Namaskar. This is a special blog which I would like to dedicate to all those who lost their lives in a cowardly terrorist attack at Pahalgam on 22nd April 2025 and also to our brave soldiers who are fighting a great battle on and across the border.
The English version of this blog follows the Marathi version below. Please leave your comment at the end of the blog with your name. Thanks.
वन्दे मातरम - आनंदमठ (१९५२) - गीतकार बंकिमचंद्र - संगीतकार आणि गायक हेमंतकुमार, गायिका लता मंगेशकर
![]() |
ऋषी बंकिमचंद्र |
![]() |
Photo Courtesy: Wikipedia |
हेमंतकुमार यांनी हे गीत भैरवी रागात बांधले आहे पण त्यात थोडा मालकंस रागही मिसळला आहे असे वाटते. गाण्याची सुरुवात हेमंतकुमार यांच्या आर्त स्वरांनी होते. पार्श्वभूमीवर हलकासा पियानो वाजतोय. १५ व्या सेकंदाला कोरस गायला लागते, लय बदलते, ठेका बदलतो आणि गाण्याला एकदम उठाव येतो. "मातरम" मधल्या "माSSS" या स्वरावरची छोटीशी हरकत खासच आहे, हे गाणे वीररसातले असल्याने त्याचा अनुभव येण्यासाठी दोन कडव्यांच्या मध्ये व्हायोलिन, ड्रम, तालवाद्य यांचा खुबीने वापर केला आहे.
दुसऱ्या कडव्यात मृदंग वाजताना ऐकू येतो. या कडव्यात संस्कृत आणि बंगाली या दोनही भाषांचा वापर केला आहे. शेवटच्या कडव्यात आपल्या मातृभूमीचे वर्णन करताना, तिला प्रणाम करताना त्या नायकाच्या झालेल्या व्याकुळ मनोवस्थेचे यथायोग्य दर्शन घडवण्यासाठी संगीतकाराने गीताची लय संथ केली आहे, जी कडवे संपताना कोरस मुखातून पुन्हा जलद होते. ही दोन्ही परिवर्तने (transformations) अप्रतिम आहेत.
"वन्दे मातरम" या गीताला आजपर्यंत अनेक जणांनी चाली लावल्या, सर्वच चाली उत्तम आहेत. पण चित्रपटातील हे गाणे हे प्रचंड गाजले. २००३ मध्ये BBC World Service ने १६५ देशातून केलेल्या सार्वकालीन सर्वोत्कृष्ट १० गाण्यांमध्ये लता मंगेशकर यांनी गायलेल्या याच गीताला दुसरे स्थान मिळाले होते (संदर्भ: विकिपीडिया)!लताचे हे गीत "आरंभ-स्वर" च्या व्याख्येत बसत नाही कारण स्वर आणि संगीत दोन्ही एकदमच सुरु होते. पण इथे सादर करण्याचे कारण दोन्ही गाणी एकत्र ऐकण्याचा आनंद काही औरच आहे. लताचे गाणे एकाच वेळेस आक्रमकता आणि करुणता यांनी ओतप्रोत भरलेले आहे. हे गाणे गीता बाली यांच्यावर चित्रित झाले आहे. मुद्राभिनयात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. शांतीच्या भूमिकेत गीता बाली यांनी जान ओतली आहे. त्यामुळे अभिनय आणि गायन या दोन्हींच्या जबरदस्त मिश्रणाने हे गाणे लाजवाब बनले आहे.
लताच्या आवाजातील "मातरम" या शब्दावर घेतलेली प्रत्येक तान लक्ष देऊन ऐकली तर त्यातले वेगळेपण (variation) लक्षात येईल, विशेषतः गाण्याच्या शेवटी हेमंतकुमार व लता दोघांनी एकापाठोपाठ घेतलेल्या ताना आणि त्यांचा प्रभाव जबरदस्त आहे.
चला तर ऐकू या हे अतिशय सुंदर वीररसाने भरलेले गीत - दोन्ही versions - हेमंतकुमार आणि लताचे.
ब्लॉगच्या शेवटी तुमची प्रतिक्रिया तुमच्या नावासहित लिहायला विसरू नका. धन्यवाद.
Vande Mataram - Anand Math (1952) - Lyricist Rishi Bankim Chandra - Composer Hemant Kumar - Singers Hemant Kumar and Lata Mangesh (each Solo)
The song in the film is
picturized on Pradeep Kumar (debut film) and Ajit (a notorious villain in Hindi
cinema). This is Hemant Kumar's first Hindi film as a musician. The film has 5
songs in total; of which Geeta Dutt has sung 2 solos and 2 duets. This
particular song is sung by Hemant Kumar and Lata Mangeshkar. The joy of both
songs is also different. Hemant Kumar's voice has the calmness and a sense of
soothing; while Lata's has the aggression and the passion that comes from the anger
of the character in the film.
Hemant Kumar has composed this
song in Raaga Bhairavi but it seems that he has mixed it with a little Raaga
Malkans. The song begins with Hemant Kumar's anguished voice. There is also
a light piano playing in the background. In the 15th second, the chorus starts
singing, the rhythm changes, the beat changes and the song takes off. As these
songs are from heroic songs and violin, drums and rhythm instruments are used
extensively in the three verses to give the experience of it.
In the second verse, you can hear
the drums playing. Both Sanskrit and Bengali languages are used in this
verse. In the last verse, the composer has slowed the rhythm of the song to
give a proper view of the hero's troubled mood as he describes his motherland
and bows to her. The rhythm becomes faster through the chorus singing at the
end of the verse. Both transformations are unparalleled.
Lata's songs do not fit the
definition of "Aarambha-Swar" because both the Swara and the
music start at the same time. But the reason for presenting it here is
something more than the pleasure of listening to both songs together. Lata's
songs are imbued with aggression and compassion at the same time. This song is
illustrated on Geeta Bali who was a master of facial expressions. Geeta Bali
has played the role of Shanti superbly.
If you listen carefully to every
melody on the word "Mataram" in Lata's voice, you will notice the
variation, especially the melody when both Hemant Kumar and Lata sing one after
the other towards the end of the song and its effect is mesmerizing to say the
least.
Let's listen to this very
beautiful heroic song - both versions - Hemant Kumar and Lata.
Please leave your comment at the end of the blog with your name. Thank you.