Friday, 3 June 2022

Rai Chand (R. C.) Boral - Pioneer of Playback Singing in Hindi films

Namaskaar Friends,

I am really very happy to present my new blog to you today.

Courtesy: Wikipedia

I will be presenting the work of a legendary music composer of Hindi film industry who had reigned supreme in the 1930's. He is also the pioneer of Playback singing in the Hindi film industry. His name is Rai Chand aka R. C. Boral.

English version of the blog follows the Marathi version below. Please do read and share your feedback. Thanks.


Good News - This blog is now available in the AUDIO format as well. Here are both English and Marathi Audio versions. Listen and Enjoy. Please do share your comments. Thanks.

English Audio: 
 
Marathi Audio: 


Hiralal Sen
Courtesy: BongBlogger
 
भारतीय सिनेमाचा इतिहास बघायला गेले तर इ.स. १८९७ पर्यंत मागे जावे लागते 
(as per Encyclopedia of Indian Cinema Indiancine.ma). त्या वर्षी भारतात राहणाऱ्या एक परदेशी फोटोग्राफरने दोन लघुचित्रे (Short Films) बनवली होती - 'Coconut Fair' आणि 'Our Indian Empire'. भारतीयांमध्ये हा मान हिरालाल सेन नावाच्या एका बंगाली दिग्दर्शकाकडे जातो. त्यांनी १८९८ मध्ये "Flowers of Persia" नावाचे लघुचित्र तयार केले होते. पुढे १९०३ मध्ये त्यांनी "Alibaba and Forty Thieves" नावाची एक संपूर्ण फिल्म बनवली पण दुर्दैवाने ती प्रेक्षकांपर्यंत आली नव्हती.

ह. स. भाटवडेकर उर्फ सावे दादा
Courtesy: PhalkeFactory.Net
 
मराठी माणसांमध्ये पहिली फिल्म बनवण्याचा मान हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावे दादा यांच्याकडे जातो. त्यांनी १८९९ मध्ये "Man and Monkey" हा लघुपट निर्माण केला होता. मात्र ज्यांना भारतीय चित्रपटांचे जनक असे संबोधले जाते त्या दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली "राजा हरिश्चंद्र" नावाचा पूर्ण ९० मिनिटे लांबीचा भारतीय चित्रसृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट बनवला, तो मूकपट होता. १९१३ पासून १९३१ पर्यंत मूकपटांचा जमाना होता. Indiancine.ma या संकेतस्थळानुसार १८९७ पासून १९१३ पर्यंत जवळपास ६० लघुचित्रे निर्माण झाली. पण पहिला बोलपट यायला तब्बल १८ वर्षे लागली. "आलम आरा" हा भारतीय चित्रसृष्टीच्या इतिहासातला पहिला बोलपट दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांनी १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित केला. Indiancine.ma या संकेतस्थळानुसार १९१३ पासून १९३१ पर्यंत अंदाजे १००० मूकपटांची निर्मिती झाली! 

Courtesy: Wikipedia
"आलम आरा" मध्ये फक्त संवादच नव्हते तर चक्क ७ गाणीसुद्धा होती. "दे दे खुदा के नाम प्यारे" हे वझीर मुहम्मद खान यांनी गायलेले गाणे हे हिंदी चित्रपटांतील पहिले गाणे समजले जाते. त्या दिवसात अभिनेते/अभिनेत्री स्वतःची गाणी स्वतःच गायचे. त्यामुळे झुबेदा, K. C. डे (मन्ना डे यांचे काका), कुंदनलाल सैगल, अशोक कुमार, देविका राणी, शांता आपटे, नसीम बानो (सायरा बानो यांची आई) या कलाकारांचा मोठाच बोलबाला होता. अभिनय आणि गायन अशा दोन्ही कला अंगी असणारे कलाकार मिळणे हे निर्मात्यांसाठी अतिशय दुरापास्त होते.    

ही अडचण दूर केली ती एका प्रतिभावान संगीतकाराने १९३५ साली. रायचंद बोराल (R. C. बोराल) असे त्यांचे नाव. New Theatres मध्ये संगीतकार म्हणून काम करत असताना रायचंद यांनी त्यांचे तितकेच प्रतिभावान सहकारी संगीतकार पंकज मलिक यांच्या मदतीने "धूप छांव" या हिंदी चित्रपटासाठी प्रथमच पार्श्वगायनाचा प्रयोग केला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. "मैं खुश होना चाहूँ खुश हो ना सकू" हे K. C. डे, पारुल घोष, सुप्रवा सरकार आणि हरिमती यांनी गायलेले गीत पहिले पार्श्वगीत म्हणून नोंदले गेले. ही हिंदीच नव्हे तर भारतीय चित्रपटांसाठी क्रांतीच होती. त्यामुळे रायचंद यांना पार्श्वसंगीताचे जनक मानले जाते. थोर संगीतकार अनिल बिस्वास तर रायचंद यांना हिंदी चित्रसंगीताचे भीष्म पितामहच म्हणतात.

Rai Chand Boral
रायचंद बोराल यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९०३ रोजी कलकत्ता येथील एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील लालचंद हे उत्तम पखवाज वादक आणि शास्त्रीय गायक होते. लालचंद यांनी रायचंद यांना त्यांच्या लहान वयातच उस्ताद मुश्ताक हुसैन खान (रामपूर घराण्याचे शास्त्रीय गायक), उस्ताद हाफ़िज़ अली खान (सरोद वादक) आणि उस्ताद मसीत खान (तबला वादक) यांसारख्या शिक्षकांची तालीम दिली. या उस्तादांच्या मार्गदर्शनाखाली रायचंद हे लवकरच तबला आणि पियानो वाजवायला शिकले. तसेच ते विविध ठिकाणी होणाऱ्या संगीत मैफलींना जाऊ लागले.

वयाच्या अवघ्या २४व्या वर्षी म्हणजे १९२७ साली रायचंद यांना Indian Broadcasting Corporation या कंपनीच्या कलकत्ता येथील कार्यालयात संगीत विभागाचे प्रमुख म्हणून नोकरी मिळाली. हाच तो काळ होता ज्यावेळी भारतामध्ये सिनेमा लोकप्रिय होऊ लागला होता. बिरेंद्रनाथ (B. N.) सरकार हे नुकतेच इंग्लंडहून भारतात परत आलेले स्थापत्यशास्त्रज्ञ सिनेमाच्या तंत्रज्ञानाकडे आकर्षित झाले आणि त्यांनी "चाशेर मेये" आणि "चोर कांटा" नावाचे २ मूकपट तयार केले. त्याचे संगीतकार म्हणून त्यांनी रायचंद यांना आमंत्रित केले. रायचंद यांनी पडद्यासमोरील पिटात बसून Live Orchestra चे संचालन केले. त्यामुळे रायचंद यांचे एक उत्तम संगीतज्ञ म्हणून नाव झाले.

याच सरकार यांनी जेंव्हा १० फेब्रुवारी १९३१ रोजी त्यांच्या New Theatres या नवीन कंपनीची सुरुवात केली त्यावेळी अर्थातच संगीत विभागाचे प्रमुख म्हणून त्यांच्यासमोर रायचंद यांचेच नाव आले. त्यामुळे रायचंद हे New Theatres शी पहिल्या दिवसापासून जोडले गेले. New Theatres च्या टीम मध्ये उत्तमोत्तम कलाकार, कलावंत होते. उदा. देवकीकुमार बोस, प्रमथेश बरुआ यांच्यासारखे दिग्दर्शक, नितीन बोस, बिमल रॉय यांच्यासारखे उत्कृष्ट कॅमेरामन, मुकुल बोस यांच्यासारखे ध्वनिमुद्रक, कुंदनलाल सैगल, पृथ्वीराज कपूर, पहाडी संन्याल, उमा शशी, कानन देवी यांच्यासारखे गायक-अभिनेते आणि अर्थातच रायचंद बोराल, पंकज मलिक आणि तिमिर बरन यांच्यासारखे एक-से-एक संगीतकार! 

रायचंद बोराल आणि कुंदनलाल सैगल
रायचंद यांना संगीतकार म्हणून पहिली मोठी संधी मिळाली ती १९३२ साली. कुंदनलाल सैगल अभिनित ३ चित्रपटांचे संगीत रायचंद यांनी केले. सैगल यांनी रायचंद यांच्या संगीत दिग्दर्शनात आपले पहिले गीत "नवाज़िश चाहिए इतनी" गायले. १९३३ साली आलेल्या "पूरन भगत" या चित्रपटाने रायचंद यांचे संगीतकार म्हणून सर्वत्र गाजायला सुरुवात झाली. या चित्रपटात एकूण ६ गाणी होती, त्यातील ४ सैगल यांनी तर २ K. C. डे यांनी गायली होती. सैगल यांनी गायलेली "दिन नीके बीते जाते हैं", "अवसर बीते जात प्राणी तेरो", "राधे रानी दे डरो ना बंसरी मोरी रे" आणि "भजू मैं तो भाव से गिरी गिरिधारी" ही चार गाणी अफाट लोकप्रिय झाली.

१९३४ साली मूळ बंगाली चित्रपट "चण्डिदास" या चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित झाली. पुन्हा एकदा  रायचंद यांच्या संगीताची जादू सर्वदूर पसरली. "तरपत बीते दिन रैन", "देखत वाको ही रूप" (दोन्ही गाणी सैगल), "बसंत ऋतू आयी आली फूल खिले डाली" व "मारूंगी मारूंगी सखी" (दोन्ही गाणी उमा शशी) आणि "सारी बसंत न्यारी बसंत" (पहाड़ी संन्याल व सैगल) ही गाणी लोकप्रिय झाली. तर "प्रेम नगर में बनाऊंगी घर मैं" हे उमा शशी आणि सैगल यांनी गायलेले गाणे हे आजही ऐकले जाते.

१९३७ साली आलेला नितीन बोस दिग्दर्शित "द प्रेसिडेंट" या चित्रपटात रायचंद यांनी पंकज मलिक यांच्या बरोबरीने संगीत दिले. त्यातील "एक राजे का बेटा लेकर" आणि "एक बंगला बने न्यारा" ही सैगल यांनी गायलेली दोन गीते प्रचंड गाजली. 

रायचंद यांच्या संगीत कारकिर्दीतील कळस म्हणावा असा चित्रपट म्हणजे १९३७ साली आलेला "विद्यापती" हा चित्रपट. देवकी बोस दिग्दर्शित या चित्रपटात पृथ्वीराज कपूर, कानन देवी, पहाडी संन्याल आणि लीला देसाई यांसारखे मातब्बर कलाकार होते. रायचंद यांनी एकूण १५ गाणी संगीतबद्ध केली होती. सर्वच्या सर्व गाणी अतिशय लोकप्रिय झाली. उदा. "डोले हृदय की नैय्या" (कानन देवी), "गोकुल से गये गिरिधारी" व "पनघट पे कन्हैय्या आता है" (पहाडी संन्याल) आणि "अंबुवा की डाली डाली झूम रही है" (कानन देवी व धूमी खान). आश्चर्य म्हणजे १५ मधील एकही गाणे सैगल यांनी गायलेले नव्हते!

१९३८ साली आलेला "स्ट्रीट सिंगर" चित्रपट आणखीन एक गाजलेला चित्रपट. यातील ४ पैकी ३ गाणी सैगल यांनी गायली होती. "बाबूल मोरा" ही प्रसिद्ध भैरवी हे रायचंद आणि सैगल जोडीचे सर्वोत्तम गाणे म्हणावे लागेल. या गाण्याची आठवण आकाशवाणीवरील एका कार्यक्रमात १९८१ साली स्वतः रायचंद यांनीच सांगितली होती. हे गाणे शूटिंग करतानाच रेकॉर्ड केले होते. हातात पेटी घेऊन सैगल रस्त्याने गाणे म्हणत जात आहेत असे दृश्य होते. त्यांच्या आगे-मागे संगीत-साथीदार आणि ध्वनिमुद्रण, शूटिंग करणारे तंत्रज्ञ होते. हा एक अनोखा प्रयोग होता जो रायचंद यांनी केला होता, आणि तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला.

कुंदनलाल सैगल यांची एक महान गायक म्हणून कारकीर्द घडवण्यामागे रायचंद यांच्या संगीताचा फार मोठा सहभाग होता.

१९४१ साली आलेला "लगन" हा चित्रपट बहुदा सैगल-रायचंद जोडीचा शेवटचा चित्रपट होता. यातही अतिशय मधुर गाणी रायचंद यांनी संगीतबद्ध केली होती. सैगल यांनी गायलेली "काहे को रार मचायी", "ये कैसा अन्याय दाता", "हट गयी लो काली घटा" आणि "कोई मनुष्य कितना भी बुरा क्यों न हो" ही गाणी सैगल यांच्या कारकिर्दीतील महत्वाची गाणी ठरली.

१९४२ ते १९५२ ही दहा वर्षे रायचंद यांच्या आयुष्यातील कठीण काळ ठरली, कारण या दहा वर्षात त्यांच्या खात्यात एकही हिट चित्रपट अथवा उल्लेखनीय गाणे झाले नाही.

१९५३ साली रायचंद मुंबईला आले आणि त्यांनी "दर्द-ए-दिल" नावाच्या चित्रपटाला संगीत दिले. New Theatres बंद झाले होते. १९४७ मध्ये सैगल यांचा मृत्यू झाला होता, हिंदी चित्रपटही कथा, सादरीकरण, तंत्रज्ञान, संगीत इ. दृष्टीने बदलत होते, शिवाय शंकर-जयकिशन, सज्जाद, सचिनदेव बर्मन, मदनमोहन, सी. रामचंद्र अशा अनेक प्रतिभावान संगीतकार आपल्या अजरामर रचना चित्रसृष्टीला देत होते. अशा बदललेल्या वातावरणाशी जुळवून घेणे हे रायचंद यांच्यासाठी मोठेच आव्हान होते. ते स्वीकारून रायचंद यांनी स्वतःची शैली बदलली. "दर्द-ए-दिल" मध्ये रायचंद यांनी त्यावेळच्या नवीन गायकांना म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्याकडून ६ गाणी गाऊन घेतली. "ना तो दिन ही दिन वो रहे मेरे" (लता), "प्यार हो गया मुझे" (आशा) आणि "वो कौन है जो निगाहो में" (रफी) या गाण्यातून एक नवीन रायचंद रसिकांना ऐकायला मिळाले. त्याच वर्षी म्हणजे १९५३ साली रायचंद यांनी अजून एक चित्रपट संगीतबद्ध केला "श्री चैतन्य महाप्रभू" ज्यात एकूण १७ गाणी होती.

पण रायचंद एकूणच या बदललेल्या वातावरणात फार काळ रमले नाहीत. १९५५ साली आलेला "स्वामी विवेकानंद" आणि १९५७ सालचा "निळाचले महाप्रभू" हे त्यांचे शेवटचे हिंदी चित्रपट ठरले. तर १९६० सालचा "नातून फसल" हा त्यांचा शेवटचा बंगाली चित्रपट होता.

रायचंद यांच्या १९३२ ते १९६० या २८ वर्षांच्या संगीत कारकिर्दीतील काही ठळक/उल्लेखनीय बाबी:  (ही माहिती मी इंटरनेटवरील विविध स्रोतातून मिळवली आहे. मी जमवलेल्या रायचंद यांच्या गाण्यांच्या यादीत एकूण २९६ हिंदी गाण्यांचा समावेश आहे. बऱ्याच चित्रपटांची माहिती उपलब्ध नसल्याने रायचंद यांनी एकूण किती गाणी स्वरबद्ध केली ते कळणे अवघड आहे.)

  • अंदाजे ७५ चित्रपटांना संगीत दिले (३६ हिंदी, ३९ बंगाली)
  • २९६ हिंदी गाण्यांपैकी सैगल यांनी तब्बल ४७ गाणी गायली आहेत 
  • १९३२ ते १९३९ या आठ वर्षात रायचंद यांनी २९६ पैकी २०८ गाणी संगीतबद्ध केली (७०%)
  • मुंबई मध्ये आल्या नंतर १९५३ साली एका वर्षातच २ चित्रपटात एकूण २३ गाणी स्वरबद्ध केली 
  • लता मंगेशकर यांनी रायचंद यांच्याकडे एकूण ८ गाणी गायली, त्यातील ७ गाणी सोलो होती 

रायचंद बोराल यांनी संगीतबद्ध केलेली १३ सर्वोत्कृष्ट गाण्यांच्या लिंक्स खाली देत आहे. तुम्ही ती जरूर ऐकावीत.
  1. राधे रानी दे डारो ना - पूरन भगत (१९३३) - कुंदनलाल सैगल  (MUST WATCH)
  2. प्रेम नगर में बनाऊँगी घर मैं - चण्डीदास (१९३४) - उमा शशी-सैगल - गीतकार आग़ा हशर कश्मीरी
  3. तरपत बीते दिन रैन - चण्डीदास (१९३४) - सैगल - गीतकार आग़ा हशर कश्मीरी
  4. मैं खुश होना चाहूँ खुश हो ना सकू - धूप छाँव (१९३५) - K. C. डे -हरिमति-सुप्रवा सरकार - गीतकार पी. सुदर्शन  (हिंदी चित्रपटातील पहिले पार्श्वगीत)
  5. बाबा मन की आँखे खोल - धूप छाँव (१९३५) - K. C. डे - गीतकार पी. सुदर्शन
  6. अंधे की लाठी तू ही है - धूप छाँव (१९३५) - सैगल - गीतकार पी. सुदर्शन
  7. सुन्दर नारी प्रीतम प्यारी - मंज़िल (१९३६) - पंकज मलिक - गीतकार आरज़ू लखनवी, A. H. शोरी
  8. इक बंगला बने न्यारा - द प्रेसिडेंट (१९३७) - सैगल - गीतकार केदार शर्मा (MUST WATCH)
  9. डोले ह्रदय की नैय्या - विद्यापति (१९३७) - कानन देवी - गीतकार केदार शर्मा
  10. जीवन बीन मधुर ना बाजे - स्ट्रीट सिंगर (१९३८) - सैगल - गीतकार आरज़ू लखनवी
  11. काहे को रार मचाई - लगन (१९४१) - सैगल - गीतकार दीनानाथ मधोक
  12. प्यार हो गया मुझे प्यार हो गया - दर्द-ए-दिल (१९५३) - आशा भोसले - गीतकार हसरत जयपुरी
  13. हमने तो दर्द-ए-दिल को तमन्ना बना दिया - दर्द-ए-दिल (१९५३) - मोहम्मद रफ़ी - गीतकार हसरत जयपुरी
हिंदी आणि बंगाली चित्रसृष्टीच्या सुरवातीच्या काळात रायचंद बोराल, पंकज मलिक आणि तिमिर बरन या त्रिकुटाने चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात आणि त्याला दिशा देण्यात सिंहाचा वाटा उचलला. रायचंद यांनी चित्रपटसृष्टीला पार्श्वगायन ही अमूल्य देणगी दिली, ज्यामुळे आपल्याला सैगल, लता, आशा, रफी, किशोरकुमार, यांच्यासारखे अनेक महान गायक मिळाले. त्याबद्दल आपण रायचंद यांचे ऋणी राहिले पाहिजे.

रायचंद यांना १९७५ साली त्यांच्या कारकिर्दीतील दोन सर्वोच्च पुरस्कार मिळाले - दादासाहेब फाळके पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार.  

२५ नोव्हेंबर १९८१ रोजी रायचंद बोराल हे आपल्याला सोडून गेले. शेवटची वीस वर्षे या प्रतिभावान संगीतकाराने शांतपणे पडद्यामागचे जीवन व्यतीत केले.

अशा महान संगीतकाराला विनम्र अभिवादन. 

आज मी रायचंद यांची दोन अजरामर गीते सादर करत आहे.

१. बाबूल मोरा नैहर छुटो जाय - स्ट्रीट सिंगर (१९३८) - गीतकार आरजू लखनवी

हिंदी चित्रपटातील आजतागायतची सर्वश्रेष्ठ भैरवी असे या गाण्याचे वर्णन करता येईल. प्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर यांनी त्यांच्या "पुन्हा यादों की बारात" या पुस्तकात सैगल यांच्यावरील लेखाचे शीर्षकच मुळी "बाबुल मोरा" असे आहे. डोक्याला फडके गुंडाळून आणि हातात पेटी धरून "बाबुल मोरा" गाणारा सैगल, त्याच्या आगे-मागे इतर तंत्रज्ञ आणि सर्वांच्या पुढे कॅमेरामध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने चालत चालत संगीत संचालन करणारे रायचंद बोराल! आणि कहर म्हणजे हे गाणे एका टेक मध्ये ओके होते. वाजिद अली शाह या संगीत नृत्यात हरवून गेलेल्या इंग्रजांच्या मांडलिक राजा जेंव्हा इंग्रजांकडून पदच्युत होतो तेंव्हा त्याने ही भैरवी गायली अशी आख्यायिका आहे. रायचंद यांच्या अमर संगीतातून आणि सैगल यांच्या कारुण्याने ओतप्रोत भरलेल्या आवाजातून वाजिद अलीचे दुःख, त्याची आर्तता, व्यथा ही पुरेपूर व्यक्त होते. 



२. ना तो दिन ही दिन वो रहे मेरे - दर्द-ए-दिल (१९५३) - लता मंगेशकर - गीतकार दीनानाथ (D. N.) मधोक

जेंव्हा मी रायचंद बोराल यांची गाणी प्रथम ऐकली तेंव्हा मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती, आणि सैगल यांच्या जमान्यातील त्यांची गाणी ऐकून मला ते १९३०-४० च्या दशकातील संगीतकार असावेत असे वाटत होते. पण या ब्लॉगच्या निमित्ताने मी जसे त्यांच्याबद्दल अधिक माहिती मिळवत गेलो तेंव्हा त्यांची सांगीतिक कारकीर्द १९६० पर्यंत चालू होती असे लक्षात आले. त्यामुळे १९५० च्या दशकात त्यांनी लता, रफी, आशा यांच्याकडून गाऊन घेतले हे कळल्यावर मला प्रचंड आनंद झाला, या तिघांनी गायलेली रायचंद यांची गाणी ऐकण्याची उत्सुकता लागली व ती ऐकताच भरून पावल्याचा अनुभव आला. लताजींनी गायलेले हे अप्रतिम गीत तुम्हालाही आवडेल.



संदर्भ: हा ब्लॉग लिहिताना मला खालील websites चा अतिशय उपयोग झाला, त्याबद्दल त्या लेखकांचे मनापासून आभार.

गाण्यांची यादी : 

-  hindigeetmala.com

-  myswar.co

-  Various sources on YouTube

इतर उपयुक्त माहिती:

1. https://en.bharatpedia.org.in/wiki/Raichand_Boral

2. http://www.millenniumpost.in

3. Indiancine.ma






Rai Chand (R. C.) Boral - Pioneer of Playback Singing in Hindi films

Born: 19 October 1903, Kolkata

Died: 25 November 1981, Kolkata


Hiralal Sen
Courtesy: BongBlogger
The history of Indian Cinema dates back to 1897 (as per Encyclopedia of Indian Cinema Indiancine.ma) when a foreign photographer produced two short duration films viz. 'Coconut Fair' and 'Our Indian Empire'. However, the pioneer of the Bengali films - Hiralal Sen - is considered to be one of the first Indian film makers who produced a short duration film viz. 'Flowers of Persia'. In 1903, he filmed the popular Alibaba and Forty Thieves, the first full-length Indian film according to Wikipedia. However, it was not until 1913, when Dadasaheb Phalke - considered as the Father of Indian Cinema - made the first ever full length feature film viz. Raja Harishchandra. Since then for almost 18 years, the Indian films were mostly silent - no dialogues and no music. 

Indian Film industry witnessed history being created when Ardeshir Irani produced the first Indian sound film viz. Alam Ara which was released on 14th March 1931. The film not only had dialogues, but also had 7 songs in it. The song 'De De Khuda Ke Naam Pyare' sung by Wazir Muhammad Khan is considered to be the first Hindi film song. However, in those days, the songs were sung by the actors themselves. Thus, Zubeida, K. C. Dey, K. L. Saigal, Ashok Kumar, Devika Rani, Shanta Apte, Naseem Bano, etc. all had their share of acting and singing in the films. But, this posed a huge limitation on the film producers and directors since they had to find an actor who can also sing well.

Rai Chand Boral

The Indian Film industry once again witnessed a historical change when Rai Chand Boral along with Pankaj Mullick successfully implemented the Playback singing in the Hindi films in 1935. The film was 'Dhoop Chhaon' produced by New Theatres and the song, "Main Khush Hona Chahoon", had an all women chorus led by Parul Ghosh with Suprabha Sarkar and Harimati picturized in a dance sequence. 

For this reason, Rai Chand Boral (widely known as R. C. Boral) is considered to be the pioneer of the Playback music in Indian films. The legendary music composer of yesteryears Anil Biswas used to call R. C. Boral as the "Bhishma Pitamaha" of Indian film music.

Born on 19th Oct 1903, in an affluent and cultured family, Rai Chand's father Lal Chand Boral was a renowned Pakhawaj player and a classical singer.  Thanks to his father, Rai Chand was fortunate to have some great tutors in the form of Ustad Mushtaq Hussain Khan (Classical Singer from Rampur Gharana), Ustad Hafiz Ali Khan (Sarod player) and Ustad Masit Khan (Tabla player). Having such Gurus, Rai Chand soon learned to play Tabla and Piano and started doing the Saath Sangat. He attended several music conferences held in Lucknow, Banaras and Allahabad.

At a very young age of 24, in 1927, Rai Chand joined the Indian Broadcasting Corporation's Calcutta station as its Head of Music Department. This was the time when cinema was also getting popular across India. BN Sircar, an England-returned civil engineer, too, was fascinated by cinema. He produced two silent films, 'Chasher Meye' and 'Chor Kanta', and approached Rai Chand to compose for these films. He conducted live orchestra from a pit dug in front of the screen and rose to fame as a musical wizard. 

New Theatres Ltd., Calcutta
Courtesy: Scroll.in
When Sircar started his own company, New Theatres, on 10th February 1931, Rai Chand was the first choice to head its music department. The team of New Theatres had some very talented individuals like directors Debki Kumar Bose, Pramathesh Barua, cameramen like Nitin Bose and Bimal Roy, sound recordists like Mukul Bose, artists like Kundan Lal Saigal, Prithviraj Kapoor, Pahadi Sanyal, Uma Shashi, Kanan Devi to name a few, and music composers like R. C. Boral, Pankaj Mullick and Timir Baran.

Kundan Lal Saigal
Rai Chand got major break in 1932 with 3 films starring K. L. Saigal. Saigal recorded his first song "Nawazish Chahiye Itni" composed by Rai Chand. However, it took another year (1933) for Rai Chand to prove his mettle as a composer when the New Theatre's film 'Puran Bhagat' was released. It had total 6 songs - 4 sung by Saigal and remaining two sung by K. C. Dey (Manna Dey's uncle). This was Rai Chand's first major hit. Saigal's songs like "Din Neeke Beete Jaate Hain", "Avsar Beeto Jaat Praani Tero", "Raadhe Raani De Daaro Naa Bansari Mori Re" and "Bhaju Main To Bhaav Se Shiri Giridhari" all became extremely popular with many households across India.

Courtesy: Cinestaan
In 1934, the Hindi version of original Bangla film 'Chandidas' was released. The magic of Rai Chand's compositions once again mesmerized the audience. The songs "Tadpat Beete Din Rain", "Dekhat Vaako Hi Roop" (both by Saigal), "Basant Ritu Aayi Aali Phool Khile Daali" and "Marungi Marungi Sakhi" both by Uma Shashi, and "Saari Basant Nyaari Basant" by Pahadi Sanyal and Saigal - all songs were very popular, while the duet "Prem Nagar Mein Banaoongi Ghar Main" by Uma Shashi and Saigal is a song that is remembered even today.

Nitin Bose directed film 'The President' was released in 1937. Rai Chand teamed up with Pankaj Mullick to compose songs for this film. Two of his compositions "Ek Raje Ka Beta Lekar" and "Ek Bangala Bane Nyaaraa" both sung by Saigal became super hits.

Rai Chand had greatest success of his career in 1937 with Debaki Bose directed film "Vidyapati" starring Prithviraj Kapur, Kanan Devi, Pahadi Sanyal and Leela Desai. Rai Chand composed total 15 songs for this film. Songs like "Doley Hirday Ki Naiyya" (Kanan Devi); "Gokul Se Gaye Girdhari" and "Panghat Pe Kanhiya Aata Hai" (both by K. C. Day), "Ambuva Ki Dali Dali Jhum Rahi Hai Aali" (Kanan Devi and Dhoomi Khan) among other compositions were precious pearls of Rai Chand's treasury. Surprising and notably, none of the 15 songs of this film were sung by Saigal!

Courtesy: BombayMann2

In 1938, Rai Chand had another hit with "Street Singer". Out of 4 songs, 3 were sung by Saigal and remaining one by Kanan Devi. "Babul Mora" (Saigal) is an immortal composition and even today is regarded as one of the greatest Bharavis of the Hindi film songs. It has also become the signature of Saigal's gaayaki in the sense that when we remember Saigal, this song comes first to our minds. Rai Chand had narrated his memories of this song in a rare program he did for Vividh Bharati sometime around 1981 - this song was picturized live while shooting. In the song, Saigal is seen with a harmonium in his hands and singing while walking on the road. All the musicians and technicians were walking along with Saigal for recording the song, and it got finalized in just one take! Isn't this amazing?

In fact, it is said that Rai Chand played a major role in shaping up Kundan Lal Saigal's career as a singer in Hindi films.

"Lagan" released in 1941 was possibly last film Saigal had with Rai Chand. It also had some of the wonderful songs like "Kahe Ko Raad Machayi", "Ye Kaisa Anyay Daataa", "Hat Gayi Lo Kaali Ghata" and "Koi Manushya Kitna Hi Bura Kyon Na Ho" all by Saigal were also hits.

Courtesy: YouTube

In 1953, Rai Chand migrated to Bombay and composed music for "Dard-E-Dil". With New Theatres closed, Saigal's sad demise in 1947, changing trends of Hindi Cinema and its music and with the rise of equally talented composers like Sajjad, S. D. Burman, Shankar Jaikishan, C. Ramchandra, etc., Rai Chand also had to change the style of his compositions. Thus we saw a new Rai Chand in "Dard-E-Dil" along with new set of singers in Lata Mangeshkar, Asha Bhosale and Mohammad Rafi! 3 of the total 6 songs composed for "Dard-E-Dil" viz. "Na To Din Hi Din Wo Rahe Mere" (Lata), "Pyar Ho Gaya Muze" (Asha) and "Woh Kaun Hai Jo Nigahon Mein" (Rafi) were all extremely melodious songs that had a scent of fresh air. In the same year, Rai Chand composed 17 songs for "Shri Chaitanya Mahaprabhu".

"Swami Vivekananda" from 1955 and "Nilachale Mahaprabhu" from 1957 were his last Hindi films, while "Natun Fasal" - a Bengali film from 1960 - was his last film as a Composer.

In his musical career of 28 years from 1932 to 1960, Rai Chand composed music for around 75 films (36 Hindi and 39 Bengali). The list of his songs that I could compile from various sources has 296 Hindi songs in it (this list is only indicative and not 100% accurate as information about many songs is not available on the internet).

Some of the interesting statistics regarding Rai Chand's compositions(career spanning 28 years from 1932 to 1960):

  • Composed music for around 75 films (36 Hindi and 39 Bengali)
  • 296 Hindi songs - out of which 47 songs were sung by Kundan Lal Saigal either as Solo or with others
  • Between 1932 and 1939, Rai Chand composed 208 out of his 296 Hindi songs for 22 out of 36 Hindi films that he composed for, i.e. almost 70% of his work was done in just first 8 years!
  • In the first year at Bombay in 1953 (and his second last year in the Hindi film industry), Rai Chand composed 23 songs for 2 films
  • Lata Mangeshkar has sung total 8 songs under Rai Chand out of which 7 are solos

Some of the great compositions by Rai Chand Boral are given below. Please do click and listen to them.

  1. Raadhe Raani De Daaro Naa Bansari Mori Re - Puran Bhagat(1933) - K.L.Saigal - Lyricist not known (MUST WATCH)
  2. Prem Nagar Mein Banaoongi Ghar Main - Chandi Das(1934) - Uma Shashi, K.L.Saigal - Lyricist Agha Hashar Kashmiri
  3. Tadpat Beete Din Rain - Chandi Das(1934) - K.L.Saigal - Lyricist Agha Hashar Kashmiri
  4. Main Khush Hona Chahu Khush Ho Na Saku - Dhoop Chhaon(1935) - K C Dey, Harimati, Suprava Sarkar, Parul Ghosh - Lyricist P Sudarshan
    • First Hindi Film song recorded as Playback
  5. Baba Man Ki Aankhen Khol - Dhoop Chhaon(1935) - K C Dey - Lyricist P Sudarshan
  6. Dil Ke Phaphole Jal Uthe Andhe Ki Laathi Tu Hi Hai - Dhoop Chhaon(1935) - K.L.Saigal - Lyricist P Sudarshan
  7. Sundar Naari Pritam Pyaari - Manzil(1936) - Pankaj Mullick - Lyricist Arzoo Lakhnavi, A.H. Shore
  8. Ek Bangla Bane Nyara - President(1937) - K.L.Saigal - Lyricist Kedar Nath Sharma (MUST WATCH)
  9. Dole Hridaya Ki Naiyya - Vidyapati(1937) - Kanan Devi - Lyricist Kedar Sharma
  10. Jeevan Been Madhur Na Baaje Jhuthe Padh Gaye Taar - Street Singer(1938) - K.L.Saigal - Lyricist not known
  11. Kahe Ko Raar Machai - Lagan(1941) - K.L.Saigal - Lyricist D N Madhok
  12. Pyar Ho Gaya Mujhe Pyar Ho Gaya - Dard-E-Dil(1953) - Asha Bhosle - Lyricist Hasrat Jaipuri
  13. Hum Ne To Dard-E-Dil Ko Tamanna Bana Diya - Dard-E-Dil(1953) - Mohammed Rafi - Lyricist Hasrat Jaipuri


Rai Chand along with Pankaj Mullick and Timir Baran shaped up the Hindi film music in its formative years. His biggest gift to the Hindi film industry was the introduction of playback singing and we all should be grateful to him for this.

Rai Chand Boral received the Dadasaheb Phalke Award - the highest award in Indian cinema, given by Government of India - in 1978 at the age of 75. Same year, he received the Sangeet Natak Akademi in Creative and Experimental music category, the highest for performing artist conferred by the Sangeet Natak Akademi, India's National Academy for Music, Dance and Drama.

From 1960 until his death in 1981, Rai Chand led a very quiet life mostly behind the curtains. 

Let's remember this great composer and salute to his work.

I would like to present two of the Rai Chand Boral's gems to you. Hope you will enjoy and appreciate it.

1. Babul Moraa, Naihar Chhuto Hi Jaae - Street Singer(1938) - K.L.Saigal - Lyricist Arzoo Lucknowi

This is undoubtedly the greatest Bhairavi of the Hindi films produced so far. There is a tale from the time of English rule in India when Wajid Ali Shah - the princeling who was extremely fond of music and dance - was dethroned by the English rulers, he was devastated and wrote a poem Babul Mora to depict the state of his heart and mind. In the film, Saigal with a headband and harmonium in hands sung this song live while shooting the film. Saigal's low pitch voice represents the extreme sadness of the character.

2. Naa To Din Hi Din Wo Rahe Mere - Dard-E-Dil(1953) - Lata Mangeshkar - Lyricist D N Madhok

When I first heard about Rai Chand Boral, I thought he was the composer from 1930's and 40's and never ever imagined that he would have composed in 1950's with the singers that I knew like Lata Mangeshkar, Asha Bhosale and Mohammad Rafi. To my pleasant surprise, he did compose an amazing song for Lata and she with her soulful voice has done full justice to this song.

Videos of both the above songs are placed just before the start of this English version. Please do watch and enjoy. Thanks.

References:  (I am grateful to the authors of the following websites for the wonderful content which I could refer while penning this write-up)

Songs list courtesy:

-  hindigeetmala.com

-  myswar.co

-  Various sources on YouTube

Other content courtesy:

1. https://en.bharatpedia.org.in/wiki/Raichand_Boral

2. http://www.millenniumpost.in

3. Indiancine.ma