Sunday, 6 July 2025

आरंभ-स्वर ५ : ये हवा ये रात ये चाँदनी (Dilip Kumar-Talat Mahmood special)


Namaskar. The English version of this blog follows the Marathi version below. Please leave your comment at the end of the blog with your name. Thanks.

ये हवा ये रात ये चाँदनी - संगदिल (१९५२) - गीतकार राजेंद्र कृष्ण - संगीतकार सज्जाद हुसैन - गायक तलत महमूद


काही काही माणसं चांगलं नशीबच घेऊन जन्माला आलेली असतात! बघा ना - विश्वजीत, जॉय मुखर्जी, भारत भूषण, प्रदीप कुमार यांच्यासारख्या सामान्य नटांना मोहम्मद रफींसारखा पार्श्वगायक लाभला आणि शम्मी या एका सामान्य नटीच्या वाट्याला चित्रपटाचा नायक तिच्या सौंदर्याचं वर्णन करत आहे असं वाटावं असं गाणं आलं! होय, मी बोलतोय ते आज सादर करत असलेल्या गाण्याबद्दल. हे गाणे आहे १९५२ सालच्या "संगदिल" या चित्रपटातील "ये हवा ये रात ये चाँदनी"; जे चित्रपटाचा नायक दिलीपकुमार प्रत्यक्षात नायिका मधुबालेसाठी गात असतो पण समोर असते ती शम्मी! 



Photo Courtesy
Wikipedia
"संगदिल" हा चित्रपट Charlotte Brontë यांच्या १८४७ सालच्या सुप्रसिद्ध Jane Eyre या कादंबरीवर बेतलेला. दिलीपकुमार आणि मधुबाला यांचा एकत्र काम केलेला दुसरा चित्रपट. चित्रपट तसा सामान्यच पण राजेंद्रकृष्ण यांची जबरदस्त गीते आणि सज्जाद यांचे अफलातून संगीत यामुळे या चित्रपटाने त्यावर्षी जवळपास ९५ लाख (म्हणजे आजचे १०० कोटी) रुपयांची कमाई केली होती!

चित्रपटात एकूण ८ गाणी - त्यातील तलत महमूद (२ सोलो, १ द्वंद्वगीत), लता आणि आशा (प्रत्येकी १ सोलो व १ द्वंद्वगीत) तर गीता दत्त व शमशाद बेगम यांचे प्रत्येकी १ सोलो गाणे. या आठही गाण्यांमधील हे सर्वात गाजलेले गाणे. आजही रेडिओवर बऱ्याचदा ऐकू येते. 

चित्रपटाचा नायक शंकर (दिलीपकुमार) आणि कमला (मधुबाला) हे बालपणापासूनचे साथीदार पण नंतर एकमेकांपासून दूर गेलेले. तरीही दोघांच्या मनात एकमेकांविषयी प्रेम. अशात शंकरची भेट मोहिनीशी (शम्मी) होते. मोहिनी शंकरवर प्रेम करू लागते. तिच्या आग्रहाखातर शंकर "ये हवा ये रात ये चाँदनी" हे गीत गातो पण त्याच्या मनात असते ती कमला. पुढे काय होते ते चित्रपटात बघणे इष्ट ठरेल.

गाणे सुरु होते फक्त ३ सेकंदांच्या संवादिनी स्वरांनी; आणि नंतर येते ती तलतच्या शांत, हळुवार सुरातील सुमधुर अशी तान. त्यापाठोपाठ येणाऱ्या सतारीच्या सुरावटीनंतर प्रत्यक्ष गाणे सुरु होते. दिलीपकुमार तलतच्या आवाजात शम्मीला म्हणत असतो: 

ये हवा ये रात ये चाँदनी, तेरी इक अदा पे निसार है  
(निसार होना = ओवाळून टाकणे, त्याग करणे)
मुझे क्यों न हो तेरी आरज़ू, तेरी जुस्तजू में बहार है 
(आरज़ू = इच्छा, जुस्तजू = शोध)

हे गाणे शृंगाराचे (मराठीत रोमँटिक) असले तरी त्याला नायकाच्या प्रेयसीच्या विरहाच्या दुःखाची एक किनार आहे. त्यामुळे संपूर्ण गाण्यात पार्श्वभूमीवर सारंगी गाण्याप्रमाणे वाजते, इथे सज्जादचा गाण्याबद्दलचा विचार दिसतो. 

पहिल्या अंतऱ्याच्या आधी साधारण १५ सेकंदांचे संगीत आहे, पुन्हा सारंगी आणि तबला, पण करुणा आणि शृंगार यांचे अद्भुत मिश्रण आहे. त्याने तिच्या सौंदर्याच्या केलेल्या वर्णनाने ती मोहरून जाते आणि जेंव्हा भानावर येऊन जराशी मागे कलंडते तेंव्हा आत्तापर्यंत एका लयीत वाजत असलेली सारंगीही आपली लय थोडीशी कमी करते, वाहव्वा! नायक म्हणतोय:

तुझे क्या ख़बर है ओ बेख़बर, तेरी एक नज़र में है क्या असर 

यातील "बेख़बर" शब्दावर घेतलेल्या हरकतीनंतर सारंगीचा अगदी छोटासा तुकडा वाजतो, तो ऐका. तीच ओळ दोनदा म्हणताना मध्ये हा अप्रतिम भराव (ज्याला आपण इंग्रजीत filler म्हणतो) वाजवला आहे.

जो ग़ज़ब में आये तो क़हर है, जो हो मेहरबाँ तो क़रार है 
(ग़ज़ब, क़हर = राग, संताप, क़रार = शांतता) 

दुसऱ्या अंतऱ्याच्या आधीचे संगीतही पहिल्यासारखेच आहे पण थोडा बदल आहे, चाणाक्ष श्रोत्यांना तो लगेच समजेल. यात सारंगीऐवजी सतार आणि साथीला व्हायोलिन असावे असे वाटते. कडवे सुरु होताना पुन्हा सारंगीचा एक छोटा तुकडा आपल्याला मूळ चालीशी जोडून घेतो. परत सज्जाद!

तेरी बात बात है दिलनशीं, कोई तुज़से बढ़के नहीं हंसी 
(दिलनशीं = मनाला मोहवणारी)
है कली कली में जो मस्तियाँ, तेरी आँख का ये ख़ुमार है 
(मस्तियाँ, ख़ुमार = नशा)

एकाच अर्थाचे दोन वेगळे शब्द एकाच ओळीत दोन्ही कडव्यांत आलेत, हे कौशल्य गीतकार राजेंद्रकृष्ण यांचे.

आत्तापर्यंत आपले वर्णन ऐकून भारावून गेलेली शम्मी भानावर तेंव्हा येते जेंव्हा गाणे संपताना दिलीपकुमार खिडकीबाहेर उभ्या असलेल्या मधुबालाला बघतोय हे तिला कळते. 

शम्मी छान दिसली आहे गाण्यामध्ये; पण मधुबाला असती तर बहार आली असती असे राहून राहून वाटते, आजच्या Artificial Intelligence च्या जमान्यात हा बदल करून गाणे बघणे शक्य आहे!

दिलीपकुमार साठी तलतने आपला आवाज काही चित्रपटांसाठी दिला आहे. उदा. बाबुल (संगीतकार नौशाद), आरजू, तराना (अनिल विश्वास), दाग, शिकस्त (शंकर जयकिशन), देवदास (SD बर्मन) आणि फुटपाथ (खय्याम). दिलीपकुमारच्या Tragedy King या प्रतिमेला शोभणारा तलत इतका दुसऱ्या कोणा गायकाचा आवाज नाही असे मला वाटते. असो.

सज्जाद यांनी हे गाणे राग दरबारी कानडा मध्ये बांधले होते. या गाण्याच्या चालीत थोडा बदल करून मदनमोहन यांनी १९५८ सालच्या "आख़री दॉँव" चित्रपटात "तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा" हे गाणे बांधले, ते खूप प्रसिद्धही झाले. तेंव्हा सज्जाद म्हणाले होते "अब मेरे गाने तो क्या उसकी परछाइयाँ भी चलने लगी है". योगायोग म्हणजे या गाण्यातही शम्मी होती पण नायिकेची मैत्रीण म्हणून आणि गाणे होते यावेळी नायिकेला म्हणजे नूतनला उद्देशून!

तर असे हे सज्जाद यांचे अप्रतिम गाणे. तुम्हालाही आवडेल असे वाटते. धन्यवाद.




Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandani - Sangdil (1952) - Lyricist Rajendra Krishna - Composer Sajjad Hussain - Singer Talat Mahmood

I always wondered why God is so kind to only few. E.g. Ordinary actors like Biswajeet, Joy Mukherjee, Bharat Bhushan, Pradeep Kumar, etc. got a playback singer like Mohammed Rafi, and Shammi, not so great actress, was given a role where the film's hero describes her beauty in a song! Yes, I am talking about the song I am presenting today. This song is from the 1952 film "Sangdil" and is called "Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandni"; the film's hero Dilip Kumar actually sings it for the heroine Madhubala, but the person in front of him is Shammi!

"Sangdil", a 1952 Hindi film was based on a famous novel from 1847 viz. Jane Eyre by Charlotte Brontë. It was the second film where Dilip Kumar and Madhubala worked together. The film was quite ordinary, but due to Rajendra Krishna's excellent lyrics and Sajjād's wonderful music, it earned nearly 95 lakh rupees at that time (equivalent to 100 crores today)!

There are a total of 8 songs in the film - including 2 solos and 1 duet by Talat Mahmood, 1 solo and 1 duet each by Lata and Asha, and 1 solo each by Geeta Dutt and Shamshad Begum. Among these, “Yeh Hawa..” song was the most popular. It is still played on the radio today.

In the film, the hero Shankar (Dilip Kumar) and Kamala (Madhubala) are childhood friends who later drifted apart. Despite that, they still love each other. Meanwhile, Shankar meets Mohini (Shammi). Mohini falls in love with Shankar. At her insistence, Shankar sings "Yeh Hawa Yeh Raat Yeh Chandni," but his mind is on Kamala. What happens next is best seen in the film.

The song begins with just 3 seconds of harmonium, followed by Talat's calm, gentle tune. After the sitar sounds, the actual song begins. Dilip Kumar, in Talat's voice, tells Shammi:

Ye Hawa Ye Raat Ye Chandni, Teri Ik Ada Pe Nisar Hai
(Nisar hona = to surrender, to sacrifice)
Mujhe Kyun Na Ho Teri Arzoo, Teri Justuju Mein Bahar Hai
(Arzoo = desire, Justuju = search)

Although this song is romantic, it also has a touch of the hero's sadness he being away from his lover. Therefore, throughout the song, a background of Sarangi plays, showcasing Sajjād's excellent thought process.

Before the first stanza, there is about 15 seconds of music, with Sarangi and Tabla, blending sorrow and romance. Her beauty is described, and she is mesmerized, but when she comes to her senses and slightly pulls back, even the Sarangi's rhythm slows down a bit, wow! The hero says:

Tujhe Kya Khabar Hai O Bekhabar, Teri Ek Nazar Mein Hai Kya Asar

After emphasizing the word "Bekhabar," a short piece of Sarangi plays, listen to it. When the line is repeated, an excellent filler is played in the middle.

Jo Gazhab Mein Aaye Toh Qahar Hai, Jo Ho Meherban Toh Qarar Hai
(Gazhab, Qahar = anger, wrath; Qarar = peace)

The music before the second stanza is similar to the first but with slight variations, which perceptive listeners will notice. Instead of Sarangi, the Sitar and possibly Violin are used. As the song begins, a small Sarangi piece connects it to the original tune. Again, Sajjād's craftsmanship is evident.

Teri Baat Baat Hai Dilnashin, Koi Tujhse Badhke Nahi Hansi
(Dilnashin = captivating)
Hai Kali Kali Mein Jo Mastiyan, Teri Aankh Ka Ye Khumar Hai
(Mastiyan, Khumar = intoxication)

Two different words with the same meaning appear in the same line and in both verses, a skill of lyricist Rajendra Krishna.

Until now, the captivated Shammi, comes to her senses when the song ends, and she finds Dilip Kumar looking out of the window at Madhubala. Shammi looks good in the song; but it feels like Madhubala would have been even better. In today's world of Artificial Intelligence, one can very well see Dilip Kumar singing the song in real for Madhubala instead of Shammi.

Talat had lent his voice to Dilip Kumar in many films. E.g. Babul (Composer: Naushad), Aarzoo, Tarana (Anil Biswas), Daag, Shikast (Shankar Jaikishan), Devdas (S. D. Burman) and Footpath (Khayyam). For Dilip Kumar's "Tragedy King" image, I think Talat's voice suited more than any other singer. Anyways.

Sajjad had composed this song in Raag Darbari Kanada. Madan Mohan copied its composition and gave a hit number "Tujhe Kya Sunaoon Main Dilruba" in the 1958 film "Aakhri Daao". At that time, Sajjād said, "Not just my songs, but its imitations are also getting popular!" Interestingly, in this song also, Shammi was present, but as a friend of the heroine, and the song was dedicated to the heroine, Nutan!

Let’s hear Sajjād's memorable composition. I think you will also like it. Thank you.