Friends,
Namaste! I am very happy and excited to present to you my blog on Hindi Film industry's Superstar of yesteryears - Waheeda Rehman.
As always, the English version of the blog follows the Marathi version below.
१९३८ - स्थळ: चेंगलपट्टू, तामिळनाडूतील चेन्नई (तत्कालीन मद्रास) पासून २३ किमी. अंतरावर असलेल्या एका छोट्याशा गावात मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात एका कन्येचा जन्म होतो, ३ मुलींनंतर जन्मलेली ही चौथी कन्या. त्याकाळच्या समाजातील समजुतींप्रमाणे कुठल्याही आई-वडिलांना धक्का बसला असता, मुलाची अपेक्षा असताना मुलगी झाली म्हणून वाईट वाटलं असतं! पण असं काहीही मोहम्मद अब्दूर रेहमान आणि त्यांची पत्नी मुमताज बेगम यांना वाटलं नाही! त्यांनी मोठ्या आनंदाने नवीन बाळाचे नाव "वहिदा" असं ठेवलं. "वहिदा" शब्दाचे खूप वेगवेगळे अर्थ आहेत. उ.दा. सुंदर, प्रामाणिक, विश्वासू, Reliable, Perfect, Complete, इ. आई-वडिलांना छोट्या वहिदाचे हे सर्व गुण पाळण्यातच दिसले होते बहुदा!
(Disclaimer: उर्वरित लेखात वहिदा रेहमान यांचा उल्लेख "वहिदा" असा एकेरी केला आहे, तो केवळ त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या आपलेपणामुळे, त्यात त्यांचा अपमान करण्याचा किंवा त्यांना कमी लेखण्याचा कोणताही हेतू नाही.)
चारही मुली थोड्याशा मोठ्या झाल्यावर त्यांनी सर्वांना चेन्नई इथे भरतनाट्यम शिकायला पाठवले. लक्षात घ्या ही गोष्ट आहे १९४० च्या दशकातील, म्हणजे वहिदाचे आई-वडील किती पुढारलेले असतील! वहिदाचे शालेय शिक्षण विशाखापट्टणम येथे झाले. १९५१ साली वहिदाच्या वडिलांचे आकस्मिक निधन झाले व साऱ्या कुटुंबालाच मोठा धक्का बसला. वहिदाला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं, पण घरातील अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे तिला आपले स्वप्न सोडून देऊन पैसे मिळवण्यासाठी नृत्याचे कार्यक्रम करावे लागले.
कट टू १९५४ : तेलुगू चित्रपट दिग्दर्शक तापी चाणक्य वहिदाचा एक नृत्याचा कार्यक्रम बघतात आणि तिला एका तेलुगू चित्रपटात एका गाण्यात नृत्य करण्याची संधी देतात, १९५५ साली प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटाचे नाव होते "रोजुलु मारायि". त्यातील "Eruvaka Sagaroranno Chinnanna" हे गाणे तुफान गाजले आणि त्यामुळे चित्रपटही. हेच गाणे पुढे एका तामिळ चित्रपटातही घेतले गेले आणि नृत्याकरता पुन्हा वहिदा रेहमान!
या नृत्यामुळे वहिदाला पुढे ३ तामिळ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली - १) "जयसिंहा" - १९५५ - N. T. रामाराव यांच्याबरोबर, २)
Kaalam Maari Pochu (1956), ३) आणि तामिळ भाषेतील पहिला रंगीत चित्रपट
Alibabavum 40 Thirudargalum - १९५६.
"रोजुलु मारायि" चित्रपट सुपरहिट झाला, त्यानिमित्त आयोजित केलेल्या समारंभात गुरुदत्त आणि वहिदाची भेट झाली. तिथेच गुरुदत्तने तिला तो बनवत असलेल्या हिंदी चित्रपटात काम करायची गळ घातली. गुरुदत्तच्या पारखी नजरेची दाद दिली पाहिजे, की एका नृत्यावरून त्याने वहिदातील स्टार होण्याचे गुण ओळखले!
वहिदा मुंबईला आली, आणि तिला गुरुदत्त निर्माण करत असलेल्या "C.I.D." चित्रपटात सहाय्यक भूमिका मिळाली १९५६ साली. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे दिग्दर्शक राज खोसला यांनी वहिदाला तिचे नाव चित्रपटासाठी बदलायला सांगितले, त्याला वहिदाने स्पष्ट नकार दिला व सांगितले की काहीही झाले तरी मी नाव बदलणार नाही, अपयशी ठरले तर घरी परत जाईन.
वहिदाच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीचा विचार केला तर असं दिसतं की ती तिच्या तत्वांवर ठाम राहिली. उ. दा. नाव न बदलणे, Swim Suit न घालणे, Sleeveless न घालणे, इ. स्वतःला चित्रपटात करिअर करायचे असूनही आपल्या तत्वांना मुरड न घालण्यासाठी माणूस भावनिकदृष्ट्या किती सशक्त असावा लागतो याची कल्पना केली तरी वहिदाच्या स्वभावाची ओळख होईल.
"C.I.D." ने वहिदासाठी यशाची दारे उघडली गेली, आणि नंतर जवळपास १७ वर्षे म्हणजे १९७३ पर्यंत वहिदाने तिच्या जवळपास ९० चित्रपटांद्वारा हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. ती त्या काळची सुपरस्टार होती असं म्हटलं तर वावगं होणार नाही. तिची Craze एवढी होती की मराठीमध्ये व.पु. काळ्यांसारख्या लेखकाला सुद्धा "मीच तुमची वहिदा" अशी कथा लिहावीशी वाटली! या कथेत एक कंपनी एक स्पर्धा जाहीर करते आणि ती स्पर्धा जो जिंकेल त्याला किंवा तिला वहिदाबरोबर २४ तास घालवायची संधी मिळेल असे बक्षीस ठेवते. आणि मग मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये काय उलथापालथ होते त्याचे सुरेख वर्णन कथेत आहे, मुद्दा हा की अशी कथा लिहायला घेताना त्यावेळी असलेल्या इतर प्रसिद्ध नट्यांपेक्षा व. पुं. नी वहिदालाच पसंती दिली!
|
Pic. Courtesy - AmarUjala.com |
१९५७ साली आलेला गुरुदत्तचा "प्यासा" आणि १९५९ सालचा "कागज के फूल" हे दोन्ही चित्रपट वहिदाच्याच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातीलही मैलाचे दगड ठरले. वहिदा आणि गुरुदत्त यांची जोडी लोकांना अतिशय आवडली. या जोडीने आणखी ३ चित्रपटात एकत्र काम केले - 12 O' Clock (१९५८), चौदहवी का चाँद (१९६०) आणि साहिब, बीबी और गुलाम (१९६२).
मला स्वतःला आजही पडद्यावरच्या गुरुदत्त-वहिदा, राजकपूर-नर्गिस, देव आनंद-सुरैय्या आणि दिलीपकुमार-मधुबाला या जोड्या प्रत्यक्ष आयुष्यात झालेल्याही बघायला आवडल्या असत्या, पण नियतीच्या मनात काही वेगळेच असते नाही?
१९५५ ते २०२० अशी तब्बल ६५ वर्षे वहिदाने जवळपास ९० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. गुरुदत्त ते राजेश खन्ना अशा दोन पिढ्यांमधील नायकांबरोबर नायिका म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली. ही यादीच पहा, म्हणजे खात्री पटेल:
नायक
|
चित्रपट #
|
चित्रपट
|
देव आनंद
|
८
|
C. I. D.(१९५६), सोलवा
साल (१९५८), काला बाजार (१९६०), बात एक रात की (१९६२), रूप की रानी
चोरों का राजा (१९६२), शराबी (१९६४), गाईड (१९६५), प्रेम पुजारी (१९७०)
|
गुरुदत्त
|
५
|
प्यासा (१९५७), 12 O'
Clock (१९५८), कागज़
के फूल (१९५९), चौदहवी का चाँद (१९६०), साहिब, बीबी और ग़ुलाम (१९६२)
|
सुनील दत्त
|
५
|
एक फूल चार काँटे (१९६०), मुझे जीने दो (१९६३), दर्पण (१९७०),
रेश्मा और शेरा (१९७१) आणि ज़िन्दगी ज़िन्दगी
(१९७२)
|
विश्वजीत
|
३
|
बीस साल बाद (१९६२), कोहरा (१९६४), मजबूर (१९६४)
|
दिलीप कुमार
|
३
|
दिल दिया दर्द लिया (१९६६), राम और श्याम (१९६७), आदमी
(१९६८)
|
धर्मेंद्र
|
३
|
बाज़ी (१९६८), मन की आँखें (१९७०), फागुन (१९७३)
|
राज कपूर
|
२
|
एक दिल सौ अफ़साने (१९६३), तीसरी क़सम (१९६६)
|
मनोज कुमार
|
२
|
नीलकमल (१९६८), पत्थर के सनम (१९६८)
|
राजेन्द्र कुमार
|
२
|
पालकी (१९६७), धरती (१९७०)
|
संजीव कुमार
|
२
|
मन मंदिर (१९७१) आणि सुबह ओ शाम
(१९७२)
|
इतर
|
६
|
किशोरकुमार - गर्ल फ्रेंड (१९६१)
प्रदीपकुमार - राखी (१९६२)
विजयकुमार - कौन अपना कौन पराया (१९६३)
कमलजीत - शगुन (१९६४)
राजकुमार - नीलकमल (१९६८)
राजेश खन्ना - खामोशी (१९७०)
|
| | Pic. Courtesy: Dailyio.in |
|
वहिदाच्या भूमिकांवर नजर टाकली तर त्यातील वैविध्य लक्षात येते. तिच्या पहिल्या हिंदी चित्रपट "C.I.D." मधील तिची दुय्यम पण ग्लॅमरस भूमिका, "प्यासा" मधली आयुष्यातील दुःखाची किनार असलेली वेश्येची भूमिका, "कागज़ के फूल" मधली एक सामान्य स्त्री ते बहुचर्चित अभिनेत्री असा प्रवास केलेली शांती, 12 O' Clock मधली स्वतःच्या बहिणीच्या खुनाचा आरोप असलेली बानी, "सोलवा साल" मधली ऐन यौवनात असताना आंधळ्या प्रेमाने आपल्या प्रियकराबरोबर पळून गेलेली "लाज" ही नायिका प्रियकराचे खरे रूप केल्यावर कशी बदलते ती भूमिका, "गाईड" मधली नको असलेल्या बंदिस्त वैवाहिक जीवनातून बाहेर पडून स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगू पाहणारी, जीवनाचा आनंद घेऊ इच्छिणारी रोझी, "तिसरी कसम" मधली नाटक/तमाशातील नर्तिका हिराबाई, "खामोशी" चित्रपटातील मानसिक रुग्णांवर उपचार करता करता स्वतःच मानसिक रुग्ण बनलेली नर्स आणि "रेश्मा और शेरा" मधली राजस्थानी ढंगातली रेश्मा. या सर्व भूमिका कधीतरी विसरणे शक्य आहे का?
वहिदा सुंदर तर आहेच, त्याबद्दल मी काय बोलणार? पण सौंदर्यापेक्षा तिचं Graceful असणं अधिक भावतं. ती एकमेव नायिका असेल जिच्या सौंदर्याची वर्णने निरनिराळ्या तऱ्हेने अनेक कवी/गीतकारांनी केली आहेत. उ.दा.
(संदर्भ : पुन्हा यादों की बारात - शिरीष कणेकर)
हिंदीतील प्रसिद्ध कवी वसंत देव यांनासुद्धा वहिदावर कविता लिहावीशी वाटली.
पण वहिदाच्या सौंदर्याचे सर्वात जबरदस्त वर्णन शकील बदायुनी यांनी "चौदहवी का चाँद (१९६०)" या चित्रपटात केले आहे, हे गाणे पडद्यावर बघताना वहिदाच्या अदांकडे बघायचं का शब्द/गीत ऐकायचं ते कळत नाही. हे शब्दच किती भारी आहेत ते बघा:
(साभार: https://www.lyricsindia.net/)
हे गाणे पडद्यावर बघताना दोन गोष्टी जाणवतात - एक म्हणजे या गाण्याच्या संपूर्ण चित्रीकरणात कुठेही अश्लीलता नाही आणि दुसरं म्हणजे असं वाटत राहतं की गुरुदत्त जणू आपल्याच भावना व्यक्त करतोय! हा चित्रपट येईपर्यंत वहिदाला ती ठीक दिसते असं वाटायचं, पण हे गाणे पडद्यावर पाहून तिचे स्वतःच्या दिसण्याविषयीचे मत बदलले असे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे! किती अभिनेत्रींच्या वाट्याला असं गाणं आलं आहे? हे गाणे इथे बघा.
वहिदावर चित्रित झालेली अथवा गाण्यात तिचे अस्तित्व असलेली अशी जवळपास १८० हिंदी गाणी सापडतात, या सर्व गाण्यांचे थोडेसे विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला तेंव्हा काही अचंभित करणारी माहिती समोर आली:
- या १८० गाण्यांपैकी ६२ गाणी ही पुरुष गायकांनी गायलेली आहेत म्हणजे साधारण ३५% इतकी!
- यातही ३२ म्हणजे ५०% पेक्षा जास्त गाणी एकट्या रफी साहेबांनी म्हटली आहेत!!
- ७ गाणी अशी आहेत ज्यात वहिदा पडद्यावर दिसते पण गाणी पार्श्वभूमीवर वाजतात उ.दा.
तिच्या यशाचे श्रेय तिच्यातील अभिनयगुणाबरोबरच तिच्या वक्तशीरपणाला, तिच्या शांत आणि सोशिक स्वभावाला, आपले काम चोख होण्यासाठी कितीही कष्ट घेण्याच्या तिच्या वृत्तीला आणि तिच्या सहनशीलतेला जाते. झगमगत्या चित्रपटसृष्टीत राहूनही तिने स्वतःचा आब राखला, तिच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची अलिप्तता जाणवते. एका मुलाखतीत तिने तिच्या सोशिकपणाची आठवण सांगितली आहे. कॅमेरामन मूर्ती यांनी तिला एका पोज मध्ये आडवे पडायला सांगितल्यावर जवळपास ४-५ तास ती तशीच पडून होती कारण मूर्ती दुसऱ्या कामात गढून गेले, त्यांच्या व दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जेव्हा हे लक्षात आले तेंव्हा त्यांनी तिची माफी मागितली व आधीच का नाही आम्हाला हाक मारली म्हणून रागावले.
१९६५ साली आलेला "गाईड" चित्रपट हा तिच्या कारकिर्दीचा, यशाचा कळस ठरला. या चित्रपटाच्या निर्मितीमागची कहाणी अशी सांगतात :
(संदर्भ: S. D. Burman - The Prince-Musician by Anirudha Bhattacharjee and Balaji Vittal)
निर्माता देव आनंदला हा चित्रपट इंग्रजी आणि हिंदी अशा २ भाषांत काढायचा होता. इंग्रजी चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून त्याने Tad Danielewski (Stratton Productions) यांना आणले होते. त्यांच्या मनात गाईडच्या इंग्रजी आवृत्तीतील "रोझी" या नायिकेच्या भूमिकेसाठी इंग्रजी भाषा येणारी अभिनेत्री पाहिजे होती, म्हणून त्यांच्या डोक्यात लीला नायडू यांचे नाव होते, पण देव आनंदने ते नाकारले आणि वैजयंतीमाला यांचे नाव सुचवले, पण अमेरिकन लोकांना जाड नायिका आवडत नाही असे कारण देऊन Tad यांनी ते नाव नाकारले. त्यानंतर देव आनंदने वहिदाचे नाव सुचवले ते तिच्या नृत्य कौशल्यामुळे जे नायिकेच्या भूमिकेसाठी आवश्यक होते. वहिदाचे नाव लगेच मान्य झाले! आणि "गाईड" च्या रूपाने रसिकांना मिळाली एक अजरामर कलाकृती. हा चित्रपट सर्वार्थाने प्रचंड यशस्वी ठरला. या चित्रपटातील भूमिकेबद्दल वहिदाला तिचा पहिलावहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आणि तोही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून! "गाईड" चित्रपट ऑस्कर करता भारतातून गेलेला त्या वर्षीचा एकमेव चित्रपट होता.
"गाईड" नंतर तिचे आणखीन काही चित्रपट खूप यशस्वी झाले. १९६८ मधील "नीलकमल" या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७१ मध्ये आलेल्या "रेश्मा और शेरा" या चित्रपटासाठी वहिदाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
वहिदाने आपल्या कारकिर्दीत काही धोकेही पत्करले. उ.दा. १९६० च्या दशकात ऐन भरात असताना नवख्या नटांबरोबर (कमलजीत, विजयकुमार) चित्रपट स्वीकारणे, Typecast होऊ नये म्हणून वेगवेगळ्या भूमिका करणे, काही चित्रपटात दुय्यम भूमिका स्वीकारणे उ.दा. "साहिब बीबी और गुलाम" मधली ज़बा.
|
With Husband Shashi Rekhi in "Shagoon"
|
१९७३ मध्ये आलेला धर्मेंद्र बरोबरचा "फागुन" हा चित्रपट तिचा नायिका म्हणून शेवटचा चित्रपट ठरला. त्यानंतर तिने चरित्र अभिनेत्री म्हणून कामं स्वीकारायला सुरुवात केली. १९७४ साली तिचा विवाह तिच्या १९६४ सालातील "शगुन" या चित्रपटातील तिचा नायक असलेल्या कमलजीत उर्फ शशी रेखी यांच्याशी झाला. त्यांना दोन मुलं आहेत - सोहेल रेखी आणि काश्वी रेखी. लग्नानंतर वहिदा कुटुंबासहित बेंगळुरूला राहायची; शशी रेखी यांचे २००० साली आकस्मिक निधन झाले. त्यानंतर वहिदा कुटुंबासहित मुंबईला परत आली.
६५ वर्षांची अतिशय यशस्वी कारकीर्द. २ वेळा फिल्मफेअर पुरस्कार, एकदा राष्ट्रीय पुरस्कार, २ वेळा
Lifetime Achievement Award (१९९४ - फिल्मफेअर आणि २००१ IIFA) आणि २०११ मध्ये पदमभूषण पुरस्कार!
अशा या ज्येष्ठ अभिनेत्रीला सलाम.
आज वहिदाची ६ गाणी सादर करत आहे, १८० गाण्यातून ६ गाणी निवडण्याचे धाडस केले आहे. या गाण्यातून वहिदाची वेगवेगळी रूपं आपल्यासमोर येतात. काही अप्रचलित गाणी आहेत. आशा आहे तुम्हाला आवडतील. वेळात वेळ काढून संपूर्ण वाचल्याबद्दल धन्यवाद.
जाने क्या तूने कही, जाने क्या मैंने सुनी प्यासा (१९५७) - सचिनदेव बर्मन - गीता दत्त
|
कैसा जादू बलम तूने डारा 12 O' Clock (1958) - ओ. पी. नय्यर - गीता दत्त
|
|
|
बनवारी रे जीने का सहारा तेरा
नाम रे एक फूल चार काँटे (१९६०) - शंकर जयकिशन - लता
|
भँवरा बड़ा नादान हाय साहिब, बीबी और ग़ुलाम (१९६२) - हेमंत
कुमार - आशा
|
|
|
नदी नारे ना जाओ श्याम पैयां पडू मुझे जीने दो (१९६३) - जयदेव - आशा भोसले
|
आज फिर जीने की तमन्ना है गाइड
(१९६५) - सचिनदेव बर्मन - लता मंगेशकर
|
|
|
संदर्भ:
१) विकिपीडिया
२) वहिदा रेहमान मुलाखती
३) वहिदा रेहमान विषयीचे लेख
|
Pic. Courtesy: CollectorBazar.com
|
1938 - A small village viz. Chengalpattu, 23 km. from Chennai (then Madras), sees a young girl born into a traditional middle class Muslim family. She is the fourth girl in the family. If social beliefs in those days were to be believed, the parents would have been shocked and sad to see yet another girl born, but Mohammad Abdur Rehman and his wife Mumtaz Begum proved to be different from the lot. Because, not only did they name the young born as 'Waheeda' meaning Beautiful, Trustworthy, Reliable, etc., but also sent all the 4 girls for Bharatnatyam training in Chennai when they grew up a bit.
Waheeda did her schooling at Visakhapattanam since her father was transferred there as a norm of his Government job as a District Commissioner. In 1951, Mohammad Rehman's sudden death forced Waheeda to give up her dreams of becoming a Doctor and turn to Dance performances to earn money for living.
Cut to 1954 - Telugu Films Director - Tapi Chanakya - once saw Waheeda's dance performance and offered her a small role of a Dancer in a song in the film "Rojulu Marayi" in 1955. Not only Waheeda's dance and the song "Eruvaka Sagaroranno Chinnanna" became hit bu the film also was a Superhit. The song was remade in Tamil with Waheeda featuring once again as a Dancer.
As a result of success of the above song, Waheeda got an opportunity to act in 3 Tamil films thereafter viz. Jayasimha (1955) with N. T. Ramarao, Kaalam Maari Pochu (1956) and first colour film in Tamil viz. Alibabavum 40 Thirudargalum (1956).
|
With Guru and Geeta Dutt |
The same year i.e. 1956, the Hindi Films Director - Guru Dutt - had watched "Rojulu Marayi" and had particullarly liked the song featuring Waheeda. So, in the grand celebration party for the film's success, when Guru Dutt was introduced to Waheeda, he asked if she would come to Mumbai (then Bombay) to act in his upcoming film "C. I. D.". Waheeda agreed and came to Mumbai where she was introduced to the Director of the film Raj Khosla. As per the tradition in those days, Raj Khosla suggested Waheeda to adopt an attractive screen name for herself, but she refused profoundly. She said she is even ready to sacrifice her film career instead of hiding her real name.
This shows the real strong character of Waheeda. In her entire film career, she stuck to her principles and never compromised on those. E.g. No change of name, No Swim Suit, No Sleeveless, etc.
The film "C.I.D." opened the doors of success for Waheeda and she ruled the Hindi Film Industry for next 17 years i.e. until 1973. Her craze in those days was such that the famour writer from Marathi viz. Vasant Purushottam Kale had written an entire Katha (type of writings) that had Waheeda's name in its title!
Waheeda contrinued to work with Guru Dutt. "Pyasa" released in 1957 and "Kagaz Ke Phool" released in 1959 turned out to be milestones not only for Waheeda's career, but also for the Hindi Film Industry. Till date, these two movies are regarded as Classics! People liked and admired the pair of Guru Dutt and Waheeda Rehman. They were featured together in 3 more movies viz. "12 O' Clock" (1958), "Chaudahvi Ka Chand" (1960) and "Sahib, Bibi Aur Ghulam" (1962).
Like Guru Dutt-Waheeda, the other pairs that were hit with the audience in those days were Raj Kapoor-Nargis, Dev Anand-Suraiyya and Dilip Kumar-Madhubala; however it's a sad irony that they could not transform their on-screen pairing in real life!
Waheeda has acted in around 90 films in a career spanning 65 years from 1955 to 2020. In this journey, she had played the Lead Female role against 2 generations of the Male actors - from Guru Dutt to Rajesh Khanna. Following list is self-explanatory:
Male Lead
|
No. of Films
|
Movie(s)
|
Dev Anand
|
8
|
C.
I. D. (1956), Solva Saal (1958), Kala Bazar (1960),
Baat Ek Raat Ki (1962), Roop Ki Rani Choron Ka Raja (1962), Sharabi (1964),
Guide (1965) and Prem Pujari (1970)
|
Guru Dutt
|
5
|
Pyasa (1957), 12 O’ Clock (1958), Kagaz
Ke Phool (1959), Chaudahvi Ka Chand (1960) and Sahib, Bibi Aur Ghulam (1962)
|
Sunil Dutt
|
5
|
Ek Phool Char Kante (1960), Muze Jeene
Do (1963), Darpan (1970), Reshma Aur Shera (1971) and Zindagi Zindagi (1972)
|
Biswajeet
|
3
|
Bees Saal Baad (1962), Kohra (1964) and
Majboor (1964)
|
Dilip Kumar
|
3
|
Dil Diya Dard Liya (1966), Ram Aur Shyam
(1967) and Aadmi (1968)
|
Dharmendra
|
3
|
Baazi (1968), Man Ki Aankhen (1970) and
Phagun (1973)
|
Raj Kapoor
|
2
|
Ek Dil Aur Sau Afsane (1963), Teesri
Kasam (1966)
|
Manoj Kumar
|
2
|
Neelkamal (1968) and Patthar Ke Sanam
(1968)
|
Rajendra Kumar
|
2
|
Palki (1967) and Dharti (1970)
|
Sanjeev Kumar
|
2
|
Man Mandir (1971) and Subah O Shaam
(1972)
|
Others
|
6
|
Kishore Kumar – Girl Friend (1961)
Pradip
Kumar – Rakhee (1962)
Vijay
Kumar – Kaun Apna Kau Parayaa (1963)
Kamaljeet
– Shagoon (1964)
Raj
Kumar – Neelkamal (1968)
Rajesh
Khanna – Khamoshi (1970)
|
Waheeda played different kinds of roles in her career. Be it a Glamorous Kamini of "C.I.D." or a good-hearted prostitute Gulabo in "Pyasa" or Shanti from "Kagaz Ke Phool" who experiences a journey from being a commoner to a Superstar or Bani in "12 O' Clock" who is alleged to have murdered her own sister or Rosie from "Guide" who breaks all the norms of a married life to experience the joy of living or Heerabai a danceuse from "Teesri Kasam" or a dedicated Nurse from "Khamoshi". If you watch all these films, you will get amazed by the sheer variety of acting that Waheeda has produced.
Waheeda was known for her beautiful face, however her Grace and Dignity empowered her beauty and the acting skills. She is perhaps the only actor in the Hindi Film Industry whose beauty has been appreciated by many lyricists in their own styles. Here are few examples:
However, the most appropriate description of Waheeda's beauty has been penned by Shakeel Badayuni in "Chaudahvi Ka Chand" (1960). You wonder how the poet has realized your own feelings about Waheeda! Here is the lyric of the song. (Courtesy:
https://www.lyricsindia.net/)
Approximately 180 songs have been picturized either on Waheeda or here presence is ther in the song. You will be surprised to know the following facts:
- Out of 180 songs, 62 have been sung by Male singers i.e. ~35%
- Out of these 62 songs, 32 have been sung by Mohammad Rafi alone i.e.~51%
- There are 7 songs that play in the background where one can only see Waheeda's presence
Lot of the credit of Waheeda's success would go to her Calm and Composed nature, her disciplined life, her punctuality, her tolerant nature and her readiness to work for long hours to the satisfaction of her Director.
The film "Guide" published in 1965 awarded the maximum success to Waheeda. Not only the film was superhit in India and abroad, but it also gave Waheeda her first Filmfare Award for Best Actress. It was the peak of her career. The story behind the making of 'Guide" goes something like this:
(Ref.: S. D. Burman - The
Prince-Musician by Anirudha Bhattacharjee and Balaji Vittal)
It's producer Dev Anand wanted to produce the film in 2 languages - English and Hindi simultaneously. He finalized Tad Danielewski of Stratton Productions in US to direct the English version. And for Hindi there was a tussle between Raj Khosla and Chetan Anand. Tad wanted an English speaking actor to play the Lead Female role - Rosie - in "Guide"; thus he had Leela Naidu in his mind; however Dev Anand rejected it. Dev suggested Vaijayantimala and Tad rejected her stating she is too fat for American audience to accept her in the lead role. So it then boiled down to Waheeda playimg Rosie, thanks to her dancing skills. And so we all got to see a memorable movie and performance which is very fondly remembered even today! "Guide" was the only entry to Oscars from India that year.
After success of "Guide", Waheeda saw more sucess in the coming years. Her film "Neelkamal" in 1968 gave her her second Filmfare Award as Best Actress. She won the accolades at National level for her performance in "Reshma Aur Shera" in 1971.
|
With Husband Shashi Rekhi Pic. Courtesy: Starsunfolded.com |
The last movie in which Waheeda played the Lead role was "Phagun" in 1973 with Dharmendra. After this, she started accepting Character roles in the films and continued her journey for a long time. Her fans still remember her character roles from the films like "Kabhie Kabhie", "Namak Halal", "Namkeen", "Chandni" and "Lamhe".
Meanwhile, in 1974, Waheeda secretly married Kamaljeet aka Shashi Rekhi who was her Male Lead in the film "Shagoon" in 1964. Both led a happily married life in Bengaluru until Kamaljeet died in 2000, post which Waheeda along with her son Sohail and daughter Kashvi moved to Mumbai and has been leading a peaceful yet fulfilling life.
Kudos to Waheeda Rehman - an actor - who gave us immense happiness and enriched our lives through her wonderful performances.
Please watch 6 of her best songs - videos uploaded just before the start of the English version. Hope you will like it. Thank you. Appreciate your time.
References:
1) Wikipedia
2) Waheeda's interviews
3) Articles/Blogs on Waheeda