Friends,
I am extremely happy to present the Eighth song of the series Anmol Ratan. This time it is a gem from late Jaidev. 6th Jaunary was his Death anniversary, hence thought it would be more appropriate to remember him through his great compositions.
English version of the blog is at the end of the Marathi version below.
Song #8: Aapki yaad aati rahi raatbhar
Film : Gaman (1978)
Director : Muzaffar Ali
Cast : Farooq Sheikh, Smita Patil, Jalal Aga, Geeta Siddharth
Lyrics : Makhdum Mohiuddin
Composer : Jaidev
Singer : Chhaya Ganguly
दरवर्षीप्रमाणेच यंदाही ३ ऑगस्ट आणि ६ जानेवारी हे दोन दिवस आले आणि गेले; पण १९५०-६० च्या दशकातील हिंदी चित्रपट संगीतकार जयदेव वर्मा यांची आठवण किती जणांना झाली असेल? नाही म्हणायला रेडिओ सिलोनने मात्र आवर्जून त्यांची गाणी लावली होती!
|
संगीतकार जयदेव |
संपूर्ण कारकिर्दीत जयदेवनी एकूण ४२ चित्रपटांना संगीत दिले (संदर्भ - Wikipedia). त्यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात १९५२ साली आलेल्या "आँधीया" या चित्रपटात संगीतकार अली अकबर खान यांचे सहाय्यक म्हणून झाली. १९५८ साली प्रदर्शित झालेले "चलती का नाम गाडी" आणि "लाजवंती" (संगीतकार सचिनदेव बर्मन) या दोन्ही चित्रपटांत जयदेवच सचिनदांचे सहायक होते.
जयदेवजींनी स्वतंत्रपणे संगीत दिलेला पहिला चित्रपट १९५५ सालचा जोरू का भाई - जो आज कुणाला आठवतही नसेल. पण १९६१ साली आलेल्या नवकेतन फिल्म्सच्या "हम दोनो" या चित्रपटाची जयदेव यांनी संगीतबद्ध केलेली गाणी प्रचंड गाजली; आणि जयदेव यांची एक प्रतिभावान संगीतकार म्हणून जगाला ओळख झाली. त्यातील "अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं" हे गाणे आणि इतर गाणी आजही ताजीतवानी आहेत.
६ जानेवारी १९८७ रोजी जयदेव यांचे निधन झाल्यानंतर प्रसिद्ध चित्रपट संगीत समीक्षक राजू भारतन यांनी "चंदेरी" या पाक्षिकात त्यांच्यावर एक मृत्युलेख लिहिला होता. त्यात त्यांनी जयदेव यांच्याविषयी खालील आठवण सांगितली होती:
"हम दोनो" चे संगीत गाजल्यानंतर नवकेतन फिल्म्सचे मालक देव आनंद आणि विजय आनंद हे दोघेही जयदेव यांच्यावर इतके खुश झाले की त्यांच्या पुढील सर्व फिल्म्सचे संगीत हे सचिनदेव बर्मन आणि जयदेव हे आलटून पालटून करणार असे त्यांनी जाहीर केले. १९६१ च्या "हम दोनो" नंतर १९६३ मध्ये आला "तेरे घर के सामने" आणि वरील करारानुसार त्याचे संगीत करण्याची जबाबदारी सचिनदेव बर्मन यांना दिली गेली. तो चित्रपटही त्याच्या गाण्यांमुळे गाजला. पुढे १९६४ मध्ये नवकेतनने "गाईड" चित्रपटाची घोषणा केली. करारानुसार हा चित्रपट जयदेव यांना मिळायला हवा होता; पण बर्मन यांनी देव आनंद आणि विजय आनंद यांच्यावर दबाव टाकून "गाईड चित्रपट मला दिला नाही तर तुमचे पुढील कुठलेही चित्रपट मी करणार नाही" अशी धमकी दिली. त्यामुळे "गाईड" चित्रपट हा शेवटी सचिनदेव बर्मन यांना मिळाला; त्यांनी त्याचे सोने केले हे निश्चित, पण एका उत्तम चित्रकथेला तितकेच उत्तम संगीत द्यायची (आणि ते देण्याची कुवत असलेल्या) जयदेव यांची संधी मात्र हुकली. ही सल जयदेव यांच्या मनात शेवटपर्यंत राहिली.
पुढे १९८१ साली अजून एकदा नशिबाने जयदेव यांची साथ दिली नाही. १९७९ साली आलेल्या "गमन"ची गाणी प्रचंड गाजल्यामुळे दिग्दर्शक मुझफ्फर अलीने त्याच्या पुढच्या महत्वाकांक्षी चित्रपट "उमराव जान" चे संगीत जयदेव यांना करायला सांगितले. जवळपास ८ गाणी जयदेव यांनी संगीतबद्धही केली. पण नंतर काय चक्र फिरली कुणास ठाऊक, पण मुझफ्फर अलीने सर्वच्या सर्व गाणी खय्याम यांना दिली. खय्याम यांनी अप्रतिम संगीत दिले. राजू भारतन म्हणतात की त्यांनी जयदेव यांनी संगीत दिलेली "उमराव जान" ची गाणी स्वतः ऐकली होती; आणि खय्यामच्या गाण्यांपेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे संगीत जयदेव यांनी दिले होते, पण दुर्दैवाने ती गाणी चित्रपटात घेतली नाहीत आणि सिनेसंगीताचे रसिक एका अत्त्युच्च आनंदाला मुकले. असो.
तरीही जयदेव त्यांचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने करत राहिले. "किनारे किनारे" (१९६३), "मुझे जीने दो" (१९६३), "रेश्मा और शेरा" (१९७१), "प्रेम पर्वत" (१९७३), "आलाप" (१९७७), "घरोंदा" (१९७७), "दूरियां" (१९७९) आणि "गमन" (१९७९) अशा चित्रपटांना एकाहून एक सरस असे संगीत जवळपास १८-२० वर्षे ते देत राहिले. त्यांचा शेवटचा गाजलेला चित्रपट म्हणजे "अनकही" (१९८५), यामध्ये त्यांनी चक्क पं. भीमसेन जोशी यांच्याकडून दोन गाणी गाऊन घेतली ("रघुवर तुमको मेरी लाज" आणि "ठुमक ठुमक पग")!!
त्यांची अत्यंत गाजलेली गाणी खालीलप्रमाणे: (Click on the links below to watch the songs)
१)
मै जिंदगी का साथ निभाता चला गया - मोहम्मद रफी - हम दोनो (१९६१)
२)
हर आंस अश्क्बार है - लता - किनारे किनारे (१९६३)
हे गाणे गाजलेले नाही; पण उत्कृष्ट संगीत; लताच्या २५ सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये मी या गाण्याचा समावेश नक्की करेन
३) देख ली तेरी खुदाई - तलत महमूद - किनारे किनारे (१९६३)
४)
रात भी है कुछ भीगी भीगी - लता मंगेशकर - मुझे जीने दो (१९६३)
एका वेश्येच्या तोंडी हे गाणे असूनही जयदेवचे अप्रतिम संगीत आणि लताचे स्वर हे खानदानी आदब राखतात हे त्याचे वैशिष्ट्य
६) ये दिल और उनकी निगाहों के साये - लता मंगेशकर - प्रेम पर्वत (१९७३)
अमिताभची हटके भूमिका; पण रसिकांना न आवडलेली. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती ती सुद्धा १९७७ साली!
९)
दो दिवाने शहर में - भूपिंदर सिंग आणि रुना लैला - घरोंदा (१९७७)
१०)
तुम्हे हो ना हो मुझको तो इतना - रुना लैला - घरोंदा (१९७७)
११)
ज़िन्दगी मेरे घर आना - भूपिंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल - दूरियां (१९७९)
१२)
सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है - सुरेश वाडकर - गमन (१९७९)
१३)
अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों - हरिहरन - गमन (१९७९)
हे गाणे ऐकल्यावर जयदेव यांच्याच "कभी खुद पे कभी हालात पे रोना आया" या गाण्याची आठवण येते
जयदेव यांचा स्वतःच्या सामर्थ्यावर एवढा विश्वास होता की त्यांनी अनेक नवीन गायकांना आपल्या चित्रपटातून गाण्याची संधी देण्याचे धाडस केले. त्यातले काही जण पुढे चित्रपट गायक म्हणून खूप यशस्वी ठरले. उ. दा. सुरेश वाडकर (गमन), हरिहरन (गमन), रुना लैला (घरोंदा), भूपिंदर सिंग (घरोंदा, दूरियां)
या गुणी संगीतकाराला सर्वोत्कृष्ट संगीताकरता एकूण ३ राष्ट्रीय पारितोषिके मिळाली - "रेश्मा और शेरा" (१९७१), "गमन" (१९७९) आणि "अनकही" (१९८५).
वरील सर्व गाणी ही जयदेव यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. पण आज मी त्यांचे एक वेगळेच गाणे सादर करणार आहे जे मला फार आवडते. ते आहे "गमन" चित्रपटातले छाया गांगुली यांनी गायलेले "आपकी याद आती रही रातभर".
चित्रपटाबद्दल फारसे बोलण्यासारखे काही नाही. गुलाम रसूल (फारुख शेख) उत्तर प्रदेशातील कोटवारा गावातील एक रहिवासी. पत्नी खैरून (स्मिता पाटील) आणि आई यांच्याबरोबर अत्यंत हलाखीत दिवस काढत असतो. त्याचा मित्र लल्लू (जलाल आगा) हा मुंबईत टॅक्सी चालवून पोट भरत असतो, त्यामुळे त्याची परिस्थिती ही गाववाल्यांपेक्षा बरी असते. गावातील परिस्थितीला कंटाळून गुलाम मुंबईला पैसे कमावण्याकरता येतो. लल्लू त्याला मदत करतो. मुंबईत आल्यावर गुलाम सुरुवातीला मिळेल ती कामे करून पैसे साठवायला लागतो. थोडे दिवसांनी लल्लू त्याला टॅक्सी चालवायला शिकवतो. टॅक्सी चालवत असताना त्याला मुंबईच्या भीषण परिस्थितीची जाणीव होती, सर्वत्र दिसणारी गरिबी, अस्वच्छता, स्वार्थी माणसे, श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी या सर्व बाबी गुलामला अस्वस्थ करून सोडतात. पुरेसे पैसे साठवून गावाकडे जाऊन यायचे गुलाम ठरवत असतो. इकडे गावामध्ये खैरून गुलामची वाट बघत असते. इथेच सुरु होते एक सुंदर गाणे "आपकी याद आती रही रातभर".
|
छाया गांगुली |
गाण्याची सुरुवात बासरीच्या एका अप्रतिम तुकड्याने होते. संपूर्ण मुखड्यात आणि पहिल्या २ कडव्यांमध्ये पाठीमागे वाजणारे स्वर-वाद्य वगळता एकही वाद्य वाजत नाही, ऐकू येतो तो छाया गांगुलींचा घनगंभीर दर्दभरा आवाज. (आजकालच्या Reality Shows मध्ये Solo Round without music असते ना तसा)
पहिली दोन कडवी (अंतरे) ही गावाकडे असलेल्या गुलामची वाट पाहणाऱ्या खैरुनवर चित्रित झाली आहेत. त्यामुळे जयदेवनी इथे कमीत कमी वाद्ये वापरली असावीत. दोन कडव्यांच्या मधे बासरी आणि सरोद यांचा सुरेल वापर केला आहे.
तिसऱ्या कडव्यापासून गावाकडचे दृश्य बदलून मुंबईत येते; हा बदल जयदेव यांनी सरोदच्या जोडीला तालवाद्य वापरून समर्थपणे दाखवला आहे.
चारही कडवी तुमच्या काळजाचा ठाव घेतात. त्यामुळे गाणे संपल्यानंतरही त्याचा प्रभाव तुमच्यावर राहतो. ही आहे संगीतकार आणि गायिका यांची कमाल!
दिग्दर्शक मुझफ्फर अली चित्रपटातून नुसते प्रश्न मांडतो; त्या प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न बिलकुल करत नाही. त्यामुळे चित्रपट पाहून झाल्यानंतरही आपल्याला कथा आठवत नाही, तर आठवतात ती त्यातील सुंदर गाणी. जयदेव यांच्या संगीतामुळे हा चित्रपट थोडाफार सुसह्य झाला आहे.
या चित्रपटासाठी जयदेव यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा राष्ट्रीय पुरस्कार तर छाया गांगुली यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार १९७९ साली मिळाला.
गाण्याचे २ videos खाली देत आहे - एक मूळ चित्रपटातील, आणि दुसरा छाया गांगुली यांनी दूरदर्शनवरील आरोही या कार्यक्रमात गायलेल्या गाण्याचा. मला स्वतःला दूरदर्शनवरील गाणे आवडते; अत्यंत कमी वादक, अप्रतिम बासरी आणि सारंगी (यांना आपण दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात लाजवाब साथ करताना कितीतरी वेळा पाहिले आहे, दुर्दैवाने आजच्यासारखे त्यावेळेस साथीदारांना ग्लॅमर लाभले नव्हते) आणि छाया गांगुलींचा साधेपणा (सादगी), गाण्याची तयारी त्यामुळे हे गाणे उठून दिसते.
दोन्ही जरूर पहा, आणि आनंद घ्या गाण्याचा, संगीताचा आणि मनोमन सलाम करा जयदेव यांना.
तुमच्या सूचना/प्रतिक्रिया जरूर पोस्ट करा. धन्यवाद.
आपकी याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
आपकी याद आती रही
रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराती रही रात भर
आपकी याद...
बांसुरी की सुरीली सुहानी सदा
याद बन बनके आती रही रात भर
चश्म-ए-नम...
याद की चाँद दिल में उतरती रही
चाँदनी जगमगाती रही रात भर
आपकी याद...
कोई दीवाना गलियों में फिरता रहा
कोई आवाज़ आती रही रात भर
चश्म-ए-नम...
Like every year, 3rd August and 6th January came and passed. No one unfortunately remembered Jaidev - a music composer of high calibre - who was born and died respectively on these dates, except for Radio Ceylon who broadcasts Jaidev's songs every year on these two days!
Jaidev Verma composed music for around 42 films out of which 1 was a Nepali film (Ref. Wikipedia). He began his career in the Hindi film industry in 1952 with the film Aandhiyaan by assisting its music director and famous Sarod maestro Ali Akbar Khan. Jaidev also assisted S. D. Burman in two of his films viz. Chalati ka naam gaadi (1958) and Lajwanti (1958).
However, his big break came in 1961 when the film 'Hum Dono' for which Jaidev composed music was a great hit and all of its songs became super popular. Even today, people remember songs like 'Abhi naa jaao chhodkar', 'Main zindagi kaa saath nibhataa chala gayaa', etc. With 'Hum Dono', the Hindi film industry witnessed the genius of Jaidev.
From 1961 till 1987 Jaidev composed music for many films and many of his compositions are remembered even today. However, as they say, the luck matters a lot in the film industry, but it was not so with Jaidev as he missed two great opportunities. Following story was narrated by well known film critic Raju Bharatan way back in 1987 after the death of Jaidev:
After the success of 'Hum Dono', the owners of Navketan Films - Dev and Vijay Anand - were extremely happy with Jaidev and promised him to award every alternate movie that they would produce. So it was Jaidev and S. D. Burman who started composing for Navketan alternately.
After 'Hum Dono', came 'Tere Ghar ke Samane' in 1963 and as per the formula, the music responsibility went to S. D. Burman and he did a great job. In 1964, Navketan announced the beginning of their ambitious film 'Guide'. Hearing this and the story, S. D. Burman knew that it would be a blockbuster film and did not want to lose the opportunity to compose it; however as per the formula, it was Jaidev's turn. So apparently S. D. Burman pressurised Dev and Vijay Anand to award him the film by threatening not to work with them again if they did not oblige. And thus he got the film and did every justice to its songs. However it took away a golden opportunity from Jaidev to prove his worth.
It happened with Jaidev yet again in 1981 when director Muzaffar Ali changed the music composer of 'Umrao Jaan' from Jaidev to Khayyam, after Jaidev had composed 8 songs. Raju Bharatan went on to say that he had no words to describe the greatness of Jaidev's compositions of 'Umrao Jaan' songs. But again Jaidev was deprived of a well deserved opportunity after the great success of 'Gaman' directed by Muzaffar Ali.
In spite of such bitter experiences, Jaidev continued to work with extreme sincerity and dedication and gave us films like 'Kinare Kinare' (1963), 'Muze Jeene Do' (1963), 'Reshma Aur Shera' (1971), 'Prem Parvat' (1973), 'Aalaap' (1977), 'Gharonda' (1977), 'Dooriyaan' (1979), 'Gaman' (1979) and 'Ankahi' (1984). In 'Ankahi' he managed to get none other than the maestro Pt. Bhimsen Joshi to sing two songs. ('Raghuvar tumko meri laaj' and 'Thumak thumak pag')
Some of Jaidev's master pieces are as follows: (Click on the links below to watch the songs)
१)
मै जिंदगी का साथ निभाता चला गया - मोहम्मद रफी - हम दोनो (१९६१)
२)
हर आंस अश्क्बार है - लता - किनारे किनारे (१९६३)
This song is not as popular as others; however I would rate this song in the Top 25 songs sang by Lata Mangeshkar
३) देख ली तेरी खुदाई - तलत महमूद - किनारे किनारे (१९६३)
४)
रात भी है कुछ भीगी भीगी - लता मंगेशकर - मुझे जीने दो (१९६३)
This song is pictured on a Courtesan; however at no point either the lyrics, composition or singing looks cheap item song
६) ये दिल और उनकी निगाहों के साये - लता मंगेशकर - प्रेम पर्वत (१९७३)
This movie had Amitabh Bachchan in a different role; contained 11 songs, can you believe this to happen in a 1977 film?
९)
दो दिवाने शहर में - भूपिंदर सिंग आणि रुना लैला - घरोंदा (१९७७)
१०)
तुम्हे हो ना हो मुझको तो इतना - रुना लैला - घरोंदा (१९७७)
११)
ज़िन्दगी मेरे घर आना - भूपिंदर सिंग आणि अनुराधा पौडवाल - दूरियां (१९७९)
१२)
सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है - सुरेश वाडकर - गमन (१९७९)
१३)
अजीब सानेहा मुझ पर गुजर गया यारों - हरिहरन - गमन (१९७९)
This composition would remind you of Jaidev's another famous song 'Kabhi khud pe kabhi haalaat pe ronaa aayaa'
Jaidev's genius lies in the fact that he never hesitated to introduce new singers. E.g. Suresh Wadkar (Gaman), Hariharan (Gaman), Runa Laila (Gharonda), Bhupinder Singh (Dooriyan).
Thankfully, Jaidev's work was acknowledged at the national level when he won the National Award for the Best Music Composer for 3 of his films - 'Reshma Aur Shera' (1971), 'Gaman' (1979) and 'Ankahi' (1984).
Today, I have presented a different song composed by Jaidev from his film 'Gaman'. The singer is Chhaya Ganguly.
'Gaman' as a movie does not force you to remember it except for its songs composed by Jaidev. The movie is about Ghulam Rasul (Farooq Sheikh) - a common man from a small village in Uttar Pradesh. He lives there with his wife Khairun (Smita Patil) and his mother. The family is extremely poor and hardly manage to feed themselves. Ghulam's friend Lallu (Jalal Aga) is a Taxi Driver in Mumbai (then Bombay) and earns more than what his village-mates would even dream of. Upon Lallu's suggestion, Ghulam leaves his place for Mumbai and starts doing some work randomly. He learns to drive taxi at a later stage and starts earning little bit of money. In the process, he gets to see real plight of people living in Mumbai. Khairun continues to remember Ghulam and waits and hopes that he would return one day. Thus starts a beautiful song 'Aap ki yaad aati rahi raatbhar'.
The song starts with a soothing piece of Flute and entire Mukhada is sung without any background music (reminding us of the Solo rounds in today's reality shows). The first two Antaras are pictured on Smita Patil on the village background and hence Jaidev has not used any rhythm, but relied solely on Sarod and Flute. From the third Antara, the focus shifts to Mumbai on Ghulam, and to depict the fast life of Mumbai, the rhythm instruments kick in.
Chhaya Ganguly has sung this song with utmost simplicity and voice control; so much so that the songs leaves a long lasting impression upon you. She won the Best Female Singer award in 1979 at the national level for this particular song.
Given above are 2 videos - one from the film itself; and the other one from the Doordarshan program 'Aarohi' featured on Jaidev wherein you will see Chhaya Ganguly herself presenting the song.
Hats off to both Jaidev and Chhaya Ganguly for giving us this treasure!
Please do listen in and post your comments/suggestions.
Thank you and appreciate your time to read it this far! :-)