Sunday, 7 September 2025

आरंभ-स्वर ७ : टूटे ना दिल टूटे ना (Dilip Kumar-Nargis-Raj Kapoor in one frame)


Namaskar. Thanks for being here. English version follows Marathi version below.

टूटे ना दिल टूटे ना - अंदाज़ (१९४९) - गीतकार मज़रूह सुलतानपुरी - संगीतकार नौशाद - गायक मुकेश चंद माथुर 

साल होतं १९४९. या वर्षी तब्बल ११८ हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले होते! (संदर्भ विकिपीडिया) एक-से-एक असे चित्रपट. काही नावेच बघा ना - बरसात, महल, दिल्लगी, शबनम, बडी बहेन, पतंगा, दुलारी, लाहोर, बाज़ार, लाडली इ. यातील अनेक चित्रपट प्रचंड गाजले, कित्येक चित्रपटांची गाणी अजरामर झाली. कित्येक तारे-तारका यांचे नशीब फळफळले. 

अशा जबरदस्त सिनेमांच्या भाऊगर्दीत मेहबूब खान या तगड्या दिग्दर्शकाने "अंदाज़" नावाचा चित्रपट प्रदर्शित केला. प्रमुख भूमिकेत होते - दिलीप कुमार, नर्गिस आणि राजकपूर. तिघेही त्याकाळचे सुपरस्टार. पण तिघांनी एकत्र काम केलेला हा एकमेव चित्रपट! गीतकार मज़रूह सुलतानपुरी तर संगीतकार नौशाद. हा चित्रपट हिट न होता तरच नवल. चित्रपटात एकूण १० गाण्यांची जबरदस्त मेजवानी. त्यापैकी लता मंगेशकर आणि मुकेश यांची प्रत्येकी ४ सोलो गाणी. आणि लताची २ द्वंद्वगीते - एक मोहम्मद रफी तर दुसरे शमशाद बेगम यांचेबरोबर. 

नौशाद यांनी मुकेशचा आवाज फक्त ३ चित्रपटांतील १० गाण्यांसाठी वापरला - "मेला" (१९४८) (गाये जा गीत मीलन के), "अनोखी अदा" (१९४८) (५ गाणी) आणि "अंदाज़" मध्ये ४ सोलो गाणी. राजकपूर-मुकेश आणि दिलीपकुमार-मोहम्मद रफी या जोड्या ठरून गेलेल्या काळात नौशाद यांनी "अंदाज़" मध्ये दिलीपकुमार साठी मुकेशचा तर राजकपूर साठी रफीचा आवाज वापरण्याचे धाडस केले आणि यशस्वी करून दाखवले!

नैना (नर्गिस) श्रीमंत वडिलांची एकुलती एक मुलगी, लाडाकोडात वाढलेली, घोडेस्वारीचा शौक असलेली. एका अपघातात तिला दिलीप (दिलीप कुमार) वाचवतो. पुढे त्यांची मैत्री होते. कालांतराने दिलीपचे नैनावर प्रेम बसते, पण नैनाला हे माहिती नसते कारण ती मात्र राजनच्या (राज कपूर) आकंठ प्रेमात असते. मधल्या काळात नैनाच्या वडिलांचे निधन होते त्यामुळे ती दुःखात बुडून जाते. राजन परदेशातून परत आल्यावर तिला धीर देतो. त्या दोघांचे आपापसातील वागणे पाहून दिलीपला त्यांच्यातील प्रेमाचा अंदाज येतो, त्याला धक्का बसतो. 

गाण्याआधीची तिघांची मनःस्थिती लक्षात घ्यावी लागेल - राजन नुकताच परदेशातून आला आहे, नैनाला भेटून खूप आनंद झालाय त्याला. नैनाने त्याला दिलीप या तिच्या मित्राबद्दल बरेच सांगितले आहे पण तरीही दिलीपला पाहून/भेटून राजन दिलीप-नैना यांच्या नात्याविषयी थोडासा साशंक आहे. नैनाचा आनंद राजनला भेटून गगनात मावत नाहीये. तिला दिलीपच्या तिच्याविषयीच्या भावना माहिती नाहीयेत. आणि दिलीप मात्र राजनच्या येण्याने असुरक्षित झाला आहे, त्याला वाटतंय की राजन नैनाला त्याच्यापासून दूर करणार, नैनाने तिचे प्रेम राजनवर आहे हे न सांगून दिलीपला दुखावले आहे. याच नाजूक क्षणी राजन आणि नैना दिलीपला पियानोवर एक गाणे गायची विनंती करतात. मग सुरु होते मुकेशचे अतीव सुंदर असे गीत. 


राजनने दिलीपला एखादे प्रेमाचे गीत गा अशी विनंती केलेली असते; पण तो तर "टूटे ना दिल टूटे ना टूटे ना" गातो त्यामुळे राजन थोडासा अवाक होऊन त्याच्याकडे पाहतो. दिलीपही कसनुसं हसत कधी नैनाकडे तर कधी राजनकडे पाहतो, त्यावेळच्या ओळी ऐकल्या तर लक्षात येईल. नैनाकडे पाहताना "मला का फसवलंस?" असे भाव दिलीपच्या चेहऱ्यावर दिसतात तर राजनकडे पाहताना "तू लुटेरा आहेस" या भावनेने रोखलेली ती नजर एखाद्याचे काळीज चिरत जाईल! दिलीपकुमारचा अभिनय लाजवाब आहे; एरवी तो खूप नौटंकी करतो असे माझे प्रांजळ मत आहे पण या संपूर्ण चित्रपटात त्याचा अभिनय अत्यंत नैसर्गिक आहे. नर्गिस व राजकपूरनेही आपल्या मुद्राभिनयाने तोडीस तोड साथ केली आहे. तिघांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बघण्यासारखे आहेत. तिघांच्याही व्यक्तिरेखा इतक्या ताकदवान आहेत की चित्रपट बघताना आपण खिळून राहतो. कोणाचा अभिनय श्रेष्ठ हे ठरवणे अतिशय अवघड आहे. या सर्वांना नैसर्गिक अभिनय करायला लावण्याचे कसब मात्र दिग्दर्शक मेहबूब खानचे. 


गाण्याबद्दल बोलायचे तर नौशादने हे गीत भैरवी रागात बांधले आहे. हे गाणे म्हणजे चित्रपटात पुढे येणाऱ्या प्रसंगांची एक झलकच आहे. मजरुह यांचे शब्द म्हणजे सोने आहे, आणि मुकेशने आपल्या धीरगंभीर आवाजाने त्या व्यक्तिरेखेचे सगळे दुःख गाण्यात ओतले आहे. दिलीपकुमार स्वतः गायक असल्याने त्याने सर्व छोट्या छोट्या हरकती-मुरकती व्यवस्थित घेतल्या आहेत त्यामुळे बहुदा Editor चे काम थोडे कमी झाले असावे. गाण्यामध्ये प्रामुख्याने पियानो, व्हायोलिन, डफ आणि मध्ये बहुदा मेंडोलिनचे तुकडे यातून अप्रतिम चाल निर्माण केली आहे नौशादने. सर्व गाणी अफलातून आहेत. या चित्रपटातील मुकेशची सर्व गाणी ही बहुदा त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम १०-२० गाण्यांमध्ये गणना करता येईल इतकी जबरदस्त गायली आहेत. उदा. "झूम झूम के नाचों आज", "तू कहे अगर जीवनभर" आणि "हम आज कहीं दिल खो बैठे".

चला तर ऐकू या हे अप्रतिम गीत. आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आवडले तर पुढे पाठवा. धन्यवाद.


Toote Naa Dil Toote Naa – Andaz (1949) – Lyricist Majrooh Sultanpuri – Music Composer Naushad – Singer Mukesh Chand Mathur

The year was 1949. That year, a staggering 118 Hindi films were released! (Source: Wikipedia) Many of them were iconic. Titles like Barsaat, Mahal, Dillagi, Shabnam, Badi Bahen, Patanga, Dulari, Lahore, Bazaar and Ladli, etc. made their mark. Several songs from these films have become timeless classics. The fortunes of many stars soared with these movies.

Amidst this wave of stellar cinema, Mehboob Khan, a powerful director, released “Andaz”, a film that stood out not just for its story, but for its historic casting: Dilip Kumar, Nargis, and Raj Kapoor – the only film they ever did together. The lyricist was Majrooh Sultanpuri, and the music was composed by Naushad. The film boasted a feast of 10 incredible songs. Out of these, Lata Mangeshkar and Mukesh sang 4 solo songs each. Lata also sang 2 duets – one with Mohammed Rafi and another with Shamshad Begum.

Naushad used Mukesh’s voice for only 10 songs across 3 films: Mela (1948) ("Gaaye Ja Geet Milan Ke"), Anokhi Ada (1948) (5 songs), and 4 solos in Andaz (1949). At a time when the pairings Raj Kapoor–Mukesh and Dilip Kumar–Mohammed Rafi was well-established, Naushad took the bold step of using Mukesh's voice for Dilip Kumar and Rafi’s voice for Raj Kapoor in Andaz, and it did wonders.

Naina (Nargis) is the only daughter of a wealthy father – pampered, raised with love, fond of horse riding. In an accident, she’s saved by Dilip (Dilip Kumar). They become friends, and over time, Dilip falls in love with Naina. But Naina is unaware of his feelings, as she is deeply in love with Rajan (Raj Kapoor). During this time, Naina’s father passes away, leaving her devastated. When Rajan returns from abroad, he comforts her. Observing their behaviour, Dilip realizes they are in love, which leaves Dilip heart-broken.

Before we watch the song, understanding the emotional state of all three characters is important: Rajan has just returned from abroad and is thrilled to meet Naina. She’s already told him a lot about her friend Dilip. Still, upon meeting him, Rajan feels a slight doubt about Dilip and Naina’s relationship. Naina is overjoyed to see Rajan and unaware of Dilip’s feelings. Dilip, however, feels insecure with Rajan’s return – he fears Rajan will take Naina away from him, and that Naina has hurt him by not revealing her love for Rajan. At this delicate moment, Rajan and Naina request Dilip to sing a song at the piano. And thus begins a heartbreakingly beautiful song sung by Mukesh. His song becomes a subtle confession of pain, layered with complex glances and emotions.

Rajan had asked Dilip to sing a romantic song. Instead, he sings “Toote Na Dil, Toote Na...” (Let the heart not break...), leaving Rajan slightly stunned and staring at him. Dilip forces a smile, glancing between Naina and Rajan – if you pay attention to the lyrics and expressions at this point, you'll notice the subtle emotions. When Dilip looks at Naina, his face seems to ask, “Why did you deceive me?” And when he looks at Rajan, his gaze carries a silent accusation: “You’re a thief”. That piercing stare could cut right through one’s heart. Dilip Kumar’s acting is exceptional here. Normally, I find him a bit theatrical; but in this film, his performance is completely natural. Nargis and Raj Kapoor match him with equally powerful expressions. Their facial acting is worth watching. All three characters are so strong that you stay glued to the screen. It’s almost impossible to decide whose performance is superior. The credit for drawing out such natural acting from them goes to director Mehboob Khan.

Speaking of the song – Naushad composed it in Raag Bhairavi. This song foreshadows upcoming events in the film. Majrooh’s lyrics are pure gold, and Mukesh pours his soul, portraying Dilip’s sorrow, into the song with his deep, resonant voice. Since Dilip Kumar was a singer himself, he executed all the subtle nuances beautifully – which probably made the editor’s job easier. The instrumentation includes Piano, Violin, Dholak, and what sounds like Mandolin pieces – Naushad created a truly sublime composition. All the songs in the film are phenomenal. In fact, Mukesh’s songs from this film can easily be counted among the top 10–20 songs of his career. Examples include: "Jhoom Jhoom Ke Nacho Aaj," "Tu Kahe Agar Jeevan Bhar," and "Hum Aaj Kahin Dil Kho Baithe."

So, let’s listen to this magnificent song.
Do share your thoughts afterward.
If you liked it, pass it along.
Thank you.