Namaskaar friends,
Please do read, watch the songs presented herein and share further if you like it. Thank you.
English version of the blog follows the Marathi version below.
All photos/images in this blog are courtesy YouTube.
Noorjehan and Dilip Kumar |
१९३९ ते १९४८ जवळपास १० वर्षांचा काळ नूरजहाँ हिंदी चित्रपटसृष्टीची अनभिषिक्त गानसम्राज्ञी होती. ती पाकिस्तानात निघून गेल्यावर मात्र ते पद फक्त आणि फक्त लताचे होते. आणि आज नूरजहाँ परत आली होती आपल्या जादुई आवाजाची भुरळ रसिकांना घालायला. त्यामुळे लतापुढे स्वतःचे सामर्थ्य दाखवण्याचे, नूरजहाँ नंतर लताच का गानसम्राज्ञी बनली ते दाखवून देण्याचे एक प्रकारे मोठे आव्हानच होते. शिवाय लताला नूरजहाँच्या आधी गायचे होते, त्यामुळे काम एकूणच खूप अवघड होते.
पूर्ण विचारांती लताने गाण्यासाठी निवडले होते ते होते पं. शामसुंदर यांनी संगीतबद्ध केलेले "बाज़ार" या १९४९ सालच्या चित्रपटातील "साजन की गलियाँ छोड़ चले" हे अजरामर गीत! पहाड़ी रागात बांधलेलं पंजाबी ढंगातील हे गाणे लताने तिच्या उमेदवारीच्या काळात नूरजहाँच्या प्रभावाखाली असताना गायलेलं होतं, आणि त्या प्रभावातून बाहेर येऊन जवळपास ३ दशके लोटल्यानंतर आज ती तेच गाणे त्याच नूरजहाँसमोर गात होती! कल्पना करा, काय प्रसंग असेल!
लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे की अशा भावपूर्ण पण आव्हानात्मक प्रसंगात लताने निवड केली ती श्यामसुंदर यांच्या गाण्याची. ही आहे शामसुंदर यांच्या प्रतिभेची जादू, एका महान गायिकेने एका महान संगीतकाराला दिलेली दाद.
लाहोरमध्ये जन्मलेल्या शामसुंदर यांना तरुणपणी मास्टर गुलाम हैदर यांचे संगीत अतिशय आवडायचे. ते स्वतः उत्तम व्हायोलिन वादक होते. उस्ताद झंडे खान यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये शामसुंदर मुख्य व्हायोलिन वादक होते. नंतर ते काही काळ मास्टर गुलाम हैदर यांचे सहाय्यक होते. मास्टरजींच्या व्यग्रतेमुळे शामसुंदर यांना काही पंजाबी चित्रपटांना संगीत द्यायची संधी मिळाली. "सोहनी कुमारन" (१९३९), "लैला मजनू" आणि "जग्गा डाकू" (१९४०) आणि "गुल बलोच" (१९४२) या पंजाबी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले व सर्व चित्रपटातील गाणी लोकप्रिय झाली.
१९३८ साली शामसुंदर सुप्रसिद्ध गायक कुंदनलाल सैगल यांच्याबरोबर लाहोरला एका संगीत कार्यक्रमासाठी गेले होते. त्या कार्यक्रमात वीज गेल्याने सैगल यांनी आपले गाणे थांबवले. संयोजकांनी एका तरुण मुलाला बोलावून माइकविना गाण्यास सांगितले. त्या तरुण मुलाने आपल्या आवाजाने श्रोत्यांवर अशी काही जादू केली की श्रोते शांत झाले. कार्यक्रम संपल्यावर सैगल साहेब व शामसुंदर दोघांनी त्या तरुण मुलाचे खूप कौतुक केले. त्याचे नाव होते मोहम्मद रफी! शामसुंदर मोहम्मद रफींच्या गाण्याने एवढे प्रभावित झाले होते की त्यांनी १९४२ साली आलेल्या "गुल बलोच" या पंजाबी चित्रपटात रफींना प्रथम गाण्याची संधी दिली.
शामसुंदर यांचा पहिला हिंदी चित्रपट होता १९४३ साली प्रदर्शित झालेला प्रभात फिल्म कंपनीचा "नई कहानी". त्यातील "नींद हमारी ख्वाब तुम्हारे" हे G. M. दुर्राणी यांनी गायलेले गीत प्रचंड गाजले होते. त्यानंतर १९४५ साली आलेल्या "गाँव की गोरी (Village Girl)" या चित्रपटात नूरजहाँ यांनी प्रथमच श्यामसुंदर यांच्याबरोबर काम केले. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती, त्यातील ६ गाणी नूरजहाँ यांनी सोलो गायली होती! सर्व गाणी प्रचंड गाजली. विशेषतः नूरजहाँ यांचे "किस तरह भूलेगा दिल" आणि "बैठी हूँ तेरी याद का लेकर के सहारा" ही २ गाणी नूरजहाँ यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांमधली समजली जातात. याच चित्रपटातील "अजी दिल हो काबू में तो" हे G. M. दुर्राणी यांच्याबरोबर मोहम्मद रफी यांनी गायलेले गाणे रफी साहेबांचे हिंदीतील पहिले गाणे समजले जाते.
१९४८ सालातील "Actress" हा आणखी एक शामसुंदर यांच्या संगीताने गाजलेला चित्रपट. यातील मोहम्मद रफी यांनी गायलेले "हम अपने दिल का फसाना उन्हे सुना ना सके" आणि "ऐ दिल मेरी आहों में इतना तो असर आए" ही दोन गीते आजही रसिकांच्या लक्षात आहेत.
"भाई जान" (१९४५), "गाँव की गोरी (Village Girl)" (१९४५) आणि "Actress" (१९४८) या तीन चित्रपटांमुळे श्यामसुंदर यांना अफाट लोकप्रियता लाभली. पण त्यांचे सर्वोत्कृष्ट संगीत अजून येणे बाकी होते.
१९४९ हे वर्ष श्यामसुंदर यांच्या कारकिर्दीतील सोनेरी वर्ष म्हटले पाहिजे. या वर्षात त्यांनी "बाजार", "चार दिन" आणि "लाहोर" हे तीन चित्रपट संगीतबद्ध केले. या तिन्ही चित्रपटात मिळून श्यामसुंदर यांनी एकूण ३१ गाणी स्वरबद्ध केली. सर्वच्या सर्व गाणी जबरदस्त लोकप्रिय ठरली. "चार दिन" चित्रपटातील सुरैय्याने गायलेली "इक बेवफा की याद ने तडपाके मार डाला", "अंजामे मोहब्बत कुछ भी नहीं " ही दोन गीते तिची सर्वोत्कृष्ट गीते म्हणून ओळखली जातात. ३१ पैकी १३ गाणी एकट्या लताने गायली होती, त्यातील ७ गाणी सोलो होती. "बाजार" आणि "लाहोर" मधल्या लताच्या गाण्यांवर नूरजहाँचा प्रभाव दिसतो. उदा. "ऐ दिल उनको याद ना करना", "बसा लो अपनी निगाहों में" (बाजार), "टूटे हुए अरमानों की इक दुनिया बसाए" आणि "उस दिल की किस्मत क्या कहिए" मोहम्मद रफी आणि सुरैया यांनी प्रत्येकी ४ सोलो गाणी गायली होती. सर्वच गाणी अतिशय सुमधुर आहेत.
"अलिफ़-लैला" मधील गाणी रेकॉर्ड होत असतानाच शामसुंदर यांचे दुःखद निधन झाले. दारूच्या व्यसनामुळे आणखीन एका गुणवान कलावंताचा दुर्दैवी आणि अकाली अंत झाला. असं म्हणतात की त्यांच्या मृत्यूनंतर "आलिफ-लैला" चित्रपटातील उर्वरित गाणी त्यांचा अतिशय जवळचा मित्र संगीतकार मदन मोहन यांनी पूर्ण केली. पण ती गाणी कोणती हे कळायला मार्ग नाही. असो.
आपल्या अवघ्या १४ वर्षांच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीत शामसुंदर यांनी एकूण ४ पंजाबी आणि १७ हिंदी चित्रपटांना संगीत दिले. १७ हिंदी चित्रपटात एकूण १४७ गाण्यांना संगीत दिले. १९४९, १९५० आणि १९५१ या ३ वर्षात शामसुंदर यांनी ७८ गाण्यांना संगीत दिले, म्हणजे ५३% गाणी अवघ्या ३ वर्षात! १४७ पैकी १०६ गाणी (७२%) ही शमशाद बेगम, मोहम्मद रफी, लता मंगेशकर, सुरैय्या, नूरजहाँ आणि सुलोचना कदम या गायक-गायिकांनी गायली आहेत. "गाँव की गोरी (Village Girl)", "लाहोर", "बाजार", "ढोलक" यांसारख्या चित्रपटातील गाण्यांमुळे ते आपल्या कायम स्मरणात राहतील.
शामसुंदर यांची काही उत्कृष्ट गाणी:
१) किस तरह भूलेगा दिल उनका ख़याल आया हुआ - गाँव की गोरी (Village Girl) (१९४५) - गायिका नूरजहाँ - गीतकार वली साहेब MUST WATCH
३) मस्ती का समां - एक रोज़ (१९४७) - गायिका मुनव्वर सुलताना - गीतकार सरशर सैलानी
५) अंजामे मोहब्बत कुछ भी नहीं - चार दिन (१९४९) - गायिका सुरैय्या - गीतकार शकील बदायुनी
६) टूटे हुए अरमानों की इक दुनिया बसाए - लाहौर (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण MUST WATCH
७) ठंडी हवा के झोकें - भाई-बहन (१९५०) - गायिका शमशाद बेग़म - गीतकार ईश्वरचंद्र कपूर
८) मौसम आया है रंगीन - ढोलक (१९५१) - गायिका सुलोचना कदम, गायक सतीश बत्रा - गीतकार अज़ीज़ कश्मीरी MUST WATCH
९) छलक रहा है निग़ाहोंसे प्यार थोडासा - ढोलक (१९५१) - गायिका सुलोचना कदम - गीतकार अज़ीज़ कश्मीरी MUST WATCH
१०) मेरे नग्मों में उन मस्ताना - अलिफ़-लैला (१९५३) - गायक तलत महमूद - गीतकार साहिर लुधियानवी
११) बहार आयी खिली कलियाँ - अलिफ़-लैला (१९५३) - गायिका लता मंगेशकर - गीतकार साहिर लुधियानवी MUST WATCH
आज शामसुंदर यांची ४ सर्वोत्कृष्ट गीते खाली सादर करत आहे. या गीतांशिवाय शामसुंदर यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण अपूर्ण राहील. सर्व गाणी MUST WATCH
१) बैठी हूँ तेरी याद का लेकरके सहारा - गाँव की गोरी (Village Girl) (१९४५) - गायिका नूरजहाँ - गीतकार वली साहेब
या चित्रपटात नूरजहाँ प्रमुख भूमिकेत होती. तिचा नायक होता प्रेम अदिब. या गाण्यात व्हायोलिन चे अप्रतिम वादन आहे. त्याच्या तोडीस तोड नूरजहाँने गायले आहे. तिने घेतलेल्या हरकती/मुरकती लाजवाब आहेत. हे गाणे वेगवान आहे आणि योग्य तालवाद्यांमुळे त्या वेगात एक सातत्य आहे. "अख्सर मेरी आँखों ने तुझे नींद में, हाए तुझे नींद में ढूँढा" यातील "नींद" आणि "हाए" या दोन शब्दांच्या फेकीतून नूरजहाँने दर्द किती प्रभावीपणे पोचवलाय! संपूर्ण गाणे तिने एका जागी बसून गायलंय, शिवाय कपडेही पूर्ण साधे आहेत. त्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष गाण्यावर केंद्रित होते. नूरजहाँचा दर्दभरा, काळीज कापत जाणारा आवाज आपल्याला ओढून घेतो.
२) हम अपने दिल का फसाना उन्हे सुना ना सके - Actress (१९४८) - गायक मोहम्मद रफी - गीतकार नक्शाब
रफी साहेबांनी गायलेलं एक उत्कृष्ट गीत. शामसुंदर यांच्या संगीताचे वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातील पार्श्वसंगीत कधीही गायक/गायिकेच्या आवाजावर मात करत नाही, उलट ते पूरक ठरतं. हे गीत पडद्यावर प्रेम अदिब यांच्यावर चित्रित झालं आहे.
३) साजन की गलियाँ छोड़ चले - बाज़ार (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी
लताची सर्वोत्कृष्ट २० गाण्यांची यादी या गाण्याशिवाय अपूर्ण ठरेल. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेले हेच ते प्रसिद्ध गाणे. निगार सुल्तानावर चित्रित झालेलं. यात व्हायोलिन, बासरी आणि तबला ऐकू येतो. तबल्याचा ठेका आणि गायनाची लय यांचा सुरेख संगम झाला आहे. लताच्या छोट्या छोट्या हरकती, शब्दफेक वाखाणण्याजोगी. हे गाणं नक्की बघा.
४) बहारें फिर भी आएंगी मगर - लाहौर (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार राजेंद्र कृष्ण
ज्या गाण्याशिवाय शामसुंदरची कहाणी पूर्ण होत नाही असं हे आणखी एक गाणं. कुठल्याही ठेक्याशिवाय "नज़र से दूर जानेवाले दिल से दूर ना करना" या शब्दांनीच आपल्या काळजाचा ठाव घेत हे गाणे सुरु होते. "बहारें फिर भी आएंगी" या ओळीपासून ठेका सुरु होतो. यासाठी बहुदा मटक्याचा वापर केला असावा. लताचा तरुण, आर्ततापूर्ण आवाज त्या नायिकेची व्यथा आपल्यापर्यंत काही सेकंदात पोचवतो. अप्रतिम संगीत रचना आणि तितकेच ताकदवान, भावपूर्ण गायन. वाहवा! असे शब्द आपल्या तोंडून नकळत बाहेर पडतात.
शामसुंदर यांच्या कलाप्रतिभेस सलाम. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर कळवा. धन्यवाद.
संदर्भ:
१) सर्व फोटो YouTube वरून साभार
२) https://apnaarchive.wordpress.com/2012/10/29/shyam-sundar-a-genius-composer/
३) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/a-vintage-affair-with-shyam-sundar-369359
४) https://www.songsofyore.com/best-songs-of-shyam-sundar/
=========================================
Friends,
Noorjehan and Dilip Kumar |
Noorjehan ruled the Hindi film industry between 1939 and 1948 through her melodious songs. After she left India to settle down in Pakistan, Lata undoubtedly was the Queen. But, today the Malika-E-Tarannum was back to enthrall the audience with her sweet voice. And thus posed the challenge in front of Lata to prove why she ruled after Noorjehan. Lata was scheduled to sing before Noorjehan, hence it was more challenging.
This was the perfect appreciation for the musical genius of Shyam Sundar by the equally genius the great Lata Mangeshkar!
Shyam Sundar was born in Lahore and since his childhood was fan of Master Ghulam Haider's compositions. Shyam Sundar was a good Violin player and used to be the lead performer in the orchestra run by Ustad Jhande Khan. He assisted Master Ghulam Haider for a while. He got an opportunity to compose for few Punjabi films since Master ji was extremely occupied with his work. He composed music for 4 Punjabi films viz. "Sohni Kumaran" (1939), "Laila Majnu" and "Jagga Daku" (1940) and "Gul Baloch" (1942). Songs from all the 4 films became popular.
In 1938, Shyam Sundar accompanied the legendary singer from those times Kundan Lal Saigal to Lahore for a concert. Due to the power failure, Saigal saab had to stop his performance. The organizers called in a young boy from the audience to engage the audience till the power is back. The young boy played magic on the audience with his vibrant voice. Both Saigal saab and Shyam Sundar praised the young boy. He was none other than Mohammad Rafi who himself became a legend in the later years! Shyam Sundar was so impressed with Rafi's voice that he gave him his first break in the films in the film "Gul Baloch" (1942).
1948 saw yet another musical hit "Actress" by Shyam Sundar. Mohammad Rafi's two of the memorable songs "Hum Apne Dil Ka Fasana Unhe Suna Na Sake" and "Ai Dil Meri Aahon Mein Itna To Asar Aaye" are remembered till date.
Shyam Sundar's popularity touched the sky high with 3 hit movies viz. "Bhai Jaan" (1945), "Gaaon Ki Gori (Village Girl)" (1945) and "Actress" (1948). He was the most sought after music composer in those days. Sadly, he could not digest the success and got into the habit of drinking liquor.
Shyam Sundar died a tragic death during the making of "Alif Laila". His close friend and equally talented composer Madan Mohan completed rest of the songs. However, it is not known till date which songs were composed by whom.
In a career spanning 14 years from 1939 to 1953, Shyam Sundar gave music to 4 Punjabi and 17 Hindi films. He composed approx. 147 songs in 17 Hindi films. In 3 years i.e. from 1949 to 1951, he composed 78 songs, that is around 53% of his total songs! 106 out of 147 (72%) songs were contributed by just 6 singers - Shamshad Begum, Noorjehan, Lata Mangeshkar, Mohammad Rafi, Suraiyya and Sulochana Kadam.
We will always remember Shyam Sundar through his beautiful compositions from the films "Gaaon Ki Gori (Village Girl)", "Lahore", "Bazar" and "Dholak".
Some of the Besties by Shyam Sundar:
१) Kis Tarah Bhoolega Dil Unka Khayal Aaya Hua - Gaaon Ki Gori (Village Girl) (1945) - Noorjehan - Lyricist Wali Sahab MUST WATCH
३) Masti Ka Samaa - Ek Roj (1947) - Munawwar Sultana - Lyricist Sarshar Sailani
५) Anjaame Mohabbat Kuchh Bhi Nahin - Char Din (1949) - Suraiyya - Lyricist Shakeel Badayuni
६) Toote Hue Armanon Ki Ik Duniya Basayein - Lahore (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna MUST WATCH
७) Thandi Hawa Ke Jhokein - Bhai Behan (1950) - Shamshad Begum - Lyricist Ishwar Chandra Kapoor
८) Mausam Aaya Hai Rangeen - Dholak (1951) - Sulochana Kadam and Satish Batra - Lyricist Aziz Kashmiri MUST WATCH
९) Chhalak Raha Nigahon Se Pyar Thodasa - Dholak (1951) - Sulochana Kadam - Lyricist Aziz Kashmiri MUST WATCH
१०) Mere Nagmon Mein Un Mastana - Alif-Laila (1953) - Talat Mehmood - Lyricist Sahir Ludhiyanvi
११) Bahar Aayi Khili Kaliyan - Alif-Laila (1953) - Lata Mangeshkar - Lyricist Sahir Ludhiyanvi MUST WATCH
Presenting below are 4 of Shyam Sundar's best compositions. All songs are MUST WATCH.
1) Baithi Hoon Teri Yaad Ka Lekar Ke Sahara - Gaaon Ki Gori (Village Girl) (1945) - Noorjehan - Lyricist Wali Sahab
Noorjehan played the female lead role in this film. The male lead role was played by Prem Adeeb. The composition has Violin as a major instrument. Noorjehan's Gaayaki is difficult to explain in words. The song has a certain pace and accompanying instruments only add to its beauty. Listen to the Noorjehan's voice throw on the words "Neend" and "Haaye" in "Akhsar Meri Aankhon Ne Tuze Neend Mein, Haaye Tuze Neend Mein Dhoondha" line. Noorjehan's young, sharp voice projects the character's agony so effectively! Enjoy the song.
2) Hum Apne Dil Ka Fasana Unhe Suna Na Sake - Actress (1948) - Mohammad Rafi - Lyricist Naqshab
One of the best Rafi songs ever. Shyam Sundar's arrangement of accompanying instruments never overpower the singer's voice or the lyrics itself.
3) Sajan Ki Galiyan Chhod Chale - Bazar (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi
List of Lata's Top 20 songs would be incomplete without this song. Picturized on Nigar Sultana, this song has Violin, Flute and Tabla throughout. The singing is synchronized with the Tabla's Theka. Lata's Harkati/Murkati are worth listening.
4) Baharein Phir Bhi Aayengi - Lahore (1949) - Lata Mangeshkar - Lyricist Rajendra Krishna
One cannot talk about Shyam Sundar's career without mentioning this particular song. One can easily say that this song is the signature song of Shyam Sundar. The start without accompaniment itself captures audiences' attention. Just out of the world composition and equally outstanding Gayaki by Lata. Hats off to both for giving us this gem of a song!
Hope you would have liked the blog. Would welcome your comment. Thank you.
References:
1) All images courtesy YouTube
2) https://apnaarchive.wordpress.com/2012/10/29/shyam-sundar-a-genius-composer/
3) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/a-vintage-affair-with-shyam-sundar-369359
Thank you for sharing nice information. Never heard these old songs. I found Latajis voice v different ofcourse very sweet.
ReplyDeleteब्लॉग नेहमीप्रमाणेच खूप सुंदर, अतिशय माहितीपूर्ण. सर्वच गाणी उत्तम , विशेषतः लता मंगेशकर अप्रतिम. पुन्हा पुन्हा ऐकावी अशी गाणी. तुझ्या लेखनामुळे गाण्यातील सौन्दर्यस्थळे विशेष जाणवतात.
ReplyDeleteधन्यवाद शुभा.
DeleteVery nicely written. Heard Shyam Sundar's song after years. Thanks.
ReplyDeleteफारच सुंदर ब्लॉग, धनंजय. खुप माहिती मला नव्याने कळली. जुनी गाणीही परत ऐकता आली. विविधभारतीवर श्यामसुंदर हे नांव त्यांच्या सकाळच्या भुले बिसरे कार्यक्रमात ऐकलं होतं पण तेवढंच, अधिकची माहिती उत्तमरीतीने आज तुझ्या या ब्लॉग मधुन कळली, धन्यवाद. असेच, दुर्मिळ माहिती असणाऱ्यां प्रतिभावंत कलाकारांबद्दल उत्तमोत्तम ब्लॉग्सची तुझ्याकडून भविष्यात अपेक्षा... मयुरेश.
ReplyDeleteधन्यवाद मयूरेश.
Deleteसुंदर अप्रतिम. Mortal men...हा कार्यक्रम youtube वर आहे का?
ReplyDelete