Friday, 3 April 2020

अनमोल रतन - 9 : Jamal Sen? Who??

Namaskaar Friends!

Here I am, once again, with another musical piece from the Golden Era of Hindi Film Music. I am extremely happy to present the 9th song of the Anmol Ratan series.

Thank you so much for your amazing response and kind words of appreciation so far. It encourages me more to bring you the jewels of music.

Today, I would like to present a gem of a song from a lesser known, or rather, should I say, unknown Hindi film music composer - Jamal Sen - on his 41st death anniversary on 12th April 2020.

English version of the blog is at the end of the Marathi version below.

Song #9: सपना बन साजन आये (Sapna Ban Saajan Aaye)



Film       : Shokhian (1951)

Director : Kidar Sharma

Cast : Premnath, Suraiyya, Jeevan 
Jamal Sen
Music Composer

Kidar Sharma
Director & Lyricist
Lata Mangeshkar
Singer






हिंदी चित्रपटात संगीत ऐकू आले ते १९३१ साली आलेल्या "आलम आरा" या बोलपटापासून. तेंव्हापासून गेल्या ९० वर्षात हिंदी सिनेसंगीत विविध प्रांतातील संगीताने हळूहळू समृद्ध होत गेले. आपल्या महाराष्ट्रातून गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव, स्नेहल भाटकर (प्रसिद्ध अभिनेते कै. रमेश भाटकर यांचे वडील), दत्ता डावजेकर, रामचंद्र चितळकर (सी. रामचंद्र), वसंत देसाई, सुधीर फडके, लक्ष्मीकांत कुडाळकर (लक्ष्मीकांत-प्यारेलाल जोडीमधले), भास्कर चंदावरकर, हृदयनाथ मंगेशकर  ते आजच्या अजय-अतुल पर्यंत अनेकांनी आपल्या मातीतल्या संगीताची गोडी हिंदीत नेली आणि तितकीच लोकप्रिय केली. बंगालमधून पंकज मलिक, अनिल विश्वास, सलील चौधरी, सचिनदेव बर्मन, हेमंत कुमार, सरदार मलिक, राहुलदेव बर्मन, किशोर कुमार, भूपेन हजारिका, बप्पी लाहिरी,  जतीन-ललित, अनु मलिक, ते आजकालच्या शंतनू मोईत्रा आणि प्रीतम यांच्यापर्यंत सर्वानी बंगाली संगीताची मिठाई आपल्यामध्ये भरपूर वाटली. महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन प्रांत हिंदी सिनेसंगीतात कायम आघाडीवर राहिले. याचबरोबर उत्तर प्रदेशातून नौशाद , पंजाब प्रांतातून गुलाम हैदर, श्यामसुंदर आणि ओ. पी. नय्यर यांनीही हिंदी सिनेसंगीतात मोलाची भर घातली. संगीतकार मदन मोहन हे इराक मध्ये जन्मलेले तर जयदेव नैरोबी मध्ये पण या दोघांनी आपल्या संगीतात विविध प्रयोग करून सिनेसंगीत आणखी समृद्ध केले. सज्जाद हुसेन हे मध्य प्रदेशात जन्मलेले पण अरबी संगीताचा उपयोग मोठ्या खुबीने त्यांनी आपल्या रचनांमध्ये केला.

अशा सर्व गुणी संगीतकारांमधील एक नाव म्हणजे राजस्थान मध्ये जन्मलेले आणि राजस्थानी लोकसंगीताचा खजिना हिंदी चित्रपटात आणणारे जमाल सेन. दुर्दैवाने आज हे नाव आपल्याला आठवणारही नाहीत. कारण त्यांची कारकीर्द तशी छोटी. स्वभावातील मानीपणा, कोणासमोरही काम मागायला न जाण्याचे धोरण आणि व्यावहारिक चातुर्य नसल्यामुळे जमाल सेन यांना फारसे काम मिळाले नाही. अवघ्या ११ वर्षात ११ चित्रपट एवढीच काय ती त्यांची कारकीर्द! त्यामुळे त्यांच्या नावाने विकिपीडियाचे साधे एक पानही लिहिलेले नाही.

जमाल सेन यांनी संगीतबद्ध केलेले हिंदी चित्रपट:

शोखियां (१९५१)

दायरा (१९५३)

धरमपत्नी (१९५३)
रंगीला (१९५३)
कस्तुरी (१९५४) - सहसंगीतकार पंकज मलिक
रितू विहार (१९५४)
पतितपावन (१९५५)
अमर शहीद (१९६०)
बगदाद (१९६१)
अल्हा उदाल (१९६२)
मनचली (१९६२)

जमाल सेन मूळचे राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजनगढ गावचे. त्यांचे एक पूर्वज केसरी सेन हे संगीत सम्राट तानसेन यांचे शिष्य होते असे म्हणतात. जमाल यांचे वडील जीवन सेन हे दरबारी गायक होते. त्यांचे आजोबा (आईचे वडील) हे रवींद्रनाथ टागोरांचे धाकटे भाऊ होते अशी माहिती इंटरनेटवर कुठेतरी वाचल्याचे आठवते. जमाल सेन स्वतः एक कथ्थक नर्तक होते. ऑल इंडिया रेडिओ कलकत्ता इथे काही काळ त्यांनी गायक म्हणूनही नोकरी केली. पुढे ते तत्कालीन सुप्रसिद्ध संगीतकार मास्टर गुलाम हैदर यांचे सहायक बनले. १९४१ साली अतिशय गाजलेल्या "खजांची" या गुलाम हैदर यांनी संगीत दिलेल्या चित्रपटामध्ये जमाल सेन यांनी तबला आणि ढोलकीही वाजवली होती. 

१९५१ साली तत्कालीन प्रख्यात दिग्दर्शक केदार शर्मा हे "शोखियां" नावाचा चित्रपट बनवत होते. हा चित्रपट वनवासी जीवनावर आधारलेला होता. त्यासाठी केदार शर्मा एका अशा संगीतकाराच्या शोधात होते ज्याला लोकसंगीताची उत्तम जाण आहे. वास्तविक केदार शर्मा यांचे आवडीचे संगीतकार रोशन (१९५० - बावरे नैन आणि १९६४ - चित्रलेखा) आणि स्नेहल भाटकर  (१९४७ - नीलकमल - राजकपूरचा पहिला चित्रपट,  १९४८ - सुहाग रात, १९५३ - गुनाह  आणि १९६३ - हमारी याद आयेगी - याच शब्दांचे मुबारक बेगम यांचे तनुजावर चित्रित झालेले गाणे आजही रसिकांना माहिती आहे) हे होते,  पण "शोखियां" साठी या दोघांपैकी कुणाचीही निवड न करता केदार शर्मा यांनी जमाल सेन यांच्यातील गुण हेरून व त्यांची राजस्थानी पार्श्वभूमी लक्षात घेऊन या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. ही त्या काळात फार मोठी गोष्ट होती. आणि जमाल सेन यांनी त्या संधीचे सोने केले.

पुढे १९५३ साली आलेल्या "दायरा" (अर्थ: वर्तुळ) या कमाल अमरोही दिग्दर्शित चित्रपटाचे संगीतही जमाल सेन यांनी दिले, या चित्रपटात एकूण ८ गाणी होती. पण त्यातील मुबारक बेगम आणि महंमद रफी यांनी गायलेले "देवता तुम हो मेरा सहारा" हे भजन जमाल सेन यांची संगीताची ताकद दाखवून देते. आजही हिंदी चित्रपटातील Top १० भजने निवडायची म्हटली तर या भजनाचा नंबर त्यात पहिल्या पाचांत नक्की लावावा लागेल. 

"शोखियां" आणि "दायरा" या दोन चित्रपटांचे संगीत भल्याभल्यांनाही अचंभित करणारे ठरले. जमाल सेन यांची ओळख प्रामुख्याने याच दोन चित्रपटांनी होते. 

"शोखियां" आणि "दायरा" च्या संगीतातील प्रतिभा जमाल सेन नंतर फारसे दाखवू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

मला जमाल सेन माहिती झाले ते १९९२/९३ साली. सूरत येथे माझी पहिली नोकरी करत होतो तेंव्हा एका रविवारी तेथील बाजारातून फिरत असताना एका Music Store मध्ये HMV ची "Rare Gems Lata Mangeshkar" ही Cassette दिसली. तोपर्यंत जुन्या हिंदी गाण्यांचा शौक जडला असल्या कारणाने मी २ Cassettes चा तो संच विकत घेतला. घरी येऊन जेंव्हा ती गाणी ऐकायला लागलो तेंव्हा त्यात आज सादर करत असलेले "शोखियां" चित्रपटातील "सपना बन साजन आये" हे गाणे होते. त्या दोन्ही Cassettes मधली लताची सर्वच गाणी माझ्यासाठी Rare होती, त्यामुळे खूप आवडली.

"शोखियां" हा चित्रपट काही खास नाही. १६ व्या शतकातील एका संस्थानाचा  राजा तांबा त्याच्या इमानदार सरदार रणबीर आणि सैनिकांना एकत्र करून पोर्तुगीजांच्या बरोबरील लढाईची तयारी करत असतो. दुसरीकडे राजाचा धाकटा भाऊ रंगीला राव हा मौजमस्ती करण्यात मश्गुल असतो. राजा तांबाने आपली राजकुमारी चिंतामणी (नझीरा) हिला रंगीला रावच्या घरी ठेवलेले असते जेणेकरून ती संगीतात रमून जाईल. इकडे राजा तांबा त्याचा खजिना राजकुमारी चिंतामणीला देऊन येण्याची जबाबदारी इमानदार सरदार रणबीर (प्रेमनाथ) वर सोपवतो. सोबतीला शेरसिंगलाही (जीवन) देतो कारण त्याला जंगलाच्या प्रदेशाची माहिती असते. जंगलातून जात असताना रणबीरची गाठ सांवली (सुरैय्या) नावाच्या एका वनवासी मुलीशी पडते. शेरसिंगने सांवलीला रणबीरला मारण्यासाठी पाठवलेले असते, पण होते उलटेच, सांवली रणबीरच्या प्रेमात पडते. रणबीर तिला आपल्याबरोबर घेऊन खजिना राजकुमारी चिंतामणीला सुपूर्त करण्यासाठी जातो. सांवलीला राजमहालात दासी बनायचे असते, पण रणबीर तिला सांगतो की तिची खरी जागा ही जंगल आहे. तिची चंचलता, शोखियां (चेष्टेखोर स्वभाव), तिचा अल्लडपणा राजमहालात चालणार नाही हे तो तिला समजावून सांगायचा प्रयत्न करतो. पण सांवली ऐकत नाही व महालातच दासी म्हणून राहायचा निर्णय घेते. रणबीर सांवलीची ओळख राजकुमारी चिंतामणीशी करून देतो आणि सांवलीला राजकुमारीची दासी म्हणून काम देतो. राजकुमारी रणबीरवर प्रेम करत असते व तो लगेच परत जाणार असे कळताच नाराज होऊन म्हणते "आये भी तो सपने की तरह". त्यानंतर राजकुमारी रणबीरला ढोलकीला साथीला घेऊन गाणे सुरु करते - सपना बन साजन आये....

गाण्याची सुरुवात ढोलकीने होते. आणि मग येतो तो लताचा अफलातून गोड आवाज.....आणि वीणेचा मधुर झंकार ...

संपूर्ण गाण्यामध्ये ढोलकी, वीणा, पेटी, झांजा आणि बासरी एवढीच वाद्ये आपल्याला ऐकू येतात. लताच्या हरकती/मुरकतींनी गाण्याच्या अप्रतिम चालीला अधिकच सुंदर बनवले आहे.  उ.दा. "झूले खूब झुलाए", "झोली में भर लाए" आणि "फूले नहीं समाए" या ओळींमधील "झुलाए", "लाए" आणि "समाए" या शब्दांवर घेतलेल्या हरकती केवळ लाजवाब! आणि "शरमाए" शब्द गातानाची नजाकत अनुभवा, किती नाजूक, लाजत मुरडत!! 

या गाण्याचे शब्दही किती सुंदर आहेत पहा, "सपना बन साजन आये", "सपने में साजन" नाही!  हे गाणं म्हणजे एक अप्रतिम स्वप्नरंजन आहे हे आपल्याला केदार शर्मांनी लिहिलेले त्याचे शब्द वाचल्यावर लक्षात येईल. जमाल सेन यांनी ही संपूर्ण सुरावट यमन कल्याण रागात बांधली आहे. यमन मधील Top ३ मध्ये या गाण्याची गणना व्हायला हरकत नाही. 

राजकुमारी चिंतामणी गाणे म्हणत असताना मागे चामर ढाळत उभ्या असलेल्या सुरैयाच्या चेहऱ्यावरील भाव बघा, राजकुमारीने रणबीरवर व्यक्त केलेले प्रेम बघून निर्माण झालेली असूया व राग या संपूर्ण गाण्यात सुरैय्याने काय सुरेख व्यक्त केला आहे! नायिका Background ला असूनही संपूर्ण गाण्यात तीच आपल्या लक्षात राहते हे दिग्दर्शकाचे कसब!

"शोखियां" हा चित्रपट यथातथाच असला तरी यातील संगीत हे याचे बलस्थान आहे. आपल्या पहिल्याच चित्रपटात जमाल सेन यांनी जी कमाल केली आहे त्याला तोड नाही. त्यांची आणखी काही गाजलेली गाणी:










आपल्या दुर्दैवाने जमाल सेन यांची गाणी संख्येने खूप कमी आहेत. पण "सपना बन साजन आये" आणि "देवता तुम हो मेरा सहारा" या दोन गाण्यांनी त्यांनी संगीताच्या जाणकारांमध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे. त्यांच्या प्रतिभेला सलाम आणि स्मृतीला वंदन.

आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आणि गाणे आवडले असेल. तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. 








Dear Friends,

Hindi Film Music has evolved over the period of last 89 years since it started in 1931 with the film "Alam Aara". Many composers from different parts of India have contributed greatly to enrich it. E.g. From Maharashtra, it was Govindrao Tembe, Master Krishnarao, Snehal Bhatkar (Father of famous artist Ramesh Bhatkar), Datta Davajekar (DD), C. Ramachandra (Ramchandra Chitalkar), Vasant Desai, Sudhir Phadke, Laxmikant Kudalkar (of famous Laxmikant-Pyarelal duo), Bhaskar Chandavarkar, Hridaynath Mangeshkar and Ajay-Atul, all of them have displayed their genius and brought in Marathi flavor to Hindi Film industry. From Bengal, composers like Pankaj Mullick, Anil Biswas, Salil Chaudhary, S. D. Burman, Hemant Kumar, Sardar Malik, R. D. Burman, Kishor Kumar, Bhupen Hazarika, Bappi Lahiri, Anu Malik and Jatin-Lalit have all enriched Hindi Film Music industry with the flavours of Bengali Folk and Rabindra Sangeet.

At the same time, Naushad who hailed from Uttar Pradesh brought in the Urdu flavor into the Hindi Film music while Ghulam Haider, Shyamsundar and O. P. Nayyar from Punjab introduced the Punjabi Rhythm. 

You would be surprised to know that Madan Mohan was born in Iraq, Jaidev in Nairobi, but both of them experimented with different genre of music and made the Hindi Film Music sweeter than before. Sajjad Hussain hailed from Madhya Pradesh, but such was his mastery over Mandolin and his genius, that he very skilfully used Arabian music into his Hindi songs.

One of the names from the above elite list of Hindi Film Music Composers is Jamal Sen from Rajasthan. Unfortunately, no one knows or remembers him today, due to his extremely short career spanning 11 years and 11 films! Obviously, he has not been credited with a single page on Wikipedia :-(

Jamal Sen's films:


Shokhiyan (1951)


Dayera (1953)

Dharmapatni (1953)
Rangeela (1953)
Kasturi (1954), with Pankaj Mullick
Ritu Vihar (1954)
Patit Paawan (1955)
Amar Shaheed (1960)
Baghdad (1961)
Alha Udal (1962)
Manchali (1962)


Jamal Sen was originally from a village viz. Sujangadh from Churu district in Rajasthan. It is believed that one of his ancestors Kesari Sen was a disciple of Sangeet Samrat Tansen. He himself was a Kathak dancer, worked as a Singer at All India Radio, Calcutta. Later he started assisting Master Ghulam Haider and used to play Dholak. He had contributed by playing Tabla and Dholak in a famous 1941 movie viz. "Khajanchi" composed by Ghulam Haider. 

In 1951, famous director Kidar Sharma was working on a movie "Shokhian" which was based on Tribal story. For this reason, Kidar Sharma was in search of a Music composer who had strong roots in Folk music. He came across Jamal Sen and offered him the movie after ignoring his regular composers Snehal Bhatkar and Roshan. Jamal Sen did not disappoint and came up with excellent compositions.

Later in 1953, Jamal Sen composed for "Daaera" directed by Kamal Amrohi (husband of Meena Kumari). A Bhajan "Devata Tum Ho Mera Sahara" became instant hit and still regarded as one of the best Bhajans that we have ever heard in Hindi films.

Till date, Jamal Sen is remembered for these 2 movies viz. "Shokhian" and "Daaera". However he could hardly repeat his genius in rest of the movies barring a song or two, and thus remained in oblivion until his death in 1979.

I happened to learn about Jamal Sen through the 2 cassettes "Rare Gems Lata Mangeshkar" that I had bought in 1992/93 while working in Surat. And now, thanks to YT, many of Jamal Sen's songs are available freely.

Today I am going to present a gem from the film "Shokhian" viz. "Sapna Ban Saajan Aaye" sung by none other that great Lata Mangeshkar. 

There is hardly anything to highlight about "Shokhian" movie. It's based on an Empire from 16th Century led by its king Tamba and ably supported by his loyal Commander Ranbir (Premnath). Tamba is busy preparing for war with Portugese while his daughter Rajkumari Chintamani (Nazeera) is at her Uncle Rangeela Rao's place engrossed in music. Tamba instructs Ranbir to hand over his entire wealth to Rajkumari Chintamani. When Ranbir proceeds for meeting Chintamani, he comes across a tribal girl Saavani who accompanies Ranbir to Chintamani's place, and seeing the luxurious life over there, decides to serve as Rajkumari's Daasi (maid servant). Rajkumari Chintamani is extremely happy in seeing Ranbir after a long time and thus wants to celebrate the occasion with a mehfil. And then comes this great song "Sapna Ban Saajan Aaye".

The song is composed in Raag Yaman Kalyan. Jamal Sen has used only 5 instruments viz. Dholak, Veena, Flute, Harmonium and Cymbals, and still managed to create the magic! If at all anyone prepares a list of Top 10 songs composed in Raag Yaman, this particular song can easily be in Top 3. Lata's masterly singing the words "Zulayein", "Laayein", "Samayein" and "Sharamayein" has only enhanced the beauty of the song.

You can watch the video of the song given above just before the English text.

The lyrics by Kidar Sharma - who also is the Director of the movie - is outstanding; it so aptly describes the emotions, in the form of dreams, of Saavani while she has fallen in love with Ranbir.

Music is the USP of "Shokhian" and the credit should go to Jamal Sen for creating an outstanding score in his very first movie as a Music Composer. Some of his other compositions are:











Unfortunately, Jamal Sen's work is very small compared to some of his contemporaries. However, he would always be remembered for "Sapna Ban Saajan Aaye" and "Devata Tum Ho Mera Sahara". Kudos to his genius.


Please let me know your feedback, if any. Request you to share this further with your friends and families. Thank you.