Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.
एक वो ज़माना था ...
जेंव्हा नायिकेला खुश करण्याकरता नायकाने एखादे छानसे गाणे तिच्याकडे प्रेमाने बघत, शांतपणे कुठलेही हातवारे किंवा बीभत्स नाच न करता म्हटले तरी ती बिचारी खुश व्हायची.
और एक ये ज़माना है ...
जेंव्हा विचित्र अंगविक्षेप, बीभत्स नाच, आजूबाजूला नाच्यांची गर्दी, आणि कंठकल्लोळ करणारे संगीत याशिवाय नायक-नायिकेचं गाणंच होत नाही
मी गोष्ट करतोय १९५०-६० च्या दशकाची जेंव्हा मुलायम, हळुवार संगीतही ऐकवलं जायचं चित्रपटातून. आणि लोकं सुद्धा अशी गाणी डोक्यावर घ्यायची! आज सादर करत असलेले गीतही असेच एक रोमँटिक गाणे आहे.
गीतकार दीनानाथ (D.N.) मधोक यांनी लिहिलेली आणि संगीतकार विनोद यांनी स्वरबद्ध केलेल्या अप्रतिम गीतांनी आजवर रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. संगीतकार विनोद यांच्यावर मी यापूर्वी सविस्तर लिहीले आहे ते इथे वाचा - अनमोल रतन - 11 : Gifted Musician - "Lara Lappa" Vinod.
"अनमोल रतन" मध्ये एकूण ११ गाणी आहेत. त्यापैकी ७ गाणी (५ सोलो व २ द्वंद्वगीते) लताने गायली आहेत. ३ गाणी (१ सोलो व २ द्वंद्वगीते) तलतने, १ सोलो गाणे आशा भोसले यांनी तर २ सोलो गाणी निर्मलादेवी (अभिनेता गोविंदाच्या आई) यांनी गायली आहेत. लताची सातही गाणी एक-से-एक आहेत. त्यातही "तारें वही है, चाँद वही है, हाये मगर वो रात नहीं" हे सोलो व तलत बरोबर गायलेले "शिकवा तेरा मैं गाउँ" ही दोन्ही गाणी लाजवाब आहेत. जरूर ऐका.
आज सादर करत असलेले गीत हे याच चित्रपटातील तलत महमूद यांनी गायलेले सोलो गीत आहे. चित्रपटाचा Video उपलब्ध नाही त्यामुळे हे गाणे Audio स्वरूपात ऐकावे लागेल.
विनोद यांनी हे गाणे भैरवी रागात बांधलेले आहे. "आरंभ-स्वर" च्या मागील भागातील नौशाद यांचे "टूटे ना दिल टूटे ना" हे गाणेही भैरवीतच बांधलेले होते. पण दोन्ही चालीत बराच फरक आहे. गाणे सुरु होते तलतच्या तब्बल १८ सेकंद घेतलेल्या सुंदर आलापाने. आणि मग येते एका प्रियकराचे मनोगत. आपल्या शांत, हळुवार स्वरांनी तलतने या गाण्याचे सौन्दर्य वाढवले आहे.
पहिला अंतरा हा या गीताचा परमोच्च बिंदू आहे असे मला वाटते. नायक-नायिकेची दृष्टादृष्ट तर झाली पण ठरवून का नकळत हे नायकाला कळत नाहीये. दृष्टादृष्ट झाल्यावर मात्र काय होते याचे सुंदर वर्णन पुढील दोन ओळींमध्ये आले आहे. दोन वेगळी क्रियापदे वापरून दोन्ही ओळींचे अर्थ गीतकार मधोक यांनी आपल्या प्रतिभेने पूर्णपणे वेगळे केले आहेत. समजतात का बघा नाहीतर प्रतिक्रियेमध्ये लिहा, मी उत्तर देईन :-)
तलतने "भूल से" नंतर घेतलेली सुंदर हरकत ऐका. "शरमाने लगे" नंतरच्या छोट्याशा पॉजने पुढच्या "और वो भी" ची लज्जत वाढवली आहे. तोंडातून "वाह वाह" असे सहज येते.
पहिला अंतरा हा वरच्या पट्टीत असल्याने तलतच्या आवाजात ताण जाणवतो पण येणारा दुसरा अंतरा हा खालच्या स्वरांमध्ये असल्याने ते तलतचे बलस्थान आहे, त्यामुळे त्याचा आवाज या कडव्यात खुलल्याचे जाणवते.
परत एकदा मधोक यांनी शब्दातून कमाल केली आहे! "दिल में" नंतरचा पॉज हा "दर्द कहाँ पैदा हुआ है?" या प्रश्नाचे उत्तर देतो. लगेच पुढचा प्रश्न "दिल कैसे कहे?". आणि पुढच्या दोन ओळींत त्याचेही उत्तर गीतकार देऊन टाकतात - "धड़कने दिल की कहानी दिल को समझाने लगी". किती सुंदर कल्पना आहे ही!
अप्रतिम शब्दरचना, त्याला साजेसं संगीत आणि तलतच्या मखमली आवाजातलं हे गाणं आपल्याला निखळ आनंद देऊन जातं. चला, ऐकू या हे गीत.
There was a time...
When, to make
the heroine happy, the hero would simply sing a beautiful song, looking at her
with love, without any gestures or outrageous dance moves — and the poor girl
would still be delighted.
And then there is today’s time...
When a song
between the hero and heroine cannot exist without weird body movements, vulgar
dances, a crowd of background dancers, and blaring, deafening music.
I am talking about the 1950s–60s,
when soft, gentle melodies were presented in films. And people cherished such
songs deeply! The song I am presenting today is one such romantic gem.
The lyrics were written by D.N.
Madhok, and the music was composed by Vinod. These timeless songs have ruled
the hearts of listeners ever since. I have previously written in detail about
composer Vinod — you can read it here: Anmol Ratan – 11: Gifted Musician –“Lara Lappa” Vinod.
The film Anmol Ratan had
11 songs in total. Out of these:
- 7 were sung by Lata Mangeshkar (5 solos + 2 duets),
- 3 by Talat Mahmood (1 solo + 2 duets),
- 1 solo by Asha Bhosle, and
- 2 solos by Nirmala Devi (actor Govinda’s mother).
All of Lata’s seven songs were
excellent, especially the solo “Tare Wohi Hai, Chand Wohi Hai, Haye MagarWoh Raat Nahin” and the duet with Talat “Shikwa Tera Main Gaoon” —
both are outstanding and must-listens.
The song I present today is Talat
Mahmood’s solo from this same film. Since the video is not available, you can
only listen to the audio.
Vinod composed this song in Raag Bhairavi. (In fact, in the previous edition of Aarambh-Swar, Naushad’s “Toote Na Dil Toote Na” was also based on Bhairavi — though the two tunes are very different.) The song begins with a beautiful 18-second alaap by Talat. Then follows the musings of a lover. With his soft, delicate voice, Talat enhanced the beauty of the composition.
I feel the first verse is the
high point of this song. The hero and heroine exchange glances — but the hero does
not know whether it happened intentionally or by accident. Yet once it happens,
the following lines describe the magic that follows, with two different verbs
giving two subtly different shades of meaning.
Notice Talat’s beautiful flourish
after the words “Bhool Se”. The small pause after “Sharmane Lage”
enhances the charm of “Aur Woh Bhi”. You cannot help but exclaim Wah Wah!
Because the first verse lies in a
higher pitch, there is some strain in Talat’s voice. But the second verse is in
a lower register — Talat’s strength — and his voice blooms here.
Once again, Madhok’s words work
wonders. The pause after “Dil Mein” gives the answer to “Where is the
pain born?” And then comes the next question: “Dil Kaise Kahe?” (How can
the heart say it?). The following two lines resolve it beautifully — “The
heartbeat itself begins to explain the heart’s story to the heart.” What a marvellous
idea!
This song — with exquisite
lyrics, fitting composition, and Talat’s velvety voice — leaves us with pure
joy. Come, let us listen to it.