Wednesday, 31 August 2022

Ghulam Haider - The Master

Namaskaar!

English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feedback. Thanks.

Good News - This blog is also available now in the AUDIO format! Here are both English and Marathi Audio versions. Listen and Enjoy. Please do share your comments. Thanks.


Marathi Audio : 

English Audio: 


Master Ghulam Haider
Photo Courtesy : Cinestaan


Noorjehan
साधारण १९३५-४० च्या दरम्यानचा काळ होता. एक तरुण संगीत दिग्दर्शक हिंदी चित्रपटसृष्टीत आपले पाय रोवू पाहत होता. याच वेळी त्याच्या कानावर एका जेमतेम १० वर्षाच्या छोट्या मुलीचा आवाज पडला. त्याला तो आवाज खूपच आवडला. त्याने त्या मुलीला थेट पंचोली स्टुडिओज मध्ये बोलावले. त्या मुलीने पिलू रागातील "प्यारे रसिया बिहारी, सुनो बिनति हमारी" ही चीज गायली. तरुण संगीतकार अतिशय खुश झाला आणि मुलीला म्हणाला, "बाळा, तू तुझ्या वयापेक्षा खूप चांगलं आणि परिपक्व असं गाणं गातेस!". त्यानंतर १९३९ साली प्रदर्शित झालेल्या "गुल बकावली" चित्रपटात त्या संगीतकाराने त्या छोट्या मुलीकडून २ गाणी गाऊन घेतली. "शाला जवानियाँ माने, आखा ना मोरी पीले" आणि "पिंजरे दे विच कैद जवानी" ही ती २ गाणी जी प्रचंड लोकप्रिय झाली. या दोन गाण्यांनी त्या छोट्या गायिकेची दखल हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्याबड्या असामींना घ्यावी लागली. १० वर्षांची ती छोटी गायिका होती बेबी नूरजहाँ जी पुढे मलिका-ए-तरन्नुम नूरजहाँ म्हणून जगभरात प्रसिद्ध झाली.

नूरजहाँ या संगीतकाराबद्दल काय म्हणतात ते इथे बघा - 



Shamshad Begum
याच तरुण संगीतकाराने त्याच दरम्यान आणखी एका तरुण गायिकेकडून "गुल बकावली" चित्रपटात २ गाणी गाऊन घेतली "घूक मेरी किस्मत सौन गयी" आणि "मैं 'तेरी तू मेरा". ती गायिका होती त्याकाळची अतिशय लोकप्रिय गायिका शमशाद बेगम.

साल १९४७. तोच संगीतकार एव्हाना खूप मोठा झालेला असतो, चित्रपटसृष्टीत त्याच्या नावाचा दबदबा निर्माण झालेला असतो. मुंबईच्या लोकल ट्रेन मधून प्रवास करताना त्याला एक लहानखोरी मुलगी काहीतरी गुणगुणताना ऐकू येते. तिचा आवाज खूपच धारदार आणि उंच पट्टीचा असतो पण गोड असतो. तो संगीतकार त्या मुलीला त्याने नुकतीच बनवलेली एक संगीतरचना गायला सांगतो, तिचे गाणे ऐकून तो जाम खुश होतो, तिला ऑडिशनला बोलावतो आणि ती मुलगी चक्क ऑडिशन पास करते. त्यानंतर तो संगीतकार त्या मुलीला फिल्मिस्तान स्टुडिओचे मालक शशधर मुखर्जी यांच्याकडे घेऊन जातो, पण मुखर्जी त्या मुलीचा आवाज ऐकून तो फारच धारदार/टोकदार आहे, माझ्या "शहीद" (१९४८) चित्रपटाच्या नायिकेला हा आवाज योग्य होणार नाही असे सांगून तिला नकार देतात. संगीतकार हे ऐकून प्रचंड संतापतो व तिथून निघून जाताना तो संगीतकार मुखर्जींकडे अशी भविष्यवाणी करतो की एक दिवस सर्व निर्माते या गायिकेच्या घराबाहेर रांगा लावतील. पुढे १९४८ मध्ये प्रदर्शित झालेल्या "मजबूर" चित्रपटात त्या लहानखोर दिसणाऱ्या गायिकेकडून "दिल मेरा तोडा मुझे कहीं का ना छोडा" हे गाणे गाऊन घेतो. ती मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून भविष्यात महान झालेली गायिका लता मंगेशकर असते!

वरील सर्व प्रसंगामधील संगीत दिग्दर्शक म्हणजे मास्टर ग़ुलाम हैदर. मास्टरजी यांच्याकडे नूरजहाँ, शमशाद, लता, सुरिंदर कौर यांसारख्या गायिकांना चित्रपट गायनाची पहिली संधी देण्याचे श्रेय जाते.


ग़ुलाम हैदर यांचा जन्म १९०८ साली आताच्या पाकिस्तानातील हैदराबाद, सिंध येथे झाला. त्यांचे वडील हे शिखांच्या धार्मिक कार्यक्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर करायचे. त्यामुळे त्यांना सर्वांनी प्रेमाने भाई मेहर असे नाव दिले होते. भाई मेहर यांचे घराणे रबाबी संगीताचे घराणे होते. त्यांची आणि त्यांच्या पूर्वजांची अनेक तंतू वाद्यांवर हुकूमत होती. ते स्वतः तबला, ढोलक, पखवाज इ. वाद्ये उत्तम वाजवायचे. तोच वारसा कदाचित ग़ुलाम हैदर यांच्याकडे आला असावा. 

मास्टर ग़ुलाम हैदर यांनी तरुण वयात दंतवैद्यक शास्त्राचं शिक्षण घेतलं होतं, पण त्याकडे न जाता ते संगीताकडे वळले. अगदी लहान वयापासूनच त्यांनी हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली. ते अनेक थिएटर कंपन्या तसेच संगीत संस्था यांच्याबरोबर हार्मोनियम वादनासाठी विविध ठिकाणी दौऱ्यावर जायचे. पण त्यांचे मूळ ठिकाण लाहोर हेच राहिले. तिथे राहून ग़ुलाम हैदर यांनी बाबू गणेश लाल यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे पद्धतशीर शिक्षण घेतले. कलकत्ता येथील Alfred Theatrical Company आणि Alexandra Theatrical Company यांच्यासाठी ग़ुलाम हैदर हे हार्मोनियम वादन करायचे. कालांतराने त्यांना लाहोर येथील सेठ जनक दास यांच्या Jenaphone Recording Company मध्ये नोकरी मिळाली आणि हळू हळू ते संगीतकार या पदापर्यंत पोहोचले.


ग़ुलाम हैदर यांना चित्रपटात संगीतकार म्हणून पहिली संधी मिळाली ती १९३४ सालच्या "Thief of Iraq" या चित्रपटात. त्यानंतर १९३५ साली त्यांचे २ चित्रपट आले "मजनू" आणि "स्वर्ग की सीढ़ी". या तिन्ही चित्रपटात मिळून ग़ुलाम हैदर यांनी एकूण २५ गाणी स्वरबद्ध केली होती. "स्वर्ग की सीढ़ी" या चित्रपटात प्रमुख गायिका होती उमराव झिया बेगम ज्या पुढे ग़ुलाम हैदर यांची पत्नी बनल्या. १९३९ ते १९४४ या कालावधीत ग़ुलाम हैदर यांनी ५ पंजाबी चित्रपटांना संगीत दिले - "गुल बकावली" (१९३९), "यमला जट" आणि "सस्सी पनून" (१९४०), "चौधरी" (१९४१) आणि "सेहती मुराद" (१९४२). यापैकी "यमला जट" ची गाणी खूप गाजली. 

मास्टरजींची वाद्यमेळ्यावर (orchestration) प्रचंड हुकूमत होती. विशेषतः त्यांच्या सर्व गाण्यातील Prelude आणि Interlude संगीत हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी त्यांच्या संगीतात पियानो, सारंगी, व्हायोलिन या तंतुवाद्यांबरोबरच तबला, ढोलकी, पखवाज या तालवाद्यांचाही प्रामुख्याने समावेश केला. १९३० च्या दशकांत हिंदी चित्रसृष्टीत रायचंद बोराल, तिमिर बरन, पंकज मलिक, अनिल बिस्वास यांसारख्या बंगाली संगीतकारांचा दबदबा होता. त्यांचे हे संगीत हे प्रामुख्याने बंगाली, रवींद्र संगीतावर आधारलेले सौम्य, गोडवा असलेले असे होते. ग़ुलाम हैदर यांनी तालवाद्यांचा विशेषतः ढोलकीचा आणि पंजाबी ठेक्याचा सर्वप्रथम वापर आपल्या संगीतात करून हिंदी चित्रपट संगीतात क्रांती घडवून आणली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हिंदी चित्रपटात पंजाबी ठेका आणि संगीत आणण्याचे संपूर्ण श्रेय ग़ुलाम हैदर यांच्याकडे जाईल.

एकीकडे पंजाबी चित्रपट संगीत करत असताना मास्टरजींनी काही हिंदी/उर्दू चित्रपटांनाही संगीत दिले. "खजांची" (१९४१), "जमीनदार", "खानदान" (१९४२) आणि "पूँजी" (१९४३) हे ते चित्रपट होत. पूर्णतः पंजाबी ठेका आणि ढोलकीचा यथेच्छ वापर असलेली "खजांची" चित्रपटातील शमशाद बेगम आणि स्वतः ग़ुलाम हैदर यांनी गायलेले "सावन के नज़ारे है" आणि इतर गाणी तसेच "खानदान" चित्रपटातील नूरजहाँ यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली, कारण लोकांना प्रथमच काहीतरी वेगळे ऐकायला मिळत होते. असं म्हणतात की खुद्द लताने १९४१/४२ सालच्या एका गायन स्पर्धेत "खजांची" चित्रपटातील गाणे गाऊन प्रथम क्रमांक मिळवला होता!

Photo Courtesy:
BaaghiTV.Com

१९४४-४५ साली मुंबईला येईपर्यंत मास्टर ग़ुलाम हैदर हिंदी चित्रसृष्टीतले एक प्रथितयश संगीतकार झाले होते. संपूर्ण नवीन आणि अनोखी अशी पंजाबी संगीतावर आधारलेली शैली त्यांनी विकसित केली होती आणि त्यात ते यशस्वी झाले होते. १९४७ साली त्यांनी आणखीन काही अजरामर गाणी संगीत रसिकांना "मजबूर", "पद्मिनी" आणि "शहीद" या चित्रपटातून दिली. याच चित्रपटात त्यांनी लताचा आवाज पहिल्यांदा वापरला. तिने गायलेली "मजबूर" चित्रपटातले "दिल मेरा तोडा" आणि "पद्मिनी" चित्रपटातील "बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के" ही गाणी निःसंशयपणे लताच्या काही सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी आहेत. याशिवाय सुरिंदर कौर यांनी गायलेलं "शहीद" चित्रपटातले "बदनाम ना हो जाए" हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

१९४७ साली भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर ग़ुलाम हैदर हे पाकिस्तानात निघून गेले. तिथे त्यांनी "शहिदा" (१९४९), "बेक़रार" (१९५०), "अकेली" (१९५१) आणि "भीगी पलकें" (१९५२) या चित्रपटांना संगीत दिले; पण दुर्दैवाने हे चित्रपट चालले नाहीत. त्यांचा शेवटचा पाकिस्तानी चित्रपट "गुलनार" १९५३ साली प्रदर्शित होण्याआधीच ग़ुलाम हैदर यांचे घशाच्या कॅन्सरने अकाली निधन झाले. त्यांचा शेवटचा हिंदी चित्रपट ठरला १९५३ साली प्रदर्शित झालेला "आबशार"! मास्टरजींच्या अकाली जाण्याने हिंदी चित्रसृष्टी एका प्रतिभावान संगीतकाराला मुकली, कारण कदाचित पुढे लाहोरमध्ये राहूनही त्यांनी हिंदी चित्रपटांना संगीत दिले असते. 

१९३४ ते १९५३ या आपल्या १९ वर्षाच्या संगीतकार म्हणून कारकिर्दीमध्ये ग़ुलाम हैदर यांनी पंजाबी, उर्दू आणि हिंदी मिळून एकूण ३० चित्रपटांना संगीत दिले. एकूण २६६ गाण्यांना त्यांनी साज चढवला, त्यापैकी फक्त ६% म्हणजे १५ गाणी ही पुरुष गायकांनी म्हटलेली आहेत! १९४१ ते १९५० या दहा वर्षात मास्टरजींनी २६६ पैकी २२० म्हणजे तब्बल ८३% गाण्यांना संगीत दिले होते इतकी त्याची प्रतिभा त्या काळात बहरात होती. ते स्वतः उत्तम गायक सुद्धा होते, त्यांनी जवळपास १५ गीते गायली आहेत. (ही आकडेवारी मला https://www.hindigeetmala.net/ आणि YouTube या websites वरून मी गोळा केलेल्या गाण्यांच्या यादीवरून तयार करता आली, त्यामुळे ही आकडेवारी १००% अचूक नाहीये. या websites चे आभार)

मास्टर ग़ुलाम हैदर या महान संगीतकाराचे आणि त्यांच्या हिंदी चित्रसृष्टीतील योगदानाचे आज स्मरण करून त्यांची काही अप्रतिम गीते ऐकू या.  

१) सावन के नज़ारें है - खजांची (१९४१) - शमशाद बेगम, ग़ुलाम हैदर आणि सहकारी - गीतकार वली साहेब

१९४१ साली प्रदर्शित झालेला  "खजांची" हा पंचोली पिक्चर्स निर्मित चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड ठरला. मास्टर ग़ुलाम हैदर यांनी हिंदी चित्रपटात प्रथमच पंजाबी लोकगीतांचा साज असलेले संगीत दिले. सर्व गाणी आणि चित्रपटही तुफान गाजला. मोहम्मद इस्माईल, रमोला देवी, प्राण, मनोरमा, जानकी दास आणि मदन पुरी यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाने त्यावर्षी सर्वाधिक कमाई केली. त्यातीलच हे सर्वाधिक गाजलेले गाणे. शमशाद बेगम यांचा पहाडी आवाज, तितकेच ताकदवान कोरस, तरुण-तरुणींचा समूह सायकलवर जात असताना चित्रित झालेले गाणे, सायकलच्या वेगाशी स्पर्धा करणारा ताल (Rhythm) आणि सायकलच्या घंटांच्या आवाजाचा खुबीने केलेला उपयोग ही या गाण्याची वैशिष्ट्ये. 





२) हम खेलेंगे आँख मिचौली खेलेंगे - खानदान (१९४२) - नूरजहाँ - गीतकार 

वास्तविक मास्टर ग़ुलाम हैदर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली नूरजहाँ यांनी अनेक सुंदर गाणी गायली आहेत. उदा. "शाला जवानियाँ माने, आखा ना मोरी पीले" (गुल-ए-बकावली - १९३९), "कचियाँ वे कलियाँ तू न तोड़" (यमला जट - १९४०), "बस वे ढोलना, तेरे नाल बोलना" (चौधरी - १९४१), "तू कौनसी बदली में मेरे चाँद है आ जा" (खानदान - १९४२), "मेरे लिए जहाँ में चैन है ना करार है" (खानदान - १९४२) आणि "बचपन की यादगारों तुम ही मुझे पुकारो" (गुलनार - १९५०). पण इथे सादर करत असलेले गाणे सर्वार्थाने सुंदर आहे, आणि माझे आवडतेही.


हे गाणे पडद्यावर खुद्द नूरजहाँ हिच्यावरच चित्रित झाले आहे आणि तिने स्वतःच गायले आहे. मास्टरजींची खासियत असलेले गाणे सुरु होण्याच्या सुरुवातीचे तब्बल ३४ सेकंदांचे संगीत (Prelude Music) ऐकल्यावर एक प्रसन्न वातावरण तयार होते, आणि नंतर ऐकू येतो तो नूरजहाँचा तरुण नूरजहाँचा एखाद्या खळाळत्या झऱ्यासारखा भासणारा आवाज. सतार आणि जलतरंग यांचा अप्रतिम वापर मास्टरजीनी संपूर्ण गाण्यात केला आहे. एखाद्या अल्लड मुलीने "हम खेलेंगे" म्हणताना तिचा अल्लडपणा हा जलतरंगाच्या आवाजाने कसा दर्शविला आहे ते पहाच, अल्लडपणा आणि जलतरंग - संगीतकाराने केलेला हा विचारच किती लाजवाब आहे! या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे एरवी ठळकपणे वाजणारे संगीत शब्द येताच हळुवार होते, त्यामुळे शब्दांना योग्य तो उठाव आणि महत्व मिळते. ग़ुलाम हैदर यांच्या संगीतविषयक विचारांना खरंच सलाम करावासा वाटतो.



 

३) बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के - पद्मिनी (१९४८) - लता मंगेशकर - गीतकार वली साहेब

लताजींनी मास्टरजींकडे फारच कमी म्हणजे जेमतेम ८ ते १० गाणी गायली तेही फक्त ३ चित्रपटात. "मजबूर" (१९४८), "पद्मिनी" (१९४८) आणि "आबशर" (१९५३) हे ते तीन चित्रपट होत, यातील "आबशर" हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच ग़ुलाम हैदर हे पाकिस्तानात निघून गेले होते. पण जाण्यापूर्वी लतासारखा अस्सल हिरा त्यांनी चित्रपट रसिकांना दिला. लताजींच्या "दिल मेरा तोडा" गाण्याची कथा आपण सुरुवातीला बघितली. या व्यतिरिक्त लताजींची काही अप्रतिम गाणी मास्टरजींकडे गायलेली आहेत. उदा. "अब डरने की कोई बात नहीं अंग्रेजी छोरा चला गया" (सहगायक मुकेश - मजबूर १९४८), "दामन है चाक चाक मेरा" (मजबूर १९४८) आणि "चले आओ तुम्हे आँसू हमारे याद करते है" (आबशर - १९५३) ही गाणी रसिकांनी जरूर ऐकावीत.  

मला जाणवलेली आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या मास्टरजींची Prelude Music ही खासियत होती आणि त्यांच्या बहुतांश गाण्यात ती दिसते, तेच Prelude Music लताजींनी मास्टरजींकडे गायलेल्या सर्व गाण्यांमध्ये जवळजवळ गायबच आहे! 

आज सादर करत असलेले गाणे हे निःसंशयपणे लताजींच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. तरुण लताचा कोवळा पण धारदार आवाज, विविध शब्दांवर त्यांनी घेतलेल्या सफाईदार हरकती/मुरकती (उदा. "लगा के", "शिकवा", इ.), दुसऱ्या अंतऱ्याला (कडव्याला) दिलेली वेगळी चाल ही या गाण्याची काही वैशिष्ट्ये.

लताजींच्या शब्दातच आपण या गाण्यामागची कथा पाहू या (संदर्भ: "लता मंगेशकर : एका गायिकेचा प्रवास" - राजू भारतन - प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस द्वितीय आवृत्ती फेब्रु. १९९५ - पान नं ४)

"एकदा मास्टरजी बॉंबे टॉकीजच्या एका सिनेमाच्या पार्श्वसंगीतासाठी रात्रभर काम करत होते. माझी (लताची) प्रकृतीही ठीक नव्हती, तरी पण मी तिथे तशीच त्यांच्याबरोबर बसून होते. कधी एकदा त्यांचा मूड लागेल आणि मला (लताला) गाणे गायला मिळेल अशी वाट बघत. अखेर पहाटे ३ वाजता त्यांना गाण्याची चाल सुचली आणि आम्ही "बेदर्द तेरे दर्द को सीने से लगा के" हे गाणे रेकॉर्ड केले, सकाळी ८ वाजता रेकॉर्डिंग संपले आणि आम्ही ११ वाजता घरी गेलो". 

धन्य ते संगीतकार आणि धन्य ते गायक! पाहू या ते अजरामर गीत.



४) जा उड़ जा रे कगवा ले जा संदेसवा - कनीज़ (१९४९) - ज़ीनत बेगम - गीतकार शातिर ग़ज़नवी

२५ सेकंदांच्या संगीतानंतर ज़ीनत बेगम यांच्या दमदार आवाजात हे गाणे सुरु होते आणि आपल्याला जाणवतो तो या गाण्याचा वेग. व्हायोलिन आणि तबला/ढोलकी यांच्या साहाय्याने हे साधलंय. साधारण १ मिनिट आणि १० सेकंदाला येणाऱ्या "पिया के बोल, बोल ऋत आई फगवा" यात दोन "बोल" शब्दांमध्ये असलेले अगदी छोटे १ सेकंदाचे अंतर हे त्या दोन शब्दांमधल्या स्वल्पविरामाचे महत्व आपल्याला जाणवून देते, आणि गाण्याचे सौंदर्य अधिकच खुलते. 

असं म्हणतात की या चित्रपटाचे पार्श्वसंगीत देण्याची संधी मास्टर ग़ुलाम हैदर यांनी आणखीन एका त्यावेळच्या उदयोन्मुख पंजाबी संगीतकाराला दिली होती, त्याचे नाव होते ओ. पी. नय्यर!



मास्टर ग़ुलाम हैदर यांना मानाचा मुजरा. आपल्याला हा ब्लॉग कसा वाटला ते जरूर सांगा. धन्यवाद.


संदर्भ: 

2. Ghulam Haider: Punjab Pioneering Musician By Harjap Singh Aujla South Asia Post Issue 35 Vol II, March 15, 2007


Namaskaar Friends,


Noorjehan

Sometime in late 1930's, a young music composer trying to establish himself in the Hindi Film Industry hears a song from a 10 year old girl, he likes her voice and calls her to Pancholi Studios. The young girl sings a Thumri in Piloo Raag viz. "Pyare Rasiya Bihari, Suno Binati Hamari". The composer is very happy and praises the girl by saying that she sings more than her age. He gives her, her first break in the Hindi film "Gul Bakavli" which was released in 1939. The young girl sings two songs which became very popular viz. “Shala Jawanian Maane, Akha Na Morhin Peele, Shala Jawannian Maane” sand “Pinjre de vich quaid Jawani”. Connoisseurs of good musical voices all over India took notice of these songs and the singer’s voice. The young singer was Baby Noorjehan who went on to become one of the greatest female singers of Hindi film industry Malika-E-Tarannum Noorjehan.


Let's hear from Noorjehan herself her memories of Master Ghulam Haider:



The music composer also gave a break to another young voice in the same film and got 2 songs recorded by her viz. "Ghook Meri Qismat Soun Gayee" and "Main Teri Tu Mera". Her name was Shamshad Begum - another singer who became a legend in the years to come.


Cut to 1947, the same Composer, while travelling on a Bombay local train, noticed an anemic looking small framed girl in her teens singing something. He noticed that her voice is very shrill but sweet. He composed a tune in no time and asked the girl to sing it after him, the composer was impressed. He called her for audition and she passed easily! He then took her to Filmistan Studios and introduced her to the owner S. Mukherjee. Upon hearing the girl's voice Mukherjee commented that it will not suit his heroine. This got the composer extremely angry and he told Mukherjee that in near future all the producers will queue up for the young girl's time. Later, the composer gave the girl her first break in a major Hindi film "Majboor" which was released in 1948 and got the song, which became famous later, "Dil Mera Toda" recorded by her. The young girl was none other than the great legendary singer Lata Mangeshkar!

In all the instances described above, the common Music Composer was Master Ghulam Haider. Masterji as he was fondly called has been credited in unearthing few famous Hindi film playback singers apart from Noorjehan, Shamshad and Lata.


Master Ghulam Haider

Ghulam Haider was born in 1908 in Hyderabad, Sind (now in Pakistan). Masterji's father used to perform Sikh religious classical and semi-classical music in Sikh places of worship and the homes of Guru Nanak’s followers, and was fondly called Bhai Mehar. Bhai Mehar hailed from a respected Gharana of Rababi musicians. He and his ancestors had a mastery over ancient string musical instruments like “Saranda”, “Taus” and “Rabab” in addition to the popular contemporary instrument “Harmonium”. He could play “Tabla”, “Dholak”, “Ghara”, and “Pakhawaj” quite proficiently. All of this was perhaps inherited by his son Ghulam Haider. 

Masterji was a Dentist by profession however turned to music from the early part of his career. Right from his nascent years he started playing the harmonium for theatre companies and musical troops that toured different places. But he made Lahore his permanent residence where he was trained by Babu Ganesh Lal. Soon, he was to play harmonium for Calcutta's famed Alfred Theatrical Company and Alexandra Theatrical Company. And after returning to Lahore, he got a job in Jenaphone Recording Company of Seth Janak Das and rose to the rank of chief music composer.

His first break in the films came with a film "Thief of Iraq" in 1934 in which he composed 11 songs. His next 2 films in 1935 were "Majnu" and "Swarg Ki Seedhi" in which he composed total 14 songs. In "Swarg Ki Seedhi" his lead female singer was Umrao Zia Begum who eventually married Masterji.

From 1939 to 1944, Ghulam Haider composed music for 5 Punjabi films viz. "Gul Bakavli" (1939), "Yamla Jatt" and "Sassi Punnoon" (1940), "Chaudhry" (1941) and "Sehti Murad" (1942). "Yamla Jatt" was the most successful film.

Masterji was known for his orchestration particularly for the prelude and interlude music in his compositions. He used various instruments such as Piano, Sarangi, Violin along with Dholak which was his contribution to the Hindi cinema music. He was the pioneer of bringing Punjabi folk music into the Hindi films. 


While in Lahore, Masterji composed music for few more Hindi/Urdu films viz. “Khazanchi” (1941), “Zameendar” (1942), “Khandaan” (1942”) and “Poonji” (1943). That was the era of the domination of the Indian film scene by the music directors from Bengal such as Rai Chandra Boral, Timir Baran and Anil Biswas. The Bengali type of music which these composers introduced in Hindi films was extremely melodius, however did not Taal instruments like Tabla and Dholak were not accorded prominence in their scheme of music. But when Ghulam Haider's "Khandaan" was released in 1942, people in India were first time exposed to Taal prominent music and they just loved the beat!

The songs of all these films were extremely popular. In particular, the song "Sawan Ke Nazarein Hain" from "Khazanchi" (1941) sung by Shamshad Begum and Ghulam Haider himself caused a big revolution in the Hindi film industry which till then was under the influence of soft melodious Bengali music. The songs of "Khandaan" (1942) which had Noorjehan in the lead actress role were also a big hit.

It is said that Lata Mangeshkar in her teen age had sung a song from "Khazanchi" which had won her the first prize in a reality show way back in 1940's!

By 1944, Ghulam Haider had established himself as a fresh, new styled and vibrant music composer. He moved to Bombay around 1944-45 and composed music for few more films. His master class waas once again evident through his songs composed for films like "Majboor", "Padmini" and "Shaheed" all released in 1948. 

After independence in 1947, he returned to Lahore and his first Pakistani film was "Shahida" (1949). He composed music for many other Pakistani films like "Beqarar" (1950), "Akeli" (1951) and "Bheegi Palken" (1952) but the films flopped. He died just a few days after the release of Pakistani film "Gulnar" (1953) due to throat cancer at age 45. His last Hindi film was "Aabshar" released in 1953.

In his career spanning 19 years from 1934 to 1953, Master Ghulam Haider composed music for around 30 films in Hindi, Punjabi and Urdu. He composed total 266 songs out of which only 6% i.e. about 15 songs were sung only by male singers while remaining 251 songs had a female voice in it! In the decade from 1941 to 1950, Masterji composed 83% of his songs i.e. roughly 220 songs. Masterji was also a singer himself and had lent his voice to around 15 songs.
(This statistics is based on the list that I could compile from https://www.hindigeetmala.net/ as well as YouTube, hence the list is indicative and may not be 100% correct.)

Let's remember this great composer and salute his contribution to the Hindi film industry. I am presenting today 4 of his best compositions sung by different female singers, please do listen and enjoy. Thank you.


1) Sawan Ke Nazarein Hai - Khazanchi (1941) - Shamshad Begum, Ghulam Haider and Chorus - Lyricist Wali Sahab

Released in 1941, the film "Khazanchi" produced by the famous Pancholi Pictures turned out to be an important milestone in the Hindi film industry, particularly its music. Because Master Ghulam Haider, for the first time in the Hindi films' history, introduced compositions based on Punjabi folk songs. The audience had not heard something like this before, they were awestruck. All the songs from "Khazanchi" and the film itself became super duper hit. The film, which had well known star cast like M. Ismail, Ramola, Pran, Manorama, Janaki Das and Madan Puri, was the topmost earner that year on the box office. The song presented below was the most famous one - sung by Shamshad Begum in her inimitable style and powerful voice, great use of Chorus, probably it was the first time the song was recorded on a moving group of cyclists, the rhythm matching the speed of the cyclists and excellent use of Cycle Bell, these are some of the USPs of this song. Enjoy. 

 


2) Hum Khelenge Aankh Michauli Khelenge - Khandaan (1942) - Noorjehan - Lyricist D. N. Madhok

The film "Khandaan" was a biggest musical hit of 1942 starring Noorjehan and Pran. Master Ghulam Haider and Noorjehan combination has delivered many great compositions like "Shala Jawaniya Maane" (Gul-E-Bakavli - 1939), "Kachiyaan Ve Kaliyaan Tu Na Tod" (Yamla Jat - 1940), "Bas Ve Dholna Tere Naal Bolna" (Chaudhri - 1941), "Tu Kaunsi Badali Mein Mere Chaand Hai Aa Jaa" (Khandaan - 1942), "Mere Liye Jahan Mein Chain Hai Naa Karar Hai" (Khandaan - 1942) and "Bachpan Ki Yaadgaron Tum Hi Muze Pukaro" (Gulnar - 1950). However the song presented below is my favourite and a very sweet song.

The song has been picturized on Noorjehan and sung by herself. The 34 second prelude music at the beginning of the song is the peculiarity of Masterji. Noorjehan's voice in this particular song is only reminiscent to a free flowing stream in a jungle. Masterji has brilliantly planned and used Sitar and Jaltarang in the entire song. Noorjehan's innocence while singing "Hum Khelenge" has been so nicely echoed on Jaltarang! You will also notice that music goes to the background and become softer when singing comes to the fore. Hats off to Master Ghulam Haider for this brilliant composition.





3) Bedard Tere Dard Ko Seene Se Lagaa Ke - Padmini (1948) - Lata Mangeshkar - Lyricist Wali Sahab

Lataji has sung only 8 to 10 songs for Master Ghulam Haider, that too in only 3 films viz. "Majboor" (1948), "Padmini" (1948) and "Aabshar" (1953). Masterji had left for Pakistan even before "Aabshar" was released, however thanks to him that he gifted us one of the most precious jewels of our times - Lata Mangeshkar! At the beginning of this blog, we read about the story behind Lata's "Dil Mera Toda" song. Besides this song, Lataji's notable songs for Masterji are "Ab Darne Ki Koi Baat Nahin" (with Mukesh - Majboor 1948), "Daaman Hai Chaak Chaak Mera" (Majboor 1948) and "Chale Aao Tumhe Aansoo Hamare" (Aabshar 1953). I would really urge all of you to listen to these songs on YouTube.

A thing to notice is that for all of the Lata's songs, Masterji has not used his famous prelude music, only he could explain the reason behind this. 

The song being presented here has everything in it - excellent composition, melodious yet sharp voice of young Lata, her effortless singing and a different composition for the second stranza of the song.

Let's see what Lataji herself had to say about this song:  (Ref. : "Lata Mangeshkar A Biography by Raju Bharatan")

"Masterji was composing music for one of the Bombay Talkies films, it was very late in the night. I (Lata) was not feeling well, but I continued to be there waiting for change of his mood and a fresh composition. Finally it was at 3AM in the early morning that he could compose the song "Bedard Tere Dard Ko Seene Se Lagaa Ke", completed the recording at 8AM and went home at around 11AM".

What a passion and professionalism towards the music by the two greats! Please listen and enjoy.




4) Jaa Ud Jaa Re Kagawaa Le Jaa Sandesawaa - Kaneez (1949) - Zeenat Begum - Lyricist Shatir Ghaznavi

The song starts with a 25 second prelude music - typical of Master Ghulam Haider. And what follows is another powerful voice that of Zeenat Begum. We get engrossed in the speed this song achieves within few seconds. You will hear Violin and Tabla/Dholak in plenty. Please listen carefully at 1 minute and 10 seconds - the words "Piya Ke Bol, Bol Rut Aayi Fagawaa", there is just 1 second pause between the first "Bol" and the second "Bol", however we understand that it has been very cleverly planted there to separate the two lines.

It is said that Master Ghulam Haider invited another upcoming Music Composer of those times from Punjab to do the background music of this film. His name was O. P. Nayyar!


Hope you liked it. Please let me know your comments and share it with friends. Thank you.


References: I am grateful to the authors of the following websites which I have referred for this write-up

2. Ghulam Haider: Punjab Pioneering Musician By Harjap Singh Aujla South Asia Post Issue 35 Vol II, March 15, 2007