Image Courtesy: time.com |
I am extremely happy to present the sixth song of the series Anmol Ratan. This time it is what I call the Twin Magic by none other than the great musician of yesteryear late Pandit Ravishankar. 11th December is his Death anniversary, hence thought it would be more appropriate to remember him on this day through his great compositions.
English version of the blog is at the end of the Marathi version below.
Song #6: Kaise din beete kaise beetin ratiyaan
Song #7: Haaye re woh din kyon na aaye
Cast : Balraj Sahni, Leela Naidu, Abhi Bhattacharya,
Naseer Hussain
Naseer Hussain
Lyrics : Shailendra
Composer : Pandit Ravishankar
Singer : Lata Mangeshkar
पण मूलतः शास्त्रीय संगीत प्रांतातील असलेले पण हिंदी चित्रपटांना संगीत दिलेले असे मात्र मोजकेच सापडतील उ. दा. उस्ताद अली अकबर खान (सतार), पन्नालाल घोष (बासरी), शिव-हरी (पं. शिवकुमार शर्मा (संतूर) आणि पं. हरिप्रसाद चौरासिया (बासरी)), उस्ताद झाकीर हुसेन (तबला). या मान्यवरांच्या यादीत एक महत्वाचे नाव म्हणजे प्रख्यात सतारवादक पंडित रविशंकर!
पं. रविशंकर यांनी मोजक्याच बंगाली, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांना संगीत दिले. त्यातले "पाथेर पांचाली", The World of Apu, Parash Pathar, "अपराजितो", Gandhi हे बंगाली आणि इंग्रजी चित्रपट तर "धरती के लाल", "अनुराधा", "मीरा", "नीचा नगर" आणि "काबुलीवाला" हे हिंदी चित्रपट त्यातील संगीताने खूप गाजले.
पण हिंदी चित्रसृष्टीला रविशंकर यांची संगीतकार म्हणून दखल घ्यावी लागली ते "अनुराधा" या १९६० साली आलेल्या हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित चित्रपटातील संगीताने. या चित्रपटात रविशंकरांनी त्यांच्या सतारीवरील प्रभुत्वाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. त्याचबरोबर व्हायोलिन, बासरी आणि सारंगी यांच्या मधुर स्वरांचे नियोजन प्रत्येक गाण्यामध्ये अचूक ठिकाणी करून त्या गाण्याची मधुरता कैक पटीने वाढवली.
Leela Naidu
Photo courtesy thedailystar.net
|
चित्रपटाची सुरुवातच मुळी "सांवरे सांवरे" या गाण्याने होते. या शिवाय "जाने कैसे सपनों में खो गयी आखियां", "कैसे दिन बीते", "समा अलबेला दिन है मिलन के", " सुन मेरे लाल" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" अशी एकाहून एक सुंदर गाणी या चित्रपटात आहेत.
लताची Top 10 गाणी निवडायची झाली तर त्यात मी "कैसे दिन बीते" आणि "हाए रे वो दिन क्यों न आये" या २ गाण्यांचा समावेश नक्की करेन.
"अनुराधा" ही एका स्त्रीची गोष्ट आहे. अनुराधा राय (लीला नायडू) ही श्रीमंत बापाची मुलगी स्वतः एक उत्तम गायिका आणि नर्तिका असते. रेडिओवर तिचे गाण्याचे कार्यक्रम होत असतात. संगीत तिचा श्वास असतो. योगायोगाने तिची गाठ डॉ. निर्मल चौधरी (बलराज साहनी) या आदर्शवादी डॉक्टरशी पडते. दोघे प्रेमात पडतात व कालांतराने लग्न करायचे ठरवतात. डॉ. निर्मलने अनुराधाला त्याच्या खडतर व्यवसायाची कल्पना दिलेली असते. या दरम्यान अनुराधाचे वडील तिचे लग्न लंडनहून नुकत्याच परतलेल्या दीपकशी (अभि भट्टाचार्य) करायचे योजत असतात. पण अनुराधा वडिलांना न जुमानता डॉ. निर्मलशी लग्न करते. दोघांना एक मुलगीही - राणू - होते. त्यानंतर अनुराधा संसार आणि मुलीचे संगोपन यात स्वतःला इतकी झोकून देते की स्वतःच्या आवडीनिवडीही बाजूला ठेवते. ती एकेकाळी गायिका असते हे सुद्धा ती विसरते. दुसरीकडे डॉ. निर्मल दिवसरात्र गरिबांची सेवा करण्यात मश्गुल राहतो, त्याला कामापुढे बायको, संसार, मुलगी काही दिसत नाही. परिणामतः अनुराधाचे जीवन खूप एकाकी होते.
रविशंकरांनी यांनी जयजयवंती रागात बांधलेल्या या गाण्यात कमाल केली आहे. गाण्याची सुरुवातच मुळी "हाए" शब्दावरील लताने घेतलेल्या सुंदर कोमल मुरकीने होते. त्यानंतर 00:002 पासून ते 00:16 पर्यंत व्हायोलिनच्या तुकड्यातून दीपक - जो अनुराधाचे गाणे अनेक वर्षांनंतर ऐकण्यात उत्सुक असतो - त्याची उत्सुकता काय छान दाखवली आहे पहा. सुरुवातीच्या दोन "हाए" मध्ये वाजणारी सारंगी व नंतर आलेला छोटासा बासरीचा तुकडा अनुराधाची वेदना प्रकट करतात. आणि नंतर मग संपूर्ण गाण्यातून प्रतीत होते ती फक्त एका विवाहितेची अगतिकता. मुखडा आणि प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटी "पिया जाने ना" लताने जसं म्हटलंय त्याला तोड नाही, लताच्या स्वरातील व्याकुळता अनुराधेची वेदना अधिकच ठळकपणे दाखवते. शैलेंद्र यांनी हे गीत असं काही लिहिलंय की जणू तेच अनुराधाचे जीवन स्वतः जगलेत!
उ. दा. अनुराधा आणि डॉ. निर्मल किंवा दीपक यांचे गाण्यातील एकाच फ्रेम मधले दृश्य, डॉ. निर्मल त्याच्या अभ्यासात नेहमीप्रमाणे गढून गेलाय, आणि अनुराधा हताशपणे त्याकडे बघते आहे.
दुसऱ्या कडव्याच्या सुरुवातीला "रुत मतवाली आ के चली जाये" ही ओळ गाताना अनुराधाचे प्रतिबिंब तिच्याच तरुणपणाच्या फोटोसमोर दाखवले आहे; जणू काही तरुणपणाची स्वप्ने बघता बघता हातातून निसटून गेली हे दर्शविण्यासाठी. १९६० च्या दशकात चित्रपटांचे तंत्रज्ञान फार पुढारलेले नसतानाही असे दृश्य निर्माण करण्याचे कसाब त्या संकलकाचे.
शेवटच्या कडव्यात "बरखा ना भाए, बदरा ना सोहे" या ओळीतील "सोहे" वर लताने जो अप्रतिम तार स्वर लावला आहे त्याला तोड नाही. गाण्याचा शेवटही वेगळ्याच पद्धतीने गायलेल्या "पिया जाने ना" ने होतो.
शैलेंद्र यांचे शब्द, लीला नायडू, बलराज साहनी आणि अभि भट्टाचार्य यांचा अभिनय, रविशंकरांचे अप्रतिम संगीत आणि या सर्वांना न्याय देणारा लताचा आवाज, सर्वच अनुभवण्यासारखे. अवश्य ऐका आणि आनंद घ्या!
अनुराधाच्या मनातील व्यथा "कैसे दिन बीते" या गीतातून तिच्याच तोंडून ऐकल्यानंतर दीपकला अनुराधाच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तिने स्वतःमधील गाणे मारले आहे हे त्याला कळून चुकते. त्याला खूप वाईट वाटते. तो तिला परत गाणे सुरु करण्याचा सल्ला देतो, पण अनुराधा ऐकत नाही. "जागे हुए को होश में लाना आसान नहीं" हे कळल्यावर दीपक अनुराधाचे घर सोडायचे ठरवतो. या दरम्यान अनुराधा-डॉ. निर्मल यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. अनुराधा निर्मलला त्याची आठवण करून देते, तो तिला रात्री ८ वाजता येऊन वाढदिवस साजरा करण्याचे आश्वासन देतो. आनंदलेली अनुराधा रात्रभर डॉ. निर्मलची वाट बघते, पण निर्मल एका रुग्णाच्या सेवेत अडकल्यामुळे येऊ शकत नाही. तो सकाळी उशिराने घरी परततो, तोपर्यंत अनुराधा संतापलेली असते. तिच्या संयमाची, डॉ. निर्मल कधीतरी तिच्याकडे लक्ष द्यायला लागेल या आशेची परिसीमा झालेली असते. अनुराधा आता मात्र डॉ. निर्मलचे घर सोडून वडिलांकडे परत जायचा निर्णय घेते व डॉ. निर्मलला तो निर्णय सांगते. अर्थात, निर्मल दुःखी होतो पण तो काही करू शकत नसतो.
दरम्यान शहरातून एक प्रसिद्ध डॉक्टर कर्नल त्रिवेदी आणि त्यांचे मित्र हिरालाल वर्मा हे डॉ. निर्मलला भेटतात व त्याच दिवशी संध्याकाळी निर्मलच्या घरी जेवायचा कार्यक्रम ठरवतात. त्यामुळे निर्मल अनुराधाला १ दिवस थांबून दुसरे दिवशी जायची विनंती करतो. संध्याकाळी कर्नल त्रिवेदी जेवायला डॉ. निर्मलाच्या घरी येतात. आल्याआल्याचं त्यांना अनुराधाचा तरुणपणाचा फोटो व तिने मिळवलेली बक्षिसे दिसतात. टेबलावर ठेवलेल्या रुद्रवीणेवर आणि पुस्तकांवर साठलेली धूळ दिसते. आणि त्यांना सर्व गोष्टींचे आकलन होते. डॉ. निर्मल अनुराधाची ओळख करून देतो. कर्नल त्रिवेदी तिला गाणे गायची विनंती करतात. मग सुरु होते आणखी एक अप्रतिम गीत "हाए रे वो दिन क्यों न आये"
गाणे संपले तरी आपल्यावर त्याचा ठसा बराच काळ राहतो यातच या गाण्याचे यश सामावलेले आहे. असा हा अप्रतिम संगीत, अभिनय, दिग्दर्शन आणि गायकीने नटलेला "अनुराधा". एकदा तरी अवश्य वेळ काढून बघा आणि ही कलाकृती निर्माण करणाऱ्यांना धन्यवाद द्या, एवढे कराच, मित्रांनो!
"Anuradha" is a 1960 film of a young woman Anuradha (Leela Naidu) who gets married to an idealistic Dr. Nirmal Chaudhari (Balraj Sahani) who has pledged to serve the poor. Anuradha's father had decided to get her married to a London-returned young boy - Deepak (Abhi Bhattacharya); however Anuradha - deeply in love with Dr. Nirmal - rejects her father's proposal, runs away and gets married with Dr. Nirmal.
Both Dr. Nirmal and Anuradha have a lovely daughter - Renu. However, Anuradha finds Dr. Nirmal always caring more for his patients and does not pay any attention to his family. As years pass by, Anuradha starts feeling more and more lonely. She had sacrificed her singing and other hobbies. After she once again meets Deepak accidentally. he tries to pursue Anuradha to start singing again and not neglect her singing talent. He requests her to sing a song, Anuradha obliges by singing "Kaise Din Beete" - a wonderful composition in Jayjaywanti raag by Pt. Ravishankar. Shailendra's poetry perfectly portray Anuradha's feelings. Use of Flute, Sitar, Violin and Sarangi play an important role in enhancing the sweetness of the song. Lata's voice is at its best, only to be experienced.
Hrishikesh Mukherjee as the Director of the movie has used camera angles and light effects extremely intelligently to capture the agony of Anuradha. The magic of cameraman and editor is at the fore during the rendition of line "Rut matwali aa ke chali jaaye" when Anuradha's past and present photographs are shown in one frame to depict the lost opportunity for Anuradha.
As the movie progresses, we see Anuradha feeling frustrated with the situation and her helplessness. And when Dr. Nirmal does not return home to celebrate their wedding anniversary, after promising Anuradha, she gets extremely angry and decides to leave the house forever and go back to her father's place to restart her singing career. Colonel Trivedi - a well known Doctor from the city - and his friend visit their house on one evening for the dinner. When Colonel Trivedi sees young Anuradha's photograph with trophies and then goes on to see the Rudraveena and books not being used for years, he realises Anuradha's plight. He requests Anuradha to sing a song for him and there starts another gem of a song "Haaye re woh din kyon naa aaye". This song has been composed in Raag Janasammohini and like the earlier song, has excellent use of Sarangi, Flute and Sitar. Lata's voice control in "Jaa jaa ke ritu laut aaye" and amazing rendition of "Zilmil woh taare kahan gaye saare" or "Suni meri beena sangeet bina" in high pitch is simply awesome and is perhaps the USP of the song!
Lata Mangeshkar - Pandit Ravishankar |
For English readers, here are the two links, which will give you a very thorough review of the film.
https://anuradhawarrier.blogspot.com/2017/10/anuradha-1960.html
https://madhulikaliddle.com/2009/09/05/anuradha-1960/
For now, enjoy the songs - videos embedded in the Marathi version above. Hope you would like it. Do post your comments.
सप्रे जी, अतिशय सुंदर लेख.
ReplyDeleteधनंजय खुप छान
ReplyDeleteअफलातून लेख लिहिला आहेस, धनंजय! चित्रपटाच्या विविध अंगांचा रसास्वाद कसा घ्यायचा आणि तो यथायोग्य शब्दांत कसा मांडायचा हे तुझ्याकडून शिकावं, मित्रा! आज रात्रीच "अनुराधा" बघणार!!
ReplyDeleteDhananjay khupach chhan
ReplyDeleteReadyourblog today. Very nicely composed information & am absolutely agree with the views. By the way this is my favourite movie & do here the songs of thd said film frequently.
ReplyDeleteप्रत्येक गाण्यातील सौन्दर्य स्थळे अतिशय उत्तमपणे उलगडून दाखवली आहेस, तसेच हृषीकेश मुखर्जी यांचे दिग्दर्शक म्हणून असलेले कौशल्य ही फार सुंदर रीतीने दाखवले आहेस, या दोन्ही क्षेत्रातील तुझी समज अतिशय उत्तम आहे.
ReplyDelete