Friday, 1 May 2020

A Tribute to Balraj Sahni and Manna Dey

Namaskaar Friends,

Balraj Sahni                   Manna Dey
Image Courtesy : thesongpedia.com
Today is 1st May - known as the World Labour Day. However in Film/Music circles, this day is remembered as the birth anniversary of a great actor - late Balraj Sahni and a great Singer - late Manna Dey. Thus, I am going to present a song today which feature Balraj Sahni and sung by Manna Dey.


English version of the blog is right after the Marathi version below.


आज १ मे. जागतिक कामगार दिन. जगातील समस्त कामगार वर्गाच्या मेहनतीला सलाम करण्याचा हा दिवस. कामगार शब्द आला की आपल्याकडे आजही कम्युनिस्ट आठवतात, आपल्याला आवडो वा ना आवडो. आणि काय योगायोग आहे पहा, आजच्याच दिवशी १९१३ साली विचाराने डाव्या/कम्युनिस्ट नास्तिक असलेल्या बलराज साहनी यांचा जन्म व्हावा! आणि नंतर सहा वर्षांनी म्हणजे १९१९ साली याच दिवशी कामगार/दुःखी/पीडित अशा लोकांची गाणी गाणाऱ्या मन्ना डें यांचाही जन्म व्हावा!!


Damayanti and Balraj Sahni
युधिष्ठिर उर्फ बलराज साहनी यांचा जन्म आता पाकिस्तानात असलेल्या रावळपिंडी इथला. हिंदी विषयात पदवी आणि इंग्रजी साहित्य या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर थोड्याच दिवसात बलराज साहनी यांनी दमयंती साहनी यांच्याशी विवाह केला. १९३० च्या दशकात काही काळ या दोघांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन येथील विश्व भारती विद्यापीठात शिक्षकाच्या नोकऱ्या केल्या.

पण मुळातली अभिनयाची  आवड त्यांना शांत बसू देईना. १९४६ साली प्रदर्शित झालेला "दूर चलें" हा त्यांचा पहिला चित्रपट. यात त्यांची प्रत्यक्षातील बायको - दमयंती - यांनी पण काम केले होते. त्यानंतर "धरती के लाल" (१९४६), "गुडिया" (१९४७), "हम लोग", "हलचल" (१९५१) असे ४-५ चित्रपट त्यांनी केले होते.

Image Courtesy: Wikipedia
पण त्यांच्या कामाची खऱ्या अर्थाने दखल घेतली गेली ती बिमल रॉय यांनी दिग्दर्शित केलेल्या "दो बिघा जमीन" या १९५२ साली आलेल्या चित्रपटातील त्यांच्या शंभू महातो या शेतकऱ्याच्या प्रमुख भूमिकेमुळे. दुष्काळामुळे अडचणीत आलेला शेतकरी शंभू आणि त्याची पिळवणूक/शोषण करणारा जमीनदार ठाकूर हरनाम सिंग यांच्यातील संघर्ष चित्रपट दाखवतो. बलराज साहनी यांनी जीव ओतून केलेल्या या भूमिकेमुळे चित्रपटाला Cannes आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये पारितोषिक मिळाले होते.

In "Lajwanti"
Image Courtesy: Wikipedia
या यशानंतर बलराज साहनी यांचे एकापेक्षा एक बहारदार अभिनयाने नटलेले चित्रपट येत गेले. १९५५ साली आलेले "सीमा", "गरम कोट", १९५८ सालचा गाजलेला चित्रपट नर्गिस बरोबरचा "लाजवंती", १९५९ - "सट्टा बाजार", "छोटी बहन", १९६० - "दिल भी तेरा हम भी तेरे" आणि "अनुराधा" (पंडित रविशंकर यांचे अप्रतिम संगीत), १९६१ साली प्रदर्शित झालेले "भाभी की चूड़ियां" (नायिका - मीना कुमारी, संगीत - सुधीर फडके, ज्योती कलश छलके सारखे अजरामर गीत) आणि "काबुलीवाला"
(संगीत - सलील चौधरी, ऐ मेरे प्यारे वतन सारखे गाणे). १९६२ - "अनपढ", १९६४ - "हकीकत", १९६५ - "वक्त", १९६७ - "हमराज", १९६९ - "एक फूल दो माली" हे त्यांचे गाजलेले काही चित्रपट. १९७३ साली प्रदर्शित झालेला "गर्म हवा" हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. १९४६ ते १९७३ अशा २७ वर्षांच्या कारकिर्दीत बलराज साहनी यांनी अंदाजे ८५ चित्रपटात विविध भूमिका केल्या. त्यातील बहुतांशी भूमिका या त्यांच्या स्वभावाला अनुसरून गंभीर धाटणीच्या होत्या.

त्यांच्या अभिनयाचे वर्णन अतिशय नैसर्गिक अभिनय असेच करावे लागेल. बऱ्याच भूमिका जणू ते जगताहेत असेच वाटायचे. मोतीलाल, संजीव कुमार, जॉनी वॉकर अशा काही मोजक्याच अभिनेत्यांना ही देणगी लाभली होती.

त्यांचा मुलगा परीक्षित साहनी यांनी एका मुलाखतीत असे सांगितले आहे की बलराजजींचे त्यांच्या मुलीवर - शबनमवर - निरतिशय प्रेम होते. ती अचानक गेल्यामुळे त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला होता; त्यातून सावरण्यासाठी त्यांनी अनेक चित्रपट sign केले. त्यावेळी जो माणूस (बलराज साहनी) एके काळी दास कॅपिटल सारखा ग्रंथच फक्त हातात घ्यायचा, त्याने गुरुग्रंथसाहिबा पण वाचायला सुरुवात केली होती. दुःखामध्ये माणसाला फक्त देवाचं आठवतो याचे हे आणखी एक उदाहरण (अपवाद फक्त श्रीराम लागूंचा!).

परीक्षित साहनी पुढे म्हणतात: हळू हळू ते धक्क्यातून बाहेर आले; पण "गर्म हवा" चित्रपटात बलराज साहनी यांच्या सलीम मिर्झा या व्यक्तिरेखेची मुलगी - अमीना - आत्महत्या करते असा प्रसंग होता. तो प्रसंग अभिनीत करताना बलराज साहनी यांना त्यांच्या मुलीचे - शबनमचे - निधन आठवत होते; त्यामुळे तो प्रसंग त्यांनी अक्षरशः पुन्हा जगला. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला; व चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही महिन्यातच बलराज साहनी यांचे निधन झाले.

"गर्म हवा" या चित्रपटाला १९७४ साली Cannes आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात Golden Palm पारितोषिक मिळाले.

अशा रीतीने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या अशा दोन्ही चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळण्याचे अनोखे भाग्य बलराज साहनी यांच्या वाट्याला आले; पण दुर्दैवाने त्याआधीच ते हे जग सोडून गेले होते.

बलराज साहनी यांच्या स्मृतीला अभिवादन.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

प्रबोधचंद्र उर्फ मन्ना डे - हिंदी चित्रपट संगीतातील एक अग्रगण्य नाव. १९४२ ते २००६ अशी तब्बल ६४ वर्षे हिंदी चित्रपट संगीतातील मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, हेमंत कुमार, तलत महमूद अशा दिग्गजांशी टक्कर देत स्वतःचे  स्थान आणि गाण्याचा एक स्वतंत्र Genre निर्माण करायचा ही काही सोपी गोष्ट नव्हती, पण मन्ना डे यांनी अपार मेहनत आणि जिद्दीच्या बळावर ते साध्य करून दाखवले. हिंदी, मराठी, बंगाली, आसामी, गुजराथी अशा एकूण पंधरा भाषांमधून अंदाजे २०००-२५०० गाणी गायली आहेत. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची अनेक गाणी आपल्या ओठांवर आहेत ही त्यांच्या गानकौशल्याच्या यशस्वितेची पावतीच आहे.

प्रबोधचंद्र डे नावाचा एक बंगाली तरुण वयाच्या २३व्या वर्षी आपल्या सुप्रसिद्ध काका संगीताचार्य कृष्णचंद्र डे यांच्याबरोबर मुंबईत संगीत क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी येतो. पण पहिली जवळपास ८ वर्षे खूप खडतर जातात, काम मिळत नाही, सगळे studios पालथे घालून झाले तरी कोणीही काम देत नाही. शेवटी १९५० साली प्रदर्शित झालेल्या "मशाल" चित्रपटातील "उपर गगन विशाल" हे मन्ना डे यांनी गायलेले गाणे प्रचंड गाजले. या चित्रपटाला S. D. बर्मन यांनी संगीत दिले होते; याच चित्रपटात लता मंगेशकर प्रथम बर्मनदांकडे गायली.

With Raj Kapoor
राजकपूर यांच्या अनेक चित्रपटांतून महत्वाची गाणी मन्ना डे यांच्या वाट्याला आली. उ. दा. "तेरे बिना आग ये चांदनी" (आवारा - १९५१ - सहगायिका लता मंगेशकर), "ठहर जरा ओ जानेवाले" (बूटपॉलिश - १९५४ - सहगायिका - आशा भोसले), "दिल का हाल सुने दिलवाला" (श्री ४२० - १९५५), "आजा सनम मधुर चाँदनी में हम", "जहाँ मैं जाती हूँ वहीँ चले आते हो", "ये रात भीगी भीगी" (चोरी चोरी - १९५६ - सहगायिका - लता मंगेशकर), "मस्ती भरा है समा" (परवरिश - १९५८ - सहगायिका - लता मंगेशकर), "चलत मुसाफिर मोह लिया रे" (तीसरी कसम - १९६६) आणि "ए भाई जरा देखके चलो" (मेरा नाम जोकर - १९७०).

मन्ना डे यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत शास्त्रीय ढंगाची गाणी ही बहुतांश वेळा गायली. अनेक संगीतकार जेंव्हा रागदारी असलेले गाणे बांधायचे, तेंव्हा मन्ना डे यांचाच विचार गायक म्हणून करायचे. उ. दा.

१. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले - बसंत बहार - शंकर जयकिशन - सहगायक भीमसेन जोशी
२. रितू आये रितू जाए सखी री - हमदर्द - अनिल विश्वास - सहगायिका लता मंगेशकर
३. फूल गेंदवा ना मारो - दूज का चाँद - रोशन
४. तुम बिन जीवन कैसा जीवन - बावर्ची - मदनमोहन
५. आयो कहाँ से घनश्याम - बुढ्ढा मिल गया - आर. डी. बर्मन
६. एक ऋतु आये एक ऋतु जाए - सौ साल बाद - लक्ष्मीकांत-प्यारेलाल - सहगायिका लता मंगेशकर

From L to R:
Madan Mohan, Mohd. Rafi, Manna Dey and Mahendra Kapur
Image Courtesy : learningandcreativity.com
तसेच त्यांच्या वाट्याला कष्टकरी, दुःखी, पीडित लोकांचे दुःख मांडणारी गाणीही आली. (उ. दा. "दिल का हाल सुने दिलवाला" [श्री ४२०], "उपर गगन विशाल" [मशाल - १९५०], "पूछो न कैसे मैंने रैन बिताई" [मेरी सूरत तेरी आँखें], "धरती कहे पुकारके" [दो बिघा जमीन], "तू प्यार का सागर है" [सीमा], इ.)

मन्ना डे यांच्यात एक संगीतकारही दडलेला होता. त्यांनी एकूण १८ चित्रपटांना संगीत दिले, एकूण ११४ गाणी संगीतबद्ध केली. परंतु यातील बहुतांश चित्रपट हे पौराणिक असल्याने त्यातील गाण्यांची फारशी दखल घेतली गेली नाही. "चमकी", "तमाशा" (देव आनंद आणि मीना कुमारी) आणि "नैना" (अभि भट्टाचार्य, गीता बाली) या १९५२-५३ साली आलेल्या चित्रपटातील गाणी मात्र सांगीतिक दृष्ट्या उच्च दर्जाची होती. त्यांच्यातील संगीतकाराची एक झलक या गाण्यांमध्ये बघा - "तमाशा" (१९५२) चित्रपटातील सर्व गीते.

१९९२ नंतर मन्ना डे यांनी गाणे कमी केले. भारत सरकारने त्यांना १९७१ साली पद्मश्री किताबाने, २००५ साली पद्मभूषण किताबाने गौरवित केले. २००७ साली त्यांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. २४ ऑक्टोबर २०१३ रोजी ते आपल्याला सोडून गेले, पण त्यांच्या गाण्यांनी त्यांचे नाव अजरामर केले आहे. त्यांच्या स्मृतीला वंदन.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आजचा लेख हा बलराज साहनी आणि मन्ना डे दोघांच्याही स्मृती जागवणारा असल्याने त्या दोघांची एकत्र गाणी पाहू या (अभिनेते - बलराज साहनी आणि गायक - मन्ना डे) :

१. तू प्यार का सागर है - सीमा (१९५५) - शंकर-जयकिशन
२. फिर मिलेंगे जानेवाले यार दसविदानिया - परदेसी (१९५७) - अनिल विश्वास
३. ऐ मेरे प्यारे वतन ऐ मेरे बिछड़े चमन - काबुलीवाला (१९६१) - सलील चौधरी
४. तुझे सूरज कहूँ या चंदा - एक फूल दो माली (१९६९) - रवी
५. मन्ना डे आणि बलराज साहनी यांना रेडिओ सिलोनने वाहिलेली श्रद्धांजली - Audio only

आज मी या दोघांचे एक सदाबहार गीत तुमच्यासाठी घेऊन आलोय. हे गीत आहे १९६५ साली आलेल्या "वक्त" या चित्रपटातील. गीत लिहिलंय साहिर लुधियानवी यांनी, तर संगीतकार आहेत रवी. गीत आहे "ऐ मेरी जोहराजबीं". हे गाणे रवी यांनी पिलू रागात बांधले आहे. असं म्हणतात की या गाण्याची चाल रवी यांनी अफगाणिस्तानातील उस्ताद अब्दुल गफूर ब्रेशना यांच्या एका कव्वालीवरून घेतली आहे.

या गाण्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ती अशी -
  • बलराज साहनी जे एरवी अतिशय गंभीर भूमिकेत दिसायचे ते या गाण्यात त्यांच्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध अशा एकदम रंगेल अवतारात दिसतात !
  • मन्ना डे ज्यांनी एरवी गंभीर, शास्त्रीय ढंगाची गाणी गायली आहेत, त्यांनी हे गाणे अतिशय मोकळेपणाने (हिंदीत ज्याला "खुलके" असं म्हणतात) गायलंय,  या गाण्याचा Genre पण मन्ना डे यांच्या सांगीतिक प्रकृतीच्या अगदी विरुद्ध आहे !
  • ह्या गाण्यातील नायिका अचला सचदेव यांची व्यक्तिरेखा एका प्रौढ बाईची आहे. १९६५ सालाच्या काळात एखाद्या प्रौढ बाईवर अशा प्रकारचे रंगेल गाणे चित्रित करणे हे खूप धाडसाचे होते !
  • या गाण्याचे गीतकार साहिर लुधियानवी ज्यांनी एरवी अतिशय गंभीर, तत्वज्ञान सांगणारी गीते लिहिली आहेत, त्यांनी एक अनोखे असे प्रेमगीत लिहिले आहे !
  • "वक्त" हा चित्रपट त्या काळातला Multi-Starrer चित्रपट असूनही, आणि एक से एक गाणी मुख्य नायक आणि नयिंकावर असूनही, हे गाणे जे चरित्र अभिनेत्यांवर चित्रित झाले आहे, चित्रपटातील सर्वात गाजलेले गाणे आहे !
तर मग पाहा, ऐका आणि आनंद घ्या एका सदाबहार गाण्याचा. धन्यवाद.





Today on the 1st May, we salute all the working class and labourers of the world. In India, we recognize the word "Labour" to be associated with the historic Communism movement. Thus, what a coincidence it's been that on this very day, an artist who was a Communist and aethiest by heart was born in 1913; and six years later in 1919, another legend - Manna Dey - was born - who has been the musical voice of the downtrodden and laborers in the Hindi film songs!

Image Courtesy : pinterest.com

Yudhishthir aka Balraj Sahni was born in a small city viz. Rawalpindi in the undivided India - now in Pakistan. He did his graduation in Hindi and post graduation in English Literature. At the tender age of 23, in 1936, he married Damayanti Sahni. Towards end of '30s, both Balraj and Damayanti came to Shantiniketan in West Bengal and served as Teachers at the Vishwa Bharati University founded by Rabindranath Tagore.

However, after a few years, Balraj decided to try his luck in the Film industry since he desperately wanted to become an actor. In 1946, he acted in his first ever film viz. "Door Chalen" wherein his real wife Damayanti played the lead Actress role. Later he also acted in few films like "Dharti Ke Laal" (1946), "Gudiya" (1947), "Hum Log" and "Hulchal" (1951). However, his big break came in 1952 when the great director Bimal Roy offered him the lead role of a farmer - Shambhu Mahato - in his epic film "Do Bigha Zameen". Balraj put in everything he had in this role. The film was hailed by critics and won the international award at the Cannes International Film Festival. Thereafter, people recognized the real talent of Balraj Sahni.

Making of "Kabuliwala" - with Bimal Roy
Image Courtesy: @FilmHistoryPic on Twitter
He never looked back since "Do Biha Zameen" and gave wonderful movies one after the other. E.g. "Seema", "Garam Coat" (1955), a super hit "Lajwanti" with Nargis in 1958, "Satta Bazar" and "Chhoti Bahan" in 1959, "Dil Bhi Tera Hum Bhi Tere" and "Anuradha" in 1960, "Kabuliwala" and "Bhabhi Ki Chudiyaan" in 1961 (remembered equally for great music by Sudhir Phadke - song Jyoti Kalash Chhalake), "Anpadh" 1962, "Haqiqat" 1964, "Waqt" 1965, "Humraj" 1967 and "Ek Phool Do Maali" in 1969 were some of Balraj Sahni's super hit movies. "Garm Hawa" released in 1973 turned out to be his last movie. 

In a career spanning 27  years from 1946 to 1973, Balraj Sahni acted in around 85 films and played varied roles; however most of the roles offered to him were either serious or extermely ethical by nature. 

He was one of the most natural actors in the Hindi film industry apart from greats like Motilal, Sanjeev Kumar and Johny Walker. He would actually live the character that he would be playing in the movie. 

Balraj Sahni's son - Parikshit - had narrated the following story in one of the interviews:

Balraj Sahni was extremely fond of his daughter - Shabnam. After her sudden death, he was completely shattered. To come out of that state, he started signing many films and that created lot of stress on him. In that phase, he used to recite Guru Granth Sahib, which was a big surprise, knowing that he was a thorough aetheist and used to read only Das Kapital (a book by Karl Marx which is as holy to the Communists as Bhagwad Geeta to Hindus). 


Image Courtesy:@GarmHava on Twitter
Later he signed a film by M. S. Sathyu viz. "Garm Hava" in which he had to play a role of Salim Mirza who heads a North Indian family in the aftermath of Mahatma Gandhi's assassination. Later in the film, when Salim Mirza's daughter commits suicide, he is destroyed. To enact this scene, Balraj Sahni had to re-live the sad demise of his own daughter. He did it brilliantly as ever. However this caused him great pains and according to Parikshit Sahni became one of the reasons for his death within couple of months of shooting this scene. Later, the Director of the film M. S. Sathyu also apologized for insisting Balraj Sahni to do that scene. Such was the dedication and commitment of Balraj Sahni towards his work.

"Garm Hava" won the Golden Palm award at the Cannes International Film Festival in 1974; however Balraj Sahni had left this material world before he could see the award!

Thus, Balraj Sahni remains one of the few actors whose films won International award both at the start and end of his career.

Salute to him and the great legacy he has left behind.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Prabodhchandra aka Manna Dey - one of the renowned names in the Hindi Film music industry. From 1942 to 2006, for almost 64 years, not only he stood firm in the tough competition of greats like Mohammad Rafi, Mukesh, Kishore Kumar, Talat Mehmood and Hemant Kumar, but also created space and Genre of his own. This was remarkable achievement! He has sung around 2500 songs in 15 different languages including Hindi, Bengali, Marathi, Gujarati, Kannada, Aassamese, etc. The fact that we remember his songs even after so many years is a testimony of the quality and genius Manna Dey possessed.

A young 23-year old Prabodhchandra Dey - aspiring to do a career in Hindi Film music - comes to Bombay (now Mumbai) accompanied by his Uncle - a stalwart in music Sangeetacharya Krishna Chandra Dey (K. C. Dey as he was famously known). As per Manna Dey's own narration in one of the interviews, during these initial days, he went from Studio to Studio begging for work, but no one entertained him. He gets frustrated and decides to go back to Kolkata; however upon his Uncle's request, stays back and within months gets his first big break for the film "Mashal" released in 1950. The music was composed by S. D. Burman. This was Lata Mangeshkar's first film with S. D. The song "Upar Gagan Vishaal" sung by Manna Dey became a hit. His career slowly picked up after that.

Presenting Shankar-Jaikishan's song
Image Courtesy : Songsofyore.com
Raj Kapoor used Manna Dey's voice in many of his movies and Manna Dey did not disappoint, all his songs were received with great feedback. E.g. "Tere Bina Aag Yeh Chandani" (Awara - 1951, with Lata Mangeshkar), "Thahar Jara O Jaanewale" (Boot Polish - 1954 - co-singer Asha Bhosale), "Dil Ka Haal Sune Dilwala" (Shri 420 - 1955), "Aaja Sanam Madhur Chandani Mein Hum", "Jahan Main Jaati Hoon" and "Yeh Raat Bheegi Bheegi" (Chori Chori - 1956 - with Lata Mangeshkar), "Masti Bhara Hai Samaa" (Parvarish - 1958 - with Lata Mangeshkar), "Chalat Musafir Moh Liya Re" (Teesri Kasam - 1966) and "Ae Bhai Jara Dekh ke Chalo" (Mera Naam Joker - 1970)

Majority of Manna Dey's songs were based on Hindustani Classical music. Many Music Composers, while composing Raag based songs, considered Manna Dey as the best choice to sing it. If you look at the list below, you will realize this:

  1. Ketaki Gulab Juhi Champak Ban Fule - Basant Bahar - Shankar Jaikishen co-Singer Bhimsen Joshi
  2. Ritu Aaye Ritu Jaaye Sakhi Ri - Hamdard - Anil Biswas - co-singer Lata Mangeshkar
  3. Ful Gendwa Naa Maaro - Dooj Ka Channd - Roshan
  4. Tum Bin Jeevan Kaisa Jeevan - Bawarchi - Madan Mohan
  5. Aayo Kahan Se Ghanshyam - Buddha Mil Gaya - R. D. Burman
  6. Ek Ritu Aaye Ek Ritu Jaaye - Sau Saal Baad - Laxmikant Pyarelal - co-singer Lata Mangeshkar
At the same time, Manna Dey became the voice of poor and oppressed and sang the songs portraying the pains of this class of people. E.g. "Dil Ka Haal Sune Dilwala" (Shree 420), "Upar Gagan Vishaal" (Mashal), "Puchho Naa Kaise Maine Rain Beetayin" (Meri Surat Teri Ankhen), "Dharati Kahe Pukarke" (Do Bigha Zameen), "Tu Pyaar Ka Saagar Hai" (Seema), etc.

Manna Dey was also a great composer. He composed more than 100 songs from 18 films. Since many of the films that he composed music for were Mythological, no one noticed it. However 3 of his films from 1952-53 viz. "Chamki", "Tamasha" (starring Dev Anand and Meena Kumari) and "Naina" (starring Abhi Bhattacharya and Geeta Bali) were of great quality music. I would highly recommend readers to listen/watch songs from "Tamasha". 

Manna Dey was active till 1992, post which he only sang in select languages and select Genres like Bhajan, Ghazal, etc. His last song for the Hindi film was in 2006. He did his last live programme in 2012 in Mumbai at the tender age of 93!

Government of India recoginzed Manna Dey's contribution to Film Music in general and awarded him Padmashri in 1971 and Padmabhushan in 2005. He also won the prestigious Dadasaheb Phalke award in 2007. Manna Dey left for the heavenly abode on 24th Oct 2013. 

I salute to the genius of Manna Dey and remember the wonderful treasure that he has left behind.

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Both Balraj Sahni and Manna Dey had worked together in many films where latter has sung some great songs for the former.  Here are some of these gems:

  1. Tu Pyaar Ka Sagar Hai - Seema (1955) - Shankar-Jaikishan
  2. Phir Milenge Jaanewale Yaar Daswidaniyaan - Pardesi (1957) - Anil Biswas
  3. Ae Mere Pyaare Watan - Kabuliwala (1961) - Salil Chaudhari
  4. Tuze Suraj Kahoon Ya Chanda - Ek Phool Do Mali (1969) - Ravi
  5. Radio Ceylon pays tribute to Manna Dey and Balraj Sahni - Audio only

However, the song that I am presenting today is undoubtedly the most Evergreen song of Hindi Films. It's "Ae Meri Zohara Zabeen" from the film "Waqt" (1965), lyrics by Sahir Ludhiyanvi and composed by Ravi in Raag Pilu. It is believed that Ravi picked up this tune from one of the Qawalis by an Afgan singer Ustad Abdul Gafoor Breshna.

The reasons for selecting this song are its USP as follows:

  • You will see Balraj Sahni playing totally opposite to his real character which was serious!
  • You will find Manna Dey singing this light hearted romantic song which was far from his normal serious, devotional Genre!
  • This song is picturized on Achala Sachdev who was clearly aged at the time of shooting this song. In the Indian society of 1965, just imagine how difficult it would have been for the director to plan a song picturised on an aged lady and still hope for the film to do well!
  • The lyricist of this song - Sahir Ludhianvi - had been known for his serious, philosophy based songs, but he again came up with something totally different to his normal self!
  • "Waqt" was a multi-starrer movie, the film contained other songs filmed on the main stars of the movie, these songs were equally good or even better; in spite of this, "Ae Meri Zohra Zabeen" picturised on an aged couple was a super hit and till date remains as the most popular song of the film! 

Hats off to the entire team of "Waqt". Please watch the song video given above and enjoy your day. Thank you.

Friday, 3 April 2020

अनमोल रतन - 9 : Jamal Sen? Who??

Namaskaar Friends!

Here I am, once again, with another musical piece from the Golden Era of Hindi Film Music. I am extremely happy to present the 9th song of the Anmol Ratan series.

Thank you so much for your amazing response and kind words of appreciation so far. It encourages me more to bring you the jewels of music.

Today, I would like to present a gem of a song from a lesser known, or rather, should I say, unknown Hindi film music composer - Jamal Sen - on his 41st death anniversary on 12th April 2020.

English version of the blog is at the end of the Marathi version below.

Song #9: सपना बन साजन आये (Sapna Ban Saajan Aaye)



Film       : Shokhian (1951)

Director : Kidar Sharma

Cast : Premnath, Suraiyya, Jeevan 
Jamal Sen
Music Composer

Kidar Sharma
Director & Lyricist
Lata Mangeshkar
Singer






हिंदी चित्रपटात संगीत ऐकू आले ते १९३१ साली आलेल्या "आलम आरा" या बोलपटापासून. तेंव्हापासून गेल्या ९० वर्षात हिंदी सिनेसंगीत विविध प्रांतातील संगीताने हळूहळू समृद्ध होत गेले. आपल्या महाराष्ट्रातून गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, स्नेहल भाटकर (प्रसिद्ध अभिनेते कै. रमेश भाटकर यांचे वडील), दत्ता डावजेकर, रामचंद्र चितळकर (सी. रामचंद्र), वसंत देसाई, सुधीर फडके, लक्ष्मीकांत कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीमधले), भास्कर चंदावरकर, हृदयनाथ मंगेशकर  ते आजच्या अजय-अतुल पर्यंत अनेकांनी आपल्या मातीतल्या संगीताची गोडी हिंदीत नेली आणि तितकीच लोकप्रिय केली. बंगालमधून पंकज मलिक, अनिल विश्वास, सलील चौधरी, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार, सरदार मलिक, राहुलदेव बर्मन, किशोर कुमार, भूपेन हजारिका, बप्पी लाहिरी,  जतीन-ललित, अनु मलिक, ते आजकालच्या शंतनू मोईत्रा आणि प्रीतम यांच्यापर्यंत सर्वानी बंगाली संगीताची मिठाई आपल्यामध्ये भरपूर वाटली. महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन प्रांत हिंदी सिनेसंगीतात कायम आघाडीवर राहिले. याचबरोबर उत्तर प्रदेशातून नौशाद , पंजाब प्रांतातून गुलाम हैदर, श्यामसुंदर आणि ओ. पी. नय्यर यांनीही हिंदी सिनेसंगीतात मोलाची भर घातली. संगीतकार मदन मोहन हे इराक मध्ये जन्मलेले तर जयदेव नैरोबी मध्ये पण या दोघांनी आपल्या संगीतात विविध प्रयोग करून सिनेसंगीत आणखी समृद्ध केले. सज्जाद हुसेन हे मध्य प्रदेशात जन्मलेले पण अरबी संगीताचा उपयोग मोठ्या खुबीने त्यांनी आपल्या रचनांमध्ये केला.

अशा सर्व गुणी संगीतकारांमधील एक नाव म्हणजे राजस्थान मध्ये जन्मलेले आणि राजस्थानी लोकसंगीताचा खजिना हिंदी चित्रपटात आणणारे जमाल सेन. दुर्दैवाने आज हे नाव आपल्याला आठवणारही नाहीत. कारण त्यांची कारकीर्द तशी छोटी. स्वभावातील मानीपणा, कोणासमोरही काम मागायला न जाण्याचे धोरण आणि व्यावहारिक चातुर्य नसल्यामुळे जमाल सेन यांना फारसे काम मिळाले नाही. अवघ्या ११ वर्षात ११ चित्रपट एवढीच काय ती त्यांची कारकीर्द! त्यामुळे त्यांच्या नावाने विकिपीडियाचे साधे एक पानही लिहिलेले नाही.

जमाल सेन यांनी संगीतबद्ध केलेले हिंदी चित्रपट:

शोखियां (१९५१)

दायरा (१९५३)

धरमपत्नी (१९५३)
रंगीला (१९५३)
कस्तुरी (१९५४) - सहसंगीतकार पंकज मलिक
रितू विहार (१९५४)
पतितपावन (१९५५)
अमर शहीद (१९६०)
बगदाद (१९६१)
अल्हा उदाल (१९६२)
मनचली (१९६२)

जमाल सेन मूळचे राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजनगढ गावचे. त्यांचे एक पूर्वज केसरी सेन हे संगीत सम्राट तानसेन यांचे शिष्य होते असे म्हणतात. जमाल यांचे वडील जीवन सेन हे दरबारी गायक होते. त्यांचे आजोबा (आईचे वडील) हे रवींद्रनाथ टागोरांचे धाकटे भाऊ होते अशी माहिती इंटरनेटवर कुठेतरी वाचल्याचे आठवते. जमाल सेन स्वतः एक कथ्थक नर्तक होते. ऑल इंडिया रेडिओ कलकत्ता इथे काही काळ त्यांनी गायक म्हणूनही नोकरी केली. पुढे ते तत्कालीन सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांचे सहायक बनले. १९४१ साली अतिशय गाजलेल्या "खजांची" या गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटामध्ये जमाल सेन यांनी तबला आणि ढोलकीही वाजवली होती. 

१९५१ साली तत्कालीन प्रख्यात दिग्दर्शक केदार शर्मा हे "शोखियां" नावाचा चित्रपट बनवत होते. हा चित्रपट वनवासी जीवनावर आधारलेला होता. त्यासाठी केदार शर्मा एका अशा संगीतकाराच्या शोधात होते ज्याला लोकसंगीताची उत्तम जाण आहे. वास्तविक केदार शर्मा यांचे आवडीचे संगीतकार रोशन (१९५० - बावरे नैन आणि १९६४ - चित्रलेखा) आणि स्नेहल भाटकर  (१९४७ - नीलकमल - राजकपूरचा पहिला चित्रपट,  १९४८ - सुहाग रात, १९५३ - गुनाह  आणि १९६३ - हमारी याद आयेगी - याच शब्दांचे मुबारक बेगम यांचे तनुजावर चित्रित झालेले गाणे आजही रसिकांना माहिती आहे) हे होते,  पण "शोखियां" साठी या दोघांपैकी कुणाचीही निवड न करता केदार शर्मा यांनी जमाल सेन यांच्यातील गुण हेरून व त्यांची राजस्थानी पार्श्वभूमी लक्षात घेऊन या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही त्या काळात फार मोठी गोष्ट होती. आणि जमाल सेन यांनी त्या संधीचे सोने केले.

पुढे १९५३ साली आलेल्या "दायरा" (अर्थ: वर्तुळ) या कमाल अमरोही दिग्दर्शित चित्रपटाचे संगीतही जमाल सेन यांनी दिले, या चित्रपटात एकूण ८ गाणी होती. पण त्यातील मुबारक बेगम आणि महंमद रफी यांनी गायलेले "देवता तुम हो मेरा सहारा" हे भजन जमाल सेन यांची संगीताची ताकद दाखवून देते. आजही हिंदी चित्रपटातील Top १० भजने निवडायची म्हटली तर या भजनाचा नंबर त्यात पहिल्या पाचांत नक्की लावावा लागेल. 

"शोखियां" आणि "दायरा" या दोन चित्रपटांचे संगीत भल्याभल्यांनाही अचंभित करणारे ठरले. जमाल सेन यांची ओळख प्रामुख्याने याच दोन चित्रपटांनी होते. 

"शोखियां" आणि "दायरा" च्या संगीतातील प्रतिभा जमाल सेन नंतर फारसे दाखवू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

मला जमाल सेन माहिती झाले ते १९९२/९३ साली. सूरत येथे माझी पहिली नोकरी करत होतो तेंव्हा एका रविवारी तेथील बाजारातून फिरत असताना एका Music Store मध्ये HMV ची "Rare Gems Lata Mangeshkar" ही Cassette दिसली. तोपर्यंत जुन्या हिंदी गाण्यांचा शौक जडला असल्या कारणाने मी २ Cassettes चा तो संच विकत घेतला. घरी येऊन जेंव्हा ती गाणी ऐकायला लागलो तेंव्हा त्यात आज सादर करत असलेले "शोखियां" चित्रपटातील "सपना बन साजन आये" हे गाणे होते. त्या दोन्ही Cassettes मधली लताची सर्वच गाणी माझ्यासाठी Rare होती, त्यामुळे खूप आवडली.

"शोखियां" हा चित्रपट काही खास नाही. १६ व्या शतकातील एका संस्थानाचा  राजा तांबा त्याच्या इमानदार सरदार रणबीर आणि सैनिकांना एकत्र करून पोर्तुगीजांच्या बरोबरील लढाईची तयारी करत असतो. दुसरीकडे राजाचा धाकटा भाऊ रंगीला राव हा मौजमस्ती करण्यात मश्गुल असतो. राजा तांबाने आपली राजकुमारी चिंतामणी (नझीरा) हिला रंगीला रावच्या घरी ठेवलेले असते जेणेकरून ती संगीतात रमून जाईल. इकडे राजा तांबा त्याचा खजिना राजकुमारी चिंतामणीला देऊन येण्याची जबाबदारी इमानदार सरदार रणबीर (प्रेमनाथ) वर सोपवतो. सोबतीला शेरसिंगलाही (जीवन) देतो कारण त्याला जंगलाच्या प्रदेशाची माहिती असते. जंगलातून जात असताना रणबीरची गाठ सांवली (सुरैय्या) नावाच्या एका वनवासी मुलीशी पडते. शेरसिंगने सांवलीला रणबीरला मारण्यासाठी पाठवलेले असते, पण होते उलटेच, सांवली रणबीरच्या प्रेमात पडते. रणबीर तिला आपल्याबरोबर घेऊन खजिना राजकुमारी चिंतामणीला सुपूर्त करण्यासाठी जातो. सांवलीला राजमहालात दासी बनायचे असते, पण रणबीर तिला सांगतो की तिची खरी जागा ही जंगल आहे. तिची चंचलता, शोखियां (चेष्टेखोर स्वभाव), तिचा अल्लडपणा राजमहालात चालणार नाही हे तो तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण सांवली ऐकत नाही व महालातच दासी म्हणून राहायचा निर्णय घेते. रणबीर सांवलीची ओळख राजकुमारी चिंतामणीशी करून देतो आणि सांवलीला राजकुमारीची दासी म्हणून काम देतो. राजकुमारी रणबीरवर प्रेम करत असते व तो लगेच परत जाणार असे कळताच नाराज होऊन म्हणते "आये भी तो सपने की तरह". त्यानंतर राजकुमारी रणबीरला ढोलकीला साथीला घेऊन गाणे सुरु करते - सपना बन साजन आये....

गाण्याची सुरुवात ढोलकीने होते. आणि मग येतो तो लताचा अफलातून गोड आवाज.....आणि वीणेचा मधुर झंकार ...

संपूर्ण गाण्यामध्ये ढोलकी, वीणा, पेटी, झांजा आणि बासरी एवढीच वाद्ये आपल्याला ऐकू येतात. लताच्या हरकती/मुरकतींनी गाण्याच्या अप्रतिम चालीला अधिकच सुंदर बनवले आहे.  उ.दा. "झूले खूब झुलाए", "झोली में भर लाए" आणि "फूले नहीं समाए" या ओळींमधील "झुलाए", "लाए" आणि "समाए" या शब्दांवर घेतलेल्या हरकती केवळ लाजवाब! आणि "शरमाए" शब्द गातानाची नजाकत अनुभवा, किती नाजूक, लाजत मुरडत!! 

या गाण्याचे शब्दही किती सुंदर आहेत पहा, "सपना बन साजन आये", "सपने में साजन" नाही!  हे गाणं म्हणजे एक अप्रतिम स्वप्नरंजन आहे हे आपल्याला केदार शर्मांनी लिहिलेले त्याचे शब्द वाचल्यावर लक्षात येईल. जमाल सेन यांनी ही संपूर्ण सुरावट यमन कल्याण रागात बांधली आहे. यमन मधील Top ३ मध्ये या गाण्याची गणना व्हायला हरकत नाही. 

राजकुमारी चिंतामणी गाणे म्हणत असताना मागे चामर ढाळत उभ्या असलेल्या सुरैयाच्या चेहऱ्यावरील भाव बघा, राजकुमारीने रणबीरवर व्यक्त केलेले प्रेम बघून निर्माण झालेली असूया व राग या संपूर्ण गाण्यात सुरैय्याने काय सुरेख व्यक्त केला आहे! नायिका Background ला असूनही संपूर्ण गाण्यात तीच आपल्या लक्षात राहते हे दिग्दर्शकाचे कसब!

"शोखियां" हा चित्रपट यथातथाच असला तरी यातील संगीत हे याचे बलस्थान आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात जमाल सेन यांनी जी कमाल केली आहे त्याला तोड नाही. त्यांची आणखी काही गाजलेली गाणी:










आपल्या दुर्दैवाने जमाल सेन यांची गाणी संख्येने खूप कमी आहेत. पण "सपना बन साजन आये" आणि "देवता तुम हो मेरा सहारा" या दोन गाण्यांनी त्यांनी संगीताच्या जाणकारांमध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. त्यांच्या प्रतिभेला सलाम आणि स्मृतीला वंदन.

आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आणि गाणे आवडले असेल. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. 








Dear Friends,

Hindi Film Music has evolved over the period of last 89 years since it started in 1931 with the film "Alam Aara". Many composers from different parts of India have contributed greatly to enrich it. E.g. From Maharashtra, it was Govindrao Tembe, Master Krishnarao, Snehal Bhatkar (Father of famous artist Ramesh Bhatkar), Datta Davajekar (DD), C. Ramachandra (Ramchandra Chitalkar), Vasant Desai, Sudhir Phadke, Laxmikant Kudalkar (of famous Laxmikant-Pyarelal duo), Bhaskar Chandavarkar, Hridaynath Mangeshkar and Ajay-Atul, all of them have displayed their genius and brought in Marathi flavor to Hindi Film industry. From Bengal, composers like Pankaj Mullick, Anil Biswas, Salil Chaudhary, S. D. Burman, Hemant Kumar, Sardar Malik, R. D. Burman, Kishor Kumar, Bhupen Hazarika, Bappi Lahiri, Anu Malik and Jatin-Lalit have all enriched Hindi Film Music industry with the flavours of Bengali Folk and Rabindra Sangeet.

At the same time, Naushad who hailed from Uttar Pradesh brought in the Urdu flavor into the Hindi Film music while Ghulam Haider, Shyamsundar and O. P. Nayyar from Punjab introduced the Punjabi Rhythm. 

You would be surprised to know that Madan Mohan was born in Iraq, Jaidev in Nairobi, but both of them experimented with different genre of music and made the Hindi Film Music sweeter than before. Sajjad Hussain hailed from Madhya Pradesh, but such was his mastery over Mandolin and his genius, that he very skilfully used Arabian music into his Hindi songs.

One of the names from the above elite list of Hindi Film Music Composers is Jamal Sen from Rajasthan. Unfortunately, no one knows or remembers him today, due to his extremely short career spanning 11 years and 11 films! Obviously, he has not been credited with a single page on Wikipedia :-(

Jamal Sen's films:


Shokhiyan (1951)


Dayera (1953)

Dharmapatni (1953)
Rangeela (1953)
Kasturi (1954), with Pankaj Mullick
Ritu Vihar (1954)
Patit Paawan (1955)
Amar Shaheed (1960)
Baghdad (1961)
Alha Udal (1962)
Manchali (1962)


Jamal Sen was originally from a village viz. Sujangadh from Churu district in Rajasthan. It is believed that one of his ancestors Kesari Sen was a disciple of Sangeet Samrat Tansen. He himself was a Kathak dancer, worked as a Singer at All India Radio, Calcutta. Later he started assisting Master Ghulam Haider and used to play Dholak. He had contributed by playing Tabla and Dholak in a famous 1941 movie viz. "Khajanchi" composed by Ghulam Haider. 

In 1951, famous director Kidar Sharma was working on a movie "Shokhian" which was based on Tribal story. For this reason, Kidar Sharma was in search of a Music composer who had strong roots in Folk music. He came across Jamal Sen and offered him the movie after ignoring his regular composers Snehal Bhatkar and Roshan. Jamal Sen did not disappoint and came up with excellent compositions.

Later in 1953, Jamal Sen composed for "Daaera" directed by Kamal Amrohi (husband of Meena Kumari). A Bhajan "Devata Tum Ho Mera Sahara" became instant hit and still regarded as one of the best Bhajans that we have ever heard in Hindi films.

Till date, Jamal Sen is remembered for these 2 movies viz. "Shokhian" and "Daaera". However he could hardly repeat his genius in rest of the movies barring a song or two, and thus remained in oblivion until his death in 1979.

I happened to learn about Jamal Sen through the 2 cassettes "Rare Gems Lata Mangeshkar" that I had bought in 1992/93 while working in Surat. And now, thanks to YT, many of Jamal Sen's songs are available freely.

Today I am going to present a gem from the film "Shokhian" viz. "Sapna Ban Saajan Aaye" sung by none other that great Lata Mangeshkar. 

There is hardly anything to highlight about "Shokhian" movie. It's based on an Empire from 16th Century led by its king Tamba and ably supported by his loyal Commander Ranbir (Premnath). Tamba is busy preparing for war with Portugese while his daughter Rajkumari Chintamani (Nazeera) is at her Uncle Rangeela Rao's place engrossed in music. Tamba instructs Ranbir to hand over his entire wealth to Rajkumari Chintamani. When Ranbir proceeds for meeting Chintamani, he comes across a tribal girl Saavani who accompanies Ranbir to Chintamani's place, and seeing the luxurious life over there, decides to serve as Rajkumari's Daasi (maid servant). Rajkumari Chintamani is extremely happy in seeing Ranbir after a long time and thus wants to celebrate the occasion with a mehfil. And then comes this great song "Sapna Ban Saajan Aaye".

The song is composed in Raag Yaman Kalyan. Jamal Sen has used only 5 instruments viz. Dholak, Veena, Flute, Harmonium and Cymbals, and still managed to create the magic! If at all anyone prepares a list of Top 10 songs composed in Raag Yaman, this particular song can easily be in Top 3. Lata's masterly singing the words "Zulayein", "Laayein", "Samayein" and "Sharamayein" has only enhanced the beauty of the song.

You can watch the video of the song given above just before the English text.

The lyrics by Kidar Sharma - who also is the Director of the movie - is outstanding; it so aptly describes the emotions, in the form of dreams, of Saavani while she has fallen in love with Ranbir.

Music is the USP of "Shokhian" and the credit should go to Jamal Sen for creating an outstanding score in his very first movie as a Music Composer. Some of his other compositions are:











Unfortunately, Jamal Sen's work is very small compared to some of his contemporaries. However, he would always be remembered for "Sapna Ban Saajan Aaye" and "Devata Tum Ho Mera Sahara". Kudos to his genius.


Please let me know your feedback, if any. Request you to share this further with your friends and families. Thank you.