Wednesday, 26 April 2023

अनमोल रतन - 14: The shortest Hindi film song ever

Namaskaar Friends,

Very happy to share the next song in the अनमोल रतन series. Shortest Blog for the Shortest song. 😊Hope you will like it.

The English version of the blog will follow the Marathi version below.


Song #14: अभी तो मैं जवान हूँ (Abhi To Main Jawan Hoon)


Photo Courtesy: Saavn.com

Film: Afsana (1951)

Director: B. R. Chopra

Cast: Ashok Kumar, Veena, Pran, Jeevan, Kuldeep Kaur, Cuckoo, Baby Tabassum

Lyrics: Ghafil Harnalvi

Composer: Husnalal Bhagatram

Singer: Lata Mangeshkar


हिंदी चित्रपट बोलायला लागल्यापासून संगीत हे त्याचे एक प्रमुख अंग बनले होते/आहे. बहुतांश चित्रपटातील गाणी ही साधारण ३-४ मिनिटांची असत. काही गाणी तर ८-१० मिनिटांची पण असत. सुरुवातीच्या काळातील म्हणजे १९३० आणि १९४०च्या दशकातील प्रत्येक चित्रपटात जवळपास ८-१० गाणी सहज असत. पण एकापेक्षा एक प्रतिभावान अशा गीतकार, संगीतकार आणि गायक-गायिकांनी मिळून या गाण्यांचा जो खजिना आपल्याला दिला आहे त्यामुळे ती गाणी कंटाळवाणी कधी झाली नाहीत. आजही १९४०, १९५० आणि १९६० च्या दशकातील गाणी रसिकांना ऐकावीशी वाटतात यातच त्या गाण्यांचे यश दिसून येते. 

थोडेसे चित्रपटाविषयी: 

"अफसाना" हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक B. R. चोप्रा यांनी निर्मित व दिग्दर्शित केला आहे. रतन आणि चमन (दोन्ही भूमिकांत अशोककुमार) हे जुळे भाऊ. त्यांची मैत्रीण मीरा (वीणा - ही पुढे आपल्या करारी आणि खलनायकी भूमिकांसाठी प्रसिद्ध झाली) आहे. रतन आणि मीरा लहानपणापासून एकमेकांना आवडतात. रतन हा साधा, सरळ असतो, तर चमन बदमाश. एकदा सर्वजण जत्रेला गेलेले असताना खूप मोट्ठे वादळ येते व त्यात रतन हरवतो. मीराला (बालपणीची मीरा बेबी तबस्सुमने ठसक्यात रंगवली आहे) धक्का बसतो, पण ती त्याची वाट पाहायची ठरवते. चमनचेही मीरावर प्रेम असते, पण मीरा रतनशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही. खूप काळ लोटतो. तिघेही मोठे होतात. चमनचा स्वतःचा उद्योग असतो, त्याचा सहकारी चटपट (जीवन) आणि त्याच्यावर प्रेम करणारी रसिलीबाई (कक्कू). वादळातून वाचलेला रतन एका अनाथाश्रमात अशोक म्हणून मोठा होतो व न्यायाधीश बनतो. अशोकचा मित्र मोहन (प्राण) आणि पत्नी लीलादेवी (कुलदीप कौर) हे खलनायक व खलनायिकेच्या भूमिकेत आहेत. पुढे काय होते यासाठी चित्रपट बघायलाच हवा.

पं. हुस्नलाल-भगतराम यांचे अप्रतिम संगीत असलेल्या "अफसाना" चित्रपटातील काही भावमधुर गीते:

१) वो पास भी रहकर पास नहीं - लता मंगेशकर - गीतकार असद भोपाली - MUST WATCH 

२) वो आए बहारें लाए बजी शहनाई - लता मंगेशकर - गीतकार असद भोपाली

३) किस्मत बिगड़ी दुनिया बदली - मुकेश - गीतकार असद भोपालीMUST WATCH

४) दुनिया एक कहानी रे भैय्या - मोहम्मद रफ़ी - गीतकार सरस्वती कुमार "दीपक"

५) आज कुछ ऐसी चोट लगी है - लता मंगेशकर - गीतकार असद भोपाली


आज जे गाणे सादर करत आहे त्या गाण्याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

१) हे गाणे हिंदी चित्रपटातले बहुदा लांबीने सर्वात छोटे गाणे असावे - फक्त १ मिनिट आणि २० सेकंद !

२) हे गाणे दोन खलनायकांवर चित्रित झाले आहे - प्राण आणि कुलदीप कौर 

३) हे गाणे पडद्यावर प्रत्यक्षात पार्श्वगीत म्हणून वाजते - कोणीही म्हणत नाही

४) हिंदी चित्रपटातील सर्वश्रेष्ठ खलनायक असं ज्याच्याबद्दल म्हटलं जातं तो प्राण या गाण्यात खलनायिकेबरोबर चक्क पाश्चिमात्य पद्धतीने नाचताना दिसतोय!

५) रेडिओ सिलोनवरच्या एका कार्यक्रमाची सुरुवात अनेक वर्षे या गाण्याच्या सुरावटीने व्हायची 


गाण्याची सुरुवात होते एका लयबद्ध सुरावटीने. व्हायोलिन, तालवाद्य आणि पाठीमागे वाजणारी बासरी या मोजक्या वाद्यांनीशी संगीतकार पं. हुस्नलाल-भगतराम यांनी ही अप्रतिम चाल बांधली आहे. मी एका वेगळ्या ब्लॉगमध्ये पं. हुस्नलाल-भगतराम यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला आहे तो इथे वाचता येईल.

१९५१ सालातील लताजींचा अत्यंत कोवळा पण तितकाच गोड आवाज या गाण्याला अजरामर करून गेला आहे. आपण या गाण्याचा जरूर आनंद घ्या.
 
गाणे आवडल्यास तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद.




Hello Friends,

Since the Hindi films went vocal, music has been their integral part. We have been enthralled by songs written, composed and sung by many great artists. During 1930's and 1940's, a lot of films had almost 8-10 songs in it, with each song lasting for 3-4 minutes. Some songs used to be very long ~8-10 min. duration. However such was the genius of those artists that the audience just loved all the songs. Many films we hear were popular only because of its wonderful songs.

Brief about the film:

"Afsana" was produced and directed by B. R. Chopra in 1951. Ratan, Chaman (both played by Ashok Kumar) and Meera (Veena - who was later known for her vamp roles) are childhood friends. While Ratan is an innocent and simple boy, Chaman is naughty and crafty. Meera loves Ratan while Chaman loves Meera, however she ignores him. One fine day, all go to a Mela and are caught in a huge storm. Ratan goes missing. Meera is shocked but decides to wait for Ratan. After few years, all grew up. Ratan survives the storm but lands in an orphanage and grows up as Ashok - the Judge. Chaman and his assistant Chatpat (Jeevan) run a business. Mohan (Pran) is Ashok's friend and Leelabai (Kuldeep Kaur) is Ashok's wife. Watch the film to understand what happens to Ratan/Ashok, Meera, Mohan and Chaman.

Few wonderful songs from the film "Afsana" composed by the legendary Pt. Husnalal-Bhagatram

१) Woh Paas Bhi Rahkar Paas Nahin - Lata Mangeshkar - Lyricist Asad Bhopali - MUST WATCH 

२) Woh Aaye Baharein Laye Baji Shahnai - Lata Mangeshkar - Lyricist Asad Bhopali

३) Qismat Bigadi Duniya Badali - Mukesh - Lyricist Asad Bhopali - MUST WATCH

४) Duniya Ek Kahani Re Bhaiyya - Mohammad Rafi - Lyricist Saraswati Kumar "Deepak"

५) Aaj Kuchh Aisi Chot Lagi Hai - Lata Mangeshkar - Lyricist Asad Bhopali


USP of the song being presented today:

1) This is perhaps the shortest song ever in Hindi films - total duration only 1 min and 20 seconds!

2) Picturized on 2 villains - Pran and Kuldeep Kaur

3) The song is played in the background, no one sings on the screen

4) Pran - who was termed as the greatest ever Villain of the Hindi film industry - is seen to be doing a Western style dance with his partner

5) The tune of this song used to be played at the start of a very famous programme on Radio Ceylon

As the song starts, you will hear beautiful piece of Violin supported by Tabla and Flute in the background. The composer Pt. Husnalal-Bhagatram has composed this extra-ordinary song with very few instruments. I have previously written in detail about Pt. Husnalal-Bhagatram, you can read it here.
 
Lata's young but sharp voice has taken this song to another level. Please enjoy the video given just above this English version of the blog.

Hope you will like it. Appreciate if you can leave a comment or two. Thanks.