Namaskaar Friends,
I am really very happy to present my new blog to you during the horrible times of the deadly pandemic. Hope this blog will keep you away, for some time though, from your pains and give you a chance to explore the pleasure through music.
Today, I am going to present the work of one of the most talented composers and singers of the Hindi and Bengali film industry - Hemanta Kumar Mukhopadhyay aka Hemant Kumar.
English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feelings. Thanks.
"जर परमेश्वर कधी गायला असता तर तो नक्कीच हेमंतकुमार यांच्या आवाजात गायला असता" - सलील चौधरी
लताजी आणि संगीतकार सलील चौधरी यांच्या हेमंतकुमार यांच्याविषयीच्या वरील उद्गारांनी आपल्याला हेमंतकुमार यांच्या महान प्रतिभेची थोडीशी ओळख होते.
१६ जून १९२० रोजी हेमंतकुमार यांचा जन्म वाराणसी (बनारस) येथे त्यांच्या आजोळी झाला. त्यांचे आजोबा (आईचे वडील) गोविंद चंद्र बंदोपाध्याय हे व्यवसायाने डॉक्टर होते. कालिदास मुखर्जी आणि किरणबाला देवी यांचा हा सुपुत्र. जन्मानंतर काही वर्षातच हेमंतकुमार यांचे कुटुंबीय त्यांच्या वाडवडिलांच्या घरी म्हणजे दक्षिण २४ परगण्यातील बहरू या गावी गेले. तिथेच हेमंतकुमार यांचे बालपण गेले. त्यांच्या आई - किरणबाला देवी - यांना कविता लिहिण्याची आणि त्यांना चाली लावण्याची सवय होती. हाच गुण पुढे हेमंतकुमार यांच्यात आला असावा.
हेमंतदांचे सुरुवातीचे शिक्षण बहरू माध्यमिक विद्यालयात झाले. १९२८ साली त्यांचे सर्व कुटुंब कोलकाता येथे आले. कोलकात्यामध्ये "जत्रा गान" आणि शाहिरांची गाणी हेमंतदांच्या कानावर पडायची, व ती त्यांना पाठही व्हायची. इथेच त्यांना काही मित्र मिळाले. या मित्रांना हेमंतदांचे गाणे खूप आवडायचे, त्यातीलच एक होते सुभाष मुखर्जी. सुभाष हे कवी होते. त्यांनीच हेमंतदांना Indian Broadcasting Corporation (IBC - याचे नाव नंतर All India Radio असे झाले) मध्ये नेऊन तेथे गाण्याची संधी मिळवून दिली. हेमंतदांनी तिथे सुभाषने रचलेली दोन गाणी स्वतः चाल लावून म्हटली, ते त्यांचे पहिले जाहीर गाणे असावे. जेमतेम पंधरा वर्षाच्या दोन मुलांनी हा चमत्कार केला होता! पुढील वर्षी IBC ने हेमंतदांना अजून २ गाणी गाण्यासाठी बोलावले. आता लोक त्यांना हळूहळू ओळखू लागले होते आणि काही जण तर त्यांना "छोटा पंकज" (त्यावेळचे बंगालमधील सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक पंकज मलिक) म्हणूनही संबोधित करू लागले होते.
१९३७ साली वडिलांच्या इच्छेप्रमाणे हेमंतदां मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व त्यांनी जादवपूर अभियांत्रिकी महाविद्यालयात Mechanical Engineering ला प्रवेश घेतला. महाविद्यालयात शिकत असतानाच हेमंतदांच्या वडिलांचे सहकारी - शांती बोस - यांनी हेमंतदांची ओळख प्रसिद्ध संगीतकार आणि रेडिओ कलाकार शैलेश दत्तागुप्तां यांच्याशी करून दिली. शैलेश हे कोलंबिया कंपनी आणि HMV कंपनीमध्ये संगीत विषय शिकवायचे. शैलेश दत्तागुप्ता यांना कलाकारांची चांगली पारख होती. त्यांना हेमंतदांचा आवाज एवढा आवडला की त्यांनी २ गाणी हेमंतदांकडून १० दिवस सराव करून रेकॉर्ड करून घेतली. "जानिते जोदी गो तुमी" आणि "बॉलो गो बॉलो मोरे" ही ती दोन गाणी. तो महिना होता डिसेंबर १९३७, हेमंतदा होते अवघे १७ वर्षाचे. शैलेशबाबूंच्या मदतीने हेमंतदांची दुसरी रेकॉर्ड १९३८ मध्ये प्रसिद्ध झाली. या दोन्ही रेकॉर्ड्सचे मिळून त्यांना एकूण ४० रुपये (त्या काळचे) मानधन मिळाले, ज्यातून त्यांच्या वडिलांनी त्यांना बाजाची पेटी घेतली. शैलेशबाबूंनी हेमंतदांची ओळख All India Radio च्या बानी कुमार यांच्याशी करून दिली. बानी कुमारांनी हेमंतदांना पुन्हा एकदा रेडिओवर गायची संधी दिली. इथून पुढे हेमंतदांनी आपला संपूर्ण वेळ संगीताला द्यायचे ठरवले. शैलेशबाबूंनी हेमंतदांना रवींद्र संगीतही शिकवले. फणी भूषण बॅनर्जी यांच्याकडून हेमंतदांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. शैलेशबाबूंनी हेमंतदांना रविंद्र संगीत शिकवले. तर बानी कुमार यांनी त्यांना दरवर्षी होणाऱ्या "महिषासुरमर्दिनी" कार्यक्रमात सोलो गाणे गायची संधी दिली, या निमित्ताने हेमंतदांची प्रसिद्ध संगीतकार पंकज मलिक यांच्याबरोबरची ओळख वाढली. जवळपास १९५१ सालापर्यंत हेमंतदा "महिषासुरमर्दिनी" या प्रतिष्ठित कार्यक्रमाचा भाग होते. १९४२ मध्ये त्यांनी गायलेली रविंद्र संगीतातील गाणी All India Radio (AIR) वरून प्रथमच प्रकाशित झाली आणि ते पुढे रविंद्र संगीताचे नियमित कार्यक्रम करू लागले.हेमंतकुमारांची संपूर्ण कारकीर्द एक गायक, संगीतकार आणि चित्रपट निर्माता या तिन्ही दृष्टिकोनातून बघावी लागते.
१९४० मध्ये "निमाई शोनणाषी" (Nimai Sanyas) या बंगाली चित्रपटात हेमंतदांना प्रथम गाण्याची संधी मिळाली. १९४४ मध्ये आणखीन एका बंगाली चित्रपटासाठी ("प्रियो बानधोबि" (Priya Bandhabi)) हेमंतदांनी आपला आवाज दिला, या चित्रपटात त्यांनी रवींद्र संगीत गायले. याच वर्षी त्यांनी स्वतः संगीत दिलेली दोन गैर-फिल्मी गाणी गायली - "कोथा कोयो नाको, शुधू शोनो" आणि "आमार बिरोहे आकाषे प्रियो" ही ती दोन गीते होत. हिंदी चित्रपटात त्यांना गायक म्हणून पहिली संधी पं. अमरनाथ यांनी "इरादा" या चित्रपटात १९४४ साली दिली. "आराम से जो राते काटे" आणि "फिर मोहब्बत के पयाम" ही दोन गाणी हेमंतदांची हिंदी चित्रपटातील सुरुवातीची गाणी होती.
१९४१ ते १९५० या दशकात हेमंतदांनी जवळपास ७० बंगाली आणि ४० हिंदी गैरफिल्मी गाणी रेकॉर्ड केली, त्यातील २० बंगाली आणि ७ हिंदी गाण्यांना त्यांनी स्वतः संगीत दिले होते. त्यांच्या बऱ्याच हिंदी गाण्यांचे संगीत त्यावेळचे सुप्रसिद्ध संगीतकार कमल दासगुप्ता यांनी दिले होते. १९४७ साली आलेला "अभियात्रि" हा बंगाली चित्रपट हेमंतदांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट.
Photo Courtesy : YouTube |
Courtesy: Lyricsbogie |
हेमंतदांच्या संगीत दिग्दर्शनाखाली इतर गायकांनी गायलेली काही हिंदी गाणी:
१) वंदे मातरम - आनंदमठ (१९५२) - लता मंगेशकर - गीतकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
२) तेरी याद में जलकर देख लिया - नागिन (१९५४) - लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण
३) सखी री सुन बोले पपीहा उस पार - मिस मेरी (१९५७) - लता मंगेशकर - आशा भोसले - गीतकार राजेंद्र कृष्ण (लता-आशाजींच्या काही मोजक्या द्वंद्वगीतांपैकी एक)
४) खोयी खोयी अँखियाँ नींद बिना - चाँद (१९५९) - लता मंगेशकर - गीतकार शैलेन्द्र
५) कश्ती का ख़ामोश सफर है - गर्ल फ्रेंड (१९६१) - किशोर कुमार - सुधा मल्होत्रा - गीतकार साहिर लुधियानवी MUST WATCH
६) ना जाओ सैय्यां छुडाके बैयाँ - साहिब बीबी और ग़ुलाम (१९६२) - गीता दत्त - गीतकार शकील बदायुनी
७) मेरी बात रही मेरे मन में - साहिब बीबी और ग़ुलाम (१९६२) - आशा भोसले - गीतकार शकील बदायुनी
८) ओ बेक़रार दिल हो चुका है - कोहरा (१९६४) - लता मंगेशकर - गीतकार कैफ़ी आज़मी
९) सारा मोरा कजरा चुराया तूने - दो दिल (१९६५) - मोहम्मद रफ़ी - आरती मुखर्जी - गीतकार कैफ़ी आज़मी
१०) कुछ दिल ने कहा कुछ भी नहीं - अनुपमा (१९६६) - लता मंगेशकर - गीतकार कैफ़ी आज़मी
एक गायक म्हणून हेमंतदांचे स्वतःचे असे एक वेगळेपण होते. घनगंभीर, खर्जातला आवाज हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या आवाजात एखादे भजन किंवा दर्दभरे गीत जास्त भावायचे. त्यांच्या आवाजाला मर्यादा होत्या, त्यांची उडत्या चालीची किंवा वेगळ्या ढंगांची गाणी काही अपवाद वगळता जवळपास नाहीतच. बंगालीमधे मात्र त्यांनी सर्व प्रकारची गाणी गायल्याचे दिसते.
हेमंतदांनी स्वतःच्याच संगीतात जवळपास १३० गाणी गायली आहेत, त्यातील काही सर्वोत्तम गाणी:
१) ओ ज़िन्दगी के देनेवाले ज़िन्दगी के लेनेवाले - नागिन (१९५४) - गीतकार राजेंद्र कृष्ण
२) ना ये चाँद होगा ना तारे रहेंगे - शर्त (१९५४) - गीतकार एस. एच. बिहारी
३) चली गोरी पी के मिलन को चली - एक ही रास्ता (१९५६) गीतकार मजरूह सुलतानपुरी
४) राह बनी खुद मंज़िल - कोहरा (१९६४) - गीतकार कैफ़ी आज़मी
५) तुम पुकार लो, तुम्हारा इंतज़ार है - ख़ामोशी (१९७०) - गीतकार गुलज़ार
Hemant da, SD, Salil da and RD 4 Doyens of Bengali Films Image Courtesy: National Herald |
हेमंतदांची इतर संगीतकाराकडे गायलेली काही गाणी:
१) ये रात ये चाँदनी फिर कहाँ - जाल (१९५२) - सचिनदेव बर्मन - गीतकार साहिर लुधियानवी
२) याद किया दिल ने कहाँ हो तुम - पतिता (१९५३) - सहगायिका लता मंगेशकर - शंकर जयकिशन - गीतकार हसरत जयपुरी
३) ज़मीं चल रही है आसमाँ चल रहा है - पहली झलक (१९५४) - सी. रामचंद्र - गीतकार राजेंद्र कृष्ण
४) चन्दन का पलना रेशम की डोरी - शबाब (१९५४) - सहगायिका लता मंगेशकर - नौशाद - गीतकार शकील बदायुनी
५) मैं गरीबों का दिल हूँ वतन की जुबाँ - आब-ए-हयात (१९५५) - सरदार मलिक - गीतकार हसरत जयपुरी
६) कह रही है ज़िन्दगी जी सके तो जी - जलती निशानी (१९५७) - अनिल विश्वास - गीतकार क़मर जलालाबादी
७) गंगा आये कहाँ से गंगा जाए कहाँ रे - काबुलीवाला (१९६१) - सलील चौधुरी - गीतकार गुलज़ार (Rare Live Recording from BBC)
८) राही तू रुक मत जाना - दूर गगन की छांव में (१९६४) - संगीतकार किशोरकुमार - गीतकार शैलेन्द्र (अहो आश्चर्यम! संगीतकार किशोरकुमार आणि गायक हेमंतकुमार!!)
हेमंतदांचे एक गायक आणि संगीतकार म्हणून बंगाली चित्रपटातले काम खूप मोठे आहे - संख्येने आणि गुणवत्तेनेही. १९४० ते १९८८ या ४१ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत हेमंतदांनी एकूण १४६ बंगाली चित्रपटांना संगीत दिले व त्यातील अंदाजे ७१३ गाण्यांपैकी ३०० गाणी सोलो अथवा द्वंद्वगीते म्हणून गायिली. तसेच इतर संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली एकूण अंदाजे २७५ गीत त्यांनी गायली.
हेमंतकुमार यांची बंगालीतील काही गाजलेली गाणी:
3) Tumi Je Amar - Harano Sur (1957) - Singer Geeta Dutt - Lyricist Gauriprasanna Muzumder MUST WATCH for Geeta Dutt's wonderful rendition and for Suchitra Sen
4) Ashar Sraban Mane Na Tu Mon - Monihaar (1966) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt - (Flawless Bengali Rendition by the one and only Lata)
5) Ek Dinete Hoini Ami Tomader Ei Hemanta - Nakal Sona (1973) - MD Nachiketa Ghosh - Lyricist Gauriprasanna Muzumder (Rare Screen Appearance by Hemant Kumar, the actual song starts at 03:23)
8) Bose achi potho cheye - ShapMochan (1955) - Lyricist Bimal Chandra Ghosh (the film that helped Hemantda regain his position as Music Director for Bengali films)
9) Ei Meghla Dine Ekla - Shesh Parayanto (1960) - Lyricist Gauriprasanna Mazumder
10) Ai Path Jodi Shes Na Hoi - Saptapadi (1961) - Singers Sandhya Mukherjee and Hemant Kumar (one of the 100s of Uttam Kumar & Suchitra Sen songs - one of the most popular Bengali duets)
हेमंतकुमारांबद्दल इंटरनेटवर माहिती शोधत असताना गेल्या वर्षी Times Of India मध्ये आलेला R. Rangaraj यांचा एक लेख नजरेत आला. त्याप्रमाणे हिंदी आणि बंगाली चित्रपटांसाठी काम करत असताना हेमंतदांना तामिळ चित्रपटांसाठीसुद्धा संगीतकार म्हणून काम करायची संधी मिळाली. १९५४ साली हिंदीतील "सम्राट" हा चित्रपट जेंव्हा तामिळ भाषेत बनवला गेला ("Kaadhal Parisu") तेंव्हा त्याचे संगीतही हेमंतदांनीच दिले, या चित्रपटात एकूण ६ गाणी होती. १९५५ साली तेलुगू आणि तामिळमध्ये आलेला "Missiamma" हा S. Rajeshwarao यांचे संगीत असलेला चित्रपट जेंव्हा १९५७ साली "मिस मेरी" नावाने हिंदीत बनला, तेंव्हा त्याचे संगीतकार म्हणून हेमंतदांची निवड झाली. हेमंतदांनी "वृंदावन का कृष्ण कन्हैय्या" या गाण्याची चाल मूळ तामिळ चित्रपटात जशी होती तशीच ठेवली, पण इतर सर्व गाण्यांना नवीन चाली दिल्या. असं म्हणतात की तामिळ मधले सुप्रसिद्ध संगीतकार इलिया राजा यांनी सुद्धा हेमंतकुमारांच्या "कहीं दीप जले कहीं दिल" या गाण्यावरून "Vaazhve Maayamaa" या गाण्याची चाल बांधली ती १९७७ सालच्या तामिळ "गायत्री" या चित्रपटसाठी. एकूण २० तामिळ गाण्यांना हेमंतदांनी चाली लावल्या आहेत.
१९५२ पासून १९७० पर्यंत हेमंतदा बंगाली आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांसाठी संगीत देत होते, गात होते. त्याशिवाय गैरफिल्मी गीतेही रेकॉर्ड होत होती. हे सर्व साधण्यासाठी त्यांनी अपार परिश्रम घेतले. खालील माहिती मुख्यतः https://www.hindigeetmala.net/ आणि https://www.songsofyore.com/category/singers/hemant-kumar/ या दोन संकेतस्थळांवरून घेतली आहे. हेमंतदांच्या सर्व गाण्यांची एकसंध यादी कुठेही उपलब्ध नाही, त्यामुळे खालील माहिती पूर्णतः अचूक नाही. पण खालील माहितीवरून नजर फिरवली तरी हेमंतदांच्या अफाट कामाचा आवाका लक्षात येतो आणि थक्क व्हायला होते.
Male Version with Subtitles
Video Courtesy: YouTube
Female Version
Video Courtesy: YouTube
या लिंकमध्ये हेमंतकुमार यांच्यावर २ अप्रतिम अभ्यासपूर्ण लेख N. Venkataraman यांनी लिहिलेले आहेत, त्या दोन्ही लेखांचा मला हा ब्लॉग लिहिताना खूप उपयोग झाला. आपण जरूर वाचा.
Hemantda with Geeta Dutt Photo Courtesy: Tripod.com |
Kishore Kumar, Hemant Kumar and Asha Bhosale (L to R) Courtesy : TheQuint.com |
1) Vande Mataram - Anand Math (1952) - Lata Mangeshkar - Lyricist Bankimchandra Chattopadhyay
2) Teri Yaad Mein Jalkar Dekh Liya - Naagin (1954) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna
3) Sakhi Ri Sun Bole Papeeha Us Paas - Miss Mary (1957) - Lata - Asha - Lyricist Rajendra Krishna (One of the few duets by Lata and Asha)
4) Khoyi Khoyi Ankhiyan Neend Bina - Chand (1959) - Lata Mangeshkar - Lyricist Shailendra
5) Kashti Ka Khamosh Safar Hai - Girl Friend (1961) - Kishore Kumar - Sudha Malhotra - Lyricist Sahir Ludhiyanvi MUST WATCH
8) O Bekarar Dil - Kohra (1964) - Lata Mangeshkar - Lyricist Kaifi Azami
10) Kuchh Dil Ne Kaha Kuchh Bhi Nahin - Anupama (1966) - Lata Mangeshkar - Lyricist Kaifi Azami
Hemantda's voice was unique, it was haunting, had a great baas and thus suited mostly to serious songs or Bhajans. However, he sang all types of songs in both Hindi and more so in Bengali.
Some of Hemantda's top Hindi songs own-composed:
1) Zindagi Ke Denewale - Naagin (1954) - Lyricist Rajendra Krishana
2) Na Yeh Chand Hoga Na Taare Rahenge - Shart (1954) - Lyricist S. H. Bihari
3) Chali Gori Pee Ke Milan Ko Chali - Ek Hi Raastaa (1956) - Lyricist Majrooh Sultanpuri
4) Raah Bani Khud Manzil - Kohraa (1964) - Lyricist Kaifi Azami
5) Tum Pukar Lo, Tumhara Intezar Hai - Khamoshi (1970) - Lyricist Gulzar
Hemantda has another distinction in that he has lent his voice to more than 100 songs under different Music Directors. There is no other composer-singer who has this record. E.g. S. D. Burman, Madan Mohan, C. Ramchandra and R. D. Burman were all singers as well as composers, but hardly sang songs under other Music Directors. He has sung 13 songs under S. D. Burman out of which 12 were for Dev Anand. Under C. Ramchandra, Hemantda has sung 9 songs in all.
Some of Hemantda's best songs under other Music Directors:
1) Yeh Raat Yeh Chandani Phir Kahan - Jaal (1952) - S. D. Burman - Lyricist Sahir Ludhiyanvi
3) Zameen Chal Rahi Hai - Pehli Jhalak (1954) - C. Ramchandra - Lyricist Rajendra Krishna
4) Chandan Ka Palna Resham Ki Dori - Shabab (1954) - Naushad - Lyricist Shakeel Badayuni
5) Main Garibon Ka Dil Hoon - Aab-E-Hayaat (1955) - Sardar Malik - Lyricist Hasrat Jaipuri
6) Kah Rahi Hai Zindagi - Jalti Nishani (1957) - Anil Biswas - Lyricist Qamar Jalalabadi
7) Ganga Aaye Kahan Se - Kabuliwala (1961) - Salil Chowdhury - Lyricist Gulzar (Rare Live Recording from BBC)
8) Raahi Tu Ruk Mat Jaanaa - Door Gagan Ki Chhaon Mein (1964) - Composer Kishore Kumar - Lyricist Shailendra (What a Surprise! Music Composer Kishore Kumar and Singer Hemant Kumar!!)
Hemantda's work in Bengali films is hugely commendable - both quantitatively and qualitatively. From 1940 to 1988, for 48 years, he composed around 700 songs for 146 films - out of which he sang around 300 songs as Solo or with other singers. He also sang around 275 songs under other composers.
Some of Hemantda's best Bengali songs:
3) Tumi Je Amar - Harano Sur (1957) - Singer Geeta Dutt - Lyricist Gauriprasanna Muzumder MUST WATCH for Geeta Dutt's wonderful rendition and for Suchitra Sen
4) Ashar Sraban Mane Na Tu Mon - Monihaar (1966) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt - (Flawless Bengali Rendition by the one and only Lata)
5) Ek Dinete Hoini Ami Tomader Ei Hemanta - Nakal Sona (1973) - MD Nachiketa Ghosh - Lyricist Gauriprasanna Muzumder (Rare Screen Appearance by Hemant Kumar, the actual song starts at 03:23)
8) Bose achi potho cheye - ShapMochan (1955) - Lyricist Bimal Chandra Ghosh (the film that helped Hemantda regain his position as Music Director for Bengali films)
9) Ei Meghla Dine Ekla - Shesh Parayanto (1960) - Lyricist Gauriprasanna Mazumder
10) Ai Path Jodi Shes Na Hoi - Saptapadi (1961) - Singers Sandhya Mukherjee and Hemant Kumar (one of the 100s of Uttam Kumar & Suchitra Sen songs - one of the most popular Bengali duets)
While gathering information about Hemant Kumar on the internet, I came across an article by R. Rangaraj in the Time Of India dated last year about Hemantda's contribution to Tamil films. It looks like he has composed around 20 Tamil songs. It started in 1954 when a Hindi film "Samrat" was being dubbed in Tamil as "Kaadhal Parisu", Hemant Kumar composed 6 songs. When the film "MissiAmma" originally made in Telugu and Tamil with music from S. Rajeshwarrao was being remade in Hindi with the name "Miss Mary" in 1957, Hemantda insisted that he would make fresh compositions except for one viz. "Brindavan Ka Krishna Kanhaiyya". He composed new tunes for "Miss Mary" and all songs became very popular. Even the great Tamil Composer Illiya Raja was inspired by Hemantda's "Kahin Deep Jale Kahin Dil" from the film "Bees Saal Baad" and composed his song "Vaazhve Maayamaa" for the film "Gayathri" in 1977.
From 1952 to 1970, Hemant da was composing music for Hindi and Bengali films in parallel. It must have been a herculean task to churn out fresh music every time, but if you really study his compositions from these 2 languages, you will realize that most of the compositions are fresh and not copy of each-other. Such was the mastery of Hemantda over the music. I have managed to compile following information based on the data that is available on https://www.hindigeetmala.net/ and https://www.songsofyore.com/category/singers/hemant-kumar/. It is very difficult to get information about all songs composed, sung by Hemant Kumar, hence the below information is not 100% accurate, however gives us an idea of the volume of work Hemantda did over the years.
Hemantda was awarded Padmashri in 1970 and Padma Bhushan in 1987; however he declined both the awards with utmost humbleness. In 1971, Hemantda received National Award as the Best Male Singer for his song in the Bengali film "Nimontron". He was also the recipient of Sangeet Natak Akadami award in 1986. In September 1989, Hemantda had travelled to Dhaka, Bangla Desh, for a concert. After returning from there, he suffered a Heart attack, and died on the 26th Sept 1989. His sudden death left a big void in both Bengali and Hindi film industries. However he is immortal through his compositions and songs, we still remember and miss him a lot.
It's not possible to cover Hemantda's entire work in on blog, however this is my humble attempt to do so. Hope you liked it. Thank you.
Today, I am presenting 2 of Hemantda's best compositions - one Hindi and other Bengali.
1) Havaaon Pe Likh Do, Havaaon Ke Naam - Do Duni Chaar (1970) - Singer Kishore Kumar - Lyricist Gulzar
The song starts with sound of the wind flowing in the jungle, followed by the entry of the Hero of the film Kishore Kumar wearing white Kurta and Dhoti. And what follows is a wonderful melodious tune of the song. Hemantda has used Sitar, Flute and Rhythm instruments quite beautifully in the song. Kishore's muscular voice has only added to the sweetness of the song. Do enjoy the video given just before the start of this English version.2) Ke Jeno Go Dekeche Aamaay - Monihar (1966) - Singer Hemant Kumar and Lata Mangeshkar - Lyricist Mukul Dutt
"Monihar" was one of the most popular Bengali films ni the '60s. It was a Multi-starrer movie with Soumitro Chatterjee, Biswajeet, Sandhya Roy, and Pahadi Sanyal as its cast. All the songs composed by Hemantda were very melodious. The song that I have presented has 2 versions - the Male version has Hemant Kumar as a major singer supported by Lata, while the Female version has exactly the opposite. In the Male version, Hemantda seems to have used only Tanpura and Tabla as accompanying instruments, while the Female version has Sarangi added to it. Another thing to note is that in both versions, the accompanying instruments do not overpower the voice. Enjoy the video given above just before the start of this English version.
Thank you. Have a great day.
Note: I have had to refer to various sources on the internet to collect information about Hemantda's songs; however in spite of this, it was not possible to get all the information. Hence there could be few errors in the numbers given. But it does give us an idea about the magnitude of Hemantda's work. Hope readers would understand and appreciate this.
References and Acknowledgement:
This link contains 2 excellent well-researched and long articles on Hemant Kumar by N. Venkataraman. I am quite grateful for the same.
लेख नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तम जमून आला आहे, इतक्या महान कलाकाराची एवढी माहिती आजपर्यंत मिळाली नव्हती.
ReplyDeleteधन्यवाद.
ReplyDeleteThanks buddy. Very much informative as usual.
ReplyDeleteThanks Buddy. Sorry, but pl identify yourself.
Deleteनमस्कार.. लेख वाचला छान माहिती आहे आणि सविस्तर मांडणी केली आहे प्रा अरुण बुलाख
ReplyDelete