Sunday, 30 March 2025

आरंभ-स्वर १ - आयेगा आनेवाला (Aayega Aanewala)


Namaskar friends, the English version of this blog follows the Marathi version below.

नमस्कार. नोव्हेंबर २०१३ पासून जेंव्हा ब्लॉग लेखनाला सुरुवात केली तेंव्हापासून जुनी हिंदी गाणी, संगीतकार, गायक हे माझ्या लेखनाचे आवडीचे विषय राहिले आहेत. जसे मी अनेक ज्ञात/अज्ञात संगीतकारांवर लिहिले तसेच "अनमोल रतन" मालिकेतून हिंदी चित्रसृष्टीच्या सुवर्णकाळातील अनेक उत्तमोत्तम गीते आपल्यासमोर सादर करण्याचा मी प्रयत्न केला. बऱ्याच जणांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. पण नवीन काहीतरी चालू करावे असे गेले काही वर्षे डोक्यात घोळत होते, काय ते सुचत नव्हते. आणि अचानक एक दिवस एक कल्पना सुचली. 

गेले ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लक्षपूर्वक गाणी ऐकताना असे लक्षात आले की बरीच गाणी ही फक्त स्वरांनी म्हणजे गायक/गायिकेच्या आवाजाने किंवा अतिशय अल्प संगीत वाद्यांनी चालू होतात. किंबहुना तेच त्याचे वैशिष्ट्य ठरते. उदा. किशोरकुमारचे "खई के पान बनारसवाला", किंवा आशाबाईंचे "आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूँ", किंवा लताचे "नाम गुम जायेगा". अशा प्रकारची सर्वात जास्त गाणी संगीतकारांमध्ये सी. रामचंद्र तर गायकांमध्ये लताने केलेली आहेत.

अशाच अवीट गोड गाण्यांविषयीची एक नवीन मालिका आपल्यासमोर घेऊन येत आहे - "आरंभ-स्वर".

नावाप्रमाणेच यात सादर केलेली सर्व गाणी ही फक्त स्वरांनी किंवा कमीत कमी संगीताने (ताल/ठेका नाही) सुरुवात झालेली असतील. या मालिकेला आधी "प्रथम-स्वर" असे नाव सुचले होते. नंतर इंटरनेट वर शोधल्यावर हे नाव याआधीच वापरले गेले आहे असे लक्षात आले. त्यानंतर दोन नावे सुचली - "आरंभ-स्वर" आणि "प्रारंभ-स्वर". माझे मित्र श्री. राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्याकडून "आरंभ" आणि "प्रारंभ" मधील फरक समजावून घेतला आणि त्यानंतर "आरंभ-स्वर" हे नाव नक्की केले. आमच्या कुटुंबाच्या स्नेही सौ. साधना शिधये यांनी या मालिकेसाठी अतिशय योग्य आणि सुंदर असा लोगो बनवून दिला. 

आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ही मालिका सुरु करताना मला अत्यंत आनंद होत आहे. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी मी एक गाणे सादर करत जाईन. यात चित्रपट आणि इतर संलग्न गोष्टींबद्दल कमी आणि गाण्याबद्दल जास्त लिहिणार आहे. गाण्यातील सौन्दर्यस्थळे जास्तीत जास्त ५००-६०० शब्दात उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. 

मला खात्री आहे की हा उपक्रम आपल्याला नक्की आवडेल. तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि असेच प्रेम राहू द्या. ब्लॉगला फॉलो केले नसेल तर नक्की करा. तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा. धन्यवाद.

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

आयेगा आनेवाला - महल (१९४९) - गीतकार नक्शाब - संगीतकार खेमचंद प्रकाश - गायिका लता मंगेशकर


"महल" चित्रपट १९४९ साली प्रदर्शित झाला. दिग्दर्शक कमाल अमरोही. हिंदी चित्रसृष्टीतील पहिला भयपट. अशोककुमार, केवळ १५ वर्षांची मधुबाला आणि कनू रॉय यांच्या प्रमुख भूमिका. नायिका कामिनीच्या भूमिकेसाठी प्रथम त्या काळची विख्यात अभिनेत्री सुरैय्याचा विचार झाला होता, पण शेवटी अमरोहींच्या आग्रहाखातर मधुबालाची निवड झाली. चित्रपटात एकूण ७ गाणी, त्यातील लताची ३ सोलो आणि चार राजकुमारीची, सारीच लाजवाब!

"महल" ची रेकॉर्ड जेंव्हा बाजारात आली तेंव्हा या गीताची गायिका म्हणून कामिनी (नायिका) नाव होते, रेडिओवरही तेच सांगत असत; पण रसिकांनी खऱ्या गायिकेचे नाव सांगा म्हणून आग्रह धरल्यावर लताचे नाव सर्वांना समजले. सुरुवातीला हे गाणे उमादेवी (प्रसिद्ध विनोदी अभिनेत्री टुणटुण) गाणार होती पण तिने नकार दिल्यावर हे गाणे लताकडे आले. या चित्रपटाने मधुबाला आणि लता दोघींनाही प्रचंड प्रसिद्धी मिळाली. हे गीत खूप लोकप्रिय झाले. हिंदी चित्रपटातील हे पहिले भुताटकीचे गाणे (Haunting Melody) होते, यानंतर अनेक चित्रपटातून अशा प्रकारची गाणी आली. "महल" त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई केलेला चित्रपट ठरला. परंतु दुर्दैवाने हे यश पाहायला संगीतकार खेमचंद प्रकाश आपल्यात नव्हते.

हरी शंकर (अशोककुमार) एका वादळी रात्री मोडकळीस आलेल्या महालात आसरा घेतो. भिंतीवरचे चित्र कोसळून खाली पडते. ते बघितल्यावर त्याला प्रचंड धक्का बसतो, कारण त्या चित्रातला दाढीधारी मनुष्य हुबेहूब त्याच्यासारखा दिसत असतो! तो दाढीधारी मनुष्य व त्याची प्रेयसी कामिनी (मधुबाला) दोघांचाही दुर्दैवी अंत झालेला असतो. हरी शंकरला कामिनीचे भूत महालात वावरत असल्याचा भास होत राहतो.

या गीताची सुरुवातच वेगळी आहे. घड्याळाचे दोन ठोके पडतात. जवळपास १४ सेकंद ठोक्यांची गूँज ऐकू येते. त्यानंतर काही सेकंद गूढ शांतता. हरी शंकर अजूनही धक्क्यातून सावरलेला नसतो, अशातच त्याला ऐकू येतो तो एका स्त्रीचा मंजुळ स्वर "ख़ामोश है ज़माना" आणि लगोलग पाच ओळींचा शेर.
 
खामोश है ज़माना, चुपचाप है सितारे
आराम से है दुनिया, बेकल है दिल के मारे
ऐसे मे कोई आहट, इस तरह आ रही हैं
जैसे की चल रहा हो, मन में कोई हमारे
या दिल धड़क रहा है, इक आस के सहारे 

एखाद्या चित्राला भराव यावा म्हणून जसं चित्राच्या पार्श्वभागी रंग भरतात तसं या पाच ओळींच्या पाठीमागून आणि मधून संगीत येतं. प्रामुख्याने पियानो आणि व्हायोलिन ही वाद्ये वापरून निर्माण केलेलं अप्रतिम संगीत गाणे आणि चित्रपटाच्या गूढतेत, सौंदर्यात भर घालतं. संपूर्ण शेर अतिशय संथ लयीत आहे कारण तिला त्याला एक संधी द्यायची आहे, शोधण्याची. आणि त्याने शोधताच गाणे जलद लयीत सुरु होते. इथे संगीतकार दिसतो! 

या पाच ओळींनंतर गाण्याचा मुखडा येतो  - फक्त एका ओळीचा - आयेगा आनेवाला आयेगा आयेगा. अजूनही हरी शंकरला कोण गातंय ते माहिती नाही. तो शोध घेत घेत दिवाणखान्यात येत असतो तेंव्हाच्या त्याच्या पायांच्या हालचालींना समर्पक असे पियानोचे तुकडे लाजवाब! तब्बल १५ वेळा वाजतात ते! शेवटी गाणे सुरु होते ३ मिनिटे आणि ४६ सेकंदांनी! 

एवढे मोठे ओपनिंग असलेले हे एकमेव गाणे असावे. पहाडी रागात बांधलेले हे गाणे म्हणजे शब्द, चाल, वादन, गायन आणि अभिनय सगळ्यांचं एक अप्रतिम मिश्रण आहे. या गाण्याची संगीतरचना आणि तालीम पाच दिवस चालू होती. खेमचंदजींनी लताला हे गाणे पुन्हा पुन्हा म्हणायला लावले. त्यात ते कधी एखाद्या मात्रेचा फरक कर, तर कधी एखादी तान बदल, तर काही नवीनच रचना कर असं करत होते, त्यामुळे प्रत्यक्ष अंतिम गाणे रेकॉर्ड व्हायला तब्बल पाच दिवस लागले!


गाण्यातील प्रत्येक ओळीविषयी काहीतरी लिहिण्यासारखे आहे, पण शब्द-मर्यादेमुळे सर्व लिहीत नाही. 

मला नेहमी असं वाटतं की लता जेंव्हा गात असते तेंव्हा ती नुसती स्वर छेडत नसते तर तिच्या शब्दफेकीतून त्या पात्राच्या भाव-भावना अधोरेखित करत आपल्यापर्यंत पोचवत असते. हे आपल्याला गाणे ऐकताना पदोपदी जाणवत रहातं. 

"बेकल", "आहट", "हमारे", "धड़क" या शब्दांचे उच्चारण ऐका. "या दिल धड़क रहा है" या ओळीत "धड़क" शब्द लताने असा काही उच्चारलाय आणि खेमचंद प्रकाश यांनी पियानोच्या अवरोहातील सुरावटीतून असा काही भास निर्माण केलाय की आपलंच हृदय धडकतंय असं वाटतं. अंतऱ्यातील "दीपक", "बग़ैर", या शब्दांचे उच्चारण किती छान आहे ते पहा.  "दिल", "कोई" या शब्दांवरच्या छोट्या मुरकी ऐका, कमाल केली आहे. 

श्वासावरचे लताचे नियंत्रण अफलातून आहे. उदा. "तड़पेगा कोई कब तक, बे आस बे सहारे" ही ओळ दुसऱ्यांदा म्हणताना आधीच्या "बे सहारे"च्या छान मुरकीनंतरच्या येणाऱ्या "तड़पेगा" शब्दानंतर तिचा पाव सेकंदाचा पॉज ऐका, तसंच दुसऱ्या कडव्याच्या तिसऱ्या ओळीच्या वेळेसही "कश्ती" शब्द दुसऱ्यांदा म्हणताना. केवळ कमाल आहे! तब्बल ७ मिनिटांचे हे गाणे आपल्याला अतीव आनंद देते.

या मालिकेचे जे शीर्षक आहे त्याला १००% साजेसं हे गीत आहे. "आरंभ-स्वर" चे हे सरताज गीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

(Rights of this video are still with the rightful owners. 
Used here only for viewing pleasure of music lovers) 


-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-


Namaskar. Writing about Hindi songs from the golden era of Hindi films (1940-1965) has been my passion since I started blogging in Nov 2013. So far, I have managed to write about known and forgotten music composers as well as present some wonderful songs of yesteryears through my ‘Anmol Ratan’ series. However, since last few years, I was longing to try something new but not getting what to do. Suddenly one day I had this idea.

I have been listening to the songs passionately for over 30 years now, and I realized that there are many songs which start only with the voice of the singer or very little music. E.g. Kishore Kumar’s “Khai ke paan banaraswala” or Ashaji’s “Aao hujur tumko sitaron mein le chaloon” or Lata’s “Naam gum jaayegaa”. The famous music composer late C. Ramchandra was the master of such songs, while Lata tops the list of singers who has sung such type of songs.

I would like to present such songs through my new musical series "आरंभ-स्वर" meaning songs that begin with voice. I am thankful to my friend Adv. Rajendra Thakurdesai for clarifying the difference between "आरंभ" and "प्रारंभ". I am also grateful to our family friend Mrs. Sadhana Shidhaye for creating a beautiful logo for this musical series.

I am extremely happy to start this musical series today on the auspicious occasion of Gudhi Padwa which also marks the start of the Hindu new year.  I would be presenting one song following the theme of on the first Sunday of every month. I would write more about the song and less about the movie. It would be my endeavour to highlight the USP of the song and the composition. I am sure you would appreciate it, like it.

Please do share your feedback on the blog series. Please feel free to forward this amongst your circles. Thank you.

-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-o-

Aayega Aanewala – Mahal (1949) – Lyricist Nakshab – Composer Khemchand Prakash – Singer Lata Mangeshkar

In Oct 1949, “Mahal” directed by Kamal Amrohi was released. It is supposedly the first horror movie in the Hindi film history. Ashok Kumar, Madhubala, and Kanu Roy were the main stars. For the female lead role Kamini, earlier Suraiyya’s name was proposed, however upon Amrohi’s insistence, 15-year-old Madhubala was chosen. The movie contains 7 songs, out of which 4 were sung by Rajkumari and 3 by Lata Mangeshkar.

The LP record of the movie carried Singer’s name for this song as “Kamini” which was the name of the heroine since in those days there was no protocol to print real Singer’s names. Even Vividh Bharati used to mention Kamini as the singer. However, upon insistence from many listeners and singers themselves, Lata’s name was revealed as the Singer! Initially, Umadevi aka Tuntun (the famous comedian actress) was chosen to sing this song; but she rejected it due to her other contractual obligations, and thus came in Lata. And rest was history for both Madhubala and Lata.

The song became a rage for quite a long time. “Aayega Aanewala” is probably the first haunting melody in Hindi films’ history. It started a trend of such haunting songs in Hindi films later. “Mahal” happened to be the biggest grocer of 1949, its songs attained huge popularity; however unfortunately Khemchand Prakash was no more to see this grand success.

A man buys an ancient mansion that belonged to a couple who had died tragically 30 years ago. When Hari Shankar (Ashok Kumar) goes to a bedroom, a photograph falls from the wall and Shankar is astonished to find the man in the photograph looks exactly like him. He then has visions of the wife's ghost (Kamini – Madhubala) wanting him back.

“Aayega Aanewala” is an exceptional song in the sense that it begins when clock strikes twice. Its echo is heard for almost 14 seconds. Then, Kamini is heard singing “Khamosh Hai Zamana” and Shankar follows her voice.

Khamosh hai zamana, Chupchap hai sitare

(Silent is this world, Silent are the stars)

Aaram se hai duniya, Bekal hai dil ke maare

(The world is content, but the lovers are restless)

Aise mein koi aahat, Is tarah aa rahi hai

(In this stillness, I am startled by the subtle sound)

Jaise ki chal raha ho, Man mein koi hamare

(It seems that someone is walking within my heart)

Ya dil dhadak raha hai, Ik aas ke sahare

(Or is it the sound of my heartbeat? It is beating in the hope that….)

Aayega Aayega Aayega, Aayega Aanewala Aayega

(Someone will come, the one who must come will come)

What follows each of the above lines are wonderfully orchestrated music pieces that only enhances the haunting nature and beauty of this song. Khemchand ji has created this magic only by using 2 instruments i.e. Piano and Violin. Just observe the music pieces just before the song gets into a faster rhythm, simply superb!

The actual song starts at 3 minutes and 46 seconds! This is perhaps the one of the few songs which has more than 3 minutes of opening. The song was composed in the Raag Pahadi. It is the perfect example of synchronization between Lyrics, Composition, Orchestration, Singing and the acting. This song took almost 5 days to get it recorded. Khemchand used to make minor changes and ask Lata to sing again which caused the delay!

I always felt that Lata does not just sing a song, but through her rendering, her voice control, her pronunciation and even with her pauses, she conveys the feelings of the character she sings for. This song is no exception.

Just listen to the song carefully and with attention, and you will realize how Lata has pronounced words like “Bekal”, “Aahat”, “Hamare”, etc. And when she sings “Ya dil dhadak raha hai” with an emphasis on the word “dhadak”, one can correlate one’s own heart beating fast. That’s the power of Lata’s rendering.

You can salute her voice control when she sings 2 lines in one breath, and we will not even realize when she had taken a beautiful pause just after words like “Tadpega” in the first stanza or the word “Kashti” in the second one. The 7-minute song leaves its strong impression upon us even after it ends.

The song is a perfect fit for the title of this musical series "आरंभ-स्वर". I can easily claim this song to be the King of "आरंभ-स्वर". Hope you would like it.


P.S.:- the video of the song is given just before the start of the English version of this blog. Please do watch it.