Sunday, 1 June 2025

आरंभ-स्वर ४ : दिन है सुहाना आज पहली तारीख है (Rarest of the rare - Sudhir Phadke-Kishore Kumar combination)

 

Namaskar. The English version of this blog follows the Marathi version below. Please leave your comment at the end of the blog with your name. Thanks.

दिन है सुहाना आज पहली तारीख है - पहली तारीख (१९५४) - गीतकार क़मर जलालाबादी - संगीतकार सुधीर फडके - गायक किशोरकुमार

महिन्याची पहिली तारीख आणि रविवार असा सुवर्णयोग "आरंभ-स्वर" मालिकेसाठी क्वचितच येतो. याचे औचित्य साधत आज एक अनोखे गीत सादर करत आहे. अनोखे अशासाठी की एकतर सुधीर फडके आणि किशोरकुमार या संगीतकार-गायक जोडीचे हे एकमेव गाणे आहे, आणि तेही महिन्यातल्या एका दिवसावर म्हणजे पहिल्या तारखेवर! 

फ्रँक काप्रा या हॉलिवूड मधील प्रसिद्ध दिग्दर्शकाचा "It's a Wonderful Life" हा एक अफलातून संकल्पनेवर आधारलेला चित्रपट - साल १९४६. त्यातील नायक जॉर्ज (जेम्स स्टीवर्ट) आणि त्याचे सुखी कुटुंब अचानक आलेल्या आर्थिक संकटाने सैरभैर होतात. जॉर्ज "मी जन्मलोच नसतो तर बरे झाले असते" असे वाटून आत्महत्या करायला निघतो. तेंव्हा त्याला एक देवदूत वाचवतो आणि त्याच्याशिवाय जग कसे चालले आहे, ते जग किती सुंदर आहे हे दाखवतो. ते पाहून "एक नया अनमोल जीवन मिल गया" अशी तलत महमूदच्या एका जुन्या गाण्यासारखी जॉर्जची अवस्था होते आणि तो पुन्हा आपल्या कुटुंबात परततो, देवदूताच्या कृपेमुळे त्याच्यावरची सर्व संकटे दूर होतात आणि पुन्हा एकदा सर्वजण सुखी, आनंदी जीवनाचा आस्वाद घेतात. 

Courtesy: Cinemaazi-dot-com

राजा नेने निर्मित आणि दिग्दर्शित "पहली तारीख" हा चित्रपट १९५४ साली प्रदर्शित झालेला चित्रपट "It's a Wonderful Life" या चित्रपटाच्या सर्वस्वी विरुद्ध (उलटा) होता. शामलाल (स्वतः राजा नेने) अत्यंत गरिबीच्या परिस्थितीला कंटाळून शेवटी आत्महत्या करतो पण त्याच्या आत्म्याला स्वर्गात कोणी प्रवेश देत नाही; त्यामुळे तो भूत बनून परत एकदा पृथ्वीवर येतो. आता तो त्याच्या कुटुंबाची हलाखीची परिस्थिती बघतो पण काही करू शकत नाही. संपूर्ण चित्रपट हा दुःखाने भरलेला आहे, मात्र चित्रपटाच्या सुरुवातीला असणारे आजचे गाणे मात्र अतिशय गंमतीशीर आहे.

Qamar Jalabadi

आज सादर करत असलेले गीत लिहिले आहे ओमप्रकाश भंडारी उर्फ क़मर जलालाबादी यांनी. महिन्याच्या पहिल्या तारखेला होणाऱ्या पगारावर ज्यांचे आयुष्य अवलंबून असते त्यांच्या आयुष्यातील गमतीजमती यात आल्या आहेत. उदा. घरी लवकर या आणि मला सिनेमाला घेऊन चला असे सांगणारी बायको, महिन्याची उधारी फेडून घ्यायला आलेले लालाजी, सर्वांना पगार दिल्यावर तिजोरी रिकामी होणार म्हणून बेचैन झालेले सेठजी आणि आम्हाला खेळणी आणा असा हट्ट करणारी पोरं असे अनेक प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर घडताहेत असे शब्दांतून उभे केलेत!

Sudhir Phadke 

बाबूजींनी लावलेली प्रत्येक कडव्याची चाल वेगळी आहे, दोन अंतऱ्यांमधील संगीतही वेगवेगळे आहे. बाबूजींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा वेगळा प्रयोग केला आहे. मुख्यतः व्हायोलिन, तबला, ढोलकी आणि घुंगरू यांचा वापर करून बांधलेली चाल मजा आणते. या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे "बंदा बेकार है किस्मत की मार है" या कडव्याला पार्श्वसंगीतच नाहीये कारण प्रसंग दुःखाचा आहे, पार्श्वसंगीत वाजते ते थेट कडवे संपताना! बाबूजींच्या या कल्पकतेचे, संवेदनशीलतेचे कौतुक करायला हवे. सुधीर फडके यांच्या हिंदी चित्रपटांतील संगीत कारकिर्दीबद्दल मी माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहिले आहे. ते इथे वाचावे - सुधीर फडके - सव्यसाची संगीतकार-गायक.

Kishore Kumar

किशोरकुमारने आपल्या ताकदपूर्ण आवाजाने आणि हरकतींनी त्यात जादू भरली आहे. प्रत्येक कडव्यातील व्यक्तिरेखेत तो अक्षरशः घुसलाय उदा. "बंदा बेकार है किस्मत की मार है" म्हणताना त्याच्या आवाजातील दुःख किंवा "पांच आने का दस आना" म्हणताना केलेले मार्केटिंग किंवा "खिलौने जरा लाना" म्हणतानाचा त्याचा लहान मुलाचा स्वर कमाल आहे. किशोरकुमार शिवाय या गाण्याला कोणीही न्याय देऊ शकले नसते हे नक्की, त्यामुळे बाबूजींच्याही गायक निवडीला दाद द्यायला पाहिजे.

हे गाणे आजही रेडिओ सिलोनवर दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सकाळी ७:३० वाजता लागते! आणि दररोज ८ वाजता कार्यक्रमाच्या शेवटी कुंदनलाल सैगल (ज्यांना किशोरकुमार गुरु मानत असे) यांचे गाणे वाजते. गुरु आणि शिष्याला अशा प्रकारे अमर करणाऱ्या रेडिओ सिलोनचेही कौतुक करायला हवे.

ऐका तर एक गंमतशीर, चैतन्यपूर्ण गाणे. चित्रपटाचा अथवा गाण्याचा video उपलब्ध नसल्याने फक्त audio स्वरूपात ऐकावे लागेल, पण तरीही हे गाणे आपल्याला आवडेल अशी अशा आहे. कसे वाटले ते नक्की कळवा. धन्यवाद.


Din Hai Suhana, Aaj Pehli Taarikh Hai – Pehli Tarik (1954) – Lyricist Qamar Jalalabadi – Music Composer Sudhir Phadke – Singer Kishore Kumar

First day of the month, that too being a Sunday is a boon for the song series like "Aarambha-Swar" since I decided to present one song on the first Sunday of every month. The song presented today is peculiar in the sense it not only is the only song by the duo of Sudhir Phadke and Kishore Kumar, but also it is based on the events that happen in common man’s life on the 1st day of every month!

The year 1946 saw the release of an out-of-box movie in Hollywood viz. “It’s a Wonderful Life” directed by the famous director Frank Capra. The film’s hero George (James Stewart) and his happy family face a sudden economic crisis and they are in despair. George, out of frustration, thinks how better it would have been had he not born in first place, and decides to suicide. However, an Angel comes and saves him, and shows him how beautiful the world is. After this, George returns happily to his family and all ends well.

Courtesy
Cinemaazi-dot-com

The Hindi movie “Pehli Tarikh” released in 1954 was a realist inversion of “It’s a Wonderful Life”. It was an unusual story about the poor Shamlal (Raja Nene) who, faced with starvation, commits suicide. His soul is not admitted into heaven and he is condemned to return to earth as a disembodied spirit. He has to watch his family face starvation and imprisonment and, in the film’s climax, is unable to prevent his wife and daughter from committing suicide as well. The film helped establish Nirupa Roy’s realist image. It was remade in Kannada and Tamil (Modalatedi/Mudhal Thedi, 1955) by P. Neelakantan.


Qamar Jalalabadi 
The song that is being presented today was written by Omprakash Bhandari aka Qamar Jalalabadi. It was picturized on an actor viz. Maruti. The song describes various events that are dependent upon the salary being paid to the common man. The words are so powerful that one can visualize all the events. E.g. The wife who urges the husband to come home early and go for the movie, Lalaji who visits the house to recover the advance, a Sethji who is concerned about the left-over money after paying to his staff and last but not the least the kids who are after Papa to buy them toys.

Sudhir Phadke

Sudhir Phadke, who was popularly known as Babuji, has composed this song completely differently from his normal soothing style. Every Antara (stanza) and music between two Antaras are different. Violin, Tabla, Dholak and the jingling bells are prominently used. Another notable thing about the song is that the Antara viz. “Bandaa Bekaar Hai Kismat Ki Maar Hai” does not have any background music until it finishes since it’s the tragic moment which is being described. One must appreciate the apt understanding of the lyrics by the composer. Read my blog on Sudhir Phadke to understand his contribution to the Hindi cinema.

Kishore Kumar 

Kishore Kumar’s powerful yet cheerful voice has upped the level of the song. He has perfectly portrayed the character in every Antara through the correct use of his voice and tone. E.g. his voice saddens while singing “Bandaa Bekaar Hai Kismat Ki Maar Hai”, while singing the “Khilaune Zara Laanaa” line, he sounds a little kid!  The variation in his voice and tone are unbelievable! It’s hard to imagine anybody other than Kishore singing this song, hence even Babuji’s choice of singer must be appreciated.

The song was hugely popular and attained a cult status when Radio Ceylon started playing the song as the first song at 7:30am on the first day of every month, while ending the programme with Kundan Lal Saigal’s (whom Kishore considers his Guru) song. Thus, Radio Ceylon has immortalized both the Guru and Shishya in a peculiar way.

Let’s listen to the song in the audio form only since the video of song or movie is not available. However, I am sure you will still be able to enjoy it. Please do leave your feedback in the blog with your name. Thank you.


Sunday, 11 May 2025

विशेष आरंभ-स्वर ३ : वंदे मातरम


Namaskar. This is a special blog which I would like to dedicate to all those who lost their lives in a cowardly terrorist attack at Pahalgam on 22nd April 2025 and also to our brave soldiers who are fighting a great battle on and across the border.

The English version of this blog follows the Marathi version below. Please leave your comment at the end of the blog with your name. Thanks.


वन्दे मातरम - आनंदमठ (१९५२) - गीतकार बंकिमचंद्र - संगीतकार आणि गायक हेमंतकुमार, गायिका लता मंगेशकर

ऋषी बंकिमचंद्र
ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून साकारलेली "आनंदमठ" ही कादंबरी म्हणजे भारतीय साहित्यातील एक अजरामर कलाकृती आहे. १७७० च्या दशकात तत्कालीन बंगालमधील (आजचा बिहार, पश्चिम बंगाल व बांगला देश) योद्धा संन्याशांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध दिलेल्या यशस्वी लढ्याचे वर्णन यात आहे. गुरुदेवांच्या आनंदमठात हे संन्यासी अध्यात्माबरोबरच युद्धाचेही शिक्षण घेत असतात. बंगाल प्रांतात भीषण दुष्काळ पसरलेला असताना इंग्रज अधिकारी हे निर्दयपणे करवसुली करत असतात. त्याला प्राणपणाने विरोध करणारे योद्धे संन्यासी आणि इंग्रजांचे सैन्य यांच्यात लढाई होऊन संन्याशांचा विजय होतो. त्यानंतर विजयगीत म्हणून "वन्दे मातरम" हे गीत सर्वजण गातात असा प्रसंग आहे.

Photo Courtesy: Wikipedia
चित्रपटात हे गीत प्रदीप कुमार (पदार्पणाचा चित्रपट) आणि अजित (हिंदी चित्रपटातील कुख्यात खलनायक) यांच्यावर चित्रित झाले आहे. संगीतकार म्हणून हेमंत कुमार यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट. चित्रपटात एकूण ५  गाणी आहेत त्यातील गीता दत्त यांनी २ सोलो आणि २ द्वंद्वगीते गायली आहे. आज सादर करत असलेले हे गीत स्वतः हेमंतकुमार आणि लता यांनी वेगवेगळे सोलो गायले आहे. दोन्ही गीतांचा आनंदही वेगळा आहे. हेमंतकुमार यांच्या गाण्यात त्यांच्या गळ्यातील आर्तता, शांतता पुरेपूर उतरली आहे तर लताच्या गाण्यात संतापातून आलेली आक्रमकता आणि जोश आहे.

हेमंतकुमार यांनी हे गीत भैरवी रागात बांधले आहे पण त्यात थोडा मालकंस रागही मिसळला आहे असे वाटते. गाण्याची सुरुवात हेमंतकुमार यांच्या आर्त स्वरांनी होते. पार्श्वभूमीवर हलकासा पियानो वाजतोय. १५ व्या सेकंदाला कोरस गायला लागते, लय बदलते, ठेका बदलतो आणि गाण्याला एकदम उठाव येतो. "मातरम" मधल्या "माSSS"  या स्वरावरची छोटीशी हरकत खासच आहे, हे गाणे वीररसातले असल्याने त्याचा अनुभव येण्यासाठी दोन कडव्यांच्या मध्ये व्हायोलिन, ड्रम, तालवाद्य यांचा खुबीने वापर केला आहे. 

दुसऱ्या कडव्यात मृदंग वाजताना ऐकू येतो. या कडव्यात संस्कृत आणि बंगाली या दोनही भाषांचा वापर केला आहे. शेवटच्या कडव्यात आपल्या मातृभूमीचे वर्णन करताना, तिला प्रणाम करताना त्या नायकाच्या झालेल्या व्याकुळ मनोवस्थेचे यथायोग्य दर्शन घडवण्यासाठी संगीतकाराने गीताची लय संथ केली आहे, जी कडवे संपताना कोरस मुखातून पुन्हा जलद होते. ही दोन्ही परिवर्तने (transformations) अप्रतिम आहेत.

"वन्दे मातरम" या गीताला आजपर्यंत अनेक जणांनी चाली लावल्या, सर्वच चाली उत्तम आहेत. पण चित्रपटातील हे गाणे हे प्रचंड गाजले. २००३ मध्ये BBC World Service ने १६५ देशातून केलेल्या सार्वकालीन सर्वोत्कृष्ट १० गाण्यांमध्ये लता मंगेशकर यांनी गायलेल्या याच गीताला दुसरे स्थान मिळाले होते (संदर्भ: विकिपीडिया)!

लताचे हे गीत "आरंभ-स्वर" च्या व्याख्येत बसत नाही कारण स्वर आणि संगीत दोन्ही एकदमच सुरु होते. पण इथे सादर करण्याचे कारण दोन्ही गाणी एकत्र ऐकण्याचा आनंद काही औरच आहे. लताचे गाणे एकाच वेळेस आक्रमकता आणि करुणता यांनी ओतप्रोत भरलेले आहे. हे गाणे गीता बाली यांच्यावर चित्रित झाले आहे. मुद्राभिनयात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. शांतीच्या भूमिकेत गीता बाली यांनी जान ओतली आहे. त्यामुळे अभिनय आणि गायन या दोन्हींच्या जबरदस्त मिश्रणाने हे गाणे लाजवाब बनले आहे.

लताच्या आवाजातील "मातरम" या शब्दावर घेतलेली प्रत्येक तान लक्ष देऊन ऐकली तर त्यातले वेगळेपण (variation) लक्षात येईल, विशेषतः गाण्याच्या शेवटी हेमंतकुमार व लता दोघांनी एकापाठोपाठ घेतलेल्या ताना आणि त्यांचा प्रभाव जबरदस्त आहे. 

चला तर ऐकू या हे अतिशय सुंदर वीररसाने भरलेले गीत - दोन्ही versions - हेमंतकुमार आणि लताचे.

ब्लॉगच्या शेवटी तुमची प्रतिक्रिया तुमच्या नावासहित लिहायला विसरू नका. धन्यवाद.


Hemant Kumar version:


Lata Mangeshkar version:



Vande Mataram - Anand Math (1952) - Lyricist Rishi Bankim Chandra - Composer Hemant Kumar - Singers Hemant Kumar and Lata Mangesh (each Solo)


The novel "Anandamath" by Rishi Bankim Chandra Chattopadhyay is an immortal masterpiece of Indian literature. It describes the successful struggle of the warrior Sanyasis in the then Bengal (today's Bihar, West Bengal and Bangladesh) against the oppressive British rule in the 1770s. In Gurudev's Anand Math, these Sanyasis are learning warfare along with spirituality. The British officers were collecting taxes ruthlessly when there is a severe famine in the province of Bengal. The Sannyasis won the battle between the warriors who were bitterly opposed to him and the British army. After that, the song "Vande Mataram" is sung as a victory song.

The song in the film is picturized on Pradeep Kumar (debut film) and Ajit (a notorious villain in Hindi cinema). This is Hemant Kumar's first Hindi film as a musician. The film has 5 songs in total; of which Geeta Dutt has sung 2 solos and 2 duets. This particular song is sung by Hemant Kumar and Lata Mangeshkar. The joy of both songs is also different. Hemant Kumar's voice has the calmness and a sense of soothing; while Lata's has the aggression and the passion that comes from the anger of the character in the film.

Hemant Kumar has composed this song in Raaga Bhairavi but it seems that he has mixed it with a little Raaga Malkans. The song begins with Hemant Kumar's anguished voice. There is also a light piano playing in the background. In the 15th second, the chorus starts singing, the rhythm changes, the beat changes and the song takes off. As these songs are from heroic songs and violin, drums and rhythm instruments are used extensively in the three verses to give the experience of it.

In the second verse, you can hear the drums playing. Both Sanskrit and Bengali languages ​​are used in this verse. In the last verse, the composer has slowed the rhythm of the song to give a proper view of the hero's troubled mood as he describes his motherland and bows to her. The rhythm becomes faster through the chorus singing at the end of the verse. Both transformations are unparalleled.

"Vande Mataram" has been sung by many people till date, all of them are excellent. But these songs in the film were hugely popular. In 2003, the same song by Lata Mangeshkar was ranked second in the BBC World Service's list of the top 10 songs of all-time greats from 165 countries (reference: Wikipedia)!

Lata's songs do not fit the definition of "Aarambha-Swar" because both the Swara and the music start at the same time. But the reason for presenting it here is something more than the pleasure of listening to both songs together. Lata's songs are imbued with aggression and compassion at the same time. This song is illustrated on Geeta Bali who was a master of facial expressions. Geeta Bali has played the role of Shanti superbly.

If you listen carefully to every melody on the word "Mataram" in Lata's voice, you will notice the variation, especially the melody when both Hemant Kumar and Lata sing one after the other towards the end of the song and its effect is mesmerizing to say the least.

Let's listen to this very beautiful heroic song - both versions - Hemant Kumar and Lata.

Please leave your comment at the end of the blog with your name. Thank you.


Sunday, 4 May 2025

आरंभ-स्वर २ : सखी री सुन बोले पपीहा उस पार (Lata-Asha Rare Duet)

 

Namaskar. The English version of this blog follows the Marathi version below. Please leave your comment at the end of the blog with your name. Thanks.

सखी री सुन बोले पपीहा उस पार - मिस मेरी (१९५७) - गीतकार राजेंद्र कृष्ण - संगीतकार हेमंतकुमार - गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले

आज एक असे गीत सादर करत आहे जे बऱ्याच जणांनी फारसे ऐकले नसेल. हे गीत आहे १९५७ साली आलेल्या "मिस मेरी" या चित्रपटातील. या गीताचे वैशिष्ट्य म्हणजे लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन बहिणींचे दुर्मिळ असे द्वंद्वगीत. या चित्रपटाचे कथाबीजच वेगळे होते. एक अविवाहित तरुण स्त्री केवळ चांगली नोकरी मिळावी म्हणून एका अनोळखी पुरुषाची बायको असल्याचे नाटक करते ही कल्पना त्या काळात करणे केवळ अशक्य होते. हा चित्रपट १९५५ साली आलेल्या तेलगू-तामिळ भाषेतील "मिसम्मा" किंवा "मिसिअम्मा" या चित्रपटाचा रिमेक होता. गंमत म्हणजे हे दोन्ही चित्रपट १९३५ सालच्या "Maanmoyee Girls' School" या चित्रपटाचे रिमेक होते. याच बंगाली चित्रपटावरून दिग्दर्शक अनंत माने यांनी १९५७ साली "झाकली मूठ" हा मराठी चित्रपट बनवला होता! हिंदी आवृत्तीत प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहेत त्या काळातील दक्षिण भारतीय चित्रपटातील सुपरस्टार जेमिनी गणेशन (यांचीच मुलगी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा). किशोरकुमारची भूमिका नायकाची नसली तरी भाव खाऊन जाते. असो.

"मिस मेरी" या चित्रपटात एकूण १० गाणी आहेत. त्यापैकी मोहम्मद रफी यांनी एकूण ४ गाणी तर लता मंगेशकर यांनी एकूण ६ गाणी गायली होती. हेमंतकुमार यांचे या चित्रपटासाठी दिलेले संगीत हे त्यांच्या नेहमीच्या शैलीपेक्षा संपूर्णतः वेगळे आहे. हेमंतकुमार यांच्या संगीत कारकिर्दीचा आढावा मी त्यांच्यावरील ब्लॉगमध्ये याआधीच घेतला आहे. तो इथे वाचता येईल.

Lyrics Courtesy: https://lyricsindia.net/songs/2340

"सखी री सुन बोले पपीहा उस पार" गाणे सुरु होते लताच्या गोड तानेने, पडद्यावर दिसतो तो मिस मेरीचा म्हणजेच मीनाकुमारीचा सुंदर, सोज्ज्वळ आणि प्रसन्न चेहरा. तिची केशभूषाही त्या काळाला शोभेशी. ती तिच्या शिष्येला गाणे शिकवत असतानाच प्रसंग. गुरुसाठी म्हणजेच मीनाकुमारीसाठी हेमंतकुमारांनी वापरलाय लताचा आवाज तर शिष्येसाठी आशाचा. 

हे गाणे हेमंतकुमार यांनी खमाज रागात बांधले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ती एक चीजच वाटते. मूळ तेलुगू/तामिळ गाण्यात कर्नाटक संगीतातील राग सुधारस वापरला आहे (मी पहिल्यांदाच ऐकले या रागाचे नाव), पण हेमंतकुमार यांची चाल मूळ गाण्यापेक्षा वेगळी आहे. गीतकार राजेंद्रकृष्ण यांनी चीजेला साजेशी अशी सुंदर संस्कृतप्रचुर हिंदी शब्दरचना केली आहे. "बारम्बार" हा शब्द मी तरी गाण्यामध्ये प्रथमच ऐकला आहे 😃

सुरुवातीला लताचे धृपद आहे, साधारण ४० व्या सेकंदाला आशा धृपद गायला सुरुवात करते. आणि आपल्या लक्षात येतं की आशाने लताच्या तोडीस तोड गायलं आहे! पुढील गाणे म्हणजे सरगम, आलापी आणि शेवटी २ मिनिटे आणि ३८ सेकंदांपासून गाण्याची जलद लय आणि त्या लयीत घेतलेल्या पल्लेदार ताना यांची मेजवानीच आहे जणू.  आशाची शेवटची ७-८ सेकंदांची जबरदस्त तान या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. लता आणि आशाशिवाय या गाण्याची कल्पना करणे सुद्धा अशक्य आहे. त्या दोघींची कमालीची एकरूपता (synchronization) हे या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य वाटते. तर असे हे गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.


Sakhi Ri Sun Bole Papiha Us Paar – Miss Mary (1957) – Lyricist Rajendra Krishna – Music Composer Hemant Kumar – Singers Lata Mangeshkar and Asha Bhosale

Today in “Aarambha-Swar”, I am presenting a song which many would not have heard before. It’s a rare duet sung by two of the legendary singers – Lata and Asha. The 1957 movie “Miss Mary” was an exceptional movie from the story point of view in the sense that it showed an unmarried woman pretends to be married (to a completely unknown man) just to get a job! No one could have imagined this situation in 1957.

The Hindi movie was a remake of a Telugu movie viz. “Missamma” and a Tamil movie “Missiamma”. Howevr what was more interesting was that both these movies were itself a remake of a 1935 Bengali movie "Maanmoyee Girls' School"! Director Anant Mane had made a Marathi Movie viz. “Zakali Mooth” in 1957 based on this Bengali movie. The Hindi movie had cast the then Superstar of Tamil film industry Gemini Ganesan (well known actor Rekha’s father) as the male lead. Kishore Kumar also stars in the movie. Though he is not in the main role, his performance is impactful.

“Miss Mary” contained 10 songs. Mohammad Rafi had sung 4 of them while Lata rendered her voice to 6. The music composed by Hemant Kumar is surprisingly very different than his style, far from Bengali music influence. In one of my earlier blogs on Hemant Kumar, I had discussed in detail his entire work for Hindi films. You can read it here.

Lyrics Courtesy: https://lyricsindia.net/songs/2340

The song “Sakhi Ri Sun Bole Papiha Us Paar” starts with a beautiful Taan by Lata. Song was picturized on Meena Kumari, who unlike her usual tragic roles, has performed quite a comic, romantic role in this movie! In the song, Miss Mary (Meena Kumari) is teaching music to her disciple. Hemant Kumar has used Lata’s voice for the Guru (Meena Kumari) while Asha renders her voice for the disciple.

The song was composed in the Raaga Khamaj. When we listen to it, it sounds like a pure classical rendering. The original Telugu/Tamil songs were composed in Raaga Sutharas (I heard this name for the first time!). However, the Hindi composition by Hemant da is different than the original ones. The legendary Lyricist – Rajendra Krishna – pens a beautiful poem (if I may call it so) in Sanskritized Hindi. I heard the word “Barambar” (i.e. often) used in a Hindi song for the first time.

Lata starts the song, and after about 35 seconds comes Asha’s turn. Then one realizes that Asha has matched Lata in her singing prowess. The song is full of Sargam and Aalaap. From 02:38 minutes, the song picks up a fast rhythm. Both Lata and Asha deliver the long Taanas which sound so lovely. Asha ends the song with her 7-8 seconds Taan which carries the song to a different level altogether.

It is impossible to imagine this song to be sung by anyone else other than Lata and Asha, such is their mastery and skilfulness. The synchronization between the two great singers in this song is something to be cherished. Hope you will enjoy the song. Thank you.