Friday, 6 January 2023

Pt. Husnlal Bhagatram - The first Music Composer Jodi

Namaskaar!

English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feedback. Thanks.

Good News - Don't have time to read the entire blog? No worries. You can now "listen" to it below. 

English Audio: 

Marathi Audio: 


या दुनियेत संगीत फार थोड्या जणांना येतं असा माझा ठाम समज आहे. म्हणजे लोकं गाणी ऐकतात पण त्यातल्या खाचाखोचा, बारकावे, सौंदर्य त्यांना कळतंच असं नाही (बऱ्याचदा त्याची गरजही नसते हेही खरेच). मग एखाद्या कवितेला किंवा गाण्याला चाल लावणं तर दूरच. बरं, एकटा माणूस कदाचित प्रयत्न करून चाल लावेलही पण तेच काम दोघे करू लागले तर किती अवघड असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी!

हिंदी चित्रपटसृष्टीत पडद्यावर गाणी प्रथम अवतरली ती १९३१ सालच्या "आलम आरा" या पहिल्या बोलपटात. या चित्रपटात तब्बल ७ गाणी होती. तेंव्हापासून ते १९४४ पर्यंत रायचंद बोराल, पंकज मलिक, अनिल बिस्वास, सरस्वती देवी, गुलाम हैदर, इ. एकल (Solo) संगीतकारांनी तो काळ अक्षरशः गाजवला होता. १९४४ साली पं. हुस्नलाल आणि पं. भगतराम या दुकलीने हिंदी किंबहुना भारतीय चित्रसृष्टीच्या इतिहासात प्रथमच एकत्र संगीत देण्याचा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. या जोडीने पुढील २२ वर्षे म्हणजे १९६६ पर्यंत ५० चित्रपटातून जवळपास ४०६ सुमधुर गाणी रसिकांना भेट दिली.

पं. भगतराम यांचा जन्म १९१४ सालचा तर पं. हुस्नलाल यांचा १९२० चा, पंजाब मधील जालंधर जिल्ह्यातील काहमा या गावातील. त्यांचे वडील देवी चंद आणि थोरले बंधू पं. अमरनाथ (जे स्वतः त्याकाळचे प्रख्यात संगीतकार होते) यांच्या प्रेरणेने हुस्नलाल आणि भगतराम दोघांनी संगीताचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. हुस्नलाल यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण संगीत महामहोपाध्याय पं. दिलीपचंद्र वेदी यांच्याकडे तर व्हायोलिनचे शिक्षण उस्ताद बशीर खान यांच्याकडे घेतले. त्यामुळे हुस्नलाल शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादन दोन्हीत तरबेज झाले. भगतराम हे उत्तम हार्मोनियम वादक होते.

१९३९-४० साली पं. भगतराम यांनी ७-८ चित्रपटांना एकल (Solo) संगीत दिले होते. पण त्यांच्या गाण्यांप्रमाणेच लोकांनी त्यांचीही दखल घेतली नाही. पं. अमरनाथही त्यांच्या कामात खूप व्यस्त होते, त्यामुळे १९४४ साली जेंव्हा प्रभात फिल्म कंपनीने त्यांना "चाँद" या चित्रपटाच्या संगीतासाठी विचारले, तेंव्हा त्यांनी नम्रपणे नकार देत, आपला भाऊ हुस्नलाल यांचे नाव सुचवले. पण त्यासाठी हुस्नलाल यांना पुण्याला जावे लागणार होते, ते एकटेच कसे जाणार या काळजीपोटी पं. अमरनाथ यांनी कंपनीला हुस्नलाल यांच्याबरोबर भगतराम यांनाही घ्या म्हणून गळ घातली. प्रभातवाल्यांनी पैसे एकालाच मिळतील या अटीवर हुस्नलाल आणि भगतराम या दोघांनाही या चित्रपटाचे संगीत करण्याची जबाबदारी दिली. तेंव्हापासून हुस्नलाल यांच्या नावापुढे भगतराम यांचे नाव चिकटले ते कायमचेच! त्यानंतर १९५५ पर्यंत या जोडीने हिंदी चित्रपसृष्टीत आपले स्वतंत्र स्थानच नाही तर दबदबा सुद्धा निर्माण केला. अनिल बिस्वास, खेमचंद प्रकाश, सज्जाद हुसेन, नौशाद, सी. रामचंद्र, सचिनदेव बर्मन असे दिग्गज संगीतकार ऐन बहरात असताना स्वतःचे स्थान निर्माण करायचे ही काही सोपी गोष्ट नव्हती.

पं. हुस्नलाल-भगतराम जोडीचा पहिला चित्रपट "चाँद" यातील गाणी खूप गाजली, विशेषतः "दो दिलों को ये दुनिया मिलने भी नहीं देती" हे गीत. या चित्रपटाच्या यशानंतर प्रभात फिल्म कंपनीने या जोडीला १९४६ सालचा "हम एक है" हा चित्रपट दिला. यात विशेष म्हणजे हुस्नलाल-भगतराम यांनी "ओ नदिया किनारे मोरा गांव रे" हे गाणे आपल्या मराठमोळ्या माणिक वर्मा यांच्याकडून गाऊन घेतले! 


१९४६ ते १९४८ दरम्यान या जोडीने आणखीन काही चित्रपटांना संगीत दिले, पण त्यांनी प्रचंड यशाची खरी चव चाखली ती १९४८ साली प्रदर्शित झालेल्या "प्यार की जीत" आणि १९४९ सालच्या "बडी बहन" या दोन चित्रपटांनी. या दोन चित्रपटात मिळून एकूण १४ गाणी होती, त्यातील ७ गाणी एकट्या सुरैय्याने गायली होती. "प्यार की जीत" मधील "इक दिल के टुकड़े हज़ार हुए" (रफ़ी), "तेरे नैनों ने चोरी किया", "ओ दूर जानेवाले वादा ना भूल जाना" (सुरैय्या) आणि "कितने दूर है हुजूर" (सुरिंदर कौर) ही गाणी, तर "बड़ी बहन" यातील "चले जाना नहीं नैन मिलाके", "जो दिल में ख़ुशी बनकर आये" (लता), "वो पास रहे या दूर रहे", "तुम मुझको भूल जाओ" (सुरैय्या) ही गाणी अजरामर झाली. 

"तेरे नैनों ने चोरी किया" मधील मुखड्यानंतरचा तुकडा पुढे शंकर-जयकिशन यांनी "बरसात" मधील "जिया बेकरार है" गाण्यात जसाच्या तसा वापरला. ब्लॉगमध्ये पुढे हे गीत सादर केले आहे ते जरूर ऐका.

१९४९ आणि १९५० ही दोन वर्षे हुस्नलाल-भगतराम यांच्या सांगीतिक कारकिर्दीतील महत्वाची आणि प्रचंड व्यस्ततेची वर्षे ठरली. या दोन वर्षात दोघांनी तब्बल १८ चित्रपटातील १७३ गाण्यांना संगीत दिले, म्हणजे त्यांच्या एकूण ४०६ गाण्यांपैकी ४३% गाणी!! यात १९४८ सालच्या ४ चित्रपटातील २० आणि १९५१ सालच्या ५ चित्रपटातील ३९ गाणी मिळवली तर एकूण २३२ गाणी (६२%) ही १९४८ ते १९५१ या चार वर्षात संगीतबद्ध केली! 

हुस्नलाल-भगतराम यांच्याकडे सोलो व द्वंद्व मिळून एकट्या लताने एकूण ११०, रफीने ९६ तर सुरैय्याने ६३ गाणी म्हटली आहेत. गीतकार क़मर जलालाबादी यांच्याशी हुस्नलाल-भगतराम यांचे खास नाते जुळले होते असे वाटते कारण त्यांनी या जोडीसाठी तब्बल १५१ गाणी लिहिली आहेत, म्हणजे एकूण गाण्यांच्या ३७%!

वरील दोन हिट चित्रपटांशिवाय या जोडीने "आज की रात" (१९४८), "बालम", "जलतरंग", "बांसरीया", "नाच", हमारी मंझिल" (सर्व १९४९), "आधी रात", "छोटी भाभी", "मीना बझार", "बिरहा की रात", "सरताज" इ. चित्रपटातूनही असंख्य सुमधुर गाणी रसिकांना भेट दिली.


१९५१ साली प्रदर्शित झालेल्या "अफसाना" चित्रपटाने हुस्नलाल-भगतराम यांच्या यशाची पताका आणखीन फडकवत ठेवली. या चित्रपटातील सर्वच्या सर्व म्हणजे ९ गाणी तुफान लोकप्रिय झाली. विशेषतः "अभी तो मैं जवान हूँ" (लता), "दुनिया  एक कहानी रे भैय्या" (रफी) ही गाणी रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. त्याच वर्षी "काफिला" चित्रपटात हुस्नलाल-भगतराम यांनी प्रथमच किशोर कुमार यांना संधी दिली, आणि किशोरने अवघी २ गाणी मिळालेली असताना त्यांचे सोने केले. ती दोन गाणी म्हणजे "लहरों से पूछ लो" (लताबरोबर) आणि "वो मेरी तरफ यूं चले आ रहे हैं" (सोलो). या जोडीचा शेवटचा नोंद घेण्यासारखा चित्रपट होता १९५५ सालचा "अद्ल-ए-जहांगीर".


पं. हुस्नलाल-भगतराम यांची काही उल्लेखनीय गाणी:

१) दो दिलों को ये दुनिया मिलने भी नहीं देती - चाँद (१९४४) - गायिका मंजू - गीतकार क़मर जलालाबादी 

२) इक दिल के टुकड़े हज़ार हुए - प्यार की जीत (१९४८) - गायक मोहम्मद रफ़ी - गीतकार क़मर जलालाबादी

३) चुप चुप खड़े हो जरूर कोई बात है - बड़ी बहन (१९४९) - गायिका प्रेमलता आणि लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी

४) लुट गयी उम्मीदों की दुनिया - जलतरंग (१९४९) - गायिका लता मंगेशकर - गीतकार सरशार सैलानी 

५) क़िस्मत बिगड़ी दुनिया बदली - अफसाना (१९५१) - गायक मुकेश - गीतकार असद भोपाली 

६) बेदर्द शिकारी अरे बेदर्द शिकारी - सनम (१९५१) - गायिका सुरैय्या, लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी      MUST WATCH 

    • लता आणि सुरैय्या यांच्या फार थोड्या द्वंद्वगीतांपैकी हे एक. या गाण्यात तरुण वयातील मीनाकुमारी आणि सुरैय्या दिसतील.

७) मोहब्बत की हम चोट खाये हुए है - फ़रमाइश (१९५३) - गायक तलत महमूद - गीतकार क़मर जलालाबादी

८) आज लैला को मजनू का प्यार मिला - अद्ल-ए-जहाँगीर (१९५५) - गायिका लता मंगेशकर - गीतकार क़मर जलालाबादी


पं. हुस्नलाल-भगतराम यांनी त्यांच्या संगीतात पंजाबी लोकगीते आणि ठेक्याचा यथेच्छ वापर केला. किंबहुना त्यांचा विशिष्ट पंजाबी ठेका हेच त्यांच्या बहुसंख्य गाण्यांचे वैशिष्टय ठरले. इतके की पुढे शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, ओ. पी. नय्यर यांनी याच ठेक्याला त्यांच्या पद्धतीने वळण देऊन आपले संगीत लोकप्रिय केले. त्यांनी आपल्या संगीतात हार्मोनियम, व्हायोलिन, हवाई गिटार, पियानो, ढोलकी आणि क्वचित मटका यांचा सढळ हाताने वापर केला. हुस्नलाल-भगतराम यांच्याकडे शंकर (शंकर-जयकिशन जोडीमधील), लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीमधील), खय्याम, महेंद्र कपूर तसेच एस. मोहिंदर (व्हायोलिनवादक व संगीतकार) यांना शिकवण्याचे श्रेय जाते. 

दुर्दैवाने त्यांचा विशिष्ट पंजाबी ठेका हाच त्यांच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरला, कारण फार वेगळे संगीत ते देऊ शकले नाहीत, तसेच चित्रपटसृष्टीत टिकून राहण्यासाठी ज्या गोष्टी करायला लागतात त्या त्यांनी केल्या नाहीत. त्यामुळे १९५५ नंतर हळूहळू त्यांचे काम कमी होत गेले. त्यांचा शेवटचा चित्रपट होता १९६६ सालचा "शेर अफगाण". 

त्यानंतर पं. हुस्नलाल कंटाळून दिल्लीला निघून गेले व उपजीविकेसाठी शास्त्रीय गायनाचे तसेच व्हायोलिन वादनाचे कार्यक्रम करू लागले. तर पं. भगतराम मुंबईतच राहून इतर संगीतकारांच्या ताफ्यात हार्मोनियम वाजवत राहिले. २८ डिसेंबर १९६८ रोजी पं. हुस्नलाल यांचे  वयाच्या अवघ्या ४८व्या वर्षी निधन झाले. तर त्यानंतर पाचच वर्षांनी म्हणजे २९ नोव्हेंबर १९७३ रोजी पं. भगतराम वयाच्या अवघ्या ५९व्या वर्षी हे जग सोडून गेले. प्रसिद्ध सरोद वादक झरीन शर्मा (दारूवाला) या पं. भगतराम यांच्या सुनबाई. 

जवळपास ११ वर्षे चित्रसृष्टी गाजवणाऱ्या आणि अनेक अप्रतिम गाणी देणाऱ्या या गुणी संगीतकार जोडीला विनम्र अभिवादन. 

आज मी मला आवडणारी पं. हुस्नलाल-भगतराम यांची ४ गाणी खाली सादर करणार आहे. आशा आहे की ती तुम्हालाही आवडतील. प्रतिक्रिया द्यावी ही नम्र विनंती. धन्यवाद.


१) तेरे नैनों ने चोरी किया - प्यार की जीत (१९४८) - गायिका सुरैय्या - गीतकार क़मर जलालाबादी


२) मोहब्बत के धोख़े में कोई ना आये - बड़ी बहन (१९४९) - गायक मोहम्मद रफ़ी - गीतकार राजेंद्र कृष्ण


३) मनवा में प्यार डोले - सरताज (१९५०) - गायक जोहराबाई अंबालावाली आणि मुकेश - गीतकार मजरुह सुलतानपुरी 


४) वो पास भी रहकर पास नहीं - अफ़साना (१९५१) - गायिका लता मंगेशकर - गीतकार असद भोपाली 

लताच्या काही उत्कृष्ट गाण्यांपैकी हे एक गाणे. अभिनेत्री वीणावर ("चलती का नाम गाडी" मधील अशोक कुमारची प्रेयसी कामिनी, किंवा "पाकिजा" मधील नवाबजान) हे गाणे चित्रित झाले आहे. प्रत्येक अंतऱ्यातील पहिल्या दोन ओळी या तालवाद्यांशिवाय लताने काय अप्रतिम म्हटल्या आहेत! तिचा सूर, छोट्या छोट्या मुरक्या केवळ अप्रतिम. संबंध गाण्यात पियानो आणि व्हायोलिनचा सुंदर वापर हुस्नलाल-भगतराम यांनी केला आहे, आणि जोडीला आहे त्यांचा प्यारा ठेका!


संदर्भ:

१) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/in-the-wrong-league-501799?infinitescroll=1

२) http://downmelodylane.com/husnlalbhagatram.html

३) https://apnaorg.com/articles/aujla-2/

४) https://www.hindigeetmala.net/search.php?value=bhagatram&type=2

५) https://www.cinemaazi.com/people/bhagatram


Friends,

Very few lucky ones in this world understand Music is my strong belief. Many of us listen to the songs everyday but not many would understand its nuances such as Raag, Taal, etc. It's true that to enjoy the song one does not need to understand it technically. But this explains why composing music is so difficult for one person, let alone a duo!

Since the films went vocal in the Indian film industry from 1931 "Alam Ara" the songs have been an integral part of the films. The first talkie "Alam Ara" itself had 7 songs in it and it created a buzz among the public at that time. From 1931 to 1944, a no. of music composers ruled the industry but all of them were solo music composers e.g. Raichand Boral, Anil Biswas, Saraswati Rane, Ghulam Haider, etc. None of them had even imagined to form a duo to compose music! Come 1944, and for the first time in the Film industry, the pair comprising of 2 brothers viz. Husnlal and Bhagatram, tried to compose the music, as a duo, for the film "Chand" produced by Prabhat Film Company from Pune. And the experiment was so successful that the duo carried on composing the music together for another 22 years!

Both, Husnlal and Bhagatram hailed from a small village Kahma in Jalandhar district of Punjab. While Bhagatram was born in 1914, Husnlal was born in 1920. Their father Devi Chand and elder brother Pt. Amarnath - who himself was an accomplished music composer in those days - were the real inspiration behind both the brothers taking up music as their career. Husnlal learnt Hindustani Classical Music from Sangeet Mahamahopadhyay Pt. Dilip Chandra Vedi. He also had Violin training from Ustad Bashir Khan of Patiyala. Bhagatram had been a good Harmonium player.

During 1939-40, Bhagatram worked as a solo music composer and composed music for about 8 films; however just like his music, people did not take notice of him. His elder brother Pt. Amarnath used to be extremely busy with his work. Thus, when Prabhat Film Company approached him to compose music for their upcoming film 'Chand' in 1944, he refused, but suggested Husnlal's name. Prabhat agreed to take Husnlal as composer. But when Pt. Amarnath learnt that Husnlal will have to go to Pune (erstwhile Poona) alone, out of anxiety for the youngest brother, he pleaded to Prabhat Film Company to allow Bhagatram to assist Husnlal in the music composing work. The company grudgingly agreed but on the condition that only Husnlal will be paid. Both agreed and thus came the first film of the duo Pt. Husnlal-Bhagatram. 'Chand' had in all 11 songs in it and all became reasonably popular.

Manik Verma
After this, Prabhat offered another film "Hum Ek Hain" in 1946 to Husnlal-Bhagatram duo. One of the songs in this film "O Nadiya Kinare Mora Gaon Re" was sung by the well-known Classical and Light Music singer from Maharashtra viz. Manik Verma.

Between 1946 and 1947, Husnlal Bhagatram did few more films, but nothing notable. However, 1948 changed their life forever with the superhit film "Pyaar Ki Jeet" starring Rehman, Suraiyya, Gope and Manorama. It had 7 songs out of which 3 were sung by Suraiyya. All songs like "O Door Janewale Vaada Na Bhool Jana" (Suraiyya), "Ik Dil Ke Tukde Hazar Hue" (Rafi), "Kitne Door Hai Huzoor" (Surinder Kaur) became extremely popular with the audience. Then came another super duper hit "Badi Behen" in 1949. It had 8 songs - 3 by Lata, 4 by Suraiyya and 1 by Rafi. Songs "Chale Jana Nahin" (Lata), "Woh Paas Rahe Ya Door Rahe", "Tum Muzko Bhool Jaao" (Suraiyya) were big hits. 

From the song "Tere Nainon Ne Chori Kiya", the music piece just after the Mukhada has been copied as is by Shankar-Jaikishan in their famous song "Jiya Beqarar Hai" from their film "Barsaat". Listen to this song presented below.

Pt. Husnlal-Bhagatram experienced golden years of their career in from 1949 to 1951. During this period, they composed music for 212 songs from 23 films, i.e. ~52% of their total songs were composed in just these 3 years! Which also means they had composed and released 1 song every 5 days! Wow, how busy they would have been during this time, we can only imagine!!  

Lata has sung total 110 songs (solo+duet), Suraiyya 65 songs and Rafi 95 songs under the duo's music direction. The composer duo seemed to have special association with Lyricist Qamar Jalalabadi - he wrote 151 songs for them i.e. whooping 37%.

Some of the other notable films by this musical duo were "Aaj Ki Raat" (1948), "Balam", "Jaltarang", "Bansariya", "Naach", "Hamari Manzil" (1949) and "Aadhi Raat", "Chhoti Bhabhi", "Meena Bazar", "Birha Ki Raat" and "Sartaj" (1950). 

In 1951, Husnlal-Bhagatram gave 2 more hit films viz. "Afsana" and "Kaafila". "Afasana" had 9 songs in it and all are remembered even today. Particularly, songs like "Abhi To Main Jawan Hoon", "Woh Aaye Bahare Aayi", "Aaj Kuch Aisi Chot Lagi Hai" (Lata), "Duniya Ek Kahani Re Bhaiyya" (Rafi) were instant hits. In "Kaafila", Husnlal-Bhagatram worked with Kishore Kumar for the first and the last time and gave him 2 songs - "Lahron Se Pooch Lo" (with Lata) and "Woh Meri Taraf Yun" - and gosh! What wonderful melodious songs these are!! 1955 saw the last notable film from the duo viz. "Adl-E-Jahangir".


Some of the best songs of Husnlal-Bhagatram:

1) Do Dilon Ko Yeh Duniya - Chand (1944) - Singer Manju - Lyricist Qamar Jalalabadi 

2) Ik Dil Ke Tukde Hazar Hue - Pyaar Ki Jeet (1948) - Singer Mohammad Rafi - Lyricist Qamar Jalalabadi

3) Chup Chup Khade Ho Jaroor Koi Baat Hai - Badi Bahan (1949) - Singers Premlata and Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi

4) Lut Gayi Ummedon Ki Duniya - Jaltarang (1949) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Sarshar Sailani 

5) Qismat Bigadi Duniya Badali - Afsana (1951) - Singer Mukesh - Lyricist Asad Bhopali 

6) Bedard Shikari Are Bedard Shikari - Sanam (1951) - Singers Suraiyya and Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi   MUST WATCH

    • One of the rare duets by Suraiyya and Lata picturized on young and gorgeous Meena Kumari and Suraiyya herself

7) Mohabbat Ki Hum Chot Khaaye Hue Hai - Farmaish (1953) - Singer Talat Mahmood - Lyricist Qamar Jalalabadi

8) Aaj Laila Ko Majnu Ka Pyaar Mila - Adl-E-Jahangir (1955) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Qamar Jalalabadi


Husnlal-Bhagatram were the harbingers of Punjabi folk music and Punjabi Theka in the Hindi films. They widely used Violin, Harmonium, Hawain Guitar, Piyano and Dholak in their brilliant compositions. Shankar (of Shankar-Jaikishen), Laxmikant (of Laxmikant-Pyarelal), Khayyam, Mahendra Kapoor and S. Mohinder all were the disciples of Husnlal-Bhagatram.

Unfortunately, they got caught in their own style (Punjabi Theka) so much that they could not produce varied kind of music after 1955, which ultimately proved their undoing as they slowly saw the decline. The last Hindi movie they did was "Sher Afgan" in 1966.

After this, Pt. Husnlal went back to Delhi and started doing Classical music and Violin programs for earnings, while Pt. Bhagatram stayed back in Mumbai playing Harmonium for other Music composers. Pt. Husnlal died of cardiac arrest on 28th December 1968 at the early age of 48, and Pt. Bhagatram died on 29th November 1973 at the age of 59.

Let's remember these great melodious composers and remember their songs that entertained us till now.

Today, I am going to present below 4 of their songs which I consider to be their signature songs. Hope you will like it. Please do share your comments. Thanks.


1) Tere Nainon Ne Chori Kiya - Pyaar Ki Jeet (1948) - Singer Suraiyya - Lyricist Qamar Jalalabadi


2) Mohabbat Ke Dhokhe Mein Koi Naa Aaye - Badi Behen (1949) - Singer Mohammad Rafi - Lyricist Rajinder Krishna


3) Manwa Mein Pyaar Dole - Sartaj (1950) - Singers Zohrabai Ambalawali and Mukesh - Lyricist Majrooh Sultanpuri


4) Woh Paas Bhi Rahkar Paas Nahin - Afsana (1951) - Singer Lata Mangeshkar - Lyricist Asad Bhopali

This is regarded as one of the best songs of Lata. It was picturized on the actress Veena ("Chalati Ka Naam Gaadi" and "Pakeezah" fame). First two lines of every Antara has been without any rhythm instrument hence depict the pure voice of the great Lata. Husnlal-Bhagatram has used Piyano and Violin throughout the song accompanied by their famous rhythm. 



References:

1) https://www.millenniumpost.in/sundaypost/inland/in-the-wrong-league-501799?infinitescroll=1

2) http://downmelodylane.com/husnlalbhagatram.html

3) https://apnaorg.com/articles/aujla-2/

4) https://www.hindigeetmala.net/search.php?value=bhagatram&type=2

5) https://www.cinemaazi.com/people/bhagatram