Sunday, 5 April 2026

आरंभ-स्वर १२ : आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना (C. Ramchandra-Lata special)

 

हिंदी चित्रपटांत मराठी संगीतकारांची परंपरा सुरुवातीपासून आहे. म्हणजे प्रभात काळातील गोविंदराव टेंबे यांच्यापासून सुरू झालेली परंपरा मास्तर कृष्णराव, दत्ता कोरगावकर (K. दत्ता), स्नेहल भाटकर, वसंत देसाई, सुधीर फडके, लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीतील), अजय-अतुल इ. संगीतकारांनी पुढे नेली. या सर्व संगीतकारांनी उत्तमोत्तम गाणी हिंदीमध्ये केली. पण या सर्व संगीतकारांमध्ये सर्वार्थाने (संख्या, दर्जा, इ.) बिनीचे म्हणता येतील असे एकच नाव, ते म्हणजे सी. रामचंद्र.

सी. रामचंद्र यांचे पूर्ण नाव रामचंद्र नरहर चितळकर असे होते. त्यांना लोकं प्रेमाने "अण्णा" असे संबोधायचे. शोधायला गेले तर सी. रामचंद्र यांच्याबद्दल पुष्कळ माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे त्यामुळे ती इथे देत नाही. 

आज जे गाणं सादर करत आहे ते आहे १९५५ सालच्या "यास्मिन" या चित्रपटातील. गीतकार आहेत जाँ निसार अख्तर (म्हणजे जावेद अख्तर यांचे पिताश्री), संगीतकार सी.  रामचंद्र आणि गायले आहे लता मंगेशकर यांनी. सी. रामचंद्र आणि लता या जोडीने असंख्य अवीट गोडीची गाणी आपल्याला दिली आहेत त्यातीलच हे एक गाणे. लता सर्वच संगीतकारांकडे सुंदर गायली आहे पण सी. रामचंद्र यांच्या संगीत दिग्दर्शनात तिचा आवाज खासच वाटतो. "शहनाई" (१९४७) या चित्रपटातील "जवानी की रेल चली जाय रे" पासून ते १९६८ मधील "पायल की झंकार" मधल्या "तू आये ना आये मगर जानेवाले" पर्यंत असंख्य नितांतसुंदर गाणी सी. रामचंद्र यांनी फक्त आणि फक्त लतासाठी बनवली.

"यास्मिन" या चित्रपटाची कथा अरबस्तानात घडते. अतिशय श्रीमंत संस्थानिक शेख आणि त्यांची बायको झुबेदा यांचा मुलगा अहमद (सुरेश). या अहमदचे प्रेम बसते एका जिप्सी मुलीवर - यास्मिनवर (वैजयंतीमाला). अर्थातच शेख आणि झुबेदाला हे मान्य नसते. अहमद घर सोडून पळून यास्मिनकडे जातो. पुढे काय होते ते YouTube वर चित्रपटात बघा.

चित्रपटात एकूण १० गाणी - त्यातील ९ गाण्यांना लताचा आवाज! "मुझपे इल्ज़ाम बेवफाई है" (लता), "तुम अपनी याद भी दिल से" (लता-तलत) आणि "बेचैन नज़र बेताब जिग़र" (तलत) ही यातील अतिशय गाजलेली, लोकप्रिय गाणी. आजचे गाणे त्यामानाने कमी ऐकलेले. सी. रामचंद्र यांची अतिशय मधुर अशी चाल, गीतकार जाँ निसार अख्तर यांचे नायिकेच्या मनातील भावना अचूक टिपणारे शब्द, आणि लताचा अजोड आवाज. 

याबरोबरच वैजयंतीमाला आणि अभिनेता सुरेश यांचे सुरेख close-ups व वैजयंतीमालाची निरागसता,  पहिल्यांदाच प्रेमात पडलेल्या प्रेमिकेचे हावभाव दाखवणारा अभिनय आणि तिचे बोलके डोळे हे या गाण्याचे वैशिष्ट्य.

गाणे सुरु होते लताच्या गुणगुणण्याने - ते गुणगुणणेही किती गोड! "अं अं अं" वरून "आ आ आ आ" येताना पार्श्वभूमीवर आधी हलकासा पियानो वाजतो, जणू काही एखादं फुलपाखरूच उडतंय! "आ आ आ" नंतर एक छोटासा संगीत तुकडा (बहुदा व्हायोलिन) वाजतो तो इतका छान पेरलाय की पुढील शब्दांना जणू काही वाट करून देतो.

आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना
तारों में हँसा करना फूलों में खिला करना
आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना ||

संपूर्ण गाणे हे प्रेमिकेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब आहे असे वाटते.

जब से तुम्हें देखा है जब से तुम्हें पाया है
कुछ होश नहीं मुझको इक नशा सा छाया है
अब बात जो कहनी हो नज़रों से अदा करना
आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना ||

ऐ काश धड़कता दिल कुछ देर ठहर जाएँ
ये रात मोहब्बत की यूं ही न गुज़र जाएँ
बाकी है अभी तुम पर ये जान फ़िदा करना
आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना ||

क़िस्मत न दिखाये अब घड़ियाँ हमें फुर्सत की
हर रात यूँ ही चमके तक़दीर मोहब्बत की
ऐ चांद सितारों तुम मिल-जुल के दुआ करना
आँखों में समा जाओ इस दिल में रहा करना ||

सुरेश आणि वैजयंतीमाला यांचा अतिशय संयत असा अभिनय, त्याला साजेसं, आवाजावर जराही मात न करणारं सौम्यसं पार्श्वसंगीत आणि ठळकपणे ऐकू येणारा लताचा सुंदर आवाज हे अद्भुत असं मिश्रण आहे. लता गात असताना पार्श्वसंगीत जवळपास ऐकूच येत नाही; ते ऐकू येते दोन कडव्यांच्या मध्ये. बासरी, गिटार, पियानो आणि तालवाद्य यांनी कडव्यांमधली जागा (interlude) अप्रतिमरीत्या भरून काढली आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या कडव्यांच्या दुसऱ्या ओळींनंतर पहिली ओळ परत म्हणताना दुसऱ्या ओळीच्या शेवटच्या शब्दाने पहिली ओळ ज्या खुबीने संगीतकार-गायिका यांनी जोडून घेतली आहे ती केवळ लाजवाब! उदा. "यूं ही न गुज़र जाएँ.....ऐ काश धड़कता दिल....".

एकूणच कुठलेही गाणे तारस्वरात (कंठरवाने) गाण्याच्या आजच्या काळात हे शांत, सौम्य गाणे ऐकण्यासाठी आपणही थोडा संयम दाखवायला हवा. वैजयंतीमालाचे निरागस सौन्दर्य व लताची भावपूर्ण गायकी अनुभवण्यासाठी हे गाणे नक्की बघा/ऐका. नक्की आवडेल.

आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल. ब्लॉग आवडला तर पुढे पाठवायला हरकत नाही. धन्यवाद.

After a gap of 2 months, I am very happy to present the next edition of my musical series "आरंभ-स्वर". 

The tradition of Marathi music composers in Hindi films has existed since the very beginning. It started in the Prabhat era with Govindrao Tembe and was carried forward by composers such as Master Krishnarao, Datta Korgaonkar (K. Datta), Snehal Bhatkar, Vasant Desai, Sudhir Phadke, Laxmikant (of the Laxmikant–Pyarelal duo), Ajay–Atul, and others. All of these composers created excellent songs in Hindi. However, among them, the one name that stands out in every respect (quantity, quality, etc.) is C. Ramchandra.

C. Ramchandra’s full name was Ramchandra Narhar Chitalkar. People fondly addressed him as “Anna.” If one searches, a lot of information about him is available on the internet, so I won’t repeat it here.

The song I am presenting today is from the 1955 film Yasmin. The lyricist is Jan Nisar Akhtar (father of Javed Akhtar), the music composer is C. Ramchandra, and the song is sung by Lata Mangeshkar. The duo of C. Ramchandra and Lata has given us countless timeless melodies, and this is one of them. Lata has sung beautifully for all composers, but her voice feels especially unique under C. Ramchandra’s musical direction.

The story of Yasmin is set in Arabia. A very wealthy nobleman, Sheikh, and his wife Zubeida have a son named Ahmed (Suresh). Ahmed falls in love with a gypsy girl, Yasmin (Vyjayantimala). Naturally, Sheikh and Zubeida do not approve. Ahmed runs away from home to be with Yasmin. What happens next can be watched in the film on YouTube.

The film has a total of 10 songs—9 of them sung by Lata! “Mujhpe Ilzaam Bewafai Hai” (Lata), “Tum Apni Yaad Bhi Dil Se” (Lata–Talat), and “Bechain Nazar Betab Jigar” (Talat) are among the most famous and popular songs. 

Today’s song is relatively lesser known. It features a very melodious composition by C. Ramchandra, lyrics by Jan Nisar Akhtar that beautifully capture the heroine’s emotions, and Lata’s incomparable voice.

Additionally, the song stands out for its beautiful close-ups of Vyjayantimala and actor Suresh, Vyjayantimala’s innocence, her expressive portrayal of a young woman falling in love for the first time, and her eloquent eyes.

The song begins with Lata’s humming—so sweet in itself! As it moves from “an an an” to “aa aa aa aa”, as if a butterfly is dancing on the flowers, a soft piano play in the background, followed by a brief musical phrase (probably a violin), which is so delicately placed that it seems to pave the way for the lyrics that follow.

Aankhon mein sama jao, is dil mein raha karna
Taarein mein hansa karna, phoolon mein khila karna
Aankhon mein sama jao, is dil mein raha karna

The entire song feels like a reflection of a lover’s hopes and dreams.

Jab se tumhein dekha hai, jab se tumhein paaya hai
Kuch hosh nahin mujhko, ik nasha sa chhaya hai
Ab baat jo kehni ho, nazron se ada karna
Aankhon mein sama jao, is dil mein raha karna

Ae kaash dhadakta dil kuch der thahar jaaye
Yeh raat mohabbat ki yun hi na guzar jaaye
Baaki hai abhi tum par yeh jaan fida karna
Aankhon mein sama jao, is dil mein raha karna

Qismat na dikhaaye ab ghadiyaan humein fursat ki
Har raat yun hi chamke taqdeer mohabbat ki
Ae chaand sitaaron tum mil jul ke dua karna
Aankhon mein sama jao, is dil mein raha karna

The restrained acting of Suresh and Vyjayantimala, the gentle background score that never overpowers the voice, and Lata’s clear, melodious singing together create a magical blend. While Lata is singing, the background music is barely noticeable; it is mainly heard in the interludes between verses. Instruments like the flute, guitar, piano, and percussion fill these interludes beautifully.

A particularly striking feature is how, in the second and third verses, the first line is repeated after the second line in such a seamless way that the last word of the second line connects perfectly to the first—an exquisite touch by both composer and singer. E.g. "yun hi na guzar jaaye....Ae kaash dhadakta dil...".

In today’s era, where songs are often sung in high pitch and loud tones, we should take a moment to appreciate this calm, gentle composition with patience. To experience Vyjayantimala’s innocent beauty and Lata’s emotive singing, do watch/listen to this song—it will surely appeal to you.

I would love to read your feedback. If you liked the blog, feel free to share it further. Thank you.