Sunday, 27 November 2022

अनमोल रतन - 13 : Kishore Kumar - Sudha Malhotra - A rare combination!

Namaskar Friends,

After a gap of almost a year, restarting my series - अनमोल रतन - wherein I present some of the great songs of yesteryears. Hope you would like this one too.

English version follows the Marathi version below.


Song #13: कश्ती का ख़ामोश सफ़र है (Kashti Ka Khamosh Safar Hai)


Film:
Girlfriend (1960)

Director: Satyen Bose


Cast: Kishore Kumar, Waheeda Rehman, Nasir Hussain, Leela Mishra, Daisy Irani and Dhumal






हे गाणं म्हणजे दोन प्रेमी जीवांमधला एका होडीतून जात असताना झालेला अप्रतिम संवाद आहे. त्याला तिला काही सांगायचे आहे, आणि तिचेही कान त्याचे म्हणणे ऐकून घ्यायला आतुरले आहेत. पण तिची "शर्मिली निगाहें" जोवर परवानगी देत नाहीत आणि त्याची "बेताब उमंगे" त्याला जोवर थोडी फुरसत देत नाहीत तोवर तो बोलू शकत नाही. "शर्मिली निगाहें" आणि "बेताब उमंगे" या शब्दांनी साहिरनी दोघांच्या मनाची अवस्था किती अचूक पकडली आहे! दोघांची तगमग होते आहे, आणि ती तगमग साहिर यांच्या समर्थ लेखणीने आपल्यापर्यंत व्यवस्थित पोचवली आहे. त्याला तितकीच सुंदर चाल हेमंत कुमार यांनी लावली आहे. किशोर कुमार आणि सुधा मल्होत्रा या दोघांनी दोन प्रेमी जीवांची तगमग आपल्या स्वरातून १००% जिवंत केली आहे.

गाणं सुरु होतं व्हायोलिनच्या आर्त सुरांनी आणि मग ऐकू येतात बासरीचे मंद हळवे सूर ज्यांनी गाण्याचा मूड परफेक्ट सेट होतो. साधारण २७व्या सेकंदाला किशोरचा खर्जातला आवाज ऐकू येतो. अतिशय नितळ आवाज, जोडीला बासरी आणि मग सुरु होतो दोघांमधला संवाद - ऐकण्यासारखा आहे. सुधा मल्होत्रा यांनीही सुरेल साथ दिली आहे. शेवटची ओळ किशोरकुमारने खास त्याच्या शैलीत अशी म्हटली आहे की बस्स!

चित्रपटाचा व्हिडिओ कुठेही उपलब्ध नाही, त्याचबरोबर चित्रपटाविषयी कुठेही माहिती मिळत नाही. त्यामुळे रेडिओ सिलोन वरील बिनाका गीतमालाचे सुप्रसिद्ध सादरकर्ते अमीन सायानी यांचे साधारण दीड मिनिटांचे निवेदन असलेला या गाण्याचा व्हिडिओ सादर करत आहे. गाणं कसं वाटलं ते ब्लॉगवर comment मध्ये जरूर लिहा. धन्यवाद.


This purely is a romantic song where the Boy wants to say something to the Girl, the Girl is equally eager to hear him; however, he cannot utter a single word until her "शर्मिली निगाहें" and his "बेताब उमंगे" permit/allow him to share his feelings. How beautifully Sahir, through these 4 words, has so aptly described the feelings of both the young love birds! The fact that both are travelling in a boat has been depicted wonderfully through the music composed by Hemant Kumar. And what a sweet, calm and excellent singing by both Kishore Kumar and Sudha Malhotra!

The mood of the song is set by beautiful pieces of Violin and Flute at the start, and what follows is a divine voice of Kishore Kumar in lower octave (which is rare). Sudha Malhotra too has sung well. This is perhaps the rarest of the songs of this duo. The last line of the song is sung by Kishore Kumar in his typical style. Please do also read the lyrics which are too good.

The video of the movie is not available on the internet; hence I have shared here an audio version with some great commentary by the legendary Amin Sayani famous for his Binaca Geetmala on Radio Ceylone once upon a time.

Hope you would enjoy the song. Please do leave a comment on the blog itself. Thank you.