेली काही हिंदी गाणी:

१) वंदे मातरम - आनंदमठ (१९५२) - लता मंगेशकर - गीतकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय

२) तेरी याद में जलकर देख लिया - नागिन (१९५४) - लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण

३) सखी री सुन बोले पपीहा उस पार - मिस मेरी (१९५७) - लता मंगेशकर - आशा भोसले - गीतकार राजेंद्र कृष्ण  (लता-आशाजींच्या काही मोजक्या द्वंद्वगीतांपैकी एक)

४) खोयी खोयी अँखियाँ नींद बिना - चाँद (१९५९) - लता मंगेशकर - गीतकार शैलेन्द्र

५) कश्ती का ख़ामोश सफर है - गर्ल फ्रेंड (१९६१) - किशोर कुमार - सुधा मल्होत्रा - गीतकार साहिर लुधियानवी MUST WATCH 

६) ना जाओ सैय्यां छुडाके बैयाँ - साहिब बीबी और ग़ुलाम (१९६२) - गीता दत्त - गीतकार शकील बदायुनी

७) मेरी बात रही मेरे मन में - साहिब बीबी और ग़ुलाम (१९६२) - आशा भोसले - गीतकार शकील बदायुनी

८) ओ बेक़रार दिल हो चुका है - कोहरा (१९६४) - लता मंगेशकर - गीतकार कैफ़ी आज़मी

९) सारा मोरा कजरा चुराया तूने - दो दिल (१९६५) - मोहम्मद रफ़ी - आरती मुखर्जी - गीतकार कैफ़ी आज़मी

१०) कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं - अनुपमा (१९६६) - लता मंगेशकर - गीतकार कैफ़ी आज़मी


एक गायक म्हणून हेमंतदांचे स्वतःचे असे एक वेगळेपण होते. घनगंभीर, खर्जातला आवाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या आवाजात एखादे भजन किंवा दर्दभरे गीत जास्त भावायचे. त्यांच्या आवाजाला मर्यादा होत्या, त्यांची उडत्या चालीची किंवा वेगळ्या ढंगांची गाणी काही अपवाद वगळता जवळपास नाहीतच. बंगालीमधे मात्र त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायल्याचे दिसते.  

हेमंतदांनी स्वतःच्याच संगीतात जवळपास १३० गाणी गायली आहेत, त्यातील काही सर्वोत्तम गाणी:

१) ओ ज़िन्दगी के देनेवाले ज़िन्दगी के लेनेवाले - नागिन (१९५४) - गीतकार राजेंद्र कृष्ण 

२) ना ये चाँद होगा ना तारे रहेंगे - शर्त (१९५४) - गीतकार एस. एच. बिहारी 

३) चली गोरी पी के मिलन को चली - एक ही रास्ता (१९५६) गीतकार मजरूह सुलतानपुरी

४) राह बनी खुद मंज़िल - कोहरा (१९६४) - गीतकार कैफ़ी आज़मी 

५) तुम पुकार लो, तुम्हारा इंतज़ार है - ख़ामोशी (१९७०) - गीतकार गुलज़ार 


Hemant da, SD, Salil da and RD
4 Doyens of Bengali Films
Image Courtesy: National Herald
हेमंतदांचे आणखी एक विशेष म्हणजे हा एकमेव संगीतकार-गायक आहे ज्यांनी ३५ संगीतकारांकडे १०० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत असलेल्या संगीतकार-गायक यांची नावे पाहिली उ.दा. सचिनदेव बर्मन, मदन मोहन, सी. रामचंद्र, राहुलदेव बर्मन, इ., तर असे लक्षात येईल की या सर्वांनी प्रामुख्याने स्वतःचीच गाणी गायली आहेत. पण जेंव्हा एखादे वेगळे गाणे केले तेंव्हा या संगीतकारांना गायक म्हणून हेमंतकुमार यांनाच घ्यावेसे वाटले, यावरून एक गायक म्हणून ते किती मोठे होते हे समजते. सचिनदेव बर्मन (१० गाणी) व सी. रामचंद्र (९ गाणी) यांनी हेमंतकुमार यांच्या आवाजाचा सर्वाधिक उपयोग करून घेतला आहे.


हेमंतदांची इतर संगीतकाराकडे गायलेली काही गाणी:

१) ये रात ये चाँदनी फिर कहाँ - जाल (१९५२) - सचिनदेव बर्मन - गीतकार साहिर लुधियानवी

२) याद किया दिल ने कहाँ हो तुम - पतिता (१९५३) - सहगायिका लता मंगेशकर - शंकर जयकिशन - गीतकार हसरत जयपुरी

३) ज़मीं चल रही है आसमाँ चल रहा है - पहली झलक (१९५४) - सी. रामचंद्र - गीतकार राजेंद्र कृष्ण 

४) चन्दन का पलना रेशम की डोरी - शबाब (१९५४)  - सहगायिका लता मंगेशकर - नौशाद - गीतकार शकील बदायुनी

५) मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबाँ - आब-ए-हयात (१९५५) - सरदार मलिक - गीतकार हसरत जयपुरी

६) कह रही है ज़िन्दगी जी सके तो जी - जलती निशानी (१९५७) - अनिल विश्वास - गीतकार क़मर जलालाबादी

७) गंगा आये कहाँ से गंगा जाए कहाँ रे - काबुलीवाला (१९६१) - सलील चौधुरी - गीतकार गुलज़ार  (Rare Live Recording from BBC)

 ८) राही तू रुक मत जाना - दूर गगन की छांव में (१९६४) - संगीतकार किशोरकुमार - गीतकार शैलेन्द्र  (अहो आश्चर्यम! संगीतकार किशोरकुमार आणि गायक हेमंतकुमार!!)


हेमंतदांचे एक गायक आणि संगीतकार म्हणून बंगाली चित्रपटातले काम खूप मोठे आहे - संख्येने आणि गुणवत्तेनेही. १९४० ते १९८८ या ४१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हेमंतदांनी एकूण १४६ बंगाली चित्रपटांना संगीत दिले व त्यातील अंदाजे ७१३ गाण्यांपैकी ३०० गाणी सोलो अथवा द्वंद्वगीते म्हणून गायिली. तसेच इतर संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली एकूण अंदाजे २७५ गीत त्यांनी गायली.

हेमंतकुमार यांची बंगालीतील काही गाजलेली गाणी:

1) Ei Raat Tomar Amar - Deep Jele Jai (1959) - MD and Singer Hemant Kumar - Lyricist Gauriprasanna Muzumder

2) O Nadir Re Ekti Kothay - Neel Akasher Neechey (1959) - MD and Singer Hemant Kumar - Lyricist Gauriprasanna Muzumder 

3) Tumi Je Amar - Harano Sur (1957) - Singer Geeta Dutt - Lyricist Gauriprasanna Muzumder    MUST WATCH for Geeta Dutt's wonderful rendition and for Suchitra Sen

4) Ashar Sraban Mane Na Tu Mon - Monihaar (1966) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt - (Flawless Bengali Rendition by the one and only Lata)

5) Ek Dinete Hoini Ami Tomader Ei Hemanta - Nakal Sona (1973) - MD Nachiketa Ghosh - Lyricist Gauriprasanna Muzumder    (Rare Screen Appearance by Hemant Kumar, the actual song starts at 03:23)

6) Choncholo Mon Anmona Hoy - Adwitiya (1968) - Singer Lata Mangeshkar and Hemant Kumar - Lyricist Mukul Dutt

7) Ami Pathbhola Ek Pathik - Mon Niye (1967) - Writer and Composer Rabindranath Tagore - Singers Hemant Kumar and Asha Bhosale

8) Bose achi potho cheye - ShapMochan (1955) - Lyricist Bimal Chandra Ghosh  (the film that helped Hemantda regain his position as Music Director for Bengali films)

9) Ei Meghla Dine Ekla - Shesh Parayanto (1960) - Lyricist Gauriprasanna Mazumder

10) Ai Path Jodi Shes Na Hoi - Saptapadi (1961) - Singers Sandhya Mukherjee and Hemant Kumar   (one of the 100s of Uttam Kumar & Suchitra Sen songs - one of the most popular Bengali duets)


हेमंतकुमारांबद्दल इंटरनेटवर माहिती शोधत असताना गेल्या वर्षी Times Of India मध्ये आलेला R. Rangaraj यांचा एक लेख नजरेत आला. त्याप्रमाणे हिंदी आणि बंगाली चित्रपटांसाठी काम करत असताना हेमंतदांना तामिळ चित्रपटांसाठीसुद्धा संगीतकार म्हणून काम करायची संधी मिळाली. १९५४ साली हिंदीतील "सम्राट" हा चित्रपट जेंव्हा तामिळ भाषेत बनवला गेला ("Kaadhal Parisu") तेंव्हा त्याचे संगीतही हेमंतदांनीच दिले, या चित्रपटात एकूण ६ गाणी होती.  १९५५ साली तेलुगू आणि तामिळमध्ये आलेला "Missiamma" हा S. Rajeshwarao यांचे संगीत असलेला चित्रपट जेंव्हा १९५७ साली "मिस मेरी" नावाने हिंदीत बनला, तेंव्हा त्याचे संगीतकार म्हणून हेमंतदांची निवड झाली. हेमंतदांनी "वृंदावन का कृष्ण कन्हैय्या" या गाण्याची चाल मूळ तामिळ चित्रपटात जशी होती तशीच ठेवली, पण इतर सर्व गाण्यांना नवीन चाली दिल्या. असं म्हणतात की तामिळ मधले सुप्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांनी सुद्धा हेमंतकुमारांच्या  "कहीं दीप जले कहीं दिल" या गाण्यावरून "Vaazhve Maayamaa" या गाण्याची चाल बांधली ती १९७७ सालच्या तामिळ "गायत्री" या चित्रपटसाठी. एकूण २० तामिळ गाण्यांना हेमंतदांनी चाली लावल्या आहेत.

१९५२ पासून १९७० पर्यंत हेमंतदा बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांसाठी संगीत देत होते, गात होते. त्याशिवाय गैरफिल्मी गीतेही रेकॉर्ड होत होती. हे सर्व साधण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. खालील माहिती मुख्यतः https://www.hindigeetmala.net/ आणि https://www.songsofyore.com/category/singers/hemant-kumar/ या दोन संकेतस्थळांवरून घेतली आहे. हेमंतदांच्या सर्व गाण्यांची एकसंध यादी कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे खालील माहिती पूर्णतः अचूक नाही. पण खालील माहितीवरून नजर फिरवली तरी हेमंतदांच्या अफाट कामाचा आवाका लक्षात येतो आणि थक्क व्हायला होते. 



१९८० नंतर हेमंतदांनी त्यांचे काम हळू हळू कमी केले. १९७० मध्ये त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार, तसेच १९८७ साली पद्मभूषण पुरस्कारही देऊ केला होता, हे दोन्ही पुरस्कार हेमंतदांनी अतिशय नम्रपणे नाकारले. १९७१ मध्ये हेमंतदांना सर्वोत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांच्या बंगाली "निमंत्रण" चित्रपटातील गाण्याबद्दल मिळाला होता. त्याशिवाय १९८६ साली संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. सप्टेंबर १९८९ मध्ये बांगला देशातील ढाका येथे एका मैफलीला जाऊन परत आल्यानंतर हेमंतदांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने एक प्रतिभाशाली संगीतकार-गायक आपण गमावला, पण त्यांची गाणी आजही अनेक रसिकांना त्यांची आठवण करून देतात, हेच त्यांच्या अफाट कामाचे यश आहे असे म्हणावेसे वाटते. गेल्याच वर्षी हेमंतदांची जन्मशताब्दी झाली. या गुणी कलाकाराला आपण आदरांजली वाहू या. धन्यवाद.

हेमंतदांचे काम एवढे प्रचंड आहे की त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा एका छोट्या लेखात घेणे अशक्य आहे.

आज मी हेमंतदांचं १ हिंदी आणि १ बंगाली गाणं प्रस्तुत करणार आहे.

१) हवाओं पे लिख दो हवाओं के नाम - चित्रपट "दो दुनी चार" (१९७०) - गायक किशोरकुमार - गीतकार गुलज़ार 

गाण्याची सुरुवातच मुळी जंगलात वाहणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाने होते, नंतर आपल्याला दिसतो तो पांढरे शुभ्र धोतर आणि झब्बा घातलेला किशोरकुमार, आणि पाठोपाठ येते ते त्याचे गुणगुणणे. जंगलात फिरायला गेल्यावर आपणही एकदम मोठ्या आवाजात गाणे म्हणायला सुरुवात करत नाही, तर आधी गुणगुणतो, व नंतर मोकळ्या आवाजात गायला लागतो. माणसाची ही सवय हेमंतदांनी त्यांच्या संगीतात किती अचूक पकडलीये नाही? सतार, बासरी, तालवाद्ये आणि किशोरकुमारचा भारदस्त आवाज यांनी हे गाणं प्रचंड जिवंत झाले आहे. बघा तर.

Video Courtesy: YouTube 



२) के जेनो गोडेके चे आमाय - चित्रपट "मोनीहार" (१९६६) - गायक हेमंतकुमार आणि लता मंगेशकर - गीतकार मुकुल दत्त

१९६६ मध्ये आलेला "मोनीहार" हा बंगाली चित्रपट Multi-Starrer चित्रपट होता. सौमित्र चॅटर्जी, विश्वजीत, संध्या रॉय, पहाडी संन्याल असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात होते. या चित्रपटातील बहुतेक सर्व गाणी अप्रतिम आहेत. यातील एक सुंदर गीत खाली सादर करत आहे. या गाण्याची दोन versions आहेत - Male Version मध्ये हेमंतकुमार यांना लताजींनी साथ दिली आहे, तर Female Version मध्ये लताजींना हेमंतदांनी साथ केली आहे. Male Version मध्ये तंबोरा आणि तबला याशिवाय एकही वाद्य नसावे असे वाटते. शिवाय कडव्यांच्या मध्येही कुठलाही संगीत तुकडा नाही. Female Version मध्ये तंबोरा आणि तबल्याच्या सुंदर वाजलेली सारंगी आहे. या दोन्ही Versions मध्ये वाद्ये ही आवाजावर हावी होत नाहीत हे या गाण्यांचे वैशिष्ट्य. विविध पट्ट्यांमधील अप्रतिम अशा ताना व ठेहराव यांनी ह्या दोन्ही गाण्यांचे सौंदर्य अधिकच वाढलेले आहे. तुम्हालाही आवडेल अशी आशा आहे.

Male Version with Subtitles

Video Courtesy: YouTube



Female Version

Video Courtesy: YouTube



टीप:
हेमंतकुमार यांचे हिंदी आणि बंगाली चित्रपटातील काम संख्येने अफाट आहे. त्यांची सर्वच्या सर्व गाणी एके ठिकाणी मिळत नाहीत. त्यामुळे विविध स्रोतातून जी गाणी मिळाली त्या आधारावर लेखातील आकडेवारी दिलेली आहे. त्यामुळे ती आकडेवारी पूर्णतः अचूक नाही. चूक-भूल द्यावी घ्यावी.

संदर्भ:
या लिंकमध्ये हेमंतकुमार यांच्यावर २ अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख N. Venkataraman यांनी लिहिलेले आहेत, त्या दोन्ही लेखांचा मला हा ब्लॉग लिहिताना खूप उपयोग झाला. आपण जरूर वाचा. 


Friends,

"When I listen to Hemant Kumar, I feel that his voice resembles a monk singing in a temple" - Lata Mangeshkar

"If God would have liked to sing, he would have sung in Hemant Kumar's voice" - Salil Chowdhury

The above words of appreciation from the greats like Lata and Salil da give us a glimpse of the immense talent of Singer-Composer-Producer Hemant Kumar.

Hemant Kumar alias Hemantda was born at Varanasi on 16th June 1920 at his maternal home. His grandfather (from his mother's side) was a Doctor by profession. He was born to Kalidas Mukherjee and Kiranbala Devi. Within a few years of Hemantda's birth, his family shifted to their ancestral home at Baharu in 24 South Paragana. Hemantda spent most of his childhood days there. His mother - Kiranbala Devi - was fond of writing poems and composing them. Hemantda might have picked up his musical skills from his mother. 

Hemantda studied at a school in Baharu. In 1928, his family shifted to Kolkata. He got to hear Jatra Gaan and songs of traveling minstrels. He used to quickly remember the tunes and reproduce them. He soon developed a friend circle, his friends used to like Hemanta's voice and singing. One such friend was Subhas Mukherjee. Subhas was a budding poet. He managed to arrange Hemanta's audition at Indian Broadcasting Corporation, which later became All India Radio (AIR). Upon getting a chance at AIR, Hemanta sang 2 of the songs written by his friend Subhas. Both were in their tender age of 15, and this was a rare feat achieved by them. Next year, AIR called Hemanta once again and recorded 2 songs. Slowly but surely, people started taking note of this new kid on the horizon and used to call him Chhota Pankaj (named after the famous composer-singer of those times Pankaj Mullick).

In 1937, Hemanta passed the matriculation exam as per the wishes of his father and got admission into Jadavpur University for Mechanical Engineering. His father's friend - Shanti Bose - introduced Hemanta to another famous composer and Radio star - Sailesh Duttagupta. Sailesh used to teach Music at Columbia and HMV companies, thus he had the skill of identifying true talent. Sailesh liked Hemanta's voice so much that he recorded 2 songs after rehearsing them for about 10 days. "Jaanite Jodi Go Tumi" and "Bolo Go Bolo More" were those two songs. That was December 1937 and Hemanta was just 17 years old! With the help of Sailesh da, Hemanta could record one more record in 1938. He got Rs. 40/- as his payment for recording 2 records, from which his father purchased a Harmonium for Hemanta. Through Sailesh, Hemanta got to know Bani Kumar. Bani gave another opportunity to Hemanta to sing for AIR. Sailesh taught Hemanta the famous Rabindra Sangeet, while Bhushan Banerjee gave him initial teachings in Hindustani Classical Music. Hemanta recorded some songs in Rabindra Sangeet for AIR, thus started his long association with Rabindra Sangeet.

Hemantda not only was a great singer, but also a great Composer and a Producer.

Hemanta got his first break as a singer in Bengali film through a 1940 film viz. "Nimai Sanyas" and another one "Priya Bandhobi" in 1944 in which he rendered Rabindra Sangeet. The same year, Hemantda recorded 2 non-film songs (NFS) viz. "Kotha Koyo Nako, Shudhu Shono" and "Aamar Birohe Aakashe Priya". Hemanta got to sing for Hindi films first time in the 1944 film "Irada" music composed by Pt. Amarnath. "Aaram Se Jo Raate Kaate" and "Phir Mohabbat Ke Payaam" were his first 2 songs for Hindi films.

Between 1941 and 1950, Hemantada recorded approx. 70 Bengali and 40 Hindi Non-Film songs, out of which he composed music for 20 Bengali and 7 Hindi songs. The majority of rest of the Hemanta's songs were composed by Kamal Dasgupta. 1947 saw Hemant Kumar being introduced to the Bengali Film Industry as a Music Composer with the film "Abhijatri". 

In 1945, Hemantda became a member of the Indian People's Theatre Association (IPTA). At IPTA, he got to know Salil Chowdhury - another famous and genius musician. Thus began a long-lasting association of Hemant da and Salil da. The Non-Film song "Gaaner Bodhu" sung by Hemanta and composed by Salil da in 1949 became an instant hit and people started recognizing the duo. The same tune was re-used in its Hindi version "Ek Bholi Bhali Gaaon Ki Raani". From thereon, the duo of Hemant da and Salil da has given the audience a treasure of a number of songs, which shows their friendship and respect for each other. You can listen to some of their best songs in the following 2 links. It is worth spending time and listen to these songs even though you may not understand Bengali.



While working for AIR, in 1943, Hemanta got to know Bela Mukherjee - a talented singer herself. Bela has sung no. of songs both in Bengali and Hindi films. Later in December 1945, Hemanta married Bela. Their first child - son Jayanta - was born in 1947. Both Hemanta and Bela have few duets to their credit. One such song is from the 1958 Hindi film "Sahara" viz. "Har Dukhada Sehnewali". 


Hemantda's entry into Hindi films was in 1952, almost 15 years after he had recorded his first song. Hemen Bose was directing the film "Anand Math" based on the great Bankimchandra's novel with the same name. He invited Hemanta to compose music for the film and Hemanta did not disappoint. Hemantda composed a total of 9 songs for this film - out of which 3 were duets with Geeta Dutt, 2 solos by Geeta Dutt, 1 duet by Talat Mahmood and Geeta Dutt, and 1 solo each by Rajkumari (actor Manmohan Krishna's sister), Lata Mangeshkar and Hemant Kumar himself. The song "Vande Mataram" sung by Lata became extremely popular. It is said that Hemen Bose had 20 retakes of this song only to synchronize the song's rhythm with the hoof movements of the horses in the movie. Such was the strive for perfection by all.


The success of "Anand Math" paved the way for Hemantda in the Hindi Film Industry. From 1952 to 1989, Hemantda composed more than 450 songs for 75 Hindi films. Out of these 75 films, 11 films had more than 9 songs each, which sums up to 119 songs, approx 25% of the total no. of Hindi film songs composed by Hemantda.

What followed was a barrage of wonderful compositions through the films "Jagruti" (1954), "Naagin" (1954), "Shart" (1954), "Miss Mary" (1957), "Bees Saal Baad" (1962), "Sahib, Biwi Aur Ghulam" (1962), "Kohra" (1964), "Anupama" (1966) and "Khamoshi" (1970).  "Nagin" songs were so popular that they were in top position in various Radio programmes for few years. The same film won Hemant Kumar his first prestigious Filmfare Award in 1955 for the Best Music Director. 

In late 1950's, Hemantda turned to production, he formed a company "Geetanjali Productions" and made some wonderful films in 1960's. E.g. "Bees Saal Baad" (1962), "Kohra" (1964), "Faraar" (1965), "Biwi Aur Makaan" (1966), "Raahagir" (1969) and "Khamoshi" (1970). "Bees Saal Baad' and "Khamoshi" were extremely successful both commercially and musically.

Hemantda with Geeta Dutt
Photo Courtesy: Tripod.com
Kishore Kumar, Hemant Kumar
and Asha Bhosale (L to R)

Courtesy : TheQuint.com
As a Music Composer, Hemantda worked with more than 50 singers right from the second generation singers like Shamshad Begum, Lata Mangeshkar, Asha Bhosale up to Amit Kumar, Suresh Wadkar, Yesudas, Usha Utthup and Sheron Prabhakar! The list of Hemantda's singers included 3 Music Composers viz. C. Ramchandra, Ravi and Ghulam Mohammad!! Amongst the female singers, Lata tops the list with approx. 111 songs, Asha with 53 and Geeta Dutt with 17 songs. From the male singers, Hemantda himself sang 83 songs while Rafi 17 and Kishore Kumar 14 songs were among the noted singers.To our surprise, Talat Mehmood features only in 1 solo and 3 duet songs, while Mukesh has sung only 4 songs along with other singers, no solo! Perhaps the Singer within Hemantda thought that he would sung his own compositions better than Talat and Mukesh, which is understandable.

Songs composed by Hemant Kumar sung by other singers:

1) Vande Mataram - Anand Math (1952) - Lata Mangeshkar - Lyricist Bankimchandra Chattopadhyay

2) Teri Yaad Mein Jalkar Dekh Liya - Naagin (1954) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna

3) Sakhi Ri Sun Bole Papeeha Us Paas - Miss Mary (1957) - Lata - Asha - Lyricist Rajendra Krishna  (One of the few duets by Lata and Asha)

4) Khoyi Khoyi Ankhiyan Neend Bina - Chand (1959) - Lata Mangeshkar - Lyricist Shailendra

5) Kashti Ka Khamosh Safar Hai - Girl Friend (1961) - Kishore Kumar - Sudha Malhotra - Lyricist Sahir Ludhiyanvi MUST WATCH 

6) Naa Jaao Saiyyan Chhudake Baiyyan - Sahib, Biwi Aur Ghulam (1962) - Geeta Dutt - Lyricist Shakeel Badayuni

7) Meri Baat Rahi Mere Man Mein - Sahib, Biwi Aur Ghulam (1962) - Asha Bhosale - Lyricist Shakeel Badayuni

8) O Bekarar Dil - Kohra (1964) - Lata Mangeshkar - Lyricist Kaifi Azami

9) Sara Mora Kajra Churaya Tune - Do Dil (1965) - Mohammad Rafi - Arati Mukherjee - Lyricist Kaifi Azami

10) Kuchh Dil Ne Kaha Kuchh Bhi Nahin - Anupama (1966) - Lata Mangeshkar - Lyricist Kaifi Azami


Hemantda's voice was unique, it was haunting, had a great baas and thus suited mostly to serious songs or Bhajans. However, he sang all types of songs in both Hindi and more so in Bengali. 

Some of Hemantda's top Hindi songs own-composed:

1) Zindagi Ke Denewale - Naagin (1954) - Lyricist Rajendra Krishana 

2) Na Yeh Chand Hoga Na Taare Rahenge - Shart (1954) - Lyricist S. H. Bihari 

3) Chali Gori Pee Ke Milan Ko Chali - Ek Hi Raastaa (1956) - Lyricist Majrooh Sultanpuri

4) Raah Bani Khud Manzil - Kohraa (1964) - Lyricist Kaifi Azami 

5) Tum Pukar Lo, Tumhara Intezar Hai - Khamoshi (1970) - Lyricist Gulzar 


Hemantda has another distinction in that he has lent his voice to more than 100 songs under different Music Directors. There is no other composer-singer who has this record. E.g. S. D. Burman, Madan Mohan, C. Ramchandra and R. D. Burman were all singers as well as composers, but hardly sang songs under other Music Directors. He has sung 13 songs under S. D. Burman out of which 12 were for Dev Anand. Under C. Ramchandra, Hemantda has sung 9 songs in all.

Some of Hemantda's best songs under other Music Directors:

1) Yeh Raat Yeh Chandani Phir Kahan - Jaal (1952) - S. D. Burman - Lyricist Sahir Ludhiyanvi

2) Yaad Kiya Dil Ne Kahan Ho Tum - Patita (1953) - with Lata Mangeshkar - Shankar Jaikishen - Lyricist Hasrat Jaipuri

3) Zameen Chal Rahi Hai - Pehli Jhalak (1954) - C. Ramchandra - Lyricist Rajendra Krishna 

4) Chandan Ka Palna Resham Ki Dori - Shabab (1954) - Naushad - Lyricist Shakeel Badayuni

5) Main Garibon Ka Dil Hoon - Aab-E-Hayaat (1955) - Sardar Malik - Lyricist Hasrat Jaipuri

6) Kah Rahi Hai Zindagi - Jalti Nishani (1957) - Anil Biswas - Lyricist Qamar Jalalabadi

7) Ganga Aaye Kahan Se - Kabuliwala (1961) - Salil Chowdhury - Lyricist Gulzar  (Rare Live Recording from BBC)

8) Raahi Tu Ruk Mat Jaanaa - Door Gagan Ki Chhaon Mein (1964) - Composer Kishore Kumar - Lyricist Shailendra  (What a Surprise! Music Composer Kishore Kumar and Singer Hemant Kumar!!)


Hemantda's work in Bengali films is hugely commendable - both quantitatively and qualitatively. From 1940 to 1988, for 48 years, he composed around 700 songs for 146 films - out of which he sang around 300 songs as Solo or with other singers. He also sang around 275 songs under other composers.

Some of Hemantda's best Bengali songs:

1) Ei Raat Tomar Amar - Deep Jele Jai (1959) - MD and Singer Hemant Kumar - Lyricist Gauriprasanna Muzumder

2) O Nadir Re Ekti Kothay - Neel Akasher Neechey (1959) - MD and Singer Hemant Kumar - Lyricist Gauriprasanna Muzumder 

3) Tumi Je Amar - Harano Sur (1957) - Singer Geeta Dutt - Lyricist Gauriprasanna Muzumder    MUST WATCH for Geeta Dutt's wonderful rendition and for Suchitra Sen

4) Ashar Sraban Mane Na Tu Mon - Monihaar (1966) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt - (Flawless Bengali Rendition by the one and only Lata)

5) Ek Dinete Hoini Ami Tomader Ei Hemanta - Nakal Sona (1973) - MD Nachiketa Ghosh - Lyricist Gauriprasanna Muzumder    (Rare Screen Appearance by Hemant Kumar, the actual song starts at 03:23)

6) Choncholo Mon Anmona Hoy - Adwitiya (1968) - Singer Lata Mangeshkar and Hemant Kumar - Lyricist Mukul Dutt

7) Ami Pathbhola Ek Pathik - Mon Niye (1967) - Writer and Composer Rabindranath Tagore - Singers Hemant Kumar and Asha Bhosale

8) Bose achi potho cheye - ShapMochan (1955) - Lyricist Bimal Chandra Ghosh  (the film that helped Hemantda regain his position as Music Director for Bengali films)

9) Ei Meghla Dine Ekla - Shesh Parayanto (1960) - Lyricist Gauriprasanna Mazumder

10) Ai Path Jodi Shes Na Hoi - Saptapadi (1961) - Singers Sandhya Mukherjee and Hemant Kumar   (one of the 100s of Uttam Kumar & Suchitra Sen songs - one of the most popular Bengali duets)


While gathering information about Hemant Kumar on the internet, I came across an article by R. Rangaraj in the Time Of India dated last year about Hemantda's contribution to Tamil films. It looks like he has composed around 20 Tamil songs. It started in 1954 when a Hindi film "Samrat" was being dubbed in Tamil as "Kaadhal Parisu", Hemant Kumar composed 6 songs. When the film "MissiAmma" originally made in Telugu and Tamil with music from S. Rajeshwarrao was being remade in Hindi with the name "Miss Mary" in 1957, Hemantda insisted that he would make fresh compositions except for one viz. "Brindavan Ka Krishna Kanhaiyya". He composed new tunes for "Miss Mary" and all songs became very popular. Even the great Tamil Composer Illiya Raja was inspired by Hemantda's "Kahin Deep Jale Kahin Dil" from the film "Bees Saal Baad" and composed his song "Vaazhve Maayamaa" for the film "Gayathri" in 1977. 

From 1952 to 1970, Hemant da was composing music for Hindi and Bengali films in parallel. It must have been a herculean task to churn out fresh music every time, but if you really study his compositions from these 2 languages, you will realize that most of the compositions are fresh and not copy of each-other. Such was the mastery of Hemantda over the music. I have managed to compile following information based on the data that is available on  https://www.hindigeetmala.net/ and https://www.songsofyore.com/category/singers/hemant-kumar/. It is very difficult to get information about all songs composed, sung by Hemant Kumar, hence the below information is not 100% accurate, however gives us an idea of the volume of work Hemantda did over the years.


Hemantda was awarded Padmashri in 1970 and Padma Bhushan in 1987; however he declined both the awards with utmost humbleness. In 1971, Hemantda received National Award as the Best Male Singer for his song in the Bengali film "Nimontron". He was also the recipient of Sangeet Natak Akadami award in 1986. In September 1989, Hemantda had travelled to Dhaka, Bangla Desh, for a concert. After returning from there, he suffered a Heart attack, and died on the 26th Sept 1989. His sudden death left a big void in both Bengali and Hindi film industries. However he is immortal through his compositions and songs, we still remember and miss him a lot. 

It's not possible to cover Hemantda's entire work in on blog, however this is my humble attempt to do so. Hope you liked it. Thank you.

Today, I am presenting 2 of Hemantda's best compositions - one Hindi and other Bengali.

1) Havaaon Pe Likh Do, Havaaon Ke Naam - Do Duni Chaar (1970) - Singer Kishore Kumar - Lyricist Gulzar

The song starts with sound of the wind flowing in the jungle, followed by the entry of the Hero of the film Kishore Kumar wearing white Kurta and Dhoti. And what follows is a wonderful melodious tune of the song. Hemantda has used Sitar, Flute and Rhythm instruments quite beautifully in the song. Kishore's muscular voice has only added to the sweetness of the song. Do enjoy the video given just before the start of this English version.


2) Ke Jeno Go Dekeche Aamaay - Monihar (1966) - Singer Hemant Kumar and Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt

"Monihar" was one of the most popular Bengali films ni the '60s. It was a Multi-starrer movie with Soumitro Chatterjee, Biswajeet, Sandhya Roy, and Pahadi Sanyal as its cast. All the songs composed by Hemantda were very melodious. The song that I have presented has 2 versions - the Male version has Hemant Kumar as a major singer supported by Lata, while the Female version has exactly the opposite. In the Male version, Hemantda seems to have used only Tanpura and Tabla as accompanying instruments, while the Female version has Sarangi added to it. Another thing to note is that in both versions, the accompanying instruments do not overpower the voice. Enjoy the video given above just before the start of this English version.

Thank you. Have a great day. 


Note: I have had to refer to various sources on the internet to collect information about Hemantda's songs; however in spite of this, it was not possible to get all the information. Hence there could be few errors in the numbers given. But it does give us an idea about the magnitude of Hemantda's work. Hope readers would understand and appreciate this. 


References and Acknowledgement:

This link contains 2 excellent well-researched and long articles on Hemant Kumar by N. Venkataraman. I am quite grateful for the same.  


Saturday, 5 September 2020

अनमोल रतन - 11 : Gifted Musician - "Lara Lappa" Vinod

Namaskaar Friends!

I am very happy to present a new song, rather 2 songs, in the series Anmol Ratan. This time it's from one of the gifted musicians of the '50s viz. Eric Roberts aka Vinod. Nobody knows a great deal about Vinod or his work in Hindi films as a Music Composer; but people still remember a very famous song viz. "Lara Lappa Lara Lappa Laai Rakada". It was Vinod who had composed this magical number for a 1949 film "Ek Thi Ladaki". Till date, this song is a hit and often played on Radio.

In this blog, I am going to talk about Vinod and his compositions. Hope you will like it.

English version of the blog follows the Marathi version below.

Please do read and share your comments. Thanks.

Song #11: लारा लप्पा लारा लप्पा लायी रकदा

Song #12: कागा रे जा रे जा रे

विनोद.
हे कुणा संगीतकाराचे नाव असेल असे वाटते का? नाही ना? पण आहे!

"एक दो तीन", "ऊट पटांग", "हा हा हे हे हो हो", "मक्खी चूस" "शेख चिल्ली" ही कुठल्या तरी हिंदी चित्रपटाची नावे वाटतात का? नाही ना? आणि चुकून जरी यावर विश्वास बसला तरी या विचित्र नावांच्या चित्रपटांमध्ये संगीत असेल असं वाटतं का? नाही ना? पण आहे!

आशा भोसले यांनी OP नय्यर आणि RD बर्मन यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणा संगीतकाराकडे लता मंगेशकर यांच्यापेक्षा जास्त गाणी गायली असतील असं वाटतं का? नाही ना? पण आहेत!

वरील सर्व अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी संगीतकार विनोद यांच्याबाबतीत खऱ्या ठरल्या आहेत! 😊

स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता तो, साल १९४० ते १९४४, तत्कालीन भारतातील (आताच्या पाकिस्तानातील) लाहोरमध्ये वास्तव्य असलेले अनेक संगीतकार मुंबईच्या वाटेवर होते. मुंबईत बनणाऱ्या हिंदी चित्रपटात आपल्याला जास्त संधी मिळतील या विचाराने बहुदा लाहोर सोडून त्यांनी मुंबईची निवड केली असावी. यात मास्टर गुलाम हैदर होते, शामसुंदर होते, रशीद अत्रे, फिरोझ निझामी, हुस्नलाल-भगतराम, हंसराज बहल यांसारखे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार होते. पं. अमरनाथ आणि पं. गोविंदराम हे दोघेच काय ते लाहोरमध्ये ठाण मांडून बसले होते. 

अशा या लाहोरमध्ये २८ मे १९२२ रोजी एरिक रॉबर्ट्स उर्फ विनोद याचा जन्म एका ख्रिस्ती कुटुंबात झाला. लहानपणी विनोदला लग्नाच्या वरातीच्या बॅण्डमध्ये वाजवल्या जाणाऱ्या संगीताचे खूप आकर्षण होते. तसेच गुरुद्वारांमधून गायले जाणारे रबाबी संगीतातील शबद कीर्तनही आवडायचे. त्याची संगीताची आवड पुढे त्याला पंडित अमरनाथांकडे घेऊन गेली आणि तो त्यांचा शिष्य बनला. पंडितजींकडून विनोदने रागशास्त्राचे ज्ञान मिळवले, त्याचबरोबर ते गाण्याला संगीत कसे देतात, हेही शिकून घेतले.

पुढे १९४५ मध्ये पं. अमरनाथ यांचे आकस्मिक निधन झाले; त्यावेळी अवघ्या २३ वर्षाच्या विनोदवर त्यांचे अपूर्ण चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी येऊन पडली. "खामोश निगाहें", "पराये बस में" आणि "कामिनी" हे ते चित्रपट होत. विनोदनी या ३ चित्रपटात एकूण २० गाण्यांना संगीतबद्ध  केले; पण त्यांच्या दुर्दैवाने एकही चित्रपट चालला नाही.


सन १९४७ - विनोद आपल्या कुटुंबासह (पत्नी - शीला बेट्टी, मुली - वीणा आणि वीरा) लाहोर सोडून अमृतसर आणि तिथून थेट मुंबईला आले. आणि त्यांची संगीतकार म्हणून कारकीर्द पुन्हा एकदा नव्याने सुरु झाली ती "चमन" या १९४८ साली प्रदर्शित झालेल्या पंजाबी चित्रपटाने. याच वेळेस मास्टर गुलाम हैदर यांनी विनोद यांची गाठ लता मंगेशकर यांच्याशी घालून दिली. लताजींनी गुलाम हैदर यांच्या "मजबूर" या १९४८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात "बेदर्द तेरे दर्द को" हे गाणे गाऊन त्यांना प्रभावित केले होते. "चमन" मध्ये विनोद यांनी लताकडून २ गाणी गाऊन घेतली आणि दोन्ही गाणी प्रचंड गाजली. "राहे राहे जांडेया अँखियाँ मिलान्देया" आणि "गलियाँ च फिरदे ढोला, निके निके बाल वे" ही ती गाणी होत. जरूर बघा/ऐका. खाली लिंक्स दिल्या आहेत. विनोद-लता या जोडीकडून भविष्यात घडणाऱ्या काही अजरामर गीतांची नांदीच होती ही गीते जणू!

१९४० ते १९६० ही हिंदी चित्रसृष्टीची सोनेरी वर्षे होती असे मी मानतो. एक से एक चित्रपट आणि संगीतकार या काळात एकाच वेळेस आपली कला लोकांसमोर आणत होते. विनोद मुंबईत १९४७ साली त्यांची कारकीर्द सुरु करत असताना येथे त्यांचे समकालीन अनेक श्रेष्ठ संगीतकार राज्य करत होते. ही यादीच बघा म्हणजे तुम्हाला विनोद यांच्यासारख्या नवख्या संगीतकारासमोर असलेल्या आव्हानाची कल्पना येईल.

नौशाद ("अनमोल घडी" आणि "शाहजहान" - १९४६), पं. रविशंकर ("धरती के लाल" आणि "नीचा नगर" - १९४६),  हंसराज बहल ("फुलवारी" - १९४६), S. D. बर्मन (शिकारी - १९४६), सी. रामचंद्र ("शहनाई" - १९४७), अनिल विश्वास (अनोखा प्यार, गजरे  - १९४८), दत्ता डावजेकर (अदालत - १९४८), शंकर-जयकिशन (बरसात - १९४८), गुलाम हैदर (मजबूर, पद्मिनी - १९४८), हुस्नलाल भगतराम (प्यार की जीत - १९४८)

१९४९ साल उजाडले. निर्माते-दिग्दर्शक रूप शोरी "एक थी लडकी" नावाचा चित्रपट बनवत होते; आणि संगीतकार होते त्यांचे लाडके विनोद. या चित्रपटात एकूण १० गाणी विनोदनी दिली. त्यातील "लारा लप्पा लारा लप्पा लायी रकदा" हे गाणे तुफान गाजले, इतके की विनोद यांची ही Signature Tune बनली. आजतागायत हे गाणे रेडिओवर ऐकू येते. याशिवाय लता-मोहम्मद रफी यांचे द्वंद्वगीत "अब हाल-ए-दिल या हाल-ए-जिगर कुछ ना पुछीये" हे गाणेही लोकप्रिय झाले.

Photo Courtesy: Wikipedia
१९५० साली आलेले "अनमोल रतन" आणि "वफा" हे २ चित्रपट विनोद यांच्या कारकिर्दीतील सोनेरी कळस म्हणावे लागतील. लताची ३ गाणी - "तारे वोही है चांद वोही है" (अनमोल रतन), "अपनी अपनी किस्मत है" आणि "कागा रे जा रे जा रे" (वफा) ही तिच्या सर्वोत्कृष्ट २५ गाण्यांमध्ये नक्की समाविष्ट करावी लागतील. तलत-लताचे "शिकवा तेरा मैं गाऊं" हे युगलगीत, तर तलतचे "जब किसीके रुख़ पे ज़ुल्फ़ें आ के लहराने लगी" हे "अनमोल रतन" मधील गाणे आजही तलतच्या सर्वोत्तम गाण्यांपैकी मानली जातात.

१९४६ ते १९५९ या अवघ्या तेरा वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत विनोदनी एकूण २७ हिंदी आणि ५ पंजाबी चित्रपटांना संगीत दिले, त्यांच्या हिंदी व पंजाबी गाण्यांची संख्या २२५ च्या आसपास आहे. यातील साधारण ८० म्हणजे ३५% गाणी विनोदनी १९४९ ते १९५१ या तीन वर्षात संगीतबद्ध केली होती! आश्चर्याची गोष्ट अशी की आशा भोसले यांनी विनोद यांच्याकडे तब्बल ४७ सोलो आणि सहकलाकारांबरोबर ३० अशी एकूण ७७ गाणी गायली आहेत, तर लता मंगेशकर यांनी फक्त १३ सोलो आणि सहकलाकारांबरोबर ९ अशी एकूण २२ हिंदी गाणी गायली आहेत!

विनोद यांची ११ सर्वोत्तम हिंदी गाण्यांची यादी खाली देत आहे, ही गाणी निवडताना वेगवेगळे गायक असतील हे पाहिले आहे. विनोद यांच्या बऱ्याच चित्रपटांच्या व्हिडिओ फिल्म्स आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे खाली दिलेली बरीचशी गाणी ही फक्त Audio स्वरूपातच आहेत. तरी पण आपण ती जरूर ऐकावीत/पाहावीत. (Many of YouTube videos below - courtesy Javed Raja)

  1. अपनी अपनी किस्मत है - वफा (१९५०) - लता मंगेशकर - गीतकार अज़ीज़ काश्मीरी - MUST WATCH
    • या गाण्यातली कलाकारी ऐका, अप्रतिम शब्द, गायला अतिशय अवघड चाल 
  2. तारे वोही है चाँद वोही है - अनमोल रतन (१९५०) - लता - गीतकार D. N. मधोक - MUST WATCH
  3. अब हाल-ए-दिल या हाल-ए-जिगर कुछ ना पूछिए - एक थी लड़की (१९४९) - मोहम्मद रफ़ी-लता - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • कलाकार - मोतीलाल आणि मीना शोरी
  4. शिकवा तेरा मैं गाऊँ दिल में समानेवाले - अनमोल  रतन (१९५०) - तलत महमूद-लता - गीतकार D. N. मधोक  
  5. दिल्ली से आया भाई टिंगू - एक थी लड़की (१९४९) - बिनोता चक्रवर्ती - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • या गाण्याच्या सुरुवातीला विनोद स्वतः संगीत संचालकाच्या भूमिकेत दिसतात 
  6. जब किसीके रुख़ पे ज़ुल्फ़ें आ के लहराने लगी - अनमोल रतन (१९५०) - तलत महमूद - गीतकार D. N. मधोक - MUST WATCH
  7. तुम अजी तुम, तुम दिल में बस रहे हो - मुखड़ा (१९५१) - आशा भोसले - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • सुरुवातीच्या काळातील आशाजींचा आवाज इथे ऐका
  8. आँखियाँ मिलाके आँखियों की नींद चुराके ना जा - मुखड़ा (१९५१) - सुलोचना कदम - गीतकार अज़ीज़ काश्मीरी 
  9. बेला बम्बीना ओय बेला बम्बीना - एक दो तीन (१९५३) - आशा भोसले - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
  10. हाय राम कांटा लागा रे सांवरिया - ऊट पटांग (१९५४) - सुधा मल्होत्रा - गीतकार D. N. मधोक
  11. मुँह मोड़ लेनेवाले दिल तोड़ देनेवाले - मक्खी चूस (१९५६) - गीता दत्त - गीतकार पंडित इंद्र

विनोद यांची ३ पंजाबी गाणी खाली देत आहे:

Courtesy: Cinestaan.com

  1. गलियाँ च फिरदे ढोला - चमन (१९४८) - लता मंगेशकर - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
  2. राहे राहे जान्देयाँ अँखियाँ मिलान्देयाँ - चमन (१९४८) - लता मंगेशकर - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
  3. अज मेरा माही नाल टूट गया प्यार वे - भैयाजी (१९५०) - लता मंगेशकर 

"अनमोल रतन" आणि "वफा" या चित्रपटात दिलेल्या अप्रतिम गाण्यांनंतर विनोद यांनी "मुखडा", "सब्ज बाग", "तितली" (१९५१), "लाडला", "ऊट पटांग", "रमण" (१९५४), "जलवा" (१९५५), "गरमा गरम" (१९५७), "अमर शहीद" (१९५९) इ. चित्रपटांना संगीत दिले. पण त्यातील मोजकीच गाणी वरील गाण्यांची उंची गाठू शकली. विनोद यांचे पहिले प्रेम पंजाबी चित्रपट  होते; पण पंजाबी चित्रपटसृष्टी रसातळाला गेली, त्याचबरोबर त्यांनी संगीत दिलेले हिंदी चित्रपट दुर्दैवाने बॉक्स ऑफिसवर तितकेसे चालले नाहीत. त्यामुळे विनोदना एक प्रकारचे नैराश्य आले, त्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर झाला आणि अखेरीस २५ डिसेंबर १९५९ रोजी वयाच्या अवघ्या ३७व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. (ही कहाणी विनोद यांचे जावई - केली मिस्त्री - यांनी सांगितली आहे)

नावात जरी "विनोद" असला तरी विनोद यांच्या संगीतरचना गंभीरपणे घ्यायला लागतात. दुर्दैवाने संगीतकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीचे सार त्यांच्याच एका गाण्यातील ओळींमध्ये सामावलेले आहे:

अपनी अपनी किस्मत है, आबाद कोई बरबाद कोई।  

अशा या गुणी संगीतकाराला मानाचा मुजरा.  

आज विनोद यांची हिंदीतली २ अजरामर गीते सादर करीत आहे.

१) लारा लप्पा लारा लप्पा लायी रकदा

१९४९ सालच्या "एक थी लडकी" या चित्रपटातील हे गीत. गायले आहे लता मंगेशकर आणि जी. एम. दुर्राणी यांनी. कोरस मध्ये मोहम्मद रफी यांचा आवाज ऐकू येतो. ह्या गाण्याची चाल "जुत्ती मेरी जांदी ए पहाडिये दे नाल" या पंजाबी लोकगीतावरून घेतली आहे. मीना शोरी नायिकेच्या भूमिकेत तर मोतीलाल ("ज़िन्दगी ख्वाब है" गाणे ज्याच्यावर चित्रित झाले आहे तो अभिनेता) नायकाच्या भूमिकेत आहे. गाण्याची पार्श्वभूमी एका ऑफिसमध्ये आहे. गाण्याचे शब्द मजेशीर आहेत. गीत लिहिले आहे अज़ीज़ काश्मीरी यांनी.


२) कागा रे जा रे जा रे 

१९५० साली आलेल्या "वफा" या निम्मी आणि करण दिवाण अभिनीत चित्रपटातील हे अप्रतिम गाणे. जितकी सुंदर चाल तितकेच सुंदर शब्द आहेत अज़ीज़ काश्मीरी यांचे. कट्टर पंजाबी असलेल्या विनोदनी आपला पारंपरिक ठेका सोडून इतकी दर्दभरी रचना करावी यातच त्यांचे कौशल्य दिसून येते. अतिशय सुंदर अशा व्हायोलिन किंवा सारंगीच्या तुकड्याने गाण्याची सुरुवात होते. "कागा रे" या शब्दाच्या आधी २ सेकंदच सतार वाजते, पण त्यामुळे गाण्यासाठी आवश्यक असलेले करुण वातावरण निर्माण होते, या इथे सतारीची योजना करण्याची कल्पना एखाद्या कसदार कलावंतालाच सुचू शकते. मुखड्यातील "जा रे जा रे" संपताना लगेचच पुढची ओळ सुरु होते आणि मग "संदेसवा" या शब्दानंतर येणारी स्वरांची जी उतरण विनोदनी बांधलीये आणि लताबाईंनी गायली आहे ती केवळ लाजवाब!

या गाण्याबद्दलचा एक किस्सा विनोद यांची मुलगी वीरा मिस्त्री यांनी सांगितला आहे - इथे बघा.

वीरा मिस्त्री यांची गाठ एके दिवशी बांद्र्याच्या डॉ. कपूर यांच्या दवाखान्यात आशा भोसले यांच्याशी पडली. आशाजींना जेंव्हा वीराजी कोण आहेत हे कळले त्यावेळी त्यांनी तिथल्या तिथे वीराजींना "कागा रे जा रे" हे गाणे म्हणून दाखवले. एका कलावंताने दुसऱ्या कलावंताला दिलेली मानवंदनाच होती ती! 

दुर्दैवाने "वफा" चित्रपट किंवा त्यातील एकही गाण्याचे व्हिडीओ आज उपलब्ध नाहीत, त्यामुळे खालील व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त गाणे ऐकू येईल.


संदर्भ:

  1. https://eternalcinema.com/music-director-vinod-lost-in-time/
  2. https://www.songsofyore.com/forgotten-composers-unforgettable-melodies-2-vinod/
  3. http://apnaorg.com/articles/aujla-5/
  4. https://www.hindigeetmala.net/music_director/vinod.php

Vinod! In literal English, this means a "Joke" or "Humor"! Can you believe that anyone with his name as Vinod would be a Music Composer?

Can you also believe that "Oot Pataang", "Ek Do Teen", "Ha Ha He He Ho Ho", "Sheikh Chilli", "Makkhi Choos" would be the names of Hindi movies?

Can you believe that apart from the greats O. P. Nayyar and R. D. Burman, Asha Bhosale would have sung more songs with a composer than Lata Mangeshkar?

Alas! But all these facts which seem unbelievable are true, concidentally, in case of a gifted Music Composer of 1950's - Vinod! :-)

It was an era before India's independence, probably between 1940 and 1944. Many Music Composers who were based in Lahore (at that time it was in India), had decided to move to Bombay (now Mumbai) to strengthen their career in the Hindi film industry which was primarily being operated from Bombay. There were some great names like Master Ghulam Haider, Shyamsunder, Rasheed Atre, Firoze Nizami, Husnalal Bhagatram, Hansraj Behl, etc. who had moved to Bombay. Only Pt. Amarnath and Pt. Govindram had opted to continue to be in Lahore. 

Eric Roberts aka Vinod was born on 28th May 1922 in Lahore in a converted Christian family. From childhood days, Vinod was fascinated by the music that used to be played in the Wedding processions in Lahore along with the Shabad Keertan (Rababi music) that used to be recited in Gurudwaras. Vinod became a disciple of Pt. Amaranath and learnt the Raag Shastra and art of music composing from his Guru. 

In 1945, due to sudden demise of Pt. Amaranath, the young 23-yr old Vinod was asked to complete the music for 3 of his pending films viz. "Khamosh Nigahein", "Paraye Bas Mein" and "Kamini". He composed around 20 songs in these 3 films, but unfortunately none of the 3 films worked at the box office. As a result, Vinod's name was not recognized by the Hindi film industry.

However, Vinod continued to pursue his music and in 1947, shifted to Bombay, along with his wife Sheela Betty and two daughters viz. Veena and Veera, to explore opportunities in the Hindi film industry there. Strangely, he got his first opportunity in 1948 to compose music for a Punjabi film "Chaman". He happened to know Master Ghulam Haider from his days in Lahore. Master ji - as Ghulam Haider was fondly called - had introduced Lata Mangeshkar to the Hindi film industry through his film "Mazboor" published in 1948. Lata had sung an outstanding number "Bedard Tere Dard Ko Seene Se Lagaa Ke" in "Mazboor" and her young, fresh, sharp voice had moved everyone. Master ji introduced Vinod to Lata and he gave Lata 2 songs in his film "Chaman" viz. "Raahe Raahe Jandeyaa, Ankhiyan Milande Yaa" and "Galiyan Ch Firde Dhola, Neeke Neeke Baal Ve", both songs became big hits. Thus began a musical partnership which lasted for next 7-8 years and gave us some breathtaking songs.

It was not any easy job to come to Mumbai as a new face and establish yourself as a Music Composer. Just look at the list of Music Composers at that time who were ruling the Hindi film industry - Naushad ("Anmol Ghadi" and "Shahjehan" - 1946), Pt. Ravishankar ("Dharti Ke Laal" and "Neecha Nagar" - 1946), Hansraj Behl ("Phulwari" - 1946), S. D. Burman ("Shikari" - 1946), C. Ramchandra ("Shehnai" - 1947), Anil Biswas ("Anokha Pyaar", "Gajare" - 1948), Daata Davjekar ("Adalat" - 1948), Shankar-Jaikishan ("Barsaat" - 1948), Master Ghulam Haider ("Mazboor", "Padmini" - 1948) and Husnalal Bhagatram ("Pyaar Ki Jeet" - 1948). You can understand the huge challenge before Vinod to perform amidst his contemporaries.

Come 1949, Producer-Director Roop K. Shorey decided to produce a film viz. "Ek Thi Ladki", and chose Vinod to be its Music Composer. This was a golden opportunity for Vinod to prove his worth and he did not disappoint. He composed 10 songs for this film and few were a hit. The song "Lara Lappa Lara Lappa" became so popular that it not only became talk of the town but gave Vinod the much-needed and much-deserved recognition as a serious composer. "Lara Lappa" became Vinod's signature tune, and he is still remembered for this one song! Another song from this film that became popular was Rafi-Lata's duet "Ab Haal-e-Dil Ya Haal-e-Jigar Kuchh Naa Puchhiye".

Photo Courtesy: Loverays.com
1950 saw Vinod composing for 2 of his best films viz. "Anmol Ratan" and "Wafa". Lata sang her heart out in "Taare Wohi Hai Chaand Wohi Hai" ("Anmol Ratan") , "Apni Apni Kismat Hai" and "Kaga Re Jaa Re Jaa Re" (Wafa), these 3 songs can easily be considered in Lata's Top 25 Hindi songs. Talat Mahmood and Lata's duet "Shikwa Tera Main Gaaon" and Talat's solo "Jab Kisi Ke Rukh Pe Zulfe Aake Lehraane Lagi" are considered in the list of Talat's best songs.  

Vinod's career as a Music Composer lasted for 13 years from 1946 to 1959. In these 13 years, he composed music for ~225 songs from 27 Hindi and 5 Punjabi films. Such was his genius that Vinod composed approximately 80 i.e. 35% of his songs in just 3 years from 1949 to 1951! You would be hugely surprised to know that Asha Bhosale has sung 77 songs for Vinod (47 solo and 30 duets) while Lata Mangeshkar has sung only 22 (13 solo and 9 duets)!! When you wonderd what Asha did before she began her long association with likes of OP, SJ, SD and RD, here is the answer.

Sharing below 11 of Vinod's best Hindi songs. Please do spare time to listen/watch each one of these. Unfortunately, videos for many of Vinod's films are not available, hence you will find only audios in the links below (Many YouTube videos below are courtesy Mr. Javed Raja)

  1. अपनी अपनी किस्मत है - वफा (१९५०) - लता मंगेशकर - गीतकार अज़ीज़ काश्मीरी - MUST WATCH
    • Listen and enjoy this wonderful but difficult composition, superb singing 
  2. तारे वोही है चाँद वोही है - अनमोल रतन (१९५०) - लता - गीतकार D. N. मधोक - MUST WATCH
  3. अब हाल-ए-दिल या हाल-ए-जिगर कुछ ना पूछिए - एक थी लड़की (१९४९) - मोहम्मद रफ़ी-लता - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • This song was picturized on Motilal and Meena Shorey
  4. शिकवा तेरा मैं गाऊँ दिल में समानेवाले - अनमोल  रतन (१९५०) - तलत महमूद-लता - गीतकार D. N. मधोक  
  5. दिल्ली से आया भाई टिंगू - एक थी लड़की (१९४९) - बिनोता चक्रवर्ती - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • You can see Vinod himself playing the role of Music Arranger in this song
  6. जब किसीके रुख़ पे ज़ुल्फ़ें आ के लहराने लगी - अनमोल रतन (१९५०) - तलत महमूद - गीतकार D. N. मधोक - MUST WATCH
  7. तुम अजी तुम, तुम दिल में बस रहे हो - मुखड़ा (१९५१) - आशा भोसले - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
    • Listen to Asha Bhosale's young energetic voice at the start of her career
  8. आँखियाँ मिलाके आँखियों की नींद चुराके ना जा - मुखड़ा (१९५१) - सुलोचना कदम - गीतकार अज़ीज़ काश्मीरी 
  9. बेला बम्बीना ओय बेला बम्बीना - एक दो तीन (१९५३) - आशा भोसले - गीतकार अज़ीज़ काश्मीरी
  10. हाय राम कांटा लागा रे सांवरिया - ऊट पटांग (१९५४) - सुधा मल्होत्रा - गीतकार D. N. मधोक
  11. मुँह मोड़ लेनेवाले दिल तोड़ देनेवाले - मक्खी चूस (१९५६) - गीता दत्त - गीतकार पंडित इंद्र

Courtesy: Bollywoodmovies

After the excellent work in "Anmol Ratan" and "Wafa" in 1950, Vinod composed music for many more films. Some of the noted ones are "Mukhada", "Sabz Baag", "Titli" (1951), "Laadalaa", "Oot Pataang", "Ramman" (1954), "Jalwa" (1955), "Garama Garam" (1957) and "Amar Shaheed" (1959). 3 of his films were released in 1961 after his death in 1959. Very few songs from the above films had the quality same as that from his earlier films. Vinod was a hard-core Punjabi and hence composing music for Punjabi films was his passion. However, circumstances developed such that the entire Punjabi film industry came crumbled down. At the same time, many of Vinod's Hindi films did not do well at the box office in spite of having good quality music. This led Vinod into frustration and impacted his health. As a result he left us for abodely heaven on 25th Dec 1959.  (This story has been narrated by Vinod's son-in-law - Mr. Kelly Mistry)

Though his name depicted humor, Vinod was a serious composer and composed some great songs that music lovers still remember. Sadly, Vinod's career as a composer can be summarized in one of the lines of his own song:

अपनी अपनी किस्मत है, आबाद कोई बरबाद कोई।  

Kudos to him.

Today, I am presenting 2 of his best Hindi songs. You can watch the videos given above in the blog.

1) Lara Lappa Lara Lappa Layi Rakhda


This song has been inspired by a Punjabi folk song "Jutti Meri Jandiye Pahadiye De Naal". Main singers are G. M. Durrani and Lata; however you can hear Mohammad Rafi in the chorus. The lead male role in the film was played by Motilal - the actor who is remembered for the song "Zindagi Khwab Hai" in Raj Kapoor's film "Jaagate Raho". The female lead role was played by Meena Shorey who has few other hit films to her credit. The great lyrics by Aziz Kashmiri have added fervour to the tune of the song.    


2) Kaga Re Jaa Re Jaa Re


This song is from the 1950 film "Wafa" starring Karan Dewan and Nimmi. This is perhaps the best song Vinod had composed. Knowing that Vinod was a hard core Punjabi, composing such a melodious sad tune would have been a challenge for him, but he has an outstanding work here. The song starts with a small piece on Violin (or perhaps Sarangi) and just before the words begin, one can hear Sitar onl briefly for few seconds, but what impact it creates on the song itself, beautiful! And the way the word "Sandesawa" has been composed and sung by Lataji is mesmerising to say the least.

Vinod's daughter - Veera Mistry - has narrated a short story about this song, about her interaction with the great Asha Bhosale, and how she was fortunate to hear this song - which was origininally sung by Lataji - from Asha ji herself. Such was the magic of this song that even a great singer like Asha ji could not resist herself. You can view her narration here.

Unfortunately, no video of the film "Wafa" or the song is available anywhere, hence you would only hear the audio on the video shared above.

That's all, friends, for today. Hope you could read till end, watched both the songs and enjoyed it. Please do share your comments, if any. Thank you.

References:

  1. https://eternalcinema.com/music-director-vinod-lost-in-time/
  2. https://www.songsofyore.com/forgotten-composers-unforgettable-melodies-2-vinod/
  3. http://apnaorg.com/articles/aujla-5/
  4. https://www.hindigeetmala.net/music_director/vinod.php