Sunday, 2 November 2025

आरंभ-स्वर ९ : आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ (Unparalleled Asha Bhosale)

 


Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.

Photo Courtesy
Wikipedia

मी मागे म्हटलं होतं तसं काही चित्रपट हे त्यातील गाण्यांमुळेच अधिक लक्षात राहतात. १९६८ साली आलेला "किस्मत" हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा दिग्दर्शक म्हणून हा पाचवा चित्रपट तर नायिका बबिता हिचा हा केवळ चौथा चित्रपट! त्यातल्या त्यात अनुभवी होता तो चित्रपटाचा नायक विश्वजित. चित्रपटाची कथा सुमार आणि अभिनय टुकार; असे असताना या चित्रपटाचं बलस्थान ठरलं ते ओ. पी. नय्यर यांनी दिलेले संगीत! चित्रपटात एकूण ५ गाणी; त्यातील "कजरा मोहब्बतवाला" हे गाणं तुफान गाजलं आणि आजही गाजतंय. याबरोबरच महेंद्र कपूर यांनी गायलेली "लाखों है यहाँ दिलवाले" आणि "आँखों में क़यामत के काजल" ही दोनही गाणी लोकप्रिय झाली. पण आशा भोसले यांनी गायलेले "आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ" हे गाणे आजही त्यांच्या सर्वोत्तम १० गाण्यांमध्ये गणले जाते.


ओ. पी. नय्यर १९५०-६० च्या दशकातले महत्वाचे आणि गाजलेले संगीतकार. १९५७ सालच्या "नया दौर" मुळे त्यांची आणि आशाजींची जोडी खऱ्या अर्थाने नावारूपाला आली. या जोडीने अनेक भन्नाट गाणी दिली आहेत उदा. "माँगके साथ तुम्हारा" (नया दौर - १९५७), "आइयें मेहरबाँ" (हावड़ा ब्रिज १९५८), "यह रेशमी ज़ुल्फ़ों का अँधेरा" आणि "जाईयें आप कहाँ जाएँगे" (मेरे सनम १९६५). १९६८ सालातील "किस्मत" हा ओ. पी. नय्यर आणि आशाजी यांच्या शेवटच्या काही चित्रपटांपैकी एक.

नायक विकी (विश्वजित) हा एक क्लबमध्ये गाणारा कलाकार असतो. योगायोगाने त्याची गाठ रोमाशी (बबिता) पडते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. एक दिवस रोमा विकीला नॅन्सी (हेलन) बरोबर बघते आणि तिचा गैरसमज होतो त्यामुळे ती दुःखी होऊन, दारू पिऊन पार्टीत गाणे म्हणते ते आज सादर करत असलेले गाणे "आओ हुज़ूर तुमको सितारों में ले चलूँ". कवी नूर देवासी यांचे शब्द आहेत.

प्रेमभंग झाल्यावर "आपण इतके वेडे कसे झालो होतो?" असा प्रश्न पडून नायिका स्वतःवरच चिडून उपरोधिक हसते आहे हे लक्षात घेऊन गाण्याची दमदार सुरुवात आशाजी करतात. हिंदीमध्ये फार थोडी गाणी ही हसण्याने सुरु झाली आहेत त्यातील हे एक. आणि मग सुरु होते १२ ओळींची छोटीशी बंदिश. "आरंभ-स्वर" च्या संकल्पनेत इतका मोठ्ठा आरंभ असलेले आजपर्यंतचे हे एकमेव गाणे आहे.

हम से रौशन हैं चाँद और तारे, हम को दामन समझिये ग़ैरत का
उठ गये हम गर ज़माने से, नाम मिट जायेगा मुहब्बत का
दिल है नाज़ुक कली से फूलों से, यह न टूटे ख़याल रखियेगा
और अगर आप से यह टूट गया, जान-ए-जां इतना ही समझियेगा ।।
क्या?
फिर कोई बाँवरी मुहब्बत की, अपनी ज़ुल्फ़ें नहीं सँवारेगी
आरती फिर किसी कन्हैया की, कोई राधा नहीं उतारेगी ।। 

यात अनेक ठिकाणी आशाजींनी अतिशय सुंदर अशा हरकती / मुरक्या घेतल्या आहेत त्या लक्ष देऊन ऐका उदा. "दामन ", "ग़ैरत", "नाजूक", "फुलों से" . पहिल्या ८ ओळींमध्ये नायिकेचा स्वाभिमान दिसतो तर "क्या?" या प्रश्नानंतर येणाऱ्या ४ ओळींमधून हळवेपणा. "फिर कोई बाँवरी मुहब्बत की" पासून गाण्याचा रंग आणि राग दोन्ही बदलतात. शब्दांच्या पाठीमागून गिटार/मेंडोलिन यांचे सतत वाजणारे स्वर नायिकेच्या मनातील आंदोलने व्यतीत करतात. तसेच "आरती फिर किसी कन्हैया की" या ओळीच्या पाठीमागे बासरीचे स्वर ऐकू येतात, हे विचार संगीतकार ओ. पी. नय्यर यांचे. अशा संगीत, शब्द आणि गायन यांच्या मिलाफातून एक सुंदर मैफल सुरु होते. यानंतर कानावर पडते ती गिटार आणि तालवाद्यांची जादू, आणि खरंच आपण कधी डोलायला लागतो ते आपले आपल्यालाच समजत नाही.

आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलूँ 
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर आओ ...।

दोन्ही कडव्यांतील संगीत रचनाही अफलातून आहे. सॅक्सोफोन जबरदस्त वाजलाय. दोन ओळींनंतर आशाबाईंनी आ हा हा ओ हो हो गाताना केवळ कमाल केली आहे! आणि काय ती हुकमी उचकी!! लाजवाब. 

हमराज़ हमख़याल तो हो, हमनज़र बनो
तय होगा ज़िंदगी का सफ़र, हमसफ़र बनो
चाहत के उजले-उजले नज़ारों में ले चलूँ 
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।

लिख दो किताब-ए-दिल पे कोई, ऐसी दास्तां
जिसकी मिसाल दे न सके, सातों आसमां
बाहों में बाहें डाले, हज़ारों में ले चलूँ
दिल झूम जाये ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।

दारू न पिता केवळ शब्दोच्चार आणि गायनातून दारू प्यायल्याचे भासवणे फक्त महान गायक/गायिकाच करू जाणे. बाई ग्रेट का आहेत हे समजते. दुर्दैवाने बबिताचा अभिनय इतका सुमार आहे की तो आशाबाईंच्या जबरदस्त गाण्याला न्याय देत नाही.

सोशल मीडियावर हे गाणे अनेक गायिकांनी गायचा प्रयत्न केला आहे. त्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण आजची एक आघाडीची गायिका मधुरा दातार हिने एका कार्यक्रमात केले आहे. तेही सोबत audio स्वरूपात देत आहे म्हणजे दोन्हीतील साम्य आणि फरक लक्षात येईल. मूळ गाण्यातील अनेक जागा मधुराने हुबेहूब घेतल्या आहेत. अप्रतिम ठेहराव आणि समरसून गायल्याबद्दल तिचे खूप कौतुक. फक्त लता-आशा यांची शारीरिक ताकद आणि ती गाण्यात Throw च्या रूपात परावर्तित करण्याचे त्यांचे सामर्थ्य हे दुसरे कोणी करू शकत नाही याची पुन्हा एकदा जाणीव होते. असो. तर ऐका ओ.पी.-आशा जोडीचे हे अफलातून, लाजवाब गाणे.  

तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आवडले तर तुमच्या संपर्कात शेअर करा. धन्यवाद.


मूळ आशा भोसले यांचे गाणे:



मधुरा दातार यांचे गाणे:





Namaskaar. As I had mentioned in one of my earlier blogs, some films are remembered more for their songs than for the films themselves. The 1968 movie Kismat is no exception. Directed by Manmohan Desai — his fifth film as a director — and starring Babita in only her fourth film role, its lead actor Biswajeet was the only experienced one among them. The story was mediocre, and the acting weak, but what made the film stand out was its music by O. P. Nayyar!

There were five songs in total, and among them, “Kajra Mohabbatwala” became a massive hit — and remains popular even today. Along with that, Mahendra Kapoor’s “Lakhon Hain Yahaan Dilwale” and “Aankhon Mein Qayamat Ke Kajal” were also quite popular. But Asha Bhosle’s “Aao Huzoor Tumko Sitaaron Mein Le Chalu” is still considered one of her ten best songs ever.

O. P. Nayyar was one of the most prominent and celebrated music composers of the 1950s and 1960s. His partnership with Asha Bhosle truly gained fame after Naya Daur (1957). Together, they gave several iconic songs — for example, “Maang Ke Saath Tumhara” (Naya Daur, 1957), “Aaiye Meherbaan” (Howrah Bridge, 1958), and “Yeh Reshmi Zulfon Ka Andhera” and “Jaiye Aap Kahan Jayenge” (Mere Sanam, 1965). Kismat (1968) was among the last few films that featured the O. P. Nayyar–Asha Bhosle duo.

The story follows Vicky (Biswajeet), a singer who performs in a club. By coincidence, he meets Roma (Babita), and they fall in love. One day, Roma sees Vicky with Nancy (Helen), misunderstands the situation, and, heartbroken, drinks at a party and sings — that song being “Aao Huzoor Tumko Sitaaron Mein Le Chalu”. The lyrics were written by poet Noor Devasi.

After heartbreak, the heroine laughs sarcastically at herself, as if asking, “How could I have been so foolish?” — and Asha Bhosle captures that emotion perfectly with a strong, expressive start. Very few Hindi songs begin with a laughter; this is one of them. Then comes a brief yet powerful 12-line verse — one of the longest and grandest “opening sections” (“आरंभ-स्वर”) in any Hindi song.

हम से रौशन हैं चाँद और तारे, हम को दामन समझिये ग़ैरत का
उठ गये हम गर ज़माने से, नाम मिट जायेगा मुहब्बत का
दिल है नाज़ुक कली से फूलों से, यह न टूटे ख़याल रखियेगा
और अगर आप से यह टूट गया, जान-ए-जां इतना ही समझियेगा ।।
क्या?
फिर कोई बाँवरी मुहब्बत की, अपनी ज़ुल्फ़ें नहीं सँवारेगी
आरती फिर किसी कन्हैया की, कोई राधा नहीं उतारेगी ।। 

Throughout the song, Asha Bhosle takes exquisite murkis (ornamental vocal turns) — listen closely to how she sings words like “Daman,” “Ghairat,” “Naajuk,” “Phoolon se.” The first eight lines reveal the heroine’s pride and defiance, while the lines following “Kya?” bring in tenderness and heartbreak. From “Phir koi banwari mohabbat ki”, the song’s tone and rhythm both changes. Behind the lyrics, the continuous strumming of guitar and mandolin expresses the emotional turbulence in the heroine’s heart. The flute that accompanies the line “Aarti phir kisi Kanhaiya ki” was a masterstroke by composer O. P. Nayyar. Together — music, lyrics, and vocals — create a truly magical composition. The guitar and percussion add rhythmic charm, making the listener sway without even realizing it.

आओ हुज़ूर तुमको, सितारों में ले चलूँ 
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर आओ ...। 

The orchestration in both stanzas is brilliant. The saxophone is spectacular. After two lines, when Asha Bhosle sings “Aa ha ha, o ho ho,” her control and flair are simply stunning — pure perfection!

हमराज़ हमख़याल तो हो, हमनज़र बनो
तय होगा ज़िंदगी का सफ़र, हमसफ़र बनो
चाहत के उजले-उजले नज़ारों में ले चलूँ 
दिल झूम जाए ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।

लिख दो किताब-ए-दिल पे कोई, ऐसी दास्तां
जिसकी मिसाल दे न सके, सातों आसमां
बाहों में बाहें डाले, हज़ारों में ले चलूँ
दिल झूम जाये ऐसी, बहारों में ले चलूँ
आओ हुज़ूर तुमको ...।।

To portray intoxication purely through voice and pronunciation — without being drunk — is something only truly great singers can do. That is what makes Asha Bhosle extraordinary. Unfortunately, Babita’s mediocre acting fails to do justice to Asha’s powerhouse singing.

Many singers have attempted this song on social media, but one of the finest renditions comes from contemporary singer Madhura Datar, who performed it live in a concert. Her version, also shared here in audio form, lets us compare the two. Madhura replicates several of Asha’s nuances beautifully, singing with great poise and depth. Yet it reminds us once again that the vocal strength and throw that legends like Lata Mangeshkar and Asha Bhosle possessed remain unmatched.

So, listen — and immerse yourself in this marvellous, timeless song by the O. P. Nayyar–Asha Bhosle duo:  “Aao Huzoor Tumko Sitaaron Mein Le Chalu.”

Please leave your comment on the blog and forward in your circles. Thank you.


5 comments:

  1. वा वा! सुरेख. ती ताकद आणि थ्रो कोणाला जमणारच नाही.

    ReplyDelete
  2. धनंजय नेहमीप्रमाणे अप्रतिम विश्लेषणात्मक ब्लॉग . मस्तच!!

    प्रशांत भागवत

    ReplyDelete
  3. Dil jai najuk ...wah

    ReplyDelete
  4. Shashikant Sadistap2 November 2025 at 14:46

    Some of the old songs like this are evergreen because of quality of song written, singers and pleasant music
    A very good blog...

    ReplyDelete

Hello, if you have liked my blog, please leave a comment with your name. Please feel free to share the link with your friends and families. Thank you.